' कोरोनामुळे संकटाच्या दरीत सापडलेल्या जगाला या मुलाने एक जबरदस्त आशेचा किरण दाखवलाय!

कोरोनामुळे संकटाच्या दरीत सापडलेल्या जगाला या मुलाने एक जबरदस्त आशेचा किरण दाखवलाय!

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम |

===

कोरोना महामारीच्या सध्याच्या या काळात लोक घरात बसून कंटाळलेत. निराश झालेत. मोठ्यांना आपलं नेहमीचं रुटीन सोडून घरात बसावं लागलंय.

तर छोट्यांना बाहेर आपल्या सवंगड्यांसह खेळणंच बंद झालंय. सर्वांच्या चेहऱ्यावरचं नेहमीचं हास्य लोप पावलंय.

माणसाचा इतिहास असा आहे, की कितीही संकटं आली तरी त्यावर मात करण्याचा प्रयत्न माणूस हर तऱ्हेने करत असतो. एकमेकांना मदत करत असतो.

आपापल्या परीने परिस्थिती सुधारावी यासाठी हातभार लावण्याचा प्रयत्न करत असतो.

कोरोनाच्या जगभरातील संकटात देखील आपल्याला असे अनेक किस्से ऐकायला मिळतात. अनेक दिलासादायक, सकारात्मक बातम्याही ऐकायला मिळतात.

त्यातून माणूस नैराश्य झटकून पुन्हा संकटकाळाशी सामना करण्यास तयार होतो.

या तणावपूर्ण परिस्थितीत लोकांच्या चेहऱ्यावर पुन्हा हास्य आणण्याचा असाच एक प्रयत्न हा छोटा करतोय. याचं नाव आहे कॅलेन मॅकलॉलीन.

 

laughter stand inmarathi 1
yahoomoney.com

 

त्याने आपल्या घरासमोर जोक्सचं किंवा विनोदाचं काउन्टर उघडलंय. आणि आपल्या घराजवळच्या लोकांना तो हसवण्याचा प्रयत्न करतोय.

कॅलेन मॅकलॉलीनचं वय आहे अवघं सहा वर्षे. आणि तो राहतोय कॅनडाच्या वॅन्कुव्हर शहरात.

 

कॅलनचे जोक्स काऊन्टर –

 

laughter stand inmarathi 2
goodnewsnetwork.com

 

आपल्या घराच्या अंगणात झाडाखाली त्याने काऊन्टर टाकलंय. तिथे तो सकाळी साडेनऊच्या सुमारास जाऊन बसतो. आणि घरासमोरून जाणाऱ्या येणाऱ्या लोकांना विनोद ऐकवून हसवतो.

अर्थात त्यासाठी तो सोशल डिस्टन्सिंगची काळजी घेऊनच हे करतोय. जेवणाची सुटी संपल्यावर पुन्हा एक तास तो तिथे जाऊन बसतो.

लोकांना आता त्याच्याबद्दल माहिती झाल्याने लोक जाता येता त्याच्याकडे बघून त्याला हाय हॅलो करतात, स्माईल देतात आणि एखाद्या विनोदाची फर्माईशही करतात.

 

कॅलनचा स्वभाव –

 

 

कॅलेनची आई कॅल्शिया म्हणते की, कॅलन पहिल्यापासूनच लोकांशी मिळून मिसळून वागणारा आहे. त्याला लोकांमध्ये राहायला आवडते.

सहा महिन्यापूर्वीच त्याला छोट्यांच्या विनोदाचे एक पुस्तक आणून दिले होते. त्यातील विनोद तो आम्हाला त्याच्या खास शैलीत रोजच ऐकवत असे.

म्हणून एकदा आमच्या मनात आले, की तोही घरात बसून कंटाळतोय, तर त्याला आपण लोकांना हे विनोद ऐकवायला बसवले तर? त्यामुळे त्यालाही लोकांना भेटण्याचा, त्यांच्याशी बोलण्याचा आनंद होईल आणि लोकांनाही मजा येईल.

कॅलनला स्वतःला ही कल्पना खूप आवडली आणि त्याने ती लगेच अंमलातही आणली. आपल्या घराच्या अंगणातल्या कोपऱ्यातच त्याने आपलं जोक्सचं हे काऊन्टर मांडलं.

