'मुस्लिम आक्रमणांपासून हिंदू धर्माचं रक्षण करणाऱ्या "नागा साधूंचा" अचंबित करणारा इतिहास...

मुस्लिम आक्रमणांपासून हिंदू धर्माचं रक्षण करणाऱ्या “नागा साधूंचा” अचंबित करणारा इतिहास…

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम |

===

भारतातला हिंदू धर्म एक प्राचीन धर्म आहे. हा फक्त एक धर्म नाही तर एक जीवनशैली सुद्धा आहे. अगदी गेल्या दोन दशकापर्यंत जगात भारताची ओळख ही साप आणि साधूंचा देश अशीच होती!

हिंदू धर्माची बरीच अशी वैशिष्ट्य आहेत की, जी बऱ्याच हिंदु लोकांना सुद्धा माहीत नसतात.

हिंदू धर्म मनुष्य आणि निसर्गाच्या संबंधांमधून एक शांततामय जीवनाचा पुरस्कार करतो. मनुष्य शरीर आत्म्या साठी जीवन- मरणाच्या चक्रातील एक तात्पुरता निवारा आहे.

परमात्म्यात सामावून मोक्ष मिळवणे हेच अंतिम ध्येय असल्याचं हिंदू धर्म सांगतो.

आजकाल अनेक हिंदूधर्मीय धर्माच्या मूळ उद्देशापासून दूर जाऊन, परंपरेचे केवळ अंधानुकरण किंवा त्या पासून निर्माण झालेल्या अंधविश्वासु परंपरेचे पालन करताना दिसतात.

परंतु हिंदू धर्मातील साधूंचा वर्ग हा अजूनही काटेकोर प्रथांच पालन करताना दिसून येतो.

sadhu inmarathi
gurushots.com

 

ढोबळमानाने हिंदू धर्मात शैव आणि वैश्य असे दोन पंथ आहेत. शैव आणि वैश्य साधूंत सुद्धा वेगवेगळे प्रकार पडतात. यातील शैव परंपरेतील नागा साधू यांचा इतिहास पुरातन संस्कृतीशी जोडला गेलेला आढळतो.

नागा या संस्कृत शब्दाचा मूळ अर्थ पर्वत असा होतो. त्यामुळे पर्वतावर आणि त्याच्या बाजूला राहणाऱ्या लोकांना ‘पहाडी’ किंवा ‘ नागा’ म्हणून ओळखण्यात येतं.

नागा साधूंच्या अस्तित्वाचे पुरावे प्राचीन काळात सुद्धा सापडतात. मोहंजोदरो इथल्या उत्खननांत सापडलेल्या नाणी आणि चित्रां मधे नागा साधू पशुपतीनाथाच्या देवळात भगवान शिव शंकराची पूजा करताना दिसतात.

अलेक्झांडर आणि त्याचे सैनिक भारतातील वास्तव्यात नागा साधूंशी भेटल्याचा उल्लेख आहे. भगवान महावीर आणि गौतम बुद्ध सुद्धा नागा साधूंच्या तपस्या, त्यांची मातृभूमी विषयक श्रद्धा, देश बांधवांवर असलेले प्रेम पाहून प्रभावित झाले होते.

जैन दिगंबर परंपरेच मूळ हे नागा साधूंच्या परंपरेत असल्याचं अभ्यासक सांगतात.

 

देश- धर्माचे रक्षक नागा साधू

 

naga sadhu inmarathi 2
walk through india

जेव्हा भारतावर म्लेंच्छ (मुघल) आक्रमण वारंवार होऊ लागले आणि त्यांच्या द्वारे हिंदू धर्मालाच धोका निर्माण झाला तेव्हा देशातील नागा साधूंनी एकत्र येऊन आखड्यांची निर्मिती केली.

याचा प्रमुख उद्देश एकत्रितपणे परकीय हल्ल्यांपासून देश बांधवांच, देशातील परंपरा यांचं भगव्या ध्वजाखाली रक्षण करणं हेच होतं. परकीयांच्या आक्रमणापासून आपली प्राचीन मंदिरे सुरक्षित ठेवण्याचं महत्वाचं काम नागा साधूंनी केलं.

