' उद्योजकांसाठी धडा: आपल्या उर्मटपणामुळे ‘फेरारी कंपनी’ने मोठा प्रतिस्पर्धी जन्माला घातला – InMarathi

उद्योजकांसाठी धडा: आपल्या उर्मटपणामुळे ‘फेरारी कंपनी’ने मोठा प्रतिस्पर्धी जन्माला घातला

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

लॅम्बॉर्गीनी आणि फेरारी. भारतीयांच्या मनातील कारचे दोन आवडते ब्रँड.

हे दोन कार चे Design लोकांना इतके आवडले आहेत की जगभरात त्यांच्या प्रतिकृती सुद्धा प्रचंड प्रमाणात लोकांनी विकत घेतल्या आणि आपल्या शोकेस मध्ये त्यांना जागा दिली.

पण, आपल्याला कदाचित हे माहीत नसेल की, या दोन जगप्रसिद्ध कार च्या ब्रँड्स मध्ये त्यांच्या सुरुवातीच्या काळात कमालीची स्पर्धा होती. ती स्पर्धा आजही आहे.

 

lamborghini inmarathi 3

 

कोणत्याही दोन कार ब्रँड्स मधली स्पर्धा हा काही आपल्यासाठी नवीन विषय नाहीये. पण, बिझनेसमधलं आपलं वर्तन हे दूरगामी परिणाम करणारं कसं ठरतं हेच सांगणरी ही गोष्ट –

फेरुकिओ लॅम्बॉर्गीनी यांचा जन्म एका शेतकरी कुटुंबात झाला होता. द्राक्ष हे त्यांचं प्रमुख पीक होतं. त्यांच्या कुटुंबातील इतर सदस्यांप्रमाणे लॅम्बॉर्गीनी यांना शेतीची खूप आवड नव्हती.

त्यांचा इंटरेस्ट हा मेकॅनिकल गोष्टींमध्ये जास्त होता. लॅम्बॉर्गीनी यांनी दुसऱ्या महायुद्धात एअरफोर्स मध्ये नोकरी केली होती.

निवृत्त झाल्यानंतर त्यांनी मिल्ट्री मधील जुन्या मशीन घेऊन त्यांचं परिवर्तन ट्रॅक्टर सारख्या शेतीउपयुक्त गोष्टींमध्ये करण्याचं काम सुरू केलं.

ट्रॅक्टर च्या बिजनेस मधून लॅम्बॉर्गीनी ह्यांना मोठ्या प्रमाणावर यश मिळालं. काही काळातच ते खूप श्रीमंत झाले. त्याकाळात जसं प्रत्येक श्रीमंत व्यक्ती हा उंची गाड्या चालवण्यात धन्यता मानत होता तीच सवय लॅम्बॉर्गीनी यांना सुद्धा होती.

 

lamborghini inmarathi 2

 

लॅम्बॉर्गीनी यांनी फेरारी ही कार विकत घेतली. कालांतराने लॅम्बॉर्गीनी हे कार रेस मध्ये सुद्धा भाग घेऊ लागले. त्यांनी फेरारी सोबतच इतरही उंची गाड्या विकत घेतल्या होत्या.

त्यांचं वैशिष्ट्य होतं की, ते त्यांनी विकत घेतलेल्या कारच फक्त रेस साठी वापरत असत.

इतक्या वर्ष ऑटोमबाईल च्या बिजनेसमध्ये असल्याने आणि मुळात त्या विषयाची प्रचंड क्रेझ असल्याने लॅम्बॉर्गीनी हे कायम आपल्या कार मध्ये काही ना काही बदल करायचा प्रयत्न करत असत.

जेव्हा त्यांनी फेरारी ही कार रेसिंग साठी वापरण्याचं ठरवलं, तेव्हा त्यांच्या लक्षात आलं की फेरारी कार ही खूप जास्त आवाज करणारी होती आणि रोड वर चालवताना त्यांना अपेक्षित ती स्मूथ फीलिंग येत नव्हती.

