' या टिप्स फॉलो करून स्वतःचा “आत्मविश्वास” वाढवलात तर अपयश कधीच वाट्याला येणार नाही – InMarathi

या टिप्स फॉलो करून स्वतःचा “आत्मविश्वास” वाढवलात तर अपयश कधीच वाट्याला येणार नाही

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामशेअरचॅट

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

===

मराठीत एक म्हण आहे की ‘व्यक्ती तितक्या प्रवृत्ती’ म्हणजे प्रत्येक व्यक्तीचा स्वभाव, त्याची जीवनाकडे पाहण्याची दृष्टी, त्याचा स्वतःचा संघर्ष वेगळा असतो.

आपल्यापैकी सर्वांनाच जीवनात यशस्वी होण्याची मनीषा असते. आयुष्याच्या प्रत्येक पातळीवर आपला, काहीतरी मिळवण्यासाठी संघर्ष चालूच असतो!

मग विद्यार्थी असताना आपल्याला उत्तम गुण मिळवण्याची, आपल्या आवडत्या खेळात, कलेत नैपुण्य प्राप्त करण्याची इच्छा असेल.

पुढे शिक्षणानंतर आपला व्ययसाय- उद्योग अधिकाधिक अत्याधुनिक बनवून त्यात प्रगती करण्याची किंवा नोकरीत उत्तरोत्तर प्रगती करण्याची इच्छा असेल.

महत्वाकांक्षा असण्यात वाईट काहीच नाही.

परंतु बऱ्याचदा असं होतं की, आपण एखादी चांगली गोष्ट करण्याची ठरवतो, मनाची तयारी सुद्धा करतो पण प्रत्यक्ष कृती करण्याची वेळ येते तेव्हा भीतीने गाळण उडते अन आपण माघार घेतो.

 

fear-student-looking-at-exam-paper
isha.sadhguru.org

 

आपल्या मनातल्या इच्छा किंवा प्लॅन प्रत्यक्षात उतरवण्यासाठी सगळ्यात आवश्यक घटक आहे तो म्हणजे आत्मविश्वास! ही शक्ती प्रत्येक जण मिळवू शकतो. आपल्या मनातल्या भीती ला मागे टाकलं की अर्ध काम झालंच!

आत्मविश्वास ही इतकी प्रचंड शक्ती आहे की त्या जोरावर अनेक अवघड कामे तुम्ही चुटकीसरशी करू शकाल.

‘थ्री इडियट्स’ सिनेमा आपल्या पैकी सर्वांनीच पहिला असेल. त्यात २ सर्वसाधारण विद्यार्थ्यांचा कायापालट केवळ आत्मविश्वासाच्या बळावर कसा होऊ शकतो हे आपण पाहिलं.

 

amir khan inmarathi

 

आत्मविश्वास हे तुमच्या ध्येयाकडे घेऊन जाणाऱ्या गाडीतील इंधन आहे!

काही गोष्टी या पुस्तकी ज्ञानाद्वारे पूर्ण शिकता येत नाहीत जसं की चांगली शेती करणं किंवा सायकल चालवणं, पोहणं. या सर्व गोष्टी करण्यासाठी तुम्हाला त्या जागेवर पोचावं लागेल आणि प्रत्यक्ष मेहनत करावी लागेल.

प्रयत्न करून त्यातून जेव्हा फळ मिळेल तेव्हा तुमचा आत्मविश्वास वाढू लागेल.

सगळ्या यशस्वी व्यक्ती त्यांच्या यशाचं श्रेय त्यांच्यातल्या आत्मविश्वासाला देतात. परंतु आत्मविश्वास नक्की कसा विकसित करायचा किंवा अंगी बाणवायचा हे मात्र त्यातील सगळ्या लोकांना सांगता येईलच असं नाही.

अर्थात, आत्मविश्वासू बनणं किंवा असण्यात फार काही कठीण काम नाही!  ज्या विषयात तुम्हाला आवड आहे किंवा असं काही काम जे केल्याने तुमच्या मनाला समाधान,आनंद मिळत असेल ते पूर्ण करूनच आत्मविश्वास वाढतो!

खाली दिलेल्या काही सोप्या युक्ती वापरून आपला आत्मविश्वास नक्कीच वाढवता येईल!

 

कामं पूर्ण करण्यावर भर द्या

 

work from home inmarathi 4

 

आत्मविश्वास हा, तुम्ही मन लावून पूर्ण केलेल्या कामावर अवलंबून असतो. जेव्हा तुम्ही एखादे काम पूर्ण करता तेव्हा तुमच्या मनाची खात्री पटते की ‘हो, मी या प्रकारचे काम नक्की करू शकतो’!

तेच जर तुम्ही आरंभशूर असाल किंवा कामं अर्धवट टाकून निघून जात असाल तर तुम्हाला ते काम जमण्याचा विश्वास कसा मिळणार?

