'ऑलम्पिक २०२० वर देखील कोरोनाचं सावट - आजवर किती वेळा रद्द झालीये ही स्पर्धा?

ऑलम्पिक २०२० वर देखील कोरोनाचं सावट – आजवर किती वेळा रद्द झालीये ही स्पर्धा?

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम |

===

मार्च महिन्याच्या मध्याला भारतात नोवेल कोरोना व्हायरसच्या संक्रमणाला सुरुवात झाली. तेव्हा परिस्थितीचं गांभीर्य कोणालाच कळलं नव्हतं.

१५ मार्च पासून शाळा महाविद्यालये ३१ मार्च पर्यंत बंद ठेवण्यात आली. परिस्थिती गंभीर होऊ लागली होती. १८० देशांमध्ये लाखो लोकांना ह्याची लागण झाली.

लाखो लोकं मृत्युमुखी पडली होती. अजूनही ह्याचा संसर्ग होतोय आणि लोकं बळी पडातायत. रोज ह्याच बातम्या आहेत सगळीकडे.

राजकारण, दहशतवाद, देशा देशातले वैमनस्य किंवा मैत्री असे दुसरे कोणतेही विषय आता चर्चेत नाहीत!

ह्या व्हायरसने भारतातही भराभर बळी घ्यायला सुरुवात केली होती. २२ मार्च रोजी टोटल लॉकडाऊन जाहिर झाला होता. नंतर तो वाढवून १४ एप्रिल पर्यंत करण्यात आला.

पण परिस्थिती अजूनही गंभीरच होती. ह्या रोगाचा संसर्ग वाढतच होता, बळींची संख्या शेकडोंच्या वर गेली होती. आणि आता ३ मे पर्यंत हा लॉकडाऊन वाढवण्यात आला आहे.

 

total lockdown inmarathi
india today

 

जगभरात पसरलेल्या कोरोना मुळे किती तरी महत्वाचे कार्यक्रम पुढे ढकलण्यात आले आहेत किंवा रद्द करण्यात आले आहेत. क्रीडा जगताला सुद्धा कोरोनाचा चांगलाच फटका बसला आहे.

यामध्ये प्रामुख्याने फुटबॉल ची मोठी स्पर्धा युरो कप २०२०  ही स्पर्धा पुढच्या वर्षापर्यंत पुढे ढकलण्यात आली आहे. यावर्षी टेनिसचं विम्बल्डन सुद्धा होणार नाहीये.

Social Distancing चं महत्व लक्षात घेता भारताची सर्वात मोठी क्रिकेट ची स्पर्धा IPL सुद्धा रद्द करण्यात आली आहे.

कोरोना मुळे या सर्व खेळातील खेळाडूंनी वर्षभर घेतलेली मेहनत वाया जाणार आहे हे स्पष्ट झालं आहे.

 

ipl cancels inmarathi

 

कोरोना मुळे क्रीडा जगताचं आणि पर्यायाने जागतिक अर्थव्यवस्थेचं किती नुकसान होत आहे हे येणारा काळ सांगेलच.

क्रीडा जगताचं लक्ष आता लागून राहिलं आहे ते म्हणजे ऑगस्ट २०२० मध्ये होऊ घातलेल्या ऑलम्पिक कडे.

आंतरराष्ट्रीय ऑलम्पिक कमिटी (IOC) ही अजून ही ऑलम्पिक नियोजित वेळीच करण्यासाठी आग्रही आहे. कोरोना मुळे जगभरात जवळपास ८०००० पेक्षा जास्त लोकांनी जीव गमावला आहे.

ऑलम्पिक साठी एकत्र येणाऱ्या प्रेक्षकांची तब्येतीची काळजी लक्षात घेऊन ऑलम्पिक कमिटी अंतिम निर्णय काय घेईल याकडे पूर्ण जगाचं लक्ष लागून राहिलं आहे.

काही दिवसांपूर्वीच जपान चे पंतप्रधान शिंझो अबे यांनी एक वक्तव्य केलं आहे की,

आपण कोरोनाचा प्रसार रोखण्यात यशस्वी नक्की होणार आणि ऑलम्पिक सुद्धा नियोजित वेळीच होणार.

 

olympics 2020 inmarathi
Orissa post

 

दरम्यान, ऑलम्पिक कमिटी चे डेप्युटी चीफ कोंझो तहीष्मा यांना कोरोना झाल्याने सर्वांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे.

