' कडु औषधांपेक्षा घरातला “हा” गोड पदार्थ खाल्लात तर अनेक रोगांपासून दूर राहू शकता..!! – InMarathi

कडु औषधांपेक्षा घरातला “हा” गोड पदार्थ खाल्लात तर अनेक रोगांपासून दूर राहू शकता..!!

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम |

===

निरोगी आयुष्य जगावं असं प्रत्येकाला वाटतं.

 

stay fit inmarathi
daily news

 

आत्ता सुरु असलेला हा कोरोना महामारीचा धुमाकूळ पाहता आपण या मतावर आलो आहोत की, माणसानं प्रमाणापेक्षा जास्त नैसर्गिक गोष्टीत केलेले हस्तक्षेप आज माणसाला किती महागात पडू शकतात हे दिसत आहे.

वाढतं आयुर्मान, वाढणारं प्रदुषण, वाढती महागाई, औषधांचा केला जाणारा वापर, धान्यांवर होणारा अतिरिक्त प्रमाणात खतांचा आणि कीडनाशकांचा केला जाणारा वापर, यामुळे बहुतेक अन्नधान्याची पोषणमूल्यं कमी झाली आहेत.

या सर्वांचा एकत्रित परिणाम म्हणजे लोकांची कमी झालेली प्रतिकारशक्ती.

पण कितीही माणूस निसर्गाच्या विरोधात गेला तरीही निसर्गानं त्याच्यासाठी काही उपयोगी वस्तू, पदार्थ, फळं वगैरेंची सोय केली आहे, ज्यामुळं त्याचं आयुष्य किमान निरोगी तरी जगायला यावं. फक्त आपल्याला ती माहिती होत नाही.

fruits-inmarathi

 

आपण सर्रास मैदा, साखरयुक्त पदार्थ वारंवार खातो आणि त्याचा परिणाम वाढतं वजन, स्थूलपणाने होणारे विविध आजार यांचा सामना करतो.

मधुमेह, हृदयविकार यांचा आयुष्यात लवकर होणारा प्रवेश हे याचं पर्यावसान आहे.

 

heart attack inmarathi

 

लहान वयात होणारा कॅन्सर, वाढत्या वयात होणारा स्मृतीभ्रंशाचा आजार हे सारे आजार हे बदललेल्या जीवनशैलीमुळे मानवी आरोग्यावर घाला घालायला आले आहेत.

डाॅक्टर सांगतात या सर्वांपासून वाचायचे असेल तर साखरेचा अतिवापर टाळावा.

 

suger inmarathi

 

ठिक आहे.. साखर कमी केली तर मग शरीराला जी उर्जा लागते ती कशी निर्माण होणार? मग कार्यक्षमता कमी झाली की जगायचं कसं?

थोडक्यात हे सगळं टाळायचं असेल तर आपल्याला नैसर्गिक साखर आवश्यक आहे. म्हणजे गोड पदार्थ तर गरजेचा आहे पण तो नैसर्गिक गोडीचा हवा.

माणूस कितीही निसर्गाच्या विरोधात गेला तरी तो निसर्गाचा पुत्र आहे. मग निसर्ग त्याची काळजी घेतोच. त्यानं आपल्या मुलासाठी असंच उत्पादन केलं आहे, ज्यानं या सर्व रोगांनी तो लढू शकेल. काय आहे ते उत्पादन?

आज आपण अशाच एका घरगुती पदार्थाची माहिती घेणार आहोत जो तुमचं आरोग्य उत्तम राखण्यासाठी उपयुक्त आहे.

खजूर हा आपल्याकडं सहजासहजी उपलब्ध आहे. तसेच तो इतर सुक्यामेव्याच्या तुलनेत स्वस्तही आहे.

 

dates inmarathi
medical news today

 

जो सामान्य लोकांना परवडणारा आहे. उष्णकटिबंधीय देशात खजूर मिळतोच.

तूप खजूर, खजुराचे लाडू, खजुराचे रोल्स असे विविध पदार्थ आपण अनेकदा तयार करतो.