या साठी तुमच्या कामांची, ध्येयाची यादी करा. त्याची वेळेनुसार कमी कालावधीत,जास्त कालावधीत पूर्ण होणारे अशी विभागणी करता येईल.

सुरवातीला प्रत्येक दिवशी अमुक एक गोष्ट करायचीच असं मनाशी ठरवून टाका. हळू हळू तुम्ही ती पूर्ण करू शकाल.  मग तुमच्या दर आठवड्याच्या टार्गेट कडे लक्ष द्या.

एक दिवसाचं ध्येय गाठल्यावर मिळणार विश्वास हा तुम्हाला पुढच्या पायऱ्या चढण्यासाठी नक्की मदत करेल.

तुमच्या वाटचालीवर वेळोवेळी लक्ष असू द्या

 

goal-setting-inmarathi
market.co

 

कुठल्याही ध्येयाला गाठण्याचा सगळ्यात सोपा मार्ग म्हणजे त्या ध्येयाचे छोटया- छोट्या ध्येयात रूपांतर करायचं आणि त्याच्या पूर्णत्वाने आपली मूळ ध्येयाकडे होणारी वाटचाल वेळोवेळी तपासून पहायची.

समजा तुम्हाला स्वतःचं वजन १० किलो ने कमी करण्याची इच्छा आहे. हे ध्येय छोट्या- छोट्या कामात विभागून घ्या. दररोज योग्य आहार आणि व्यायाम करून तुम्ही आठवड्याला किमान २ कि. वजन घटवण्याचं छोटं ध्येय ठेवू शकता.

मग आठवड्याच्या शेवटी न चुकता वजनाच्या काट्यावर उभे राहून वजन किती कमी झालं याची नोंद करा. पहिल्या आठवड्यात भलेही तुमचं वजन १/२ किलोनेच कमी होईल! पण खचू नका

.. something is better than nothing! दर आठवड्याला कमी होणाऱ्या वजनाने तुम्हाला एक आत्मविश्वास येईल आणि तुम्ही तुमच्या मूळ ध्येयाला लवकर गाठू शकाल!

 

योग्य तेच करा

 

https://qr.ae/pNy7lA

 

बहुतेक आत्मविश्वासू लोकं हे सुयोग्य मूल्यावर आधारित जीवनशैली आत्मसात करतात. कुठलेही निर्णय घेताना त्यातल्या योग्य,अयोग्य गोष्टी आपल्याला समजल्या पाहिजे.

समजा अभ्यासातला एखादा विषय तुम्हाला आवडत नसेल किंवा त्यात मन लागत नसेल पण कोर्स पूर्ण करण्यासाठी तर त्याचा अभ्यास पूर्ण करणं आवश्यक आहे!

अश्यावेळी त्या विषयाचा अभ्यास तुम्ही सतत टाळत राहिलात तर पुढे परिक्षेवेळी या विषयाचा ताण येईल. तुमच्या आवडत्या विषया च्या परिक्षेवर पण परिणाम होईल.

म्हणून प्रत्येक वेळी आपलं मूळ ध्येय साध्य करण्यासाठी जे योग्य असेल तेच करा.

 

व्यायाम करा

 

home exercise inmarathi 1

 

हो, हा मुद्दा वाचून तुम्हाला आश्चर्य वाटलं असेल पण हे खरंय की शारीरिक व्यायाम केल्याने केवळ शरीरच नाही तर मन सुद्धा तंदुरुस्त राहायला मदत होते.

दररोज केलेल्या व्यायामाने एकाग्रतेची शक्ती वाढते, गोष्टी लक्षात ठेवण्याच्या क्षमतेत वाढ होते.

त्यामुळे स्वतःसाठी दिवसातून थोडा वेळ बाजूला काढा आणि झेपेल असा तुमच्या शरीराला थोडा तरी दमवणारा व्यायाम कराच!

 

भीती सोडून द्या

 

Fearful Waking up InMarathi

 

मराठीत म्हणतात ‘भित्या पाठी ब्रह्मराक्षस! ‘ किंवा हिंदीत पण तो सुप्रसिद्ध डायलॉग आहे ना ‘जो डर गया समझो मर गया’. मनात भीती बाळगू नका. ही भीती तुमच्या मनातल्या शक्ती ला खाऊन टाकते.

‘मी मीटिंग मध्ये हा प्रश्न विचारला तर सगळे मला हसतील का?’ ‘वर्गात सगळ्यांसमोर सरांनी मला झापल तर?’

असल्या भीती पलीकडे जाण्याचा प्रयत्न करा. काय होईल समजा तुम्ही मीटिंग मध्ये किंवा वर्गात सर्वांसमोर प्रश्न विचारला तर? अधिकाधिक काय होईल?

एक तर तुमच्या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला दिलं जाईल किंवा ते लगेच मिळणार नाही! पण तुमच्या मनातली शंका तर दूर होईल. अन समजा हसलंच कुणी तर हसू द्या.

