' "वॅलेंटाईन डे" आणि "प्रेमा"चा संबंध कितपत!??

“वॅलेंटाईन डे” आणि “प्रेमा”चा संबंध कितपत!??

आमच्या इतर लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुकपेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page

===

वॅलेंटाईन डे आला की संस्कृतीचे रक्षण करण्याचा देखावा करणारे आणि सरसकट सर्व पाश्चात्य गोष्टी स्वीकारल्या पाहिजेत असं म्हणणं असणारे निर्बुद्ध बुद्धिवादी ( पुरोगामी) पेटून उठतात! पण आपण एक तटस्थ दृष्टिकोन ठेऊन १४ फेब्रुवारी मागचा इतिहास जाणून घेणार आहोत!

उगम-इतिहास :

१३ फेब्रुवारी आणि १५ फेब्रुवारीच्या दरम्यान प्राचीन रोम मध्ये Lupercalia नावाचा एक “उत्सव” साजरा केला जात असे. Palentine पर्वत जेथे रोमचा उगम झाला असं समजलं जातं. तेथे Lupa नावाची गुहा आहे (लुपा एक लांडगीण होती जिने Romulus आणि Remus ह्या रोमच्या founders ना, अनाथांना स्तनपान केलं होतं असं समजलं जातं!) तिथे ह्या उत्सवाचं उगमस्थान आहे!

 

Lupercal-Cave-marathipizza

स्रोत

Faunus या रोमन देवतेचे याजक (पुजारी, priest) ज्यांना Luperci असे म्हटले जात असे, ते दोन बकरे (fertility साठी) आणि एक कुत्रा (purity साठी) यांचा बळी देत असत! नंतर ते दोन खानदानी Luperci बकऱ्यांची कातडी ओढून, रक्त कपाळावर माखून गावभर हिंडत असत!

पहिल्या शतकातील ग्रीक इतिहासकार Plutarch म्हणतो,

बकऱ्यांच्या कातडीपासून चाबूक बनवला जात असे. त्या चाबकाचे फटके गरोदर स्त्रिया (प्रसुतीच्या वेळी कमी त्रास व्हावा म्हणून), मुली (fertility वाढावी म्हणून) खात असतं.

 

valentine-day-history-marathipizza01

स्रोत

ही Pagan परंपरा जवळजवळ १००० वर्ष चालली. पाचव्या शतकात ‘ख्रिश्चन’ रोममध्ये हे सर्व प्रकार बंद करण्यात आले व योगायोगाने १४ फेब्रुवारी st Valentine (तिसरे शतक) ची पुण्यतिथी ही “वॅलेंटाईन डे” म्हणून साजरा करण्याचा प्रघात पाडण्यात आला!

पण वॅलेंटाईनने असे काय केले होते?

Father Frank O’Gara ( Whitefriars Street Church, Dublin, Ireland) म्हणतात,

 रोमन सम्राट Claudius ह्याने तरुण मुलांना लग्न करण्यास मनाई केली होती. कारण, त्याच्या मते गृहस्थ व्यक्ती एक चांगला सैनिक होऊ शकत नाही! तर Valentine हे एक रोमन याजक होते जे गुप्तपणे, रीतसर ख्रिश्चन पद्धतीने तरुणांचे लग्न लावून देत असे!

 

valentine-day-history-marathipizza

स्रोत

क्लॉडियस ख्रिश्चनांच्या आणि लग्न संस्थेच्या विरोधात तर वॅलेंटिन आणि चर्च हे बहूपत्नीत्व (polygamy) च्या विरोधात!! चर्च हे लग्न संस्थेला अतिशय पवित्र मानत असे! क्लॉडियसने वॅलेंटिनला तुरुंगात टाकले. Asterius हा वॅलेंटिनचा जेलर (काहीजण judge मानतात) होता. त्याच्या अंध मुलीला वॅलेंटिनने बरे केले!

तिला लिहिलेल्या शेवटच्या पत्रात “From your Valentine” असा उल्लेख आहे! त्यांचे प्रेमसंबंध होते कि नाही हे ऐतिहासिकदृष्ट्या स्पष्ट झालेले नाही.

Whitefriars Street Church येथे वॅलेंटिनचे अवशेष आहेत असे सांगितले जाते. तिथे पारंपरिक ख्रिश्चन १४ फेब्रुवारीला भेट देतात आणि वॅलेंटिनला श्रद्धांजली वाहतात!!

 

valentine-day-history-marathipizza02

स्रोत

तर असा हा वॅलेंटिन! आजच्या काळातील वॅलेंटिन डे आणि रोमँटिक प्रेमाचा संबंध – Chaucer नावाच्या कवीने १३७५ मध्ये (Lupercalia बंद केल्यानंतर ९०० वर्षांनी) The Parliament of Fowls ह्या त्याच्या कवितेत १४ फेब्रुवारीचा पक्षी, मानव जात, प्राणी या सगळ्यांच्या mating season ची सुरुवात म्हणून उल्लेख केला आणि तो st valentine day च्या दिवशीच आला नेमका! इथून “प्रेम दिवसाची” सुरुवात झाल्याचा निष्कर्ष बरेच लेखक, तज्ज्ञ, तत्वज्ञ, धर्म अभ्यासक काढतात.

हा दिवस साजरा करावा की नाही हा ज्याचा त्याचा प्रश्न. फक्त एक आवर्जून विनंती आहे की 

‘आपण नेमकं काय साजरं करतोय? त्याचा आपल्याशी (भारतीय समाजाशी) कितपत संबंध आहे? त्या गोष्टीमागचा इतिहास काय आहे?’ ह्या गोष्टींचा तटस्थपणे अभ्यास करावा!

===

InMarathi.com वर विविध लेखकांनी व्यक्त केलेले विचार ही त्यांची वैयक्तिक मतं असतात. InMarathi.com त्या मतांशी सहमत असेलच असे नाही. । आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुकपेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?