अजून एक प्रॉब्लेम त्यांना फेरारी मध्ये सापडला तो म्हणजे हा की, त्या कारचं क्लच हे वारंवार खराब व्हायचं आणि त्याला दुरुस्त करावं लागायचं.

साठच्या दशकात, फेरारी कार ही लक्झरी कार सेगमेंट मध्ये पहिल्या नंबर वर होती. एंझो फेरारी हे फेरारी कार चे जनक होते. ते स्वतः एक मेकॅनिक होते.

 

ferrari inmarathi

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

हे ही वाचा – तुमच्या आवडत्या ब्रँड्सच्या जन्माच्या काही अफलातून कहाण्या, जाणून घ्या…

लॅम्बॉर्गीनी यांनी विचार केला की, त्यांना ज्या काही टेक्निकल गोष्टी फेरारी मध्ये सुधारल्या पाहिजेत असं वाटतंय ते सरळ एंझो फेरारी यांना सांगावं.

त्यावेळी फेरारी ही टॉप ची कार होती आणि त्याच्या मालकाला ही गोष्ट पटली नाही की, एखादा ट्रॅक्टर मेकॅनिक आपल्याला काय आपल्या गाडी मधल्या चुका कशा काय सांगू शकतो?

फेरारी यांना वाटलं लॅम्बॉर्गीनी यांना त्यांच्या कार बद्दल काहीच माहिती नाहीये किंवा एकूणातच कार च्या टेक्निकल बाजूंबद्दल लॅम्बॉर्गीनी यांचं ज्ञान अगदीच तोकडं असावं.

फेरारी यांनी लॅम्बॉर्गीनी यांना स्पष्ट शब्दांत सांगितलं की, “मला एका ट्रॅक्टर मेकॅनिक कडून कोणताही सल्ला ऐकण्याची अजिबात इच्छा नाहीये.” त्या क्षणापासून एका स्पर्धेला सुरुवात झाली.

लॅम्बॉर्गीनी यांनी या अपमानाचं उत्तर आपल्या कामातून द्यायचं ठरवलं. इतकी वर्ष कार बनवणे त्यांचा फक्त एक छंद होता. आता त्या गोष्टीला त्यांनी त्यांचं पॅशन मध्ये बदललं.

लॅम्बॉर्गीनी यांनी फेरारी यांनी त्यांचा केलेला अपमान हा स्वतःची कार कंपनी तयार करण्यासाठी असलेला driving force म्हणून लक्षात ठेवला.

त्यांनी वेगवेळ्या designs वर काम करायला सुरुवात केली. त्यांनी या designs वरून स्वतःच्या ब्रँड च्या कार तयार करायचं ठरवलं. अवघ्या चार महिन्यात लॅम्बॉर्गीनी यांनी Lamborghini 350 GTV ही गाडी ऑक्टोबर १९६३ च्या ट्युरीन मोटर शो मध्ये लाँच केली.

 

vintage lamborghini inmarathi

 

१९६४ संपेपर्यंत लॅम्बॉर्गीनी यांनी १३ कार विकल्या होत्या. कार चं नाव तोपर्यंत ३५० GT असं बदलण्यात आलं होतं.

लॅम्बॉर्गीनी यांनी फेरारीला चांगलीच टक्कर द्यायला सुरुवात केली होती. तेव्हा लॅम्बॉर्गीनी यांनी इतर बिजनेस मध्ये सुद्धा पाय रोवायला सुरुवात केली. वयाच्या ५० व्या वर्षापर्यंत लॅम्बॉर्गीनी हे प्रचंड श्रीमंत म्हणून नावारूपास यायला सुरुवात झाली होती.

त्यांची संपत्ती ही फेरारी यांच्या संपत्ती इतकीच असावी असे अंदाज बांधणं सुरू झालं. फेरारी या स्पोर्ट्स कार ला स्पर्धा करेल अशी एक कार तयार करायची असं लॅम्बॉर्गीनी यांनी ठरवलं.

