' “नासाच्या” एका वैज्ञानिकाने केलाय गौप्यस्फोट – चंद्रावर ‘कुणीतरी’ आहे! वाचा – InMarathi

“नासाच्या” एका वैज्ञानिकाने केलाय गौप्यस्फोट – चंद्रावर ‘कुणीतरी’ आहे! वाचा

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

तंत्रज्ञान “पुढे” जातंय. त्यायोगाने मानवाची झेप पण वाढत आहे. पण मानवाची कुवत नेमकी किती आहे हे ज्या छोट्या छोट्या developments वरून कळतं! डॉक्टर विक्रम साराभाई यांच्या अथक परिश्रमामुळेच आज आपल्या जवळ भारतीय अंतराळ अनुसंधान संघटन म्हणजेच ISRO सारखी विश्वस्तरीय संघटना आहे.

 

vikram sarabhai inmarathi

 

भारताच्या चांद्रयान, मंगळयान या मोहिमांमुळे भारतात अवकाश विश्वाबद्दल कुतूहल वाढत जात आहे. आबालवृद्ध या विषयावर चर्चा करत आहेत.

सृष्टीतील अनेक रहस्य आपल्याला माहित नाहीत. त्यामुळे जेव्हा पूर्वी न अनुभवलेलं काही आपण पहिल्यांदा अनुभवतो, ही mystery सुटे पर्यंत मानवी मन आणि मेंदू ते कोडं उलगडण्यात गढून जातात.

 

Chandrayan 2

 

आजवर आपल्याला हेच वाटायचं की या जगात केवळ पृथ्वीवरच जीवन आहे. पण शास्त्रज्ञांनी पृथ्वीशिवाय इतर ग्रहांवरही जीवन असल्याची शक्यता वर्तवली आहे. तसे पुरावे देखील मिळाले असल्याने जीवसृष्टी असल्याची दाट शक्यता नेहमीच वर्तवण्यात येत असते.

परंतु एकूणच विज्ञानात रस असणाऱ्या अनेकांसाठी हा विषय फार आधीपासूनच औत्सुक्याचा राहिलेला आहे.

त्यात विविध ग्रहांवर, दूरवरच्या सुर्यमालांमध्ये शक्यता असलेल्या जीवसृष्टीबद्दल प्रचंड कुतूहल अनेकांच्या मनात असतं.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

 

aliens inmarathi

 

परग्रहवासी, माणसाचा आणि अश्या aliens चा संपर्क – ह्या विषयावर तुम्ही बोलायला लागलात तर तुम्हाला विचित्र प्रतिक्रिया मिळतील.

कुणाला तुम्ही चक्रम वाटाल तर कुणाला attention seeker – उगाच लक्ष ओढून घेण्यासाठी काहीतरी चमत्कारिक बोलणारे वाटाल.

पण थोडासा रिसर्च, थोडा गंभीर अभ्यास केलात – तर तुम्हाला ह्या विषयावर तुमचं म्हणणं सिद्ध करता येईल एवढं material इन्टरनेटवर सहज सापडेल.

 

space inmarathi

 

अमेरिकेच्या Apollo Mission बद्दल – चंद्रावरील स्वारीबद्द्ल – असेच अनेक तर्क-वितर्क प्रसिद्ध आहेत.

अनेकांचं असं म्हणणं आहे अमेरिका चंद्रावर पोहोचलीच नाहीये आणि रिलीज केले गेलेले video, फोटो खोटे आहेत.

तसाच दुसरा एक तर्क आहे – की चंद्रावर जे प्रत्यक्ष दिसलं ते सर्व अमेरिका / NASA आपणा सर्वांना सांगत नाहीये.

gravity inmarathi

 

NASA मधील अनेक वैज्ञानिकांनीच ह्यावर कुठे ना कुठे भाष्य केलं आहे.

