जगात सर्वत्र कुतूहलाचा विषय असलेले हे महाकाय शिंपले देतात पृथ्वीवरील चमत्काराची साक्ष…
आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम |
===
आपलं जग हे विविध चमत्कारांनी भरलेलं आहे. ह्यातले काही चमत्कार नैसर्गिक आहेत तर काही मानवनिर्मित आहेत.
ह्या चमत्कारांना बघून आश्चर्यचकित व्हायला होतं, आश्चर्याने तोंडात बोटं घातली जातात.
नैसर्गिक चमत्कारांमध्ये नद्या, टेकड्या, झाडे, पाने, फुले, काही प्राणी, पक्षी आहेत ज्यांची निर्मितीच, ज्यांचे मूळच चमत्कार आहे तर काही असे चमत्कार आहेत जे नैसर्गिक आपत्तीनंतर तयार झालेत.
जसे, पूर, भूकंप, हवामातील बदल, अतीवृष्टी इत्यादी. तर मानवनिर्मित आश्चर्य म्हणजे वास्तु, किल्ले, देवळं, राजवाडे, शिल्पं, चित्रं अशी माणसाने बांधलेले, तयार केलेले चमत्कार!
भारतात आणि भारताबाहेर देखील असे अनेक चमत्कार आहेत.
भारतात गोमतेश्वर पुतळा, गोल्डन टेंपल, ताजमहाल, हम्पी मंदिरं, खजुरहो लेणी, कोणार्कचे सूर्य मंदिर, नालंदा विश्वविद्यालय हे सात चमत्कार आहेत.

तर भारताबाहेर चिचेन् इत्सा- मेक्सिको, क्रिस्तो रेदेंतोर- ब्राझिल, कसोलियम- इटली, चीनची भींत, माक्सू पिक्स्तू- पेरू, पेट्रा- जॉर्डन इत्यादी चमत्कार आहेत.
हे नव्या चमत्कारंमध्ये येतात. तसेच पिसाचा मनोरा, अमेरिकेतील स्वातंत्र्यदेवतेचा पुतळा, आयफेल टॉवर, गिझाचा पिरॅमिड, क्राइस्ट द रिडिमर, रोमच्या कोलोसियम ह्यांचा जगातल्या आश्चर्यांमध्ये समावेश होतो.
अर्थातच ह्यामध्ये भारताच्या ताज महालचा देखील समावेश होतो. त्याला विसरून चालणार नाही.
हे मानवनिर्मित आणि नैसर्गिक चमत्कार विचार करायला भाग पाडतात. ह्यांना बघून अचंबित व्हायला होतं, कसे, कोणी, असे कसे अशा अनेक गोष्टींचा शोध सुरू होतो.
मग त्यांचे वर्गीकरण होते जगभरातल्या चमत्कारिक गोष्टी आणि देशातल्या चमत्कारिक गोष्टी. ह्या चमत्कारांना बघण्यासाठी, एक भन्नाट अनुभव घेण्यासाठी खूप लोकं दूर दूर वरून येतात.
त्याच प्रमाणे ह्यांचा अभ्यास करण्यासाठी देखील अनेक शास्त्रज्ञ, पुरातत्त्ववेत्ते, इतिहासकार इत्यादी मंडळी येथे भेट देतात.
चला तर मग आज आपण अशाच एका अद्भूत, अनोख्या चमत्काराविषयी माहिती घेणार आहोत जो युनाटेड स्टेटस् अर्थात अमेरिकेमध्ये आहे.
जो नैसर्गिक चमत्कार आहे ज्याचं नाव आहे “पेंटेड हिल्स्” आणि ते ओरेगॉनच्या वायव्येला १४ कि.मी. लांब आहे.

३१३२ एकर मधे (१२.६७ कि.मि.) इतक्या जागेत असणार्या ह्या पेंटेड हिल्स् ची गणना ओरेगॉनच्या सात आश्चर्यांमध्ये होते. काउंटी मधलं हे एक संरक्षित क्षेत्र आहे.
खरं तर इकडे तीन प्रकारच्या हिल्स् आहेत. शीप हिल्स्, पेंटेड हिल्स् आणि कार्लो.
ह्यातील पेंटेड हिल्स् ह्या तिथल्या नदीच्या प्रवाहामुळे आणि पूरामूळे तयार झालेल्या रंगीबेरंगी दगड आणि माती ह्यांच्या एकावर एक साचलेल्या स्तरांमुळे तयार झाल्या आहेत.
ह्या रंगीत आहेत, रंग दिल्यासारख्या वाटतात म्हणून ह्यांचे नाव पेंटेड हिल्स् असे देण्यात आले आहे. ह्यामध्ये पिवळा, लाल, गडद हिरवा, काळा आणि राखाडी रंग इतके रंग आहेत.
पेंटेड हिल्स् चे हे रंग साधारण ३५ लाख वर्षांपूर्वी तयार झाले असावेत, जेव्हा ही जागा नदीच्या पूरसदृश भागात होती, असे तज्ञांचे मत आहे.
ह्यांचे रंगीत थर वेळोवेळी हवामानातेल बदलांमुळे बनत गेले जे वेगवेगळ्या वेळी वेगवेगळे होते.