तुमच्या मनातली भीती जाणं महत्वाचं. मग ती अभ्यासाची असो, गाडी चालवण्याची किंवा चार लोकांत बोलण्याची असो. जो पर्यंत आपण पुढाकार घेऊन काम करत नाही तोपर्यंत ती भीती अधिक मोठी होत जाणार.

या भीती ला वेळीच ठेचाल तर तुमचं ध्येय तुम्हाला आवाक्यात आल्यासारखं वाटेल!

 

स्वतःच्या ध्येयाच्या बाजूने उभे रहा

 

Dare, Fear and Dream Inmarathi
9changes.com

 

एकदा तुमचं ध्येय ठरलं ना मग नेहमीच त्याच्या बाजूने उभे रहा. दुनिया काहीही बोलो. तुम्ही काय करू शकता आणि काय नाही हे दुनिया तुम्हाला नाही सांगू शकत. ते सर्वस्वी तुमच्यावर अवलंबून आहे.

समजा बाहेरील व्यक्तीने तुमच्या ध्येयावर शंका उपस्थित केली किंवा त्याची हेटाळणी केली तरी त्या नकारात्मक गोष्टींकडे साफ दुर्लक्ष करा.

आपल्या देशाचे महानायक श्री अमिताभ बच्चन उमेदीच्या काळात आकाशवाणी वर निवेदक पदाच्या परीक्षेसाठी गेले होते. तिथे त्यांचा आवाज खूप जड आहे म्हणून त्यांना नाकारलं होतं!

पण ते निराश झाले नाहीत किंवा त्यांनी त्यांच्या आवजाचा नूनगंड बाळगला नाही आणि आज त्यांचा फक्त आवाज करोडो लोकांना खिळवून ठेवतो!

 

बोले तैसा चाले..

 

ratan tata inmarathi 6
livemint

 

म्हणतात ना ‘बोले तैसा चाले त्याची वंदावी पाऊले’ समाजात बोलल्या प्रमाणे वागणाऱ्या लोकांना आजही सन्मान मिळतो. सर्वात महत्वाचं म्हणजे बोलल्याप्रमाणे वागल्याने तुमच्या मनात स्वतःविषयी एक आदर निर्माण होतो.

प्रत्यक्ष कृती तुमच्या शब्दांना बळ देते आणि तुमच्या ध्येयाकडे तुम्ही अधिक सुलभतेने जाऊ शकता.

 

दूरदर्शी बना

 

women empowerment 3 inmarathi
bollywoodcat

 

ध्येय साध्य करत असताना किंवा दररोज ची कामं करताना असे कित्येक क्षण येतील जेव्हा तुमच्या काही निर्णयाने तुम्हाला दुःख होईल पण त्या वेळी होणाऱ्या तोट्या बद्दल विचार करण्यापेक्षा आपल्या ध्येयाचा विचार करा.

क्षणिक सुखाच्या मागे न लागता आपल्या मूळ लक्ष्याकडे, ते साध्य केल्याने होणाऱ्या फायद्याचा विचार करा.

 

कुछ तो लोग कहेंगे

 

office inmarathi

 

समाजात किंवा तुमच्या मित्र- मंडळीत अगदी घरात सुद्धा बरीच अशी लोकं भेटतील जी तुमच्या ध्येयाची खिल्ली उडवतील किंवा ते कसं अशक्य आहे हे सांगण्याचा प्रयत्न करतील.

त्या वेळी लक्षात ठेवा ‘कुछ तो लोग कहेंगे… उनका काम है कहेना’

दुसऱ्यांच्या नकारात्मक टिपण्णी चा स्वतःवर,स्वतःच्या ध्येयावर थोडा सुद्धा परिणाम होऊ देऊ नका. तुम्ही जर त्यांच्या विचारांच्या ताब्यात गेलात तर मग गेलं सगळं मुसळ केरात!

लक्षात ठेवा लोकं दररोज शब्द बदलतात. उगवत्या सूर्याला नमस्कार करण्याची रीत असते त्यांची. एखादी गोष्ट तुम्ही करू शकता हे तुम्हाला माहिती आहे ना, तुमची खात्री आहे ना मग अश्या लोकांकडे संपूर्ण दुर्लक्ष करा.

 

फावल्या वेळात तुम्हाला जे आवडतं ते करा

 

cooking inmarathi
Indian women blog

 

जेव्हा तुम्हाला मोकळा वेळ मिळेल तेव्हा तुम्हाला सगळ्यात आवडणारी गोष्ट करा. तुम्हाला ट्रेकिंग करून आनंद मिळत असेल किंवा तुम्हाला झाडं लावण्याचा छंद असेल, पुस्तक वाचण्याचा, पोहण्याचा किंवा अजून काही.

तुमचे छंद जोपासा. तुम्हाला जे करायला आवडतं त्या साठी वेळ राखून ठेवा. तुमचे छंद जोपासल्याने मनाची मरगळ दूर होऊन तुम्ही नव्या जोमाने परत कार्यरत राहू शकाल.

===

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?