हे आहेत भारतातील सर्वात खतरनाक रस्ते!

आमच्या इतर लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुकपेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi

===

 

भटकायला कोणाला नाही आवडत? सोबत कार किंवा बाईक असेल तर अजूनच धम्माल! एखाद सुंदर डेस्टीनेशन पकडायचं आणि सुरु करायचा आपला प्रवास! पण अश्या अनोळख्या ठिकाणी प्रवास करताना तुम्हाला त्या प्रदेशाची इत्यंभूत माहिती असणे गरजेचे आहे. त्यातल्या त्यात, तिकडच्या रस्त्यांची माहिती तर तुम्हाला असायलाच हवी. कारण जर रस्ते गाडी चालवण्यासाठी तितकेसे चांगले नसतीत तर हा प्रवास जीवघेणा देखील ठरू शकतो.

आम्ही तुम्हाला भारतातल्या अश्याच काही जीवघेण्या वाटणाऱ्या रस्त्यांबद्दल सांगणार आहोत. यावरून प्रवास करताना एक चूक देखील मृत्यूला आमंत्रण ठरू शकते.

खारडुंग ला, लडाख

khardung-la-marathipizza

स्रोत

लडाख म्हणजे बर्फाचा प्रदेश, सदानकदा रस्त्यावर बर्फ असल्याकारणाने येथील रस्त्यांवरून जपूनच प्रवास करावा लागतो. याच लडाखमधील खारडुंग ला पास म्हणजे एका बाजूला खोल दरी आणि दुसऱ्या बाजूला बर्फाचे डोंगर! त्यामुळे दोन्ही कडून कचाट्यात सापडलेल्या ड्रायव्हरला येथून अगदीच जपून प्रवास करावा लागतो.

 

जाल्लोरी पास, कुल्लू

jallori-paas-marathipizza

स्रोत

देवभूमी म्हणून प्रसिद्ध असलेले हिमाचल प्रदेश हे राज्य म्हणजे आपल्या सह्याद्रीप्रमाणे डोंगर आणि दऱ्यांनी परिपूर्ण आहे. येथील सर्वच रस्ते डोंगर पोखरून काढण्यात आले आहेत. जाल्लोरी पासचा रस्ता हिमाचल मधील सर्वात खतरनाक रस्ता म्हणायला हरकत नाही कारण येथून गाडी चालवताना इतकी वळणे येतात की जराशी नजर चुकली तरी अनर्थ होऊ शकतो.

 

रोहतांग पास, मनाली

rohatang-paas-marathipizza

स्रोत

हिमाचल प्रदेशमधील हा अजून एक खतरनाक रस्ता! हा रस्ता इतका लहान आहे की येथे नेहमी ट्रॅफिक जॅम लागलेले असते. दोन्ही बाजूला असणाऱ्या बर्फाच्या राशींपलीकडे असणाऱ्या खोल दऱ्या गाडी चालवताना अगदी काळजाचा ठाव घेतात.

नाथू ला, सिक्कीम

nathu-la-marathipizza

स्रोत

भारत आणि चीनच्या सीमेकडे जाणाऱ्या या रस्त्याभर सगळीकडे उंचच उंच पर्वत नजरेस पडतात. येथील खरी भीती आहे हिमस्खलन अर्थात बर्फ कोसळणे. पर्वतांच्या माथ्यावरून कधी बर्फ जोरात खाली कोसळेल आणि रस्त्यावर येऊन आदळेल याचा नेम नाही.

 

कोली हिल्स रोड, तामिळनाडू

kolli-hills-road-marathipizza

स्रोत

कोली या शब्दाचा स्थानिक भाषेतील अर्थ आहे मृत्यूचा डोंगर! येथील रस्त्यावरून प्रवास करताना या डोंगरराजाला हे असे नाव का दिले असेल याचा प्रत्यत आल्याशिवाय राहत नाही. अतिशय नागमोडी वळणे पाहून येथे अस्सल ड्रायव्हरला देखील घाम फुटावा.

 

नॅशनल हायवे- २२

national-highway--marathipizza

स्रोत

हरियाणा राज्यातील अंबाला पासून सुरु होणाऱ्या ह्या रस्त्याच्या बाजूला कधीही कोसळतील असे बेभरवश्याचे डोंगर आहेत. येथील माती देखील अतिशय भूसभुशीत असून त्यावर विश्वास ठेवणे देखील कठीण!

 

माथेरान, महाराष्ट्र

matheran-marathipizza

स्रोत

माथेरान म्हणजे आपल्या सह्याद्रीमधला डोंगराळ आणि अतिउंचावर वसलेला प्रदेश! येथील रस्ते लहान आणि नागमोडी आहेत. पावसाळ्यात या रस्त्यावरून प्रवास करणे म्हणजे एक दिव्यच ठरते.

 

मुन्नार रोड, केरळ

munnar-road-marathipizza

स्रोत

या रस्त्यावरून प्रवास करताना कोणत्या वळणार समोर कोणती गाडी दत्त म्हणून हजर होईल हे सांगणे कठीण! या रस्त्यावरून कधी प्रवास करायचा झाल्यास आपला हात हॉर्नवर असणे उत्तम!

हे रस्ते त्यांच्या प्राकृतिक रचनेमुळे खतरनाक स्वरूपाचे आहेत. त्यामुळे येथून प्रवास करताना योग्य ती काळजी घ्यावीच, पण ही गोष्टही लक्षात ठेवा की, साधे वाटणारे रस्ते देखील कधी तुमच्या जीवावर उठतील याची शाश्वती देता येत नाही. म्हणून रस्त्यावरचा प्रवास कोणताही असो लिमिटमध्ये गाडी पळवा आणि निसर्गाचा आनंद घेत प्रवास करा!

लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com तसेच, आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुकपेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?