' कोरोनापेक्षा मोठे संकट कर्करोगाचे; सेलीब्रिटी, सर्वसामान्य लोकांना कॅन्सर होण्यामागची कारणं...

कोरोनापेक्षा मोठे संकट कर्करोगाचे; सेलीब्रिटी, सर्वसामान्य लोकांना कॅन्सर होण्यामागची कारणं…

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

===

मागच्या एप्रिल महिन्यात इरफान खान याचा कॅन्सरमुळे मृत्यू झाला. हा धक्का सहन होत नाही तोवरच ऋषी कपूर यांचा देखील कॅन्सरमुळे मृत्यू झाला अशी बातमी आली.

 

irfan khan inmarathi

 

बॉलीवुडसाठी खरोखरच या दुःखद घटना म्हणाव्या लागतील.

ऋषी कपूर आणि इरफान खान यांनी चित्रपटसृष्टीत स्वतःची ओळख निर्माण केली होती पण कॅन्सरने त्यांना अवेळीच संपवलं असं म्हणता येईल.

मुळातच करोनोच्या भयावह संकटात जग सापडलं असताना आपल्या आवडत्या दोन नायकांचा असा दुर्दैवी अंत, हा आपल्या प्रत्येकासाठीच क्लेशदायक आहे.

पण या दोघांच्या मृत्युचा थोडा सविस्तरपणे विचार केला तर, त्यातलं साम्य लक्षात येतं, ते म्हणजे अर्थातच कॅन्सर.

आज कितीतरी मोठ-मोठे सेलिब्रिटीज कॅन्सरच्या विळख्यात अडकलेले आहेत.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

सोनाली बेंद्रे, मनिषा कोईराला, अनुराग बसू, विनोद खन्ना, नर्गिस दत्त सारे अनेक सेलिब्रिटी सध्या सेलिब्रिटींना कॅन्सरने ग्रासले होते, अनेकजण तर आजही उपचार घेत आहेत.

 

celebraities inmarathi

 

खरं तर त्यांच्याकडे पैसा ही खूप आहे म्हणून हे लोक परदेशात जवळ स्वतःवर इलाज करू शकतात.

पण त्यातही काहीजण वाचले आणि काहींचा अंत झाला.

मग सामान्य माणसाला जर कॅन्सर झाला तर त्याची काय हालत होत असेल?

सेलिब्रेटिजना तपासण्यासाठी अनेक तज्ञ मंडळी असतात. त्यांचं दिवसाचं शेड्युल पण ठरलेले असते. व्यवस्थित व्यायाम, डायट या सगळ्या गोष्टींचे पालन होतं.

तरीदेखील यांना कॅन्सर का होत असेल? याचे उत्तरही त्यांच्या लाइफस्टाइल मध्येच आहे.

दररोजच टाईट शेड्यूल, कामाचं टेन्शन, कामानिमित्त करावा लागणारा प्रवास, शिफ्टमध्ये करावे लागणारे काम. याच बरोबर मद्यपान, धूम्रपान आणि ड्रग घेणे या सवयीमुळे त्यांना कॅन्सर होतो असंही म्हणता येईल.

सेलिब्रिटींचा कॅन्सर त्यांच्या प्रसिद्धीमुळे लोकांसमोर येतो. पण सामान्य माणसाला कॅन्सर होतो त्याची स्थिती काय आहे?

 

chemotherapy-inmarathi02

 

भारतात जर आजची परिस्थिती पाहिली तर अमेरिका आणि ब्रिटनपेक्षा भारतातल्या लोकांना जास्त कॅन्सर होतो अशी आकडेवारी सांगते.

एक कोटी 30 लाख लोकसंख्येमागे सध्या दहा लाख लोकांना दरवर्षी कॅन्सर होत आहे आणि कॅन्सरमुळेच भारतात होणारे मृत्यू देखील अधिक आहेत.

अनेक असाध्य रोगांपैकी एक समजला जाणारा हा कॅन्सर. त्यावर अजून तरी कोणताही ठोस रामबाण उपाय सापडलेला नाही. सध्या नॅनोपार्टिकल थेरपी कॅन्सरवर उपयुक्त ठरत आहे म्हणतात. पण तरीही त्याबद्दल शाश्‍वती देता येत नाही.

 

treatmen inmarathi

हे ही वाचा –

 

===

 

दररोजच याविषयी नवीन काहीतरी बातमी येत असते पण तरीही ठामपणे काही सांगता येत नाही.

आपल्याला असं वाटतं की कॅन्सर हा मानवनिर्मितच आहे. पॉल्युशन,लाईफस्टाईल, व्यसन यामुळेच कॅन्सर होत असेल. परंतु हेदेखील तितकसं खरं नाही.

फक्त मनुष्यप्राण्याला कॅन्सर होतो असंही आपल्याला वाटू शकतं पण तेही खरं नाही. पृथ्वीवरच्या इतर प्राण्यांना देखील कॅन्सर होतो. अगदी पृथ्वीवर लाखो वर्षांपूर्वी जे डायनासोर्स होते त्यांनादेखील कॅन्सरने ग्रासलेलं होतं, असे पुरावे आता मिळत आहेत.

दक्षिण आफ्रिकेमध्ये डायनासोरचे 1.7 दशलक्ष वर्षांपूर्वीचे जे अवशेष मिळाले आहेत त्यामध्ये त्या डायनासोरला ब्लड वेसल्स ट्यूमर होता.

