' प्रकाशझोतात न आलेल्या या भारतीयाने जन्माला घातलेल्या तंत्राशिवाय आज कोणीच जगू शकत नाही

प्रकाशझोतात न आलेल्या या भारतीयाने जन्माला घातलेल्या तंत्राशिवाय आज कोणीच जगू शकत नाही

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामशेअरचॅट

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

===

” ई-मेल” आजच्या जगातील परवलीचा शब्द.

आज सोशल मीडिया माध्यमं कितीही प्रगत असली तरी एकमेकांशी संपर्क ठेवणे, विविध कागदपत्र हाताळणे, निरनिराळे डॉक्युमेंट्स पाठवणे या सगळ्या करिता सगळ्यात सुरक्षित समजली जाणारी यंत्रणा म्हणजे ई-मेल.

अभिमानाची गोष्ट हीच आहे की या संपर्क यंत्रणेचा शोध हा एका भारतीयाने लावलेला आहे. ‘शिवा आय्यादुराई’ असं या भारतीयाचे नाव, ज्याने सगळं जग जवळ आणलं.

भारतीय वंशाच्या अमेरिकन नागरिक असलेल्या शिवा आय्यादुराई यांनी त्यांच्या चौदाव्या वर्षी १९७८ मध्ये पहिल्यांदा ई-मेल सेवा अस्तित्वात आणली.

 

shiva aiyyadurai inmarathi
https://postcard.news/

 

१९७८ च्या उन्हाळ्यामध्ये युनिव्हर्सिटी ऑफ मेडिसिन अँड डेंटिस्ट्री न्यू जर्सी प्रोग्रामिंग असाइन्मेंटसाठी स्वयंसेवक म्हणून त्यांची निवड झाली होती.

त्या काळात कुठल्याही युनिव्हर्सिटीमध्ये सगळेच व्यवहार हे कागदोपत्री व्हायचे आणि त्याचे अक्षरशः ढीग लागलेले होते. शिवा यांना कम्प्युटर विषयी प्रचंड आकर्षण होतं, प्रोग्रामिंगचे वेड होतं.

त्यांच्यातलं टॅलेंट तिथे असणाऱ्या प्रोफेसर मायकलसन आणि लेसली त्यांनी ओळखलं.

त्या दोघांनी शिवा यांना चॅलेंज दिलं की, ही कागदपत्रे कमी करून ती डिजिटल, इलेक्ट्रॉनिक प्लॅटफॉर्मवर कशी पाठवता येतील? त्याद्वारे एकमेकांशी संपर्क कसा ठेवला जाईल याचं प्रोग्रामिंग करून दाखव.

शिवा यांनी ते चॅलेंज स्वीकारलं आणि त्यासाठी अत्यंत सोपी पद्धत अस्तित्वात आणली. त्याकाळात काँप्युटर होते मात्र त्यांचा वापर हा कॉम्प्युटर सायंटिस्ट आणि कॉम्प्युटर स्पेशालिस्ट यांच्यापुरताच मर्यादित होता.

पहिल्यांदाच ऑर्गनायझेशनच्या अंतर्गत सेक्रेटरी आणि सीईओ यांच्यात डिजिटली कम्युनिकेशन व्हायला सुरुवात झाली. त्यासाठी लागणारा वेळही अत्यंत कमी होता. शिवा यांची हीच पद्धत आजही ईमेल साठी वापरली जाते.

 

diploma computer inmarathi
DTES institute

 

शिवा अय्यादुराई यांनी आणलेल्या पद्धतीमुळे वेगळ्या नोंदी ठेवायची गरज लागेनाशी झाली.

कारण त्यांनी “इन बॉक्स, आउट बॉक्स, ड्राफ्ट्स, मेमो, टू, फ्रॉ , सीसी, बीसीसी, अटॅचमेंट, कंपोज, फोल्डर, फॉरवर्ड, रिप्लाय, एड्रेस बुक, ग्रुप्स, रिटर्न रिसीट, सॉर्टिंग” इत्यादी गोष्टी असणार एक सॉफ्टवेअर तयार केले.

त्यामुळे कम्प्युटरवरून मेल सेंड किंवा रिसिव्ह करण्यात येऊ लागले. याच प्रोग्रामला नाव दिले गेले ” ई-मेल.”

ही सिस्टीम खूप चांगल्या प्रकारे चालू लागली. त्यामुळे मग शिवानी आय्यादुराई यांनी ई-मेल चे कॉपीराइट्स घेतले, कारण त्यावेळेस पेटंट अस्तित्वात नव्हते.

केवळ १४ व्या वर्षी त्यांनी ही कामगिरी केली परंतु त्यांचा हा क्लेम अमेरिकेतल्या अनेक लोकांनी फेटाळला त्यांच्यावर अनेक प्रकारची टीकाही झाली.

अर्पानेट या कंपनीने १९७० च्या दशकातच आम्ही ई-मेल चा शोध लावला असेल सांगितले. याचं कारण म्हणजे ते @ हे चिन्ह वापरून एकमेकांना कॉम्प्युटरवरून संदेश पाठवायचे.