त्यांना खूप जणांनी समजावून सांगितलं की, फेरारी कंपनीच्या पाठीशी त्यांचा खूप वर्षाचा अनुभव आहे. फेरारी सारखी ग्रेट कार तयार करणे ही गोष्ट ठरवायला सोपी आहे.

पण, प्रत्यक्षात असं करून दाखवणं किंवा या स्वप्नाच्या पाठीमागे लागणं हे खूप रिस्की आहे हे लॅम्बॉर्गीनी यांना त्यांच्या निकटवर्तीयांनी समजावून सांगण्याचा खूप प्रयत्न केला. ते मागे हटणाऱ्यांपैकी अजिबात नव्हते.

१९६२ मध्ये लॅम्बॉर्गीनी यांनी त्यांच्या या स्पोर्ट्स कार manufacturing unit च्या प्रोजेक्ट ला सुरुवात केली होती. १९६३ च्या मे महिन्यात Automobile Ferruccio Lamborghini या कंपनी ची त्यांनी सुरुवात केली.

 

vintage lamborghini inmarathi 1

 

त्यांनी Sant’Agata Bolonese या ठिकाणी एक प्लॉट खरेदी करायचं ठरवलं. या प्लॉट वर कार बिजनेस साठी पूर्णपणे वेगळा सेट अप उभा करायचं लॅम्बॉर्गीनी यांनी ठरवलं.

इतर कंपनी सोबत त्यांनी केलेलं काम आणि मुख्यतः त्यांच्या ट्रॅक्टर बिजनेस ने त्यांना दिलेल्या अनुभवाच्या जोरावर त्यांनी एक वर्ल्ड क्लास manufacturing unit उभं केलं.

मजबूत बांधकाम ही या युनिट ची speciality तर होतीच; पण त्याहूनही चांगली होती ती म्हणजे त्याची रचना. मध्यभागी होती manufacturing ची बिल्डिंग आणि त्याच्या बाजूला ऑफिस बिल्डिंग होती. त्यामुळे मॅनेजमेंट मधील लोकांना सतत गोष्टींचे अपडेट्स मिळायचे.

ही गोष्ट लॅम्बॉर्गीनी यांच्यासाठी सुद्धा फार महत्वाची होती. कारण, त्यांना जर एखादी गोष्ट चुकत आहे असं जेव्हा जाणवायचं तेव्हा ते स्वतः जाऊन त्या कार मेकॅनिक सोबत काम करायचे.

लॅम्बॉर्गीनी हे स्वतः एक मेकॅनिक असल्याने त्यांनी त्यांच्या कार साठी अगदी योग्य ते स्पेअर पार्ट वापरायचं ठरवलं. इंजिन हे Giotto Bizzarrini यांचंच वापरायचं ठरवलं. याच कंपनी चे इंजिन हे त्या काळातल्या फेरारी मध्ये सुद्धा वापरले जायचे.

कार च्या इतर स्पेअर पार्ट साठी लॅम्बॉर्गीनी यांनी Giampaolo Dallara आणि Giampaolo Stanzani या दोन तरुण इंजिनियर्स ची नियुक्ती केली होती.

Turin Motor Show मध्ये 350 GT ही कार सादर करताना लॅम्बॉर्गीनी यांनी त्याचं पूर्ण श्रेय हे त्यांच्या पूर्ण टीम ला दिलं.

आपल्या झालेल्या एखाद्या अपमानाचं उत्तर हे फक्त शब्दात आणि मोठ्या आवाजात न देता आपल्या कृतीतून त्याचं उत्तर द्यावं हा बोध आपण या घटनेपासून नक्कीच घेऊ शकतो.

===

हे ही वाचा – दोघांचं भांडण – सगळ्यांचा लाभ! भावांच्या भांडणातून स्थापन झाले जगप्रसिद्ध शूज ब्रँड्स

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

 शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?