George Leonard ह्या NASA च्या scientist आणि photo analyst ने ह्या विषयावर – Somebody Else Is On The Moon , चंद्रावर कुणीतरी आहे – ह्या नावाचं एक पुस्तकच लिहिलं आहे. ते पुस्तक मोफत उपलब्ध करण्यात आलं आहे.

इच्छुक इथे क्लिक करून डाऊनलोड करू शकतात.

पुस्तकात Leanord ह्यांनी मिळवलेली माहिती आणि काही फोटो आहेत, जे चंद्रावरील मोठाल्या प्रिंट्स दाखवतात. हे फोटो फारसे स्पष्ट नाहीत.

ह्या फोटोंपेक्षा पुस्तकात केलेली विधानं अधिक महत्वाची आहेत. अशी विधानं करणारे Leanord हे एकटेच नाहीत.

 

aliens-attack-inmarathi01

 

Bob Dean ह्या US Army च्या रिटायर्ड Command Sargent Major ने युरोपमधील एका कॉन्फरंसमध्ये NASA ला – Never A Straight Answer – असं म्हटलंय.

ते म्हणतात :

नासा ने अपोलो मिशनच्या फिल्म रेकॉर्डिंगच्या तब्बल 40 रीळ नष्ट केल्या आहेत. कारण नासाच्या म्हणण्यानुसार ह्या रेकॉर्डिंग ‘disruptive,’ ‘socially unacceptable,’ ‘politically unacceptable’ होत्या.

आपण अनेकदा UFO – Unidentified Flying Objects – हवेत उडण्याऱ्या तबकड्यांबद्दल बरंच ऐकतो.

ह्यावर नासाच्या Dr. Edgar Mitchell (चंद्रावर चालणारी 6 वी व्यक्ती) ह्यांचं म्हणणं आहे –

मनुष्यजात नेहमीच ह्या गुंत्यात अडकली आहे की आपणसोडून इतर कुणी ह्या विश्वात आहे का. आपल्या काळातच ह्याचं प्रमाण मिळालं आहे. नाही – आपण एकटे नाही आहोत!

 

aliens connect inmarathi

 

ह्यावरून नासाकडे UFO, परग्रहवासी ह्यांच्याबद्दल ठोस माहिती असल्याचं प्रमाण मिळतं.

नासाचे आणखी एक वैज्ञानिक, Dr. Brian O’Leary सुद्धा हेच म्हणतात. ह्या व्हिडीओमध्ये बघा.

 

 

अगदी Leonard प्रमाणेच Dr. John Brandenburg जे Clementine Mission to the Moon ह्या मिशनचे Deputy Manager होते.

ते सुद्धा नासाकडे चंद्रावरील परग्रहवासीयांच्या हालचालीबद्दल ठोस माहिती असल्याचं सांगतात.

ते म्हणतात :

चंद्रावर कुणी काही बांधकाम करत आहे का हे चाचपडण्याचा Clementine Mission चा हेतू होता. मी त्या मिशनचे जे फोटो बघितले आहेत, ते हेच दाखवतात की चंद्रावर काही कृत्रिम structures नक्कीच आहेत.

अभ्यासूंनी / इच्छुकांनी ही डॉक्युमेंटरी नक्की बघायला हवी.

 

थोडक्यात – “परग्रहवासी” – ही आता साधी conspiracy theory राहिलेली नाही.

यावर विश्वासार्ह वाटावेत असे शास्त्रज्ञ, तंत्रज्ञ बोलू लागले आहेत. त्यामुळे येत्या काही या विषयावर काळात एखादी धक्कादायक, ठोस माहिती समोर येण्याची शक्यता नाकारता येत नाही!

थोडक्यात, परग्रहावरील जीवसृष्टी हा आता फक्त रंजक कथा कादंबऱ्या चित्रपट इ पुरता विषय न रहाता, एक वास्तव म्हणून पुढे येऊ शकतो.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

 शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?