वेगवेगवेळे वातावरण म्हणजेच दमट आणि शुष्क हवामान अधिक उषण कटिबंधीय वातावरणात बदलू लागल्याने ह्याला लालसर आणि पिवळसर थर तयार झाला.
जो मृदेने भरपूर आहे आणि लोह आणि ऍल्युमिनिअमने युक्त आहे, समृद्ध आहे. लाल रंगाचा थर जो लोहामुळे आलाय तो अलिकडच्या काळातील असावा जेव्हा पूर ओसरून वातावरण उष्ण आणि दमट झाले.
काळा रंग, गडद हिरवा रंग हा पूरामुळे वाहत आलेल्या प्रवाळसदृश वनस्पतींनी तयार झाला आहे आणि राखाडी रंग चिखल, वाळू आणि शिंपल्यांचा आहे.
पेंटेड हिल्स् मध्ये सुरवातीच्या काळातले हत्ती, घोडे आणि उंट ह्यांचे अवशेष सापडले आहेत त्यामुळे हा भाग्ग पृष्ठवंशीय पुरातत्त्ववेत्त्यांसाठी खूपच महत्त्वाचा आहे.
इथल्या भागावर बरेच्ग संशोधन चालू आहे ज्यामुळे येथे कशा प्रकारची वस्ती होती, फक्त जनावरेच होती की मनुष्यवस्ती देखील होती.
तसेच तेव्हाच्या वातावरणाचा आणि इतर बर्याच गोष्टींचा शोध पुरातत्त्व शास्त्रज्ञ घेत आहेत.
ह्या पेंटेड हिल्स चा आकार आणि रंग हुबेहुब शिंपल्यासारखा दिसतो.

शिंपल्याचे कसे थर दिसतात आणि एकाच शिंपल्याचे थरानुसार रंगही वेगवेगळे आणि सुंदर, आकर्षक दिसतात तसेच ह्या पेंटेड हिल्सचे शिंपल्या प्रमाणेच थर, थरांचा वेगवेगळा रंग आणि शिंपल्यासारखाच आकार असतो.
अतिशय सुंदर, आकर्षक दिसणाऱ्या ह्या पेंटेड हिल्स हुबेहुब शिंपल्यासारख्याच दिसतात. त्यामुळे ह्यांना महाकाय आकारातील शिंपले देखील म्हंटले जाते. खरंच ही एक आश्चर्यकारक गोष्ट आहे.
ओरेगॉनच्या ७ आश्चर्यकारक गोष्टींपैकी (Seven Wonders of Oregon) ह्या पेंटेड हिल्स आहेत ह्यात काही नवल नाही. त्या आहेतच आश्चर्यकारक!
पेंटेड हिल्स पर्यटकांसाठी वर्षभर खुले असते. पण, त्यासाठी काही नियम आहेत.
तिथे बांधलेल्या रस्त्यांवरूनच, पायवाटांवरूनच जायचे, समजा रस्ता सोडून गेलात तर तिथल्या निसर्गाला तसेच नैसर्गिक रित्या उद्भवलेल्या खनिजांना अडथळा निर्माण होऊ शकतो.

तसेच टेकड्यांना नुकसान पोहोचू शकते, कोणी जाणून बुजून नुकसान करतात तर कोणाकडून चुकून नुकसान पोहोचवलं जातं!
त्यामुळे इथे वारंवार सूचना देण्यात येतात इथल्या वस्तूंना नुकसान, हानी पोहोचवू नका (‘Don’t Hurt the Dirt’), आणि कोणत्याही खूणा सोडू नका (‘Leave No Trace’).
खरंच अशा काही वस्तू, वास्तू, गोष्टी बघून आश्चर्यचकित व्हायला होतं, त्याची निर्मिती बघून फ़ारच नवल वाटतं, अचंबित व्हायला होतं.
ही कोरोना संकट टळल्यावर तुम्ही जेव्हा केंव्हा अमेरिका वारीला, फिरायला जाल तेव्हा नक्कीच ह्या पेंटेड हिल्स् ला भेट द्याल ना?
===
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | Copyright © InMarathi.com | All rights reserved.