' केळीच्या सालीचे ‘हे’ १० फायदे वाचल्यावर तुम्ही साल कधीही फेकणार नाही! – InMarathi

केळीच्या सालीचे ‘हे’ १० फायदे वाचल्यावर तुम्ही साल कधीही फेकणार नाही!

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

===

आपल्याकडे फळे खाण्याला खूपच महत्त्व आहे. अशक्त, आजारी माणसाला फळे खाण्याचा किंवा फळांचा रस पिण्याचा सल्ला दिला जातो. फार पूर्वीपासूनच आपल्याकडे फळं खाण्याची सवय आहे.

उपवासाला देखील फळं खाल्ली जातात तसेच देवी-देवतांना नैवेद्य दाखवताना त्यात देखील फळांचा वापर केला जातो. गौरी-गणपती, नवरात्र अशा सगळ्या उत्सवांमध्ये फळांना विशेष महत्त्व दिले जाते.

सफरचंद, द्राक्षं, चेरी, स्ट्रॉबेरी, चिकू ह्यासारखी फळं आपण सालीसकट खातो. तर आंबा, केळी, फणस, संत्री, मोसंब अशा फळांची आपण सालं काढतो आणि गर खातो.

पण, तुम्हाला माहितेय? ह्यातल्या बऱ्याच फळांच्या सालींचा देखील खूप उपयोग होतो.जसे संत्र्याची साल सुकवून त्याचा फेस किंवा हेअर मास्क तयार केला जातो जो चेहऱ्यासाठी आणि केसांसाठी देखील खूप उपयुक्त असतो.

आज आपण आणखी एका फळाच्या सालाविषयी जाणून घेणार आहोत. ह्या फळाच्या सालाचे खूपच फायदे आहेत जे माहित झाल्यावर आपण कधीच ह्याचं साल फेकून देणार नाही आणि ते फळ आहे केळं!

 

banana inmarathi

 

बाजारात १२ महिने उपलब्ध असलेलं केळं जवळ जवळ सगळ्यांनाच आवडतं! बहुतांश करून सगळ्यांच्याच घरात केळी आणली जातात.

केळ्याचा आपल्या शरीराला खूपच फायदा होतो जसे – शक्तीवर्धक, वजन वाढविणे, ऊर्जावर्धक, हाडं बळकट होणे. ह्यात फॉलिक ऍसिड, विटॅमिन ए, बी आयर्न आणि कॅल्शियम भरपूर प्रमाणात असते.

केळ्याच्या सालींमध्ये प्रतिजैविक आणि ऍंटीऑक्सिडंट गुणधर्म असतात. त्यामुळेच जसा केळ्याचा गराचा उपयोग असतो तसेच सालींचाही खूप उपयोग होतो.

चला तर मग केळ्याच्या सालीचे उपयोग बघूया ह्या लेखातून.

१) कीटक दंश

 

banana-peel-advantages-inmarathi
wikihow.com

 

डास, मुंगी वगैरे कीटकांनी दंश केल्यानंतर आपल्याला जिथे दंश केलाय तिथे जळजळ होते, खाज येते आणि सुजल्यासारखं होतं (गांधी येणे).

जर अशा कीटकांनी दंश केला तर त्या जागी केळ्याचं साल लावल्यास, चोळल्यास आग होणे, खाज येणे किंवा सूज येणे ह्या गोष्टी होत नाहीत.

 

२) चेहऱ्याची त्वचा उजळणे

 

benefits of banana peel inmarathi
be beautiful.com

 

केळ्याचं साल चेहऱ्यावरून फिरवल्यास चेहरा उजळण्यास मदत होते.

केळ्याचं साल अंडे किंवा कोरफडीबरोबर मिसळून तो फेस मास्क म्हणून वापरला तर त्वचेवरील डार्क स्पॉटस् कमी होतात. तसेच चेहरवारील सुरकुत्या कमी होतात.

केळ्याचं साल त्वचा उजळण्यास खूपच प्रभावी ठरतं.

तसेच मुरमांच्या चिवट डागांवर केळ्याचं साल चोळल्यास मुरमांचे डाग खूपच फिके होतात आणि वारंवार हा उपाय केल्यास हे डाग नाहिसे होण्यास मदत होते.

 

३) डोळ्यांची निगा

 

benefits of banana peel inmarathi 1
pinterest

 

आज काल जेवण्याच्या, झोपण्याच्या वेळा, सवयी बदलल्या आहेत, आणि त्याचा विपरीत परिणाम आपल्या शरीरावर होतो. कामाचे स्वरूप असे आहे की ज्यामुळे डोळ्यांवर ताण येतो.

सारखं कॉम्पुटर, लॅपटॉप किंवा मोबाइलचा अतिरिक्त वापर, जागणे ह्यामुळे डोळ्यांभोवती काळी वर्तुळं होतात. जर केळ्याचं साल ५ मिनिटे डोळ्यांवर ठेवलं तर ही काळी वर्तुळे कमी होण्यास मदत होते.

सातत्याने हा उपाय केल्यास ही काळी वर्तुळे नाहिशी होण्यास मदत होते.

 

४) सोरायसिस वर उपाय

 

benefits of banana peel inmarathi 2
womendailymagzine.com

 

सोरायसिस सारख्या रोगाने अंगावर जे चट्टे किंवा व्रण उठतात ते कमी करण्यास केळ्याच्या सालीचा खूपच चांगला उपयोग होतो.

