' सिगरेट सोडायची आहे, मग हे ५ पदार्थ खायला लागा आणि परिणाम बघा! – InMarathi

सिगरेट सोडायची आहे, मग हे ५ पदार्थ खायला लागा आणि परिणाम बघा!

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

कोणत्याही गोष्टीचे अतिसेवन म्हणजे व्यसनच, मग ती गोष्ट चांगली असो किंवा शरीरासाठी अपायकारकच!

जसे जास्त अन्न सेवन केल्यास पोटाचे विकार होतात, जसे तेलकट तुपकट पदार्थ जास्त खाल्ल्याने शरीराला अपाय होऊ शकतो तसेच मद्यपान आणि धूम्रपान या दोन व्यसनांनी तर खूप भयावह परिणाम होतात!

दारूचं व्यसन माणसाला अक्षरशः बरबाद करतं, दारू माणसाच्या नर्व्हस सिस्टीमवर घाव करतेच शिवाय माणसाचे खासगी आयुष्य त्याचे घरदार हे सुद्धा बरबाद करते!

सिगारेटचे व्यसन तर किती धोकादायक आहे हे वेगळं सांगायलाच नको, सिनेमा बघायला गेल्यावर सुरुवातीला येणारी ‘मुकेश’ ची जाहिरात तर आपल्या सगळ्यांनाच ठाऊक आहे!

त्या जाहिरातीतून तर सिगरेट किंवा तंबाखू सेवनाचे इतके भयानक परिणाम दाखवले आहेत तरी लोकं सिगारेट सोडायचं नाव घेत नाहीत!

 

no smoking inmarathi

 

दरवर्षीच्या अर्थसंकल्पात सिगारेट वरचा कर वाढवला जातो त्यामुळे ते प्रॉडक्ट आणखीन महाग होते पण तरीही सिगारेट आणि तत्सम पदार्थांच्या विक्रीत तसूभर देखील फरक पडत नाही!

त्यामुळे हे व्यसन इतकं वाईट कि एकदा लागलं की ते सुटायचं नावचं घेत नाही. मग एकदा का त्याचे दुष्परिणाम दिसू लागले की कुठून कुठून काय काय शक्कल शोधून सिगारेट सोडायचे आपले प्रयत्न सुरु होतात.

पण बहुतेक वेळा हे प्रयत्न देखील अपुरे पडतात आणि पुन्हा तेच ‘ये रे माझ्या मागल्या’!

 

 

no smoking inmarathi

 

तुम्ही देखील असे अनेक प्रयत्न करून कंटाळला असाल तर आज आम्ही तुम्हाला जी हटके गोष्ट सांगणार आहोत ती करून बघा आणि आम्हाला खात्री आहे की त्याचा नक्कीच चांगला परिणाम दिसून येईल.

एका संशोधनातून ही हटके गोष्ट सिद्ध झाली आहे ती गोष्ट म्हणजे- रोजच्या दैनंदिन खाद्यपदार्थांच्या सेवनाने देखील सिगारेट सुटू शकते. काय?

आहे की नाही एकदम मस्त बातमी! म्हणजे आता उगाच बाहेरचे प्रयत्न नको आणि त्यात पैसा घालवायला देखील नको.

१. मोसंबीचा रस

 

mosambi juice inmarathi

 

सिगारेटमुळे शरीरातील व्हिटॅमिन ‘सी’वर परिणाम होतो. याची भरपाई निकोटिन करू लागतो. अशा वेळी जर सिगारेटपासून लवकर सुटका मिळवू इच्छित असणार्‍यांना मोसंबीचा रस किंवा रसाळ फळांचे जास्तीत जास्त सेवन केले पाहिजे.

या कामामध्ये लिंबू, डाळिंब मदत करू शकतात.