 

shiva aiyyadurai inmarathi 2
https://www.wired.com/

 

पण हे म्हणजे ई-मेल होऊ शकणार नाही; कारण ई-मेलमध्ये असणाऱ्या सगळ्या गोष्टी फक्त आणि फक्त शिवा आय्यादुराई यांनीच अस्तित्वात आणल्या.

तरीदेखील शिवा यांच्यावर खूप टीका केली गेली. त्यांना धमकीचे फोन केले गेले. त्यांची बदनामी केली गेली. त्यांनी केलेल्या कामाबद्दल त्यांच्यावर शंका उपस्थित करण्यात आल्या.

या सगळ्याबद्दल बोलताना शिवा म्हणतात की,”मी कृष्णवर्णीय असल्यामुळे माझ्या कामाबद्दल लोकांनी शंका घेतली. मी घेतलेल्या मेहनतीवर स्वतःचा हक्क दाखवण्याचा प्रयत्न केला गेला आहे.”

इंटरनेटवरून देखील त्यांचं नाव काढून टाकण्याचा प्रयत्न केला गेला. अगदी विकिपिडियावर देखील ई-मेल चा जनक कोण असं विचारलं तर , ‘रे टॉमलिन्सन’ यांचं नाव तुम्हाला दिसेल.

 

shiva aiyyadurai inmarathi 1
https://fossbytes.com/

 

खरंतर ई-मेल च्या शोधानंतर शिवा आय्यादुराई यांनी एमआयटी मधून चार डिग्री घेतली आहेत. मिडीया, ते मेडिसिन आणि आर्ट ते टेक्नॉलॉजी या क्षेत्रांमध्ये त्यांचा संचार आहे. सिस्टीम बायोलॉजीमध्ये पीएचडी केली आहे.

एमआयटीचा टॅलेंट सर्च आवार्ड देखील त्यांनी मिळवला आहे. ई-मेल नंतर त्यांनी १९९३ मध्ये आर्टिस्ट लोकांसाठी, ‘आर्ट्स ऑनलाइन’ नावाचं एक पोर्टल तयार केलं.

त्यानंतर व्हाइट हाउस ने ठेवलेल्या ‘कॅटगरायझिंग ई-मेल’ ही कॉम्पिटिशन जिंकली आणि त्यानंतर त्यांनी इको मेल नावाची कंपनी सुरू केली. ज्याद्वारे २००० कंपन्यांनी त्याचा लाभ घेतला.

या टेक्नॉलॉजी शिवाय त्यांना मेडिसिन आणि बायोलॉजीमध्ये देखील इंटरेस्ट होता त्यासाठी त्यांनी २००७ मध्ये ‘ सायटोसॉल्व’ नावाची कंपनी सुरू केली, यामध्ये विविध औषध आणि त्यांचे उपयोग यावरती संशोधन केलं जायचं.

 

corona israel scientist inmarathi
new york post

 

याबरोबरच ते हाडाचे शिक्षक देखील आहेत. एम आय टी मध्ये त्यांनी एक नवीन कोर्स देखील सुरू केला, ‘सिस्टीम व्हिज्युअलायझेशन’ त्याचं नाव. ज्यामध्ये सामान्य माणूस देखील हा कोर्स करू शकेल. एम आय टी चा हा सगळ्यात पॉप्युलर कोर्स समजला जातो.

त्यांना जितकी माहिती आहे ती लोकांपर्यंत पोहोचवणं त्यांना ते समजावून सांगणे या गोष्टी डॉक्टर शिवा यांना आवडतात.

पण आपल्यावर झालेल्या आरोपांमुळे ते व्यथित देखील होतात. कारण जी गोष्ट त्यांनी केली आहे ती खरोखरच आजच्या काळासाठी एक महत्त्वाची देणगी आहे. पण त्याचं श्रेय त्यांना मिळू नये यासाठी प्रयत्न केला गेला.

पण इलेक्ट्रॉनिक मेल सिस्टीम आल्यामुळे विनाकारण वाढणारी कागदपत्र कमी झाली आहेत. ती जवळ बाळगणे देखील कमी झाले आहे. कमी जागेत आता आपल्याला कुठूनही कुठलंही पत्र किंवा डॉक्युमेंट्स पाहणं सोपे झालेलं आहे.

 

work from home inmarathi

 

२०१२ मध्ये स्मिथसॉनियन नॅशनल म्युझियम ऑफ अमेरिकन हिस्ट्री या संस्थेकडे शिवा यांनी आपले दावे, पुरावे सादर केले. ई-मेल साठी घेतलेले कॉपीराइट्स कागदपत्र त्यांच्याकडे आहेत.

तिथल्या पडताळणी नंतर, आपण ई-मेलच्या शोधाचे जनक असल्याचे जगासमोर आल्याचे अय्यादुराई म्हणतात.

‘मी माझ्या सॉफ्टवेअरला ई-मेल असे नाव दिले होते. त्यापूर्वी इंग्रजी भाषेमध्ये ती संज्ञा कधीही वापरली गेली नव्हती,’ असं त्यांचं म्हणणं आहे.

आता अगदी दर सेकंदाला किती तरी लाख इमेल्स जगभरातून एकमेकांना पाठवले जातात. एका भारतीयामुळे आज सगळं जग जवळ आलं आहे ही खरोखरच अभिमानास्पद गोष्ट आहे.

===

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्रामशेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?