वाळलेला खजूर म्हणजे खारीक खोबरे वापरून केलेले लाडू यातून आवश्यक असलेला पौष्टिक आहार आपण घेतोच. पण खजुराची आणखीही काही वैशिष्ट्ये आहेत जी आपली प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी उपयोगी आहेत.

 

dates choclate inmarathi
healthy food for living

 

कारण त्यामध्ये असलेल्या कॅलरीज या प्रथिनांतून येतात. एक मोठा भाग कॅलरीज असतात आणि उरलेला भाग असतो तो प्रथिनांचा असतो. आणि हीच प्रथिनं मानवी शरीरासाठी अत्यंत उपयुक्त आहेत.

खजुरामध्ये वेगवेगळी भरपूर जीवनसत्त्वं, आणि खनिजे असतात. त्याचबरोबरीने त्यात फायबर्स आणि अॅण्टिआॅक्सिडंट असतात.

अगदी वाळल्यानंतरही म्हणजेच त्यांची खारीक झाल्यानंतरही कॅलरीज मोठ्या प्रमाणात असतात. या लेखात आपण खजुरात असणारे घटक आणि जीवनसत्त्वे यांची माहिती घेऊया.

काय काय असतं खजुरात? जे मानवी शरीरासाठी भरपूर प्रमाणात लाभदायक आहे?

१. अॅण्टिआॅक्सिडंट

खजुरामध्ये भरपूर प्रमाणात अॅण्टिआॅक्सिडंट असते. ताज्या खजुरात यांचे प्रमाण जास्त असते तर वाळलेल्या खजुरात पाॅलिफेनाॅल असते.

 

dates 1 inmarathi

 

त्यामुळं आपण ग्रीन टी घेतल्यानंतर जी उर्जा निर्माण होते तीच खजुरामुळे मिळते. यातही खालस म्हणजे अका मदिना जातीचे जे खजूर असतात त्यात अॅण्टिआॅक्सिडंट भरपूर प्रमाणात उपलब्ध आहे.

या अॅण्टिआॅक्सिडंटमुळे मानवी शरीरातील पेशींची संख्या समान ठेवून कोणत्याही रोगांचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी लागणारी प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी खजूर उपयुक्त ठरतात.

अगदी गंभीर आजार जसे, मधुमेह, हृदयविकार, कर्करोग, स्मृतीभ्रंश यांना आटोक्यात ठेवण्यासाठी खजूर अतिशय उपयुक्त आहे.

२. समतोल राखण्यासाठी उपयुक्त

खजुराच्या दुसरा मोठा उपयोग म्हणजे यामुळे रक्तातील साखरेची पातळी योग्य राखायला मदत होते.

 

dates 2 inmarathi
hindustan times

 

रोजच्या आहारात दोन खजुर खाल्ले असता साखरेची पातळी समतल राहतेच शिवाय रक्तातील मेदाचे प्रमाणही योग्य राखायला मदत होते.हे संशोधनाने सिद्ध झाले आहे.

३. रक्तदाब नियंत्रणात आणण्यासाठी

वाढत्या ताणतणावाच्या हा अजून एक परिणाम म्हणजे कमी वयात वाढलेला रक्तदाब.

 

bp inmarathi

 

जे विकार पूर्वी उतारवयात होत होते ते आता तिशीतच माणसाला गाठू लागले आहेत. या रक्तदाबावर नियंत्रण ठेवण्यासाठी खजूर अतिशय उपयुक्त आहे.

साधारणपणे खजूराच्या पाच ते सहा बियांमध्ये ८० मिलीग्रॅम मॅग्नेशियम असते. या मॅग्नेशियम मुळे रक्तवाहिन्यांचे कार्य सुरळीतपणे चालू रहाते.

 

dates 3 inmarathi

 

३७० मिलीग्रॅम मॅग्नेशियम मुळे रक्तदाब कमी होण्यास मदत होते, मात्र एकाच वेळी जर जास्त प्रमाणात खजूर खाल्ले तर पोट बिघडण्याची शक्यता असते.