कॅन्सर हा कोणालाही होऊ शकतो म्हणून त्याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही.

कारण आपल्या लाइफस्टाइलचा प्रभाव आपल्या प्रकृतीवर पडतोच पडतो.शरीराचं वजन जास्त असेल तर नक्कीच कॅन्सर होण्याचा धोका अधिक असतो.

 

cancer inmarathi

 

एका सर्वेक्षणानुसार इंग्लंड मध्ये दरवर्षी 22800 लोक लठ्ठपणाच्या कॅन्सर मुळे मरतात.

लठ्ठपणा व्यतिरिक्त व्यायामाचा अभाव, मद्यपान इत्यादी गोष्टी देखील कॅन्सर होण्यास कारणीभूत ठरतात.

म्हणून सगळ्यांनीच आपल्या स्वतःच्या लाइफस्टाइल कडे लक्ष दिल्यास कॅन्सर होण्यापासून वाचता येईल त्यासाठी काही सवयी अंगीकारणे मात्र गरजेचे आहे.

१. डायट

तसा कॅन्सर साठी वेगळा असा कोणता डायट प्लान नाहीये. तरी आपल्या जेवणात धान्य, कडधान्य, फळं, भाज्या यांचा समावेश असावा.

 

healthy food inmarathi

 

फळांमधून अनेक चांगल्या गोष्टी आपल्या शरीराला मिळतात त्यासाठी फळे खाणे योग्य.

कोणतेही जंकफूड अति प्रमाणात खाऊ नये.

 

junk food inmarathi

 

बऱ्याचदा लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांनाच तेच खाऊन बसायची सवय असते. तर ते शक्यतो टाळलेलं बरं.

प्रोसेस्ड मीट किंवा इतर कोणतेही स्नॅक्स यांचा समावेश आपल्या आहारात नसावा.

आपला आहार हा पोषणमूल्य वाढवणारा असावा. त्यामुळे शरीरात प्रोटीन,न्यूट्रिशन,एन्झाएम्स व्यवस्थित मिळावे.

२. व्यायाम

दररोज व्यायाम करणे मात्र गरजेचे आहे. आठवड्यातून किमान एकशे पन्नास मिनिट व्यायाम केला पाहिजे.

 

yoga
indira gandhi medical university

 

थोडं चाललंही पाहिजे, त्याच बरोबर प्राणायाम ध्यान यांची जोड जर व्यायामाला दिली तर अधिक चांगले.

३. सप्लीमेंट घेणे टाळा

बरेचदा असा दिसतो की विविध प्रकारची प्रोटिन्स,न्यूट्रिशन, विटामिन्स मिळावीत म्हणून लोक सप्लिमेंट घेत असतात.

पण अशा वेगळ्या सप्लीमेंट घेतल्याने आपल्या शरीराची हानी होते.

विटामिन्स घेण्यासाठी तर लोक सरळ मेडिकलमध्ये जाऊन त्याबद्दलच्या गोळ्या मागतात. हे करणे अत्यंत चुकीचे आहे.

 

healthy-living-marathipizza03

 

कुठलीही सप्लीमेंट घ्यायच्या आधी डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.

४. व्यसने टाळा

कॅन्सर चा सगळ्यात मोठा मित्र म्हणजे तंबाखू.

ज्या माणसाला तंबाखूचे व्यसन असतं त्यापैकी 90 टक्के लोकांना कॅन्सर होतो, तंबाखू खाणाऱ्या लोकांना तोंडाचा कॅन्सर होतो.  त्यासाठी तंबाखू शक्यतो दूर ठेवा.

 

tobaco inmarathi

 

अति मद्यपानाचा देखील आपल्या शरीरावर वाईट परिणाम होत असतो म्हणून मद्यपान करणे टाळलेलेच बरे.

तंबाखू आणि दारूमुळे माणसाच्या कल्पनेपेक्षाही जास्त नुकसान होत असते.त्यामुळे या गोष्टींपासून लांब राहून सुरक्षित आणि सुंदर जीवनाचा स्वीकार करावा.

शिवाय डॉक्टरांना आपली तब्येत दाखवणं आणि त्यांचा सल्ला घेणे महत्त्वाचे आहे.

 

check up inmarathi

 

वर्षातून एकदा तरी आपल्या सर्व चाचण्या करून घेऊन त्यानुसार डॉक्टरांचा सल्ला घेतला पाहिजे. डॉक्टरांना तब्येत दाखवून सगळ्या तपासण्या करणे हा कॅन्सर रोखण्याचा सगळ्यात उत्तम मार्ग आहे.

सेलिब्रिटींना होणारा कॅन्सर हा सामान्य माणसाला देखील हेच शिकवतो कारण कुठलाही आजार,तुमची परिस्थिती तुमची जात-पात-धर्म पहात नाही.

त्यासाठी स्वतःच स्वतःची व्यवस्थित काळजी घेणे आवश्यक असते.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

हे ही वाचा – 

===

 

===

महत्वाची सूचना: सदर लेखातील माहिती, विविध तज्ज्ञांच्या अभ्यास व मतांनुसार तसेच सर्वसामान्य मनुष्याच्या आरोग्यास अनुसरून देण्यात आलेली आहे. ही माहिती देण्यामागे, या विषयाची प्राथमिक ओळख होणे हा उद्देश आहे. वाचकांनी कोणताही निर्णय घेण्याआधी, आपल्या आरोग्याला अनुसरून, डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

 शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?