 

२. च्युइंगम

 

nicotex inmarathi

 

सिगारेटच्या तलफीवर शुगर फ्री च्युइंगम एक चांगला पर्याय ठरू शकतो. बाजारात निकोटेक्स नावाचे एक च्युइंगम आहे ज्यामुळे सिगरेटचे व्यसन सुटायला मदत होते!

याचा फायदा बऱ्याच लोकांना झाला आहे, पण तरी या च्युइंगम ची सवय सुद्धा वाईटच त्यामुळे त्याची सवय लावून घ्यायची कि नाही हे तुम्ही तुमचं ठरवायचं!

 

३. दूध

milk inmarathi

 

दुधाला आपण एका पौष्टिक पदार्थाच्या रूपात ओळखतो. दुधापासून शरीराला आवश्यक असणारी पोषक तत्त्वे मिळतात. दूध आपल्या या सवयीला सोडण्यात मदत करील.

ड्युक्स विद्यापीठात झालेल्या संशोधनानुसार सिगारेट ओढण्यापूर्वी एक ग्लास दूध घेतले तर आपल्याला सिगारेट घेण्यास आनंद येणार नाही. कारण याचा धूर कडू लागेल.

एकदा हे करून पाहा. सिगारेटला दुधाच्या ग्लासमध्ये बुडवून घ्या, नंतर सुकवून तीच सिगारेट ओढा. तिचा धूर इतका कडू लागेल की दुसरा झुरका घेण्याची इच्छाच होणार नाही. या प्रयोगानंतर कोणीही सिगारेटला नको म्हणेल.

 

४. जिनसेंग

 

Korean-Ginseng-marathipizza

 

आपल्याला सिगारेटची तलफ लागेल तेव्हा चविष्ट पदार्थ नाही तर चिमूटभर मीठ चाटून पाहा. तलफ नाहीशी होईल.

जिनसेंग- ही चिनी जडी-बुटी फक्त वजन कमी करण्यासाठीच उपयोगी नाही, तर निकोटिनद्वारे शरीरात जाणार्‍या डोपामाइनच्या प्रभावालासुद्धा कमी करण्यास मदत करते, पण याचे नियमित सेवनही नुकसानदायक ठरू शकते.

महिन्यात तीन किंवा चार वेळेस घेऊ शकता.

५. भाज्या

vegetables-marathipizza

 

दुधाप्रमाणेच गाजर, दोडका, काकडी आणि वांगे खाल्ल्यानंतर सिगारेट पिण्याची इच्छा होत नाही. तज्ज्ञांच्या मते, या भाज्यांची जास्त मात्रा निकोटिनवर प्रभाव टाकते.

सिगारेट सोडण्याच्या अभियानापासून वटाणे आणि मक्यासारख्या भाज्यांना दूरच ठेवले पाहिजे. या भाज्यांत असणारी शर्करा याची तलफ जास्त वाढवू शकते.

आता जर आपल्याला सिगारेट पिण्याची तलफ लागली तर एक गाजर खा, नाही तर पालक खा. या भाज्यासुद्धा आपली सिगारेट पिण्याची इच्छा दूर करू शकतात.

 

ciggerate no inmarathi

 

पण एक गोष्ट मात्र नक्की, जर तुम्हाला खरोखरच सिगारेट सोडायची असेल तर प्रबळ इच्छाशक्ती असणे देखील गरजेचे आहे. 

जर तुम्ही मनापासून ठरवलं असेल कि सिगरेट सोडायची म्हणून तर ती नक्कीच सुटेल, नाहीतर काय क्रियेवीण वाचा व्यर्थ!

सदर लेखातील माहिती, विविध तज्ज्ञांच्या अभ्यास व मतांनुसार तसेच सर्वसामान्य मनुष्याच्या आरोग्यास अनुसरून देण्यात आलेली आहे. ही माहिती देण्यामागे, या विषयाची प्राथमिक ओळख होणे हा उद्देश आहे. InMarathi.com च्या वाचकांनी कोणताही निर्णय घेण्याआधी, आपल्या आरोग्याला अनुसरून, डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

 शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?