' कामगारांच्या शोषणाविरुद्धचा स्फूर्तिदायक लढा : वाचा, 'कामगार दिनाचा' आंतरराष्ट्रीय इतिहास

कामगारांच्या शोषणाविरुद्धचा स्फूर्तिदायक लढा : वाचा, ‘कामगार दिनाचा’ आंतरराष्ट्रीय इतिहास

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम |

===

आंतरराष्ट्रीय कामगार दिन हा जगातील अनेक देशांमध्ये मजुर किंवा कामगार वर्गाच्या योगदानाचा सन्मान करण्यासाठी अधिकृत सार्वजनिक सुट्टी आहे.

भारत, चायना, उत्तर कोरिया, क्युबा आणि माजी सोव्हिएत युनियन या देशांमध्ये १ मे हा दिवस मे दिन म्हणून विशेष ओळखला जातो.

मे डेला कामगार दिन किंवा आंतरराष्ट्रीय कामगार दिन असेही म्हणतात. कामगार दिनाची कल्पना ही ‘सामाजिक आणि आर्थिक उन्नतीसाठी कामगारांना एकत्रित करणे’ आहे.

 

labour day inmarathi
dgreetings.com

 

भारतात १ मे चे महत्त्व –

वेगवेगळ्या देशांत कामगार दिनाची मूळ कथा वेगवेगळी आहे; परंतु त्या प्रत्येक देशात हा दिवस साजरा करण्याचे मुख्य कारण हे कामगार वर्गातील लोकांच्या शोषणाविरूद्ध केलेल्या लढ्याचे स्मरण करणे हा आहे.

१ मे दिनाचा इतिहास – 

या दिवसाच्या चळवळीची सुरूवात शिकागो येथून झाली होती आणि नंतर ही चळवळ सर्वत्र पसरली.

शिकागोमध्ये ४ मे रोजी झालेल्या बॉम्बस्फोटात सात पोलिस अधिकारी आणि चार नागरिक ठार झाले. आदल्या दिवशी शांततावादी निदर्शकांना ठार मारणाऱ्या पोलिसांच्या विरोधात प्रतिक्रिया म्हणून हा स्फोट घडवून आणला गेला.

 

labour day inmarathi 1
readers digest.com

 

बॉम्बस्फोटानंतर आठ अराजकवाद्यांना कट रचल्याबद्दल दोषी ठरविण्यात आले आणि त्यांना फाशीची शिक्षा सुनावण्यात आली.

संपूर्ण दोषी ठरलेल्या आठ जणांपैकी कोणीही बॉम्ब फेकला नव्हता आणि ते निरपराध होते अशा बातमीमुळे गवत बाजारातील तो नरसंहार जगभरातील ठळक बातमी बनला.

कामगार दिन किंवा मे दिन याचे स्मरण प्रत्येक देश का करतो?

दरवर्षी, जगभरातील लोक कामगार दिन साजरा करतात, याला आंतरराष्ट्रीय कामगार दिन म्हणूनही ओळखले जाते.

समाजवादी गट आणि कामगार संघटनांनी या दिवशी मोठ्या प्रमाणात राजकीय निषेध (पेवॉल) आयोजित केले. बर्‍याच देशांमध्ये मे डे ही अधिकृत सार्वजनिक सुट्टी असते आणि कामगारांना सुट्टी असते.

हा दिवस आंतरराष्ट्रीय स्तरावर साजरा केला जात असला तरी कामगार दिनाचा प्रारंभ अमेरिकेत झाला आणि त्याचे मूळ १९ व्या शतकातील शिकागोमध्ये कामगार संघटनांच्या उदयातून झाले.

 

labour day inmarathi 2
old guv legends.com

 

कामगारांच्या हक्कांसाठी त्यांनी लढलेली कडक लढाई आणि आठ तासांच्या वर्क डे साठीचा लढा म्हणून हा दिन स्मरणात ठेवला जातो.

भारतात हा दिवस केव्हापासून आणि का साजरा केला जातो?

भारतात लेबर किसान पार्टी ऑफ हिंदुस्तान या पार्टीच्या वतीने १ मे १९२३ रोजी या मे दिनाचा पहिला उत्सव चेन्नई येथे आयोजित करण्यात आला होता.

या कामगार दिनाचे प्रतीक असलेला लाल ध्वज देखील भारतात तेव्हाच प्रथम वापरण्यात आला होता.

या पक्षाचे नेते सिंगारावेलु चेतियार यांनी ‘मे डे’ उत्सव दोन ठिकाणी आयोजित केले होते – एक म्हणजे मद्रास उच्च न्यायालयासमोर समुद्रकिनार्‍यावर आणि दुसरे ट्रिप्लिकेन बीचवर.

नंतर त्यांनी या बैठकीचे अध्यक्षस्थान भूषवले आणि त्यांच्या अध्यक्षतेखाली कामगारांसाठी प्रासंगिक सुट्टी जाहीर करण्याचा ठराव येथे पारित करण्यात आला.

 

labour day inmarathi 3
DTnext.com

 

त्याचबरोबर या सभेत पक्षाच्या अहिंसक तत्त्वांचे स्पष्टीकरण देणारे इतर काही मुद्दे, जगातील कामगारांना काही आर्थिक मदतीसाठी आणि स्वातंत्र्य मिळविण्याच्या विनंतीवरदेखील चर्चा झाली.

