' पिकनिकला जाताय? जाण्यापूर्वी ही चेकलिस्ट बघूनच जा. – InMarathi

पिकनिकला जाताय? जाण्यापूर्वी ही चेकलिस्ट बघूनच जा.

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम |

===

रोजचा सकाळचा आलार्म, त्यानंतर पाठीवरचं ओझं सांभाळत, प्रवास करत गाठलेलं ऑफिस, टेन्शन्स, घरी आल्यावरही येणारा कंटाळा हे सगळ तुम्हालाही जाणवतय?

मग सावधान… तुम्हाला आता उपचारांची गरज आहे.

अर्थात हे उपचार कोणतेही कडु औषध किंवा महागडी ट्रिटमेंट नसून तुमच्या जिवलगांबरोबर धमाल पिकनीक आहे.

आठवड्यातील पाच दिवस प्रचंड काम केल्यानंतर विकेंडला छोटासा ब्रेक ही आता सगळ्यांची गरज बनली आहे.

 

picnic inmarathi
123rf.com

 

म्हणूनच दर आठवड्याच्या सुट्टीचा एक वेगळा प्लॅन शुक्रवारपासुनच तयार होऊ लागतो.

फिरण्याची प्रचंड आवड असणा-यांना अडव्हेंचर्स ठिकाणांची ओढ असते,  तर काही लोकांना केवळ लॉंग ड्राईव्ह आणि एखाद्या छानश्या हॉटेलमध्ये रिलॅक्स व्हायला आवडतं.

पण काहीही असो प्रत्येकाला पिकनिक ला बाहेर फिरून मजा येतेच ना?

 

relax inmarathi
real simple

 

कधीकधी काही क्षुल्लक कारणांमुळे ह्या सगळ्या गोष्टीं एन्जॉय करायला आपण मुकतो.

मात्र कधी कधी खुप आनंदाने सुरुवात केलेली पिकनीकही नंतर त्रासदायक ठरते. याची कारणं अगदीच लहानसहान असतात.

ती कारणं म्हणजे रस्ता चुकणं, प्रत्येकाचा प्राधान्यक्रम बदलणं, रुसवे-फुगवे  एवढी क्षुल्लक असतात.

 

fighting inmarathi
rawpixel

 

पण जर तुम्हाला ह्यासारख्या गोष्टींमुळे आपला पिकनिकचा मूड घालवायचा नसेल तर आम्ही देतोय एक चेकलिस्ट. प्रत्येक वेळी पिकनिक ला जाताना ही चेकलिस्ट तुम्हाला मदत करणार आहे.

तर कधीही पिकनिक ला जाताना लक्षात ठेवायच्या काही गोष्टी..

कुठं जायचंय जे नक्की करा.

पिकनिकचं ठिकाण आणि जायचा रस्ता नेमका माहित करून घ्या. अश्याने वेळेवर कन्फ्युजन होणार नाही. आणि झालेल्या गोंधळाने कुणाचा मुड खराब होणार नाही.

आता तर इंटरनेटच्या मदतीने घरबसल्या तुम्ही संपुर्ण पिकनिकचं नियोजन करु शकता.

 

trip inmarathi

 

यामध्ये जाण्याचं ठिकाण, रस्ता, तिथली हॉटेल्स यांपासून ते थेट तिकडे मार्गदर्शक ठरणा-या गाईड्सपर्यंत…

त्यामुळे ज्यांच्यासोबत पिकनीकला जाणारा आहात, त्यांच्याशी चर्चा करा, सर्वांची मतं विचारात घ्या आणि त्यातून सर्वांना आवडत्या ठिकाणांच बुकिंगही झटपट करा.

अर्थात रस्ता चुकणार नाही यासाठी गुगल मॅप्ससारखे अप्स सोबत आहेतच, त्याचा वापर करा.

फर्स्टएड बॉक्स जवळ ठेवा

पिकनीकच्या दरम्यान मुळातच सुरक्षेची काळजी घ्या.

 

first-aid-marathipizza

 

मात्र अपघात कुणाला सांगून होत नाहीत.

त्यामुळे संकाटांचा धोका आधीच ओळखलेला बरा,

पिकनीकमध्ये धमाल करताना चुकून एखादा अपघा झाला, किंवा कुणालाही जखम झाली तर तुम्ही अशा अपरिचित ठिकाणी दवाखाना शोधत बसणार?