पूर्वीपासूनच नागा साधूंना देव- धर्माची रक्षा करणं आणि त्यावर झालेल्या हल्ल्याला पूर्ण ताकदीनिशी प्रत्युत्तर देण्याची शिकवण दिलेली आहे.

मंदिर- मठांच्या संरक्षणासाठी यांच्या कडे तलवार, त्रिशूळ, धनुष्य बाण, गदा यांसारखी अवजारं असत.

 

naga sadhus warriers mughal invaders muslim inmarathi
the-south-asian.com

नागा साधूंनी मुघलांपासून अनेक शिव मंदिराचं रक्षण केल्याचा उल्लेख इतिहासात आहे.

औरंगजेबाने हिंदूंची प्राचीन मंदिरे नष्ट करण्यासाठी एका खास दहशतवादी सैन्याची तुकडी नेमली होती. आज सुद्धा बऱ्याच शिवालयात तुम्हाला नंदीच्या भग्न मूर्ती दिसतील.

 

beheaded nandi inmarathi
reddit.com

या दहशतवादी सैन्याला हाल- हाल करून मारण्याचं पूर्ण श्रेय नागा साधूंकडे जातं! नागा साधूंमुळेच भगवान शंकराची देवळं सुरक्षित राहिली, जिथे हिंदू अल्पसंख्याक आहेत तिथे सुद्धा धर्म अबाधित राहिला.

सन १६६४ ला जेव्हा काशी- विश्वनाथ देवळावर औरंजेबाच्या दहशतवादी सैनिकांनी हल्ला केला तेव्हा नागा साधूंनी त्याचा कडवा प्रतिकार करून या दहशतवादी लुटारू सैनिकांची कत्तल केली.

जेव्हा औरंगजेबाला ही बातमी समजली तेव्हा त्याला मोठा धक्का बसला. त्याने विश्वनाथ मंदिरावर हल्ल्याची योजना तीन वर्षांपर्यंत स्थगित केली.

नागा साधूंच्या या पराक्रमाचा उल्लेख जेम्स लोकफेल्ड च्या ‘ The Illustrated Enclopediya of Hinduism Volume -1’ या पुस्तकात आढळतो.

जेम्स च्या मते इतक्या सूसज्ज महाशक्तीशाली दहशतवादी सैन्याला मारण्याचा, महानिर्वाणी आखाड्याच्या नागा साधूंचा पराक्रम हा अद्भुत होता. दुर्दैवाने भारतीय इतिहासात या लढाई चा कुठेही उल्लेख आढळत नाही.

नागा साधूंचा मुघल काळातील अजून एका पराक्रमाचा पुरावा आहे.

अकबराच्या समकालीन असलेल्या अद्वैत वेदांत परंपरेतील मधुसूदन सरस्वती यांच्या प्रदेशात मुस्लिम समाजातील लोकं, अकबराच्या सैनिकांनी हिंदू धर्मियांचे प्रार्थनास्थळ, पुजाऱ्यांची खुले आम लूट आणि कत्तल चालवली होती.

निष्पाप साधू मदतीसाठी मधुसूदन यांच्या कडे धावले.ही सगळी परिस्थिती पाहून त्यांना प्रचंड दुःख झालं. ते तातडीने अकबराच्या राजदरबारात गेले आणि दहशतवादी कारवायांना पायबंद घालण्याची मागणी केली.

परंतु अकबराने त्याची फारशी दखल घेतली नाही. हिंदूवर हल्ले चालूच राहिले.

शेवटी नाईलाजाने मधुसूदन सरस्वतींनी सर्व नागा साधूंना संदेश पाठवून एकत्र केलं आणि मुस्लिम आक्रमणापासून हिंदू धर्मियांची रक्षा करण्याची विनंती केली.

 

naga sadhu inmarathi

 

नंतर जेव्हा दहशतवादी आणि मुस्लिम धर्मियांनी गावातल्या हिंदूंवर हल्ला केला तेव्हा नागा साधू त्यांच्यावर एखाद्या सिंहाप्रमाणे तुटून पडले. मुस्लिम सैन्याला हा प्रतिहल्ला अनपेक्षित होता.

