' या ९ गोष्टी असतील तर प्रत्येकावर छाप पडणाऱ्या व्यक्तिमत्त्वासाठी मेकअप, ब्रँडेड कपडे यांची गरज भासणार नाही – InMarathi

या ९ गोष्टी असतील तर प्रत्येकावर छाप पडणाऱ्या व्यक्तिमत्त्वासाठी मेकअप, ब्रँडेड कपडे यांची गरज भासणार नाही

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामशेअरचॅट

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

===

प्रत्येक माणसाची एक सुप्त इच्छा असते की लोकांनी त्याच्याकडं चांगल्या नजरेने पहावं. आपण लोकप्रिय असावं.

बऱ्याचदा आपण पाहतो की, एखादा मनुष्य खूप साधा असतो पण तरीही तो खूप जणांचा आवडता असतो. त्याचं वागणं बोलणं राहणं फार भारी नसतं पण त्याला किंवा तिला लोक खूप मानत असतात.

पहायला गेलं तर त्यांच्याकडे असं वाटतही नाही पण लोक म्हणतात फार मस्त माणूस आहे तो.‌

कपडे साधे असतील, मेकअप नसेल पण अशी माणसं त्यांच्यात असलेल्या वेगळेपणाने उठून दिसत असतात. काय असतं हे वेगळेपण?

 

sunder pichai inmarathi
indiatoday.in

 

कधी ती तत्त्वनिष्ठ असतात. समजूतदार असतात, सर्वांना सामावून घेत पुढे जाणारी असतात. आज आपण पाहूया अशा लोकांची खासियत.. ते का वेगळे असतात.

तसं वेगळं दिसण्यासाठी काय केलं पाहिजे?

 

१. मनात असलेली गोष्ट करा –

 

listen to yourself inmarathi
lizkislick.com

 

एखाद्या वेळी आपण एखादी गोष्ट करायची ठरवतो पण ती करताना पहिल्यांदा मनात येतं लोक काय म्हणतील?

कारण आपण जे करु इच्छितो ते फारसं कुणाला माहीत नसतं असं काही असू शकतं.

जेंव्हा आपण समाजात किंवा एखाद्या गटात असतो तेंव्हा लोकप्रिय असलेल्या गोष्टी करायचा जास्त प्रयत्न करतो त्यामुळे आपण आपली इमेज चांगलीच रहावी याची काळजी घेतो.

पण कधीतरी अशी एखादी गोष्ट करा जी वेगळी असेल. म्हणजे हटवादीपणा नाही..तर वेगळेपण जपणारी!

 

२. छोट्या छोट्या गोष्टी सोडून द्या –

 

indian people inmarathi
freepik.com

 

जेंव्हा आपण एखाद्या ग्रूपमध्ये असतो, तो सामाजिक असेल.. मित्र मैत्रिणी, सहकाऱ्यांचा असेल.. किंवा कौटुंबिक असेल. खूप गोष्टी मनाविरुद्ध होतात.

किंवा आपल्याला खटकतात त्या गोष्टी सोडून द्या. सहकारी आपलं महत्त्व वाढवण्यासाठी कधी कधी राजकारण करतात..मित्र मैत्रिणी माघारी गाॅसिप करतात या जगात सार्वत्रिक गोष्टी आहेत.

त्याकडं दुर्लक्ष करायला शिका. बारीकसारीक गोष्टींचा पुढे पर्वत होतो. त्या जिथल्या तिथे सोडल्या की त्याच्या कानगोष्टी होऊन भलतंसलतं आणि अनर्थकारी बाहेर पडत नाही.

 

३. सगळ्यांमध्ये असलेलं चांगलं लक्षात ठेवा –

 

good people bad people inmarathi
yourbetterlife.com

 

जगात प्रत्येक माणसात चांगले वाईट दोन्ही गुण असतात. स्वतः वरुन जग ओळखा. तुम्हाला जर सतत कुणी तुझ्यात काय वाईट आहे हे सांगत राहीलं तर? म्हणून दुसऱ्याला हाणून पाडू नका.

कधीतरी त्याच्या चांगल्या गुणाचं कौतुक करा..तोच गुण आवर्जून लक्षात ठेवा. आयुष्य खरंच फार देखणं होईल. छोटीशी गोष्ट दुसऱ्याला किती आनंद देऊन जाते बघा!

एका माणसानं दुसऱ्या माणसाला ग्रीक रोमन साम्राज्याशी संबंधित एक कथा पाठवली आणि आवर्जून सांगितले, ही वाचताना मला तुझीच आठवण आली.

कारण तो ग्रीक संस्कृतीचा अभ्यासक होता. आपली ही गोष्ट लक्षात ठेवली याचा त्याला कोण आनंद झाला!!! असं आनंदाचं झाड बना.

जी तुमच्या सहवासात येतील ती प्रसन्न होतील असं वागा. पण खुशमस्करे होऊ नका.

 

४. नाही म्हणायला शिका –

 

say no inmarathi
mindfamilymedicine.com

 

कितीतरी गोष्टी असतात की मित्रांनी जबरदस्तीने केली म्हणून करावी लागली. त्यांनी जबरदस्ती केली पण नकार देण्याचा हक्क तुमचा होता ना? आपल्या मतांशी ठाम रहायला शिका.

एखादं इंडिसेंट प्रपोजल धुडकावून लावायला घाबरु नका. कारण एकदा तुम्हाला अशा गोष्टी चालतात म्हटलं की तुम्ही साॅफ्ट टार्गेट ठरु शकता. म्हणून सुरुवातीलाच नाही म्हणा.