जपानच्या उप पंतप्रधान टारो यांनी तर असं विधान केलं आहे की, “हा जपान देशाला असलेला ‘शाप’ आहे. हे असं दर चाळीस वर्षांनी होत आलं आहे”.

असं विधान करण्यामागे एक कारण आहे. जपान ने १९४० मध्ये ऑलम्पिक स्पर्धा आयोजित करण्यासाठी पुढाकार घेतला होता.

पण, दुसऱ्या महायुद्धामुळे ही स्पर्धा रद्द झाली होती. कोणत्याही बाह्य घटकांमुळे ही स्पर्धा रद्द होण्याची ही पहिली वेळ नव्हती.

ऑलम्पिक ही जगातील सर्वात मोठी स्पर्धा आहे हे आपल्याला माहीतच आहे. ज्यामध्ये जगभरातील जवळपास सर्व देशांचे खेळाडू सहभागी होतात.

जर का २०२० मधली ही स्पर्धा रद्द झाली तर ही १२४ वर्षातली फक्त चौथीच वेळ असेल.

या आधी तीन वेळेस ही स्पर्धा कधी आणि कशामुळे रद्द किंवा पुढे ढकलण्यात आली आहे त्यावर एक नजर टाकूयात.

 

olmpics 1916 inmarathi
the quint

 

१९१६ मध्ये ऑलम्पिक सर्वात पहिल्यांदा रद्द करण्यात आलं होतं जे की बर्लिन आणि जर्मनी मध्ये होणार होतं.

३०,००० लोकांची आसन व्यवस्था असलेलं स्टेडियम बर्लिन मध्ये तयार सुद्धा करण्यात आलं होतं. पहिल्या महायुद्धामुळे ही स्पर्धा रद्द करण्यात आली होती.

१९४० मध्ये जपान मध्ये आयोजित केलेलं ऑलम्पिक हे दुसऱ्या महायुद्धामुळे रद्द करण्यात आलं होतं.

पण, जेव्हा हिटलर ने १९३९ मध्ये पोलंड वर अतिक्रमण केलं तेव्हा ही स्पर्धा रद्द करण्यात आली होती.

१९४४ मधील लंडन मधील नियोजित ऑलम्पिक हे सुद्धा दुसऱ्या महायुद्धामुळे रद्द करण्यात आलं होतं.

 

london olympics inmarathi

 

याशिवाय, १९८० मध्ये अमेरिका, चीन, जपान यांसारख्या मोठ्या देशांनी मॉस्को ऑलम्पिक वर बहिष्कार टाकला होता. याचं कारण सोविएत युनियन वर अफगाणिस्तान ने केलेलं अतिक्रमण हे होतं.

२०२० मध्ये स्पर्धा नियोजित वेळी होणारच या वर ऑलम्पिक कमिटी अजून तरी ठाम आहे. मंगळवारी जाहीर केलेल्या एका पत्रकानुसार,

“अजूनही स्पर्धेला चार महिने बाकी आहेत आणि आत्ताच कोणताही निर्णय घेणं योग्य ठरणार नाही” असं वक्तव्य जाहीर करण्यात आलं आहे.

चीफ कॅबिनेट सेक्रेटरी योशीहीदे सुगा यांनी जाहीर केलं की,

“सरकार २४ जुलै ते ९ ऑगस्ट या काळात आयोजित केलेल्या ऑलम्पिक स्पर्धेची तयारी सुरूच ठेवणार आहे. आम्ही ही स्पर्धा पुढे ढकलण्याच्या मानसिकतेत अजिबात नाही.”

 

tokyo 2020 inmarathi
Washingtonpost

 

त्यांनी ही माहिती त्यांच्या संसदेत एका न्याय अधिकारी च्या स्पर्धेच्या पुढे ढकलण्या बद्दलच्या प्रश्नाच्या उत्तरात दिली.

कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे किती तरी खेळाडू हे त्यांच्या सरावाला सुद्धा पूर्ण वेळ देऊ शकत नाहीयेत. त्यापैकी बऱ्याच खेळाडूंनी ऑलम्पिक कमिटी वर टीका केली आहे.

कारण, कमिटी या सर्व बाबींचा गांभीर्याने विचार करत नाहीये आणि त्यांच्या या हट्टापायी सर्व खेळाडूंच्या तब्येतीचा धोका पत्करणे यात कोणतंच शहाणपण नाहीये.

===

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?