दहशतवाद्यांना गावातील काही मुस्लिम नागरिक सुद्धा सामील होते त्यांनी पण प्रतिकाराची स्वप्नात सुद्धा कल्पना केली नव्हती. नागा साधूंनी निर्दयी पणे हल्लेखोरांना कापून काढले.

या भागातील मुस्लिमांमध्ये या हल्ल्याची तीव्र जरब बसली आणि पुढील अनेक शतके त्यांनी हिंदू धर्मियांना त्रास देण्याची हिम्मत केली नाही.

या लढाईचा उल्लेख विल्यम स्क्वेएज च्या Soldier Monks and militantas Sadhusपुस्तकात दिसून येतो.

कसे बनतात नागा साधू?

ब्रह्मचर्य

महापराक्रमी नागा साधू बनण्याचे नियम अत्यंत कडक आहेत.

ज्या व्यक्तीला आपले जीवन नागा साधू म्हणून व्यतीत करायचं आहे त्यांना आपल्या वासना, लैंगिक ईच्छा आणि इंद्रिय सुखांना कायम स्वरूपी नष्ट करण्यासाठी कठोर ब्राह्मचर्येचं पालन करावं लागतं.

यात केवळ शारीरिक सुख नाही तर मनामधून सुद्धा भौतिक सुखाच्या कल्पना यांचा त्याग करावा लागतो.

 

naga sadhu inmarathi 3

 

ब्राह्मचर्येच्या स्तरावर त्याची कठोर परीक्षा होते. जर तो या परीक्षेतुन पास झाला तर त्याला नागा साधूंच्या प्रशिक्षण शिबिरांत दाखल करून घेण्यात येतं.

पण नागा साधू बनण्याची ‘दीक्षा’ प्राप्त करण्यासाठी अजून बऱ्याच कठोर प्रशिक्षणाला सामोरं जावं लागतं.

ईश्वर, देश, लोकांची सेवा

जरी एखाद्या व्यक्तीने आपल्या सर्व इच्छांवर नियंत्रण मिळवलं तरी त्याने ईश्वराचं पूजन केलं पाहिजे. देशाची- लोकांची सेवा केलीच पाहिजे. ईश्वर- देश- देशबांधव यांविषयी प्रेम नसलेली गर्विष्ठ लोकं हे समाजावर भार असल्यासारखं असतात.

म्हणूनच नागा साधूंनी या तीनही गोष्टीं प्रती आपली सेवा देऊन राष्ट्र – धर्माचं पालन करणं आवश्यक आहे. वय वर्ष १६ ते १८ मधील कुठल्याही वर्णाचे नवयुवक, नागा साधू बनण्यासाठी पुढे येऊ शकतात.

साधू परंपरेत वर्ण द्वेष केला जात नाही. अट एवढीच की त्यांनी प्रशिक्षणासाठी सर्व नियमांचं सर्वोतोपरी पालन केलंच पाहिजे.

अंत्य विधी

 

naga sadhu inmarathi 5

 

साधू बनण्यासाठी व्यक्तीला आवल्या कुटुंबाचा, समाजाचा त्याग करावा लागतो. त्या व्यक्ती साठी साधू बनण्यासाठी तो एक नवीन जन्म घेणार असतो.

त्या पूर्वी व्यक्तीला आपले अंत्य संस्कार जसे की पिंडदान, श्राद्ध स्वतःच करावे लागतात जेणे करून परिवाराशी असलेला संबंध कायमस्वरूपी संपून जाईल.

त्या नंतर गुरू त्या व्यक्तीला नवीन नाव देऊन ओळख देतात.

वस्त्रांचा त्याग

नागा साधूंना वस्त्रांचा त्याग करणे अनिवार्य आहे. ते केवळ एक भगवा कपडा वापरू शकतात पण तो संपूर्ण शरीर झाकणारा नसावा. नागा साधू स्वतःच्या शरीराला कुठल्याही प्रकारे सजवू शकत नाहीत.

 

naga sadhu inmarathi 4
calcutta news

 

ते सबंध शरीराला केवळ राख लावतात आणि हाच त्यांचा शृंगार असतो!