जेथे व्रण किंवा चट्टे आहेत तिथे केळीची साल आतल्या बाजूने रात्रभर बांधून ठेवावी.

हा उपाय सतत केल्यास सोरायसिस कमी होऊन खूपच आराम मिळतो.

 

५) केसांची निगा

 

banana spa inmarathi

 

केळीच्या सालींमध्ये मुबलक प्रमाणात ऍंटीऑक्सिडंटस् असतात. त्यामुळे हे केसांसाठी देखील अत्यंत उपयुक्त असते.

केळीचे साल वापरून तयार केलेला हेयर मास्क नियमितपणे वापरल्यास केस मऊ, निरोगी, चमकदार आणि मजबूत होतात.

===

===

६) दातांची चमक आणि पांढरे दात

 

benefits of banana peel inmarathi 3
zambia news24.com

 

आपले दात छान पांढरे आणि चमकदार असावेत असं प्रत्येकालाच वाटत असतं. त्यासाठी महागड्या ट्रीटमेंट घेतल्या जातात, ज्यामध्ये ब्लीचिंग सारखे हानीकारक द्रव्य असतात ज्यामुळे दात खूप सेंसेटिव्ह होतात.

 पण तुम्हाला माहितेय का? केळ्याची साल दातांसाठी अत्यंत उपयुक्त असते कारण त्यामध्ये पोटॅशियम असते जे दातांची निगा राखते.

त्यासाठी केळ्याची साल चावावी लागत नाही तर केळ्याची साल आतल्या बाजुने दातांवर घासायची. असं सलग २ आठवडे रोज करायचं आणि त्याचा योग्य तो रिझल्ट दिसेलच लगेच.

 

७) शांत झोप लागणे

 

guy sleeping inmarathi
shutterstock

 

ट्रिप्टोफेन हे एक नैसर्गिक रसायन आहे जे शांत झोप येण्यासाठी मदत करते. सेरोटोनिन हे एक असे चांगले रसायन आहे जे आरामदायक आहे, ज्यामुळे खूपच रिलॅक्स वाटते.

केळ्याच्या सालामधे ही दोन्हीही रसायने असतात, त्यामुळे शांत झोप हवी असेल तर रात्री झोपताना केळ्यांची साले डोळ्यांवर ठेवावीत.

 

८) फायबर

 

banana inmarathi
the indian express.com

 

फळांच्या साली मध्ये मोठ्या प्रमाणावर फायबर असते. अर्थातच केळीच्या सालांमध्येही फायबरचे प्रमाण जास्त असते.

ज्यामुळे पचनक्रिया तर व्यवस्थित होतेच त्याशिवाय केळ्यांची साले कोलेस्टेरॉलच योग्य ती पातळी राखण्यास मदत करतात.

याशिवाय हृदय निरोगी राखण्यास मदत करतात. त्यामुळे स्मूदी, जॅम किंवा अन्य काही पदार्थांद्वारे केळ्यांची साले पोटात जावीत ह्याची काळजी घ्यावी.

 

९) मस किंवा मस्सा नष्ट करण्याकरिता उपयोग

 

banana-peel-advantages-inmarathi
mb.ntd.tv

 

शरीरावर मस येणे हे वेदनादायक नसते पण शरीरावर मस चांगली दिसत नाही किंवा कुरुप दिसते. डॉक्टरकडची ट्रीटमेंट वेदनादायक, हानीकारक रसायने असणारी आणि खार्चिक देखील असते.

त्यापेक्षा केळ्याची साल मस आहे तिथे बांधून ठेवावे, हा उपाय मस नष्ट होईपर्यंत करावा. काही दिवसातच मस समूळ नाहिशी होते.

 

१०) घरगुती स्वच्छतेसाठी वापर

 

banana-peel-advantages-marathipizza01
gigazine.net

 

बरेच लोक केळीच्या सालींचा उपयोग घरगुती स्वच्छतेसाठी करतात. पॉलिश करणे, चामड्याचे बूट चमकवणे, चांदीची भांडी पॉलिश करणे याकरिता केळ्यांच्या सालींचा उपयोग केला जातो.

अशाप्रकारे  केळ्यांच्या सालीचा उपयोग घरगुती स्वच्छतेसाठी देखील करता येतो.

याशिवाय केळीच्या सालाचा उपयोग सेंद्रिय खत म्हणून केला जातो. ज्यामुळे फुलझाडांना अधिक फुले येतात. फळझाडे देखील चांगली आणि अधिक फळे देतात.

एकंदरीतच केळीची सालं खूपच बहुगुणी आणि उपयुक्त असतात. त्वचा, केस ह्याशिवाय घरगुती, बागेत देखील केळ्यांची साले अतिशय उपयुक्त असतात.

त्यामुळे आता तुम्ही केळं खाऊन झाल्यावर केळीची साले फेकून देण्याची चूक करणार नाही ना?

===

===

महत्वाची सूचना: सदर लेखातील माहिती, विविध तज्ज्ञांच्या अभ्यास व मतांनुसार तसेच सर्वसामान्य मनुष्याच्या आरोग्यास अनुसरून देण्यात आलेली आहे. ही माहिती देण्यामागे, या विषयाची प्राथमिक ओळख होणे हा उद्देश आहे. वाचकांनी कोणताही निर्णय घेण्याआधी, आपल्या आरोग्याला अनुसरून, डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.

===

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्रामशेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?