याच्या तीन वर्षानंतर फ्रेन्च समाजवादी पार्टीने देखील कामगार चळवळीचा आणि हे मार्केट(गवत बाजार) येथील नरसंहाराचे स्मारक म्हणून एक मेला आंतरराष्ट्रीय कामगार दिन म्हणून निवडले.

कम्युनिस्ट आणि समाजवादी राजकीय पक्षांच्या कामगार चळवळींना हा दिवस जोडला गेला आहे. कामगार दिनाला हिंदीमध्ये ‘कामगार दिन’ किंवा ‘आंतराष्ट्रिय श्रमिक दिवस’, मराठीत ‘कामगार दिवस’ आणि तामिळमध्ये ‘उझीपल्लार नाल’ म्हणूनही ओळखले जाते.

त्याचप्रमाणे १९६० साली भाषेच्या आधारावर गुजरात आणि महाराष्ट्र यांच्या सीमा ठरवल्या जाऊन ही दोन राज्ये स्वतंत्र झाली.

तो दिवस १ मे च असल्याने एक मे हा दिवस ‘गुजरात दिन’ आणि ‘महाराष्ट्र दिन’ म्हणून देखील ओळखला जातो.

इतर देश –

अमेरिका –

 

labour day inmarathi 4
business connect world

बहुतेक अमेरिक नागरिक १ मे हा वसंत दिन म्हणून साजरा करतात. काही कमी लोकांना हा दिन कामगार दिन म्हणूनही ओळखला जातो याची

कल्पना असते.

जगभरातील कामगारांच्या एकजुटीचा आणि जागतिक सुट्टीचा दिवस म्हणून हा दिन ओळखला जातोय याची कल्पना फार कमी लोकांना असते.

जपान –

जपानमध्ये कामगारांच्या चळवळीचा असा थेट संबंध नसताना देखील तिथे हा दिवस साजरा केला जातो. जगभर या दिवशी सुट्टी असते म्हणून त्यांनी देखील या दिवसाला सुट्टी जाहीर केली आहे.

आणि जपानी लोक एप्रिल २९ ते मे ५ पर्यंतचा हा आठवडा ‘गोल्डन विक’ या नावाने साजरा करतात. आणि हा दिवस शोवा डे म्हणून साजरा करतात.

त्यांचा प्रसिद्ध राजा शोवा, ज्याने १९२६ ते १९८९ दरम्यान राज्य केले, त्या राजाच्या आठवणीत ते हा आठवडा साजरा करतात.

रशिया –

औद्योगिकरणाच्या उदयानंतर अमेरिकेत १९ व्या शतकांत कामागारांचे बरेच शोषण झाले. त्यांना दिवसाचे १५-१५ तास राबवून घेण्यात येत होते.

हा अन्याय सहन करण्यात अनेक वर्षे घालवल्यानंतर शेवटी सगळे कामगार एकत्र आले, आणि त्यांनी या अन्यायाविरुद्ध आवाज उठवला.

कामाच्या तासांची निश्चिती, भरपगारी रजा, निश्चित मजुरी आणि कामाच्या वेळेत मध्ये सुट्टी अशा मागण्या त्यांनी समोर ठेवल्या.

 

labour day inmarathi 5

 

यातूनच आठ तास कामाचे, आठ तास करमणुकीचे आणि आठ तास विश्रांतीचे अशी दिवसाची विभागणी करून घेण्यात आली, म्हणून हा दिवस कामगारांच्या चळवळीत आठ तासांची चळवळ म्हणून देखील ओळखला जातो.

म्हणूनच कामगार दिन किंवा मे डे’चा प्रचार विविध समाजवादी, साम्यवादी आणि अराजकवादी गटांनी देखील केला आहे.

१९४७ ते १९५३ हा काळ अमेरिका आणि सोव्हिएत रशिया यांच्यामधील शीतयुद्धाचा काळ होता. या काळात एक मे हा दिवस सोव्हिएत रशियात रेड स्क्वेअरमध्ये सैन्याचा परेड दिवस म्हणून आयोजित केला जाऊ लागला होता.

या दिवशी तेथील नेते लेनिनच्या स्मारकावर जाऊन त्याला अभिवादन करत. त्यामुळे तेथे हा दिवस सैन्याचा परेड दिन म्हणून देखील ओळखला जातो.

आजही हा दिवस तेथे सैन्याची परेड आणि अधिकृत सुट्टीचा दिवस आहे.

इतर राष्ट्रे –

न्यूझीलंड आणि ऑस्ट्रेलियाच्या काही भागात हा दिवस ऑक्टोबरच्या पहिल्या सोमवारी साजरा केला जातो, तर अमेरिका आणि कॅनडामध्ये सप्टेंबरच्या पहिल्या सोमवारी हा दिवस साजरा केला जातो.

या दिनाची दरवर्षीची थीम किंवा कल्पना –

दरवर्षी आंतरराष्ट्रीय कामगार दिनाच्या सदस्यांद्वारे थीमची आखणी केली जाते, यावर्षी ‘सर्वांसाठी शाश्वत पेन्शन’ ही समाजवादी सदस्यांची भूमिका आहे.

ही थीम या दिनाचा जगभरातील उत्सव आणि कार्यक्रमांचा केंद्रबिंदू बनते.

===

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | Copyright © InMarathi.com | All rights reserved. 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?