'या ७ गोष्टींना ख्रिश्चन धर्माने थेट "पाप" ठरवलं आहे! तुम्ही देखील यांत अडकला आहात काय? तपासून पहा!

या ७ गोष्टींना ख्रिश्चन धर्माने थेट “पाप” ठरवलं आहे! तुम्ही देखील यांत अडकला आहात काय? तपासून पहा!

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम |

===

ख्रिश्चन धर्म हा जगातील सर्वात जास्त लोकांनी आत्मसात केलेला धर्म आहे. हा जगातील सर्वात प्रभावशाली धर्मांपैकी सुद्धा एक आहे.

या धर्मात एकूण ७ गोष्टी अश्या सांगितल्या आहेत ज्या की पाप समजल्या जातात. या गोष्टींची नोंद किंग सोलोमन यांनी लिहिलेल्या पुस्तकात केलेली आहे.

ही पापं म्हणजे ख्रिश्चन धर्माची बंधुभाव आणि धर्मावरील विश्वास या नावाने सुद्धा ओळखली जातात.

या सात गोष्टींची निवड प्रामुख्याने या कारणासाठी करण्यात आली की, ख्रिश्चन धर्माच्या अनुयायांना चांगलं आचरण करण्याची शिकवण देण्यात यावी,

त्यांचा धर्मावरील विश्वास वाढावा या उद्देशाने देवाला न आवडणाऱ्या सात गोष्टी असा यांचा उल्लेख करण्यात आला.

 

christian inmarathi
the daily beast

 

पण, काही वर्षांनी सर्व अनुयायांना हे सांगण्यात आलं की देवाला फक्त एक गोष्टच आवडत नाही ती म्हणजे ‘देवावर आणि पर्यायाने धर्मावर विश्वास न ठेवणे.’

ख्रिश्चन धर्मीय लोकांचा या गोष्टीवर ठाम विश्वास आहे की, कोणताच मनुष्य हा शुद्ध नाहीये आणि त्याने कोणत्या ना कोणत्या वेळी काही तरी पाप हे नक्कीच केलेलं आहे.

याला अपवाद म्हणजे फक्त येशू ख्रिस्त. प्रत्येक मनुष्याला शुद्धीकरणाची गरज आहे. सर्वांनी देवाला क्षमा मागून स्वतःला शुद्ध केलंच पाहिजे.

सहाव्या शतकात होऊन गेलेले पोप ‘ग्रेगरी द ग्रेट’ यांनी लिहिल्याप्रमाणे खालील ७ गोष्टी या ख्रिश्चन धर्मात पाप समजल्या जातात:

 

१. वासना :

 

lust inmarathi
image album

 

वासना म्हणजे विकृत आणि लैंगिक विचारांचा अतिरेक. वासना कधीच भागल्या जाऊ शकत नाही आणि त्यामुळेच बलात्कार आणि व्यभिचार यासारखे प्रकार घडत असतात.

वासना म्हणजे लैंगिक गरजेला अतिरिक्त महत्व देणं आणि कायम त्या गोष्टीसाठी अधाशी असणं. वासना ही तुमच्या विचारातील पवित्रतेला कायम काळिमा फासणारी असते.

तुमच्या नात्यामध्ये पवित्रता असणं ही अत्यंत आवश्यक गोष्ट आहे ज्याला की ख्रिश्चन धर्मात सर्वोच्च स्थान देण्यात आलं आहे.

वासना कोणत्याही व्यक्तीला अविचारी गोष्टी करायला भाग पाडत असते आणि त्यांना देवाच्या भक्तीपासून सुद्धा लांब करत असते.

वासनेचा संबंध हा कायम लैंगिक गोष्टींशीच जोडला जातो, पण तो अर्थ फक्त तितका मर्यादीत नसून त्याचा लौकिक अर्थ स्वतःच्या मनावर ताबा ठेवणे असा आहे.

 

२. खादाडपणा :

 

hunger inmarathi
captain toy

 

खादाडपणा ही एक वृत्ती आहे ज्यामुळे तुम्ही कायम गोष्टींचा अतिवापर आणि त्यामुळे त्यांचा होणारा अपव्यय याला कायम बळी पडत असतात.

आजच्या जगात या वृत्तीला कायम अन्नाशी जोडलं जातं. पण ही वृत्ती फक्त अन्न सेवनापूर्ती मर्यादीत नसून ती आपल्याला कोणत्याही गोष्टीचा अतिरेक करू नये हे शिकवते!

ज्यामध्ये खूप खर्चिक, खूप अधिरता कोणत्याही बाबतीतला हे सुद्धा योग्य उदाहरण ठरू शकतात.

खादाडपणा नियंत्रणात आणण्यासाठी मनावर नियंत्रण आणि संयम या दोन गोष्टी फार आवश्यक आहेत. नियंत्रण यासाठी असावं लागतं की, तुम्ही अनावश्यक गोष्टींची लालसा ठेवू नये यासाठी.

आणि संयम यासाठी की ज्या गोष्टी तुम्हाला पाहिजे आहेत त्यामध्ये एक संतुलन ठेवता यावं यासाठी.

खादाडपणा या गोष्टीला सुद्धा म्हणतात की तुम्ही तुमच्या गोष्टी इतरांसोबत share करतात की नाहीत की प्रत्येक गोष्ट फक्त स्वतः साठीच ठेवून घेतात.

 

३. लोभ:

 

greed inmarathi
BlueSky wealth advisors

 

लोभ हा वासना आणि खादाडपणा यांच्यासारखाच आहे असं म्हणता येईल.

