' ‘मद्यप्रेमींची’ सुरू झाली दिवाळी, तर नेटकऱ्यांनी ट्विटरवर केली धमाल – हे फोटो बघाच – InMarathi

‘मद्यप्रेमींची’ सुरू झाली दिवाळी, तर नेटकऱ्यांनी ट्विटरवर केली धमाल – हे फोटो बघाच

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम |

===

कोरोना मुळे जवळ जवळ दोन महिन्यांहून अधिक काळ घरात लॉकडाऊन मुळे अडकुन पडलेल्या मद्यप्रेमींसाठी कालचा दिवस म्हणजे दिवाळी दसऱ्यापेक्षा कमी नव्हता!

मद्यातून मिळणाऱ्या महसुलाच्या नुकसानामुळे परवा सरकारने देशातील लायसन्स धारक दारूच्या दुकानदारांना दारू विकायची मुभा दिली!

आणि सगळ्या मद्यप्रेमी लोकांचा जणू जीव भांड्यात पडला!

ही बातमी व्हायरल होणार इतक्यातच देशातल्या विविध राज्यात, जिल्ह्यात मद्यप्रेमींनी अक्षरशः धुडगूस घातला! आदल्या रात्रीपासून लोकं दारूच्या दुकानाबाहेर ठाण मांडून बसले!

 

liqour shops open inmarathi
sakal times

 

म्हणजे एकवेळ कधी रेशनसाठी एवढ्या मोठ्या रांगा लागल्या नाहीत ज्या काल दारूच्या दुकानाबाहेर पाहायला मिळाल्या! 

मुंबई पुणे इथल्या भागात काही ठिकाणी Social Distancing चे नियम पाळले गेले तर काही ठिकाणी त्या नियमांना धाब्यावर बसवण्यात आले!

पण तरीही दारूच्या दुकानाबाहेरची रांग काही कमी होईना!

नाशिक मध्ये तर लोकं रांगेतून सरकायच नाव घेत नाहीत म्हंटल्यावर पोलिसांना नाईलाजाने लाठीचार्ज करायला लागला, तरी कित्येक लोकं निर्लज्जपणे पोलिसांचे फटके खात लाईनीत उभे होते!

एवढं होऊन शेवटी नाशिक विभागातली सगळी दारूची दुकानं बंद करायचा निर्णय जिल्हाधिकारी आणि पोलिस प्रशासन यांना घ्यावा लागला!

 

wine shop closed inmarathi
the financial express

 

अशा कित्येक बातम्या घरबसल्या टीव्हीवर आपण पाहिल्या!

एका ठिकाणी २ महिन्यांनी दुकान उघडून विक्री करणाऱ्या मालकाने समोरच्या दारू खरेदी करणाऱ्या पहिल्या ग्राहकाला देव मानून त्याला हार घालून मगच विक्री चालू केली!

तर काही ठिकाणी रांगा लावून उभे असलेल्या मद्यप्रेमी लोकांवर फुलांची उधळण सुद्धा करण्यात आली!

अशा काही हास्यास्पद घटना आपण पाहिल्या आणि एकंदरच आपल्या देशात दारू साठी लोकं काहीही करू शकतात याचा अंदाज आपल्याला आला!

यावरून ट्विटर सारख्या माध्यमातून सुद्धा #Liquorshopsopen या हॅश टॅग अंतर्गत कित्येक जोक्स आणि मिम्स व्हायरल झाले!

 

liquor lover inmarathi
NDTV.com

 

दिल्ली मधील अरविंद केजरिवाल यांच्या सरकारने दिल्लीत दारू विक्रीवर ज्यादा ७०% विशेष कोरोना कर आकारायला सुरुवात केली तरीही लोकांची गर्दी काही कमी होईना!

याच विषयावर ट्विटर सारख्या सोशल मीडियाच्या माध्यमातून काही जोक्स, मिम्स हे प्रचंड व्हायरल झाले, ते मिम्स आज आपण इथे बघणार आहोत!

हे मिम्स बघताना हसू तर आवरणार नाहीच पण आपल्या देशात दारूला इतकं महत्व का आहे असा प्रश्न सुद्धा आपल्यासमोर उभा राहील!

चला तर बघूया काही धमाल ट्विटर वरचे फोटो!

 

twitter 1 inmarathi
twitter

 

हा फोटो पाहून काहींना कल्चरल शॉक सुद्धा बसू शकतो, हो कारण इथे तर दारू खरेदीसाठी काही तरुण मुलींनी रांग लावल्याचं चित्र दिसत आहे!

 

twitter 2 inmarathi
twitter

 

या रकमेचं दारूच बिल बघून हे नक्कीच कळेल की आपल्या देशात दारू विक्रीमुळे किती महसूल येतो, आणि आपल्या इथं दारूसाठी अगदी वाट्टेल तितकी रक्कम मोजणारी मंडळी सुद्धा कमी नाहीत!

 

twitter 3 inmarathi
twitter

 

अशीच काहीशी अवस्था दुकानाच्या बाहेर उभ्या असलेल्या प्रत्येक तळीरामाची झाली असणार हे मात्र नक्की!

 

twitter 4 inmarathi
twitter

 

वरील फोटोत दिसणार मद्यप्रेमी, त्याच्या हातात खूप कष्टाने मिळवलेली बाटली आणि त्याच्या टी शर्ट वर लिहिलेले ३ शब्दच सगळं काही सांगून जातात!

 

twitter 5 inmarathi
twitter

 

दारूसाठी लागलेल्या भल्या मोठ्या रांगा बघून तो कोरोना विषाणू सुद्धा मनातल्या मनात असंच काहीतरी म्हणाला असेल नई?

 

twitter 6 inmrathi
twitter

 

आणखीन एक महागडं बिल, आणि आणखीन एक तळीराम देशाच्या अर्थव्यवस्थेला चालना देताना!

 

twitter 7 inmarathi
twitter

 

कित्येक तास रांगेत उभ राहून स्टॉक घरी घेऊन येणाऱ्या मद्यप्रेमीचं असंच स्वागत त्याच्या घरात झालं असणार!

 

twitter 8 inmarathi
twitter inmarathi

 

हा तळीराम तर इतका खुश आहे की त्या दारूच्या बाटल्या नसून ऑलम्पिक ची गोल्ड मेडल असल्यासारख दाखवतोय!

 

twitter 9 inmarathi
twitter

 

कस्टमर म्हणजे जणू देवच असं समजून या दुकान मालकाने कित्येक तास रांगेत उभे राहून मद्य खरेदी करणाऱ्याचा सत्कार केला!

 

twitter 10 inmarathi
twitter inmarathi

 

दिल्ली सरकारची ही युक्ति जरी उत्तम ठरली असली तरी आपल्या देशात असंख्य मद्यप्रेमी असे आहेत जे वाटेल तेवढी किंमत मोजून दारू घेऊ शकतात!

तर हे होते काही मोजके धमाल फोटो जे सोशल मीडियावर व्हायरल झाले, तुमच्याकडेही असे काही धमाल मजेशीर मिम्स किंवा फोटो असतील तर कमेंट सेक्शन मध्ये जरूर शेयर करा!

===

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?