त्याच्या आईबाबांनी आपल्या शेजाऱ्यापाजाऱ्यांना आणि त्याच्या मित्रमैत्रिणींना सोशल मिडियाच्या माध्यमातून त्याचे हे जोक्स ऐकण्यास येण्याचे आमंत्रण दिले.

लोक त्याच्या घरासमोर येता जाता थांबू लागले. आणि जोक्सची फर्माईश करू लागले. अर्थात कॅलनचे जोक्स हे लहानग्या मुलांच्या वयाचेच असतात.

हे विनोद छोटे छोटे, बहुतांश एका वाक्याचेच असतात. परंतु ते सादर करण्याची त्याची खास शैली आहे ती लोकांना आवडते.

 

त्याचे जोक्स ऐकायला येणारे लोक –

 

laughter stand inmarathi
storypick.com

 

लॉकडाऊनच्या काळात लोक फार कुणी बाहेर पडत नाहीत. परंतु काही जीवनावश्यक वस्तुंच्या खरेदीसाठी बाहेर पडताना ते आवर्जून कॅलनच्या या काऊन्टरसमोर दूर उभे राहून त्याचे विनोद ऐकून हसत असतात.

घडीभर का होईना आपले नैराश्य विसरत असतात.

शेजारीपाजारीही आपल्या लहानग्यांना घेऊन त्याचे जोक्स ऐकायला जरा वेळ तरी बाहेर येतात. त्याचे शेजारी राहणारे मित्रमंडळी देखील गेट बाहेरून त्याला हाय हॅलो करू शकतात.

एकदा त्याच्या शाळेचे प्रिन्सिपॉलही त्याला दुरून भेटून गेले आणि त्याचे विनोद ऐकून हसून गेले. त्यामुळे सगळ्यांनाच थोडा का होईना आनंद मिळतो.

 

लेमोनेड विकण्याऐवजी लोकांना हसवणे, तेही फ्रिमध्ये –

 

laughter stand inmarathi 5

 

परदेशांत विशेषतः अमेरिका, कॅनडा आणि युरोपमधील देशांत कॅलनच्या वयाची लहान मुलं आपल्या शाळेला उन्हाळी सुट्ट्या लागल्या, की आपल्या घरासमोर काऊन्टर्स लावून लेमोनेड सारखे सॉफ्ट ड्रिंक्स विकतात.

त्यातून त्यांचा वेळही छान जातो आणि त्यांना पॉकेटमनीही मिळतो. जाणारे येणारे लोक देखील अशा छोट्यांकडून ड्रिंक्स विकत घेऊन पितात आणि त्यांना उत्तेजन देतात. त्यांचे कौतुक करतात.

परंतु सध्या उन्हाळी सुट्ट्यांना तिकडे अजून अवकाश आहे आणि आता लॉकडाऊनच्या काळात सुट्टीप्रमाणेच घरी बसावं लागतंय. त्यात लेमोनेड विकण्याचे काऊन्टर तर लावणे शक्य नाही.

परंतु असे एक अनोखे काऊन्टर त्याने आपल्या आईबाबांच्या मदतीने आणि पाठिंब्याने लावले आहे. आणि लोक त्याला प्रतिसादही देत असल्याने त्याचा उद्देशही सफल झालेला आहे.

अर्थात कॅलन हे जोक्स ऐकवण्याचे पैसे घेत नाही. या लहानग्याचं म्हणणं आहे, की लोकांना आताच्या काळात जीवनावश्यक वस्तु खरेदीसाठी पैसा बचत राहायला हवा.

त्यामुळे मी त्यांना पैसे न घेताच हे विनोद ऐकवत आहे. माझा हेतू ह्या नैराश्याच्या काळात त्यांच्या चेहऱ्यावर जरा तरी हसू आणावं इतकाच आहे. या लहानग्याच्या या बोलावरून मोठ्यांनीही बरंच काही शिकण्यासारखं आहे.

कोरोना महामारीच्या भीषण निराशाजनक काळात आपल्याला अनेक अशा दिलासादायक बातम्याही कानावर येतात. त्यापैकीच एक म्हणजे या लहानग्या कॅलन मॅकलॉलीनची कहाणी आहे.

===

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | Copyright © InMarathi.com | All rights reserved. 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?