थोडक्यात खजूर शरिरातील मॅग्नेशियम वाढवण्यासाठी उपयोगी आहेत.

४. मेंदूच्या कार्यक्षमतेत वाढ

खजुराचा हा अतिशय महत्त्वाचा उपयोग आहे. विस्मरणाचा त्रास खजूर खाण्याने कमी व्हायला बहुतांश मदत होते.

 

memory inmarathi
thehealthsite.com

 

मुलांना तसेच वयोवृद्ध व्यक्तींना खजूर ही आरोग्याची गुरुकिल्ली आहे असं म्हणायला हरकत नाही. अल्झायमर झालेल्या लोकांनी खरोखर खजुराचा वापर नक्की करावा.

५. हाडांसाठी पोषक

खजुराच्या सेवनाने या आरोग्याच्या तक्रारी जशा कमी होतात तसाच महत्त्वाचा भाग असतो तो हाडांच्या पोषणासाठी यांचा फार उत्तम उपयोग होतो.

स्त्रीयांना रजोनिवृत्तीनंतर कॅल्शियमच्या कमतरतेमुळे आॅस्टीओपेनिया म्हणजे हाडांचा ठिसूळपणा वाढून अस्थिभंगाचा धोका निर्माण होतो.

 

eating dates inmarathi
krishi jagran

 

खजुराच्या सेवनाने त्यात असणारी पोटॅशियमची मात्रा हा धोका कमी करायला मदत करतो.

६. फायबर्स

खजुरात असलेले तंतूमय पदार्थ म्हणजेच फायबर्स. हा मानवी शरीरातील एक आवश्यक घटक आहे.

या फायबर्समुळे अन्नपचन व्यवस्थित होण्यासाठी मदत होते. बद्धकोष्ठाचा त्रास या फायबर्स मुळे टळू शकतो आणि त्याच बरोबरीनं रक्तातील साखरेचे प्रमाण नियंत्रित करण्यासाठी मदत होते.

 

fiber inmarathi
mother nature network

 

थोडक्यात सांगायचं तर, खजूर हे इतर सुका मेवा आणि मिठाई यांच्या तुलनेत खूप स्वस्त पण उत्तम आरोग्यासाठी उपयुक्त फळ आहे.

उष्णकटिबंधीय देशात ताजा ताजा खजूर सहज उपलब्ध होतो. तोच पाश्चिमात्य देशांत सुकवून विकला जातो. तरीही त्यांची पोषणमूल्यं ही उत्तमच आहेत.

ओला खजूर आणि सुकलेला खजूर म्हणजे खारीक वापरुन बनवलेले पदार्थ निश्चितपणे पौष्टिक असतातच आणि त्याचा उपयोग उत्तम आरोग्यासाठी होतो.

 

khajoor inmarathi
top indian racipes in hindi

 

खजुरात असलेली नैसर्गिक साखर ही माणसाच्या रक्तातील साखरेचे प्रमाण नियंत्रित करण्यासाठी मदत करते. कारण त्यावर कसलीही रासायनिक प्रक्रिया केलेली नसते.

हृदयविकाराच्या त्रासातही खजुराच्या सेवनाने उपयोग होतो आणि रक्तवाहिन्यांचे कार्य सुरळीतपणे पार पाडायला खजूरच मदत करतो. असा हा खजूर सर्वसामान्यांना परवडेल असा आणि आरोग्यदायी आहे.

===

महत्वाची सूचना: सदर लेखातील माहिती, विविध तज्ज्ञांच्या अभ्यास व मतांनुसार तसेच सर्वसामान्य मनुष्याच्या आरोग्यास अनुसरून देण्यात आलेली आहे. ही माहिती देण्यामागे, या विषयाची प्राथमिक ओळख होणे हा उद्देश आहे. वाचकांनी कोणताही निर्णय घेण्याआधी, आपल्या आरोग्याला अनुसरून, डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.

===

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?