भस्म, तिलक, फुले, रुद्राक्ष याच वस्तूंचा ते वापर करू शकतात. सामान्यतः हे साधू नग्न असतात, परंतु बाकी लोकांमध्ये वावरताना हे लंगोट वापरू शकतात कारण त्या लोकांना या साधूंमुळे लज्जा वाटू नये म्हणून.

केश त्याग आणि रुद्राक्ष

 

naga sadhu inmarathi 1
pinterest

 

या साधूंना वेणी, डोक्यावरील सर्व केस काढावे लागतात. त्यांना शिखा ठेवण्याची परवानगी नसते ते केवळ केसांची जटा ठेवू शकतात.

एकभुक्त

नागा साधू २४ तासात केवळ एकदाच जेवू शकतात. जास्तीत जास्त ७ घरांत भिक्षा मागून आलेलं सात्विक अन्न हे ग्रहण करतात. पण जर या ७ घरात भिक्षा मिळाली नाही तर मात्र साधूला उपवास करावा लागतो.

खाण्यामध्ये कुठलाही पर्याय उपलब्ध नसतो जे काही भिक्षा म्हणून मिळालं आहे तेच अन्न खावं लागतं.

जमिनीवरच निद्रा

हे साधू केवळ जमिनीवरच झोपू शकतात फार तर एखादा कपडा टाकून. परंतु कुठलाही पलंग,गादी, चटई सारख्या साधनांचा वापर निषिद्ध मानला गेला आहे.

गुरुमंत्र

 

naga sadhu inmarathi 6
happymind travels

 

दीक्षा प्राप्त केल्यावर नागा साधूला गुरुमंत्र दिला जातो. हा गुरुमंत्रच साधूंच्या आयुष्याचं ध्येय बनतं.

गुरूंवर पूर्ण श्रद्धा ठेवून ,गुरुमंत्राच्या साहाय्याने आयुष्यभर तपस्या करावी लागते.

एकांतवासातील जीवन

नागा साधू शहरात किंवा दाट लोकवस्ती असलेल्या गावात राहू शकत नाहीत. त्यांना सामान्य लोकांपासून दूर असलेल्या जागेत आसरा घ्यावा लागतो.
नागा साधू जंगलात,पर्वतावर किंवा हिमालयात आढळून येतात.

ते कोणाचा आदर किंवा अनादर करत नाहीत.  केवळ दुसऱ्या संन्यासी किंवा गुरू समोर नतमस्तक होऊ शकतात.

नागा साधूंचे प्रकार

 

naga sadhu inmarathi 7
outlook india

 

नागा साधूं मध्ये साधनेनुसार प्रत्येक साधू एक एक पायरी चढून वरचा अधिकार,पदवी प्राप्त करू शकतो. खाली त्याचा चढता क्रम दिला आहे:

नागा
महंत
श्री महंत
जमातीया महंत
ठाणपती महंत
पीर महंत
दिगंबरश्री
महामंडलेश्वर
आचार्य महामंडलेश्वर

महिला सुद्धा नागा साध्वी बनू शकतात. त्यांना सुद्धा कठोर प्रशिक्षणाला सामोरं जावं लागतं. फरक एवढाच की, त्यांना भगवं वस्त्र संपूर्ण शरीराभोवती गुंडाळून घ्यावं लागतं.

नागा साधूं विषयी अजून बरीच अचंबित करणारी माहिती उपलब्ध आहे. हटयोगाच्या साधनेने ते स्वतःच्या शारीरिक शक्तीला कल्पनेपालिकडे घेऊन जातात.

कुठल्याही रोगाला परतवून लावेल इतकी मजबूत प्रतिकार शक्ती ते तयार करतात.

कुंभमेळ्यात आपण त्यांच्या सहभागी होण्याची दृश्य पहिली असतील. त्यांच्या नग्न अवस्थे मुळे बाकी लोकांना त्यांच्याविषयी घृणा, आश्चर्य, भीती वाटणं सहाजिक आहे.

परंतु त्यांचा इतिहासातील पराक्रम जर पहिला तर त्यांचा आपल्याला नक्कीच अभिमान वाटल्या शिवाय राहणार नाही.

===

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | Copyright © InMarathi.com | All rights reserved. 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?