त्यापेक्षा ठेवा ना First-Aid Box सोबत. गरज नाही पडली तर उत्तमच पण खबरदारी घेतलेली केव्हाही बरी.

पिकनीकचं साहित्य

 

picnic foldable chairs marathipizza

 

हल्ली हॉटेल्समध्ये सर्व प्रकारच्या सुखसोयी उपलब्ध आहेत. त्यामुळे पुर्वीप्रमाणे सगळंच सामान घरून नेण्याची गरज नसते.

मात्र कॅम्पिंग, वाईल्ड लाईफ सफारी किंवा अडव्हेंचर्स ठिकाणी ट्रिपला जाणार असाल, तर अंथरूण, पांघरुण यांसारखं साहित्य सोबत घेऊन जा.

अर्थात कमी जागेत जास्त सामान बसेल याची काळजी घ्या.  मोठे किंवा लहान सोबत असतील तर त्यांच्यासाठी फोल्डिंगच्या खुर्च्या सोबत ठेवाव्या. शक्यतो सोबतच्या सामानाचं वजन जरा हलकंच ठेवा ते म्हणतात ना – Travel Light!

आवडत्या काही गोष्टी सोबत ठेवा

 

picnic books marathipizza

 

तुम्ही जर एखाद्या  हॉटेल मध्ये मुक्कामी असाल तर तुमचा कंटाळा घालवण्यासाठी तुमचं आवडतं पुस्तक सोबत असायलाच हवं किंवा तुम्ही जर कुठे मोकळ्या जागेवर फिरायला गेले असाल तर तुमचं आवडतं बॅट बॉल सोबत असायलाच हवं ना?

हल्ली पिकनीकला रिलॅक्सेशनही म्हटलं जातं, त्यामुळे अशावेळी आवडतं पुस्तक, एखादा खेळ, लहान मुलांसाठी खेळणी, आयपॉड अशा कही गोष्टी सोबत घेऊन जाता.

 

family game inmarathi
getty images

 

कुटुंबासह खेळ खेळण्याची काही औरचं मजा असते.

पिकनिकची न्याहारी

 

basket picnic marathipizza

 

पिकनीकला गेल्यावर हॉटेलमधल्या पदार्थांवर ताव मारता येईल, मात्र अनेकदा रस्त्यात किंवा प्रवासात भुक लागते. अशावेळी खाता येतील असे पदार्थ सोबत असु द्या.

दिवसभर पुरेल एवढं पाणी सोबत ठेवा. तुम्हाला सकाळचा नाश्ता, दुपारचं जेवण आणि संध्याकाळचा नाश्ता करायचा आहे ह्या अंदाजाने अन्न सोबत घ्या.

खराब न होणारे पदार्सॅथ टाळा. सॅन्डविच, फळे, कबाब असे सोबत ठेवायला सोपे पदार्थ निवडा.

अन्न खाण्यासाठी Use & Throw ग्लास आणि ताटं वापरावे. अश्याने जेवण  किचकट होणार नाही. पण आपण केलेल्या कचऱ्याचे व्यवस्थापन जबाबदारीने करावे.

मोबाईलखेरीज हल्ली कोणतंही काम होत नाही. पिकनिकला जाताना कुटुंबासह वेळ घालविण्यासाठी मोबाईलचा वापर कमी केला गेला असला तरी फोन कायम चार्ज ठेवणं गरजेचं आहे.

 

picnic basket inmarathi

 

प्रवासादरम्यान गुगल मॅप्स किंवा अन्य अॅप्सचा वपर केला जातो. त्याव्यतिरिक्त हॉटेल्स किंवा अन्य कोणत्याही व्यक्तींना संपर्क साधावा लागु शकतो. अशावेळी फोनचा चार्जर, पॉवर बॅंक सोबत नेणं गरजेचं आहे.

याशिवाय तुम्ही रोज घेत असलेली औषधं, गरजेच्या वस्तु यांचीही फेरतपासणी करा.

बॅग भरताना ही चेकलिस्ट तपासलीत, तर तुमची पिकनिक नक्कीच यशस्वी होणार.

ह्या टिप्स अंमलात आणा आणि एकदम परफेक्ट पिकनिक एन्जॉय करा!

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?