आणि दुसरा कुणी असं साॅफ्ट टार्गेट होत असं दिसत असेल तर त्याच्या पाठीशी उभे रहा. गर्दीतही एकटे असाल तरी तुमच्या स्वरक्षणानं उठून दिसाल.

हीच गोष्ट तुमचं व्यक्तिमत्त्व उजळवून टाकणारी असेल.

 

५. इतरांमधील चांगले गुण ओळखा –

 

praise others inmarathi
desiringgod.org

 

प्रत्येक माणसात चांगले वाईट दोन्ही गुण असतात. पण तुम्ही चांगले गुण लक्षात ठेवा आणि आवर्जून त्याचं कौतुक करा.

तुमच्यातील चांगली गोष्ट कुणी सांगतं तेंव्हा किती आनंद होतो? तोच आनंद इतरांनाही द्या. प्रशंसा आणि लाळघोटेपणा यात फार फरक आहे.

चांगल्या गुणाला दाद देणं ही प्रशंसा असते. ती करा. नसलेले चांगले गुण चिकटवणं हा लाळघोटेपणा असतो. तो करु नका, पण चांगल्या कामाची प्रशंसा नक्की करा.

हे करत असताना ज्या दैवी देणगी असलेल्या गोष्टी..जसं तुझे डोळे किती छान आहेत, वगैरे शारीरिक प्रशंसा टाळा. त्यात त्या व्यक्तीचं काहीही कर्तृत्व नसतं.

त्यानं प्रयत्नपूर्वक केलेलं चांगलं काम असेल त्याचं कौतुक करा.

 

६. तुमची कृती तुमचं व्यक्तिमत्त्व सांगूदे –

 

ratan tata inmarathi
thehansindia.com

 

हे फारच महत्त्वाचे आहे. तुम्ही स्वतःच्या तोंडानं तुमचे गुण सांगू नका. मी सगळ्यांच्यात मिसळू शकतो, मी नम्र आहे, मला गर्व नाही..हे आपण कधीही सांगायचं नसतं.

ते लोकांना तुमच्या वागण्यातून दिसतंच दिसतं. मी हे केलं, ते केलं हे आपण सांगावंच लागत नाही. ते लोकांना कळतंच.

जरी आपला व्यवसाय जाहितीवरच चालतो तरी पण व्यक्तिमत्व वागण्यात दिसतं.

बढाईखोर माणसापासून सगळे लांब रहायला बघतात पण विनम्र माणसाच्या भोवती गोळा होतात हे नेहमी लक्षात ठेवा.

 

७. काही विचित्र सवयी –

 

laughing people inmarathi
feminisminindia.com

 

आपल्या काही विचित्र म्हणजे गंमतीशीर सवयी असतात. त्याबद्दल लाज वाटू देऊ नका.

जसं वयानं फार मोठे झाला तरी टाॅम अँड जेरीसारखी कार्टून फिल्म बघणं, काॅमिक्स वाचणं, एखादा मोठा विनोद झाला तर खळखळून हसणं, कधीकधी ते गडगडून हसणं होऊ शकतं पण मोकळेपणानं रहा.

यांमुळेच तर आयुष्यात चैतन्य टिकून आहे. लोक काय म्हणतील? अरे कार्टून बघतो? काॅमिक्स वाचतो? कसला मोठ्यांदा हसतो! पण यामुळे तुम्ही नाटकी नाही आहात हे समजतं!

थोडक्यात जसे आहात तसेच रहा..

 

८. लपवाछपवी करु नका –

 

hiding inmarathi
oxfordlearning.com

 

आपण आपली वाईट बाजू, वाईट दिवस लपवायला बघतो पण तसं करु नका. तुम्ही सोसलेल्या गोष्टी लोकांना माहिती झाल्या की लोक आपोआपच तुमच्या जवळ येतात.

कारण प्रत्येकाला काही ना काही सोसावंच लागतं. तुमचा संघर्ष, तुमचे वाईट दिवस सहजावारी सांगा पण त्याबद्दल कडवटपणा ठेवू नका. कारण त्याचमुळे तर तुम्ही घडला आहात.

जे परफेक्ट लोक असतात ते आपले गुण दोष याकडे त्रयस्थपणे बघू शकतात. दोषही मोकळेपणाने कबूल करतात. त्याला फार मोठं मन लागतं, धाडस लागतं!

 

९. थोडंस हातचं राखून ठेवा –

 

introvert guy inmarathi
pinterest

 

खुल्या पुस्तकासारखं असलात तरी काहीतरी मागं ठेवा.. सारं काही सर्वांना सांगायची गरज नाही. फार रहस्यमय राहीलात तर लोक तुमच्यापासून दूरच राहणं पसंत करतात.

फार मोकळेपणानं राहीलात तर गळ्यात पडायला येतात. म्हणून या दोहोंचा सुवर्णमध्य साधा. तुमच्याबद्दल कणभर उत्सुकता राहीली पाहिजे.

म्हणून थोडंसं मागं राखून ठेवा पण लोकांमध्ये मिसळून वागा.

थोडक्यात शारीरिक गोष्टी बदलतात, सौंदर्य घटतं, पैसा खर्च होतो. पण व्यक्तिमत्व मात्र टिकून राहतं. ते टिकावं यासाठी वरील गोष्टी उपयुक्त आहेत.

===

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामशेअरचॅट

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?