लोभ म्हणजे कोणत्याही गोष्टीसाठी तुमच्या मनात असलेली स्वार्थी लालसा आणि कोणत्याही वस्तूची वेड्या सारखा संचय करत राहणे ज्यामुळे तुम्ही स्थावर मालमत्ता वाढवू शकतात,

आणि त्यामध्येच धन्यता मानायला सुरुवात करतात.

लोभ कमी करण्यासाठी एकच उपाय असू शकतो तो म्हणजे तुमच्या कमाईतील काही भाग तुम्ही परमार्थासाठी व्यतीत करणे.

त्यासाठी आवश्यक आहे ते तुमच्या स्वभावात निस्वार्थीपणा असणे आणि तुम्ही इतरांच्या कल्याणासाठी कायम मदत करायला तयार असणे. समाजाबद्दल प्रेम असणे हे यासाठी अपेक्षित आहे.

 

४. आळशीपणा :

 

sloth inmarathi
deviantArt

 

तुमच्या मनात असलेली उदासीनता हे आळशीपणा या वृत्तीला खतपाणी घालणारी असते. कोणत्याही गोष्टीला महत्व न देणं किंवा ते महत्व पटलेलं नसलं की आळशीपणा हा बळावत असतो.

स्वतःच्या सामर्थ्याची स्वतःलाच ओळख नसली की सुद्धा आळशीपणा हा वाढत असतो. आळशीपणावर मात करण्यासाठी प्रत्येक कामाला एकाग्र चित्ताने वेळ देणं अत्यंत आवश्यक आहे.

ही एकनिष्ठता तुमच्या प्रत्येक नात्यात असावी हे सुद्धा अपेक्षित आहे.

 

५. क्रोध :

 

wrath inmarathi
crossfit inferno

 

क्रोध किंवा राग म्हणजे तुम्हाला नियंत्रित न ठेवता आलेल्या भावना. ज्या की एखाद्याबद्दल असणाऱ्या द्वेषामुळे सुद्धा असू शकतो.

राग ही अशी गोष्ट आहे ज्यात तुम्हाला सत्य दिसणं बंद होतं आणि तुमचं मन इतरांनी एखादी गोष्ट घडण्या बद्दलची कारणं तुमचं मन मान्य करत नाही.

राग ही गोष्ट सर्वात घातक गोष्ट आहे कारण त्यामुळे तुम्ही कायम एखाद्या गोष्टीच्या किंवा नात्याच्या विनाशाकडे खेचले जातात.

आणि नकळत तुम्ही त्या मार्गावर एखाद्या घडून गेलेल्या घटनेबद्दल बदला घेणे आणि नकळत स्वतःच्या सतर्कतेला धक्का पोहोचवणे अश्या गोष्टी करत असतात,

आणि ते करताना तुम्ही न्यायाच्या बाजूने कधीच नसता.

तुम्ही फक्त तुमच्या रागाच्या बाजूने असतात. रागावर मात करण्यासाठी क्षमा करणे, समजावून घेणे, दया दाखवणे, संयम बाळगणे आणि समोरच्या व्यक्तीची परिस्थिती मान्य करायला शिकणे हे अत्यंत आवश्यक आहे.

 

६. मत्सर :

 

envy inmarathi
the new times

 

मत्सर म्हणजे दुसऱ्या व्यक्तीकडे असलेल्या कोणत्याही दृश्य किंवा अदृश्य वस्तूबद्दल तुमच्या मनात लालसा असणे.

सौंदर्य, उत्साह, व्यक्तिमत्व आणि विनोदी स्वभाव या काही अदृश्य गोष्टींची उदाहरणं सांगता येतील. तुमच्या मनात कोणत्याही व्यक्तीबद्दल होणारी जळफळाट हे मत्सर निर्माण होण्याचं पाहिलं लक्षण आहे.

यावर मात करण्यासाठी आपल्या मनात कृतज्ञता भाव असणं अत्यंत आवश्यक आहे. आपल्याला इतरांचं कौतुक करायला शिकलं पाहिजे.

इतरांच्या आनंदात आनंदी होणं आपण शिकायला पाहिजे.

आपल्याकडे नसलेल्या गोष्टींबद्दल विचार न करता आपल्याकडे जे आहे त्याबद्दल कायम कृतज्ञ असल्यानेच मनात मत्सर भावना निर्माण होणे बंद होऊ शकते.

 

७. गर्व :

 

pride inmarathi
google sites

 

गर्व ही स्वतःबद्दल मनात तयार केलेली अनावश्यक प्रतिमा आहे. या प्रतिमेमुळेच मनात अहंकार निर्माण होतो.

अहंकारी वृत्ती ही एक विकृत मनस्थिती आहे ज्यामध्ये तुम्ही स्वतःवर प्रमाणापेक्षा जास्त प्रेम करतात आणि इतरांवर गरजेपेक्षा कमी आणि इतरांना तुम्ही कायम कमी लेखता.

गर्व म्हणजे तीच गोष्ट आहे त्यामुळे लुसिफर ला स्वर्गातून खाली यावं लागलं आणि सैतान बनावं लागलं होतं.

याचं कारण हे की लुसिफरला असं वाटलं होतं की तो स्वतः सर्व लोकांपेक्षा आणी देवपेक्षा श्रेष्ठ आहे. गर्वावर मात करण्यासाठी तुम्हाला स्वतः मध्ये नम्रता असणं अत्यंत आवश्यक आहे.

या सात पापांबद्दल सांगण्याचा उद्देश हाच की वाचकांना याबाबतीत माहिती होणे,

आणि त्यांनी समाजात जर कोणी या गोष्टींबद्दल जर का याबाबतीत अंधश्रद्धा पसरवत असेल तर तुम्हाला या वाचनातून मिळालेल्या शहाणपणा तुम्ही समाजात योग्य ज्ञान लोकांपर्यंत पोहोचवाल!

===

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?