' कोरोना: अहोरात्र मेहनत करणाऱ्या या वैज्ञानिकांचा शोध संपूर्ण जगासाठी नवसंजीवनी ठरु शकतो – InMarathi

कोरोना: अहोरात्र मेहनत करणाऱ्या या वैज्ञानिकांचा शोध संपूर्ण जगासाठी नवसंजीवनी ठरु शकतो

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम |

===

कोरोनाचा धोका आता जगभर वाढलेला असताना त्यावर अजूनही कुठलंही औषध, लस मिळालेली नाही आणि हीच यातील सगळ्यात वाईट गोष्ट आहे.

शास्त्रज्ञ यावर लस मिळवण्यासाठी अहोरात्र प्रयत्न करीत आहेत. संपूर्ण जगभर हे प्रयत्न होताना दिसत आहेत. सध्या जवळजवळ शंभर प्रकारच्या लसींवर जगभर प्रयोग चालू आहेत.

त्यापैकी नक्की कोणती लस चालेल हे इतक्यात सांगता येणार नाही.

या सगळ्या लसींचा गुणकारी गुणधर्म त्याचे साईड इफेक्ट यांचा अभ्यास करावा लागणार आहे. यासाठी सर्व साधारण एक ते दीड वर्षाचा कालावधी लागू शकतो.

अगदीच कमी म्हटलं तरी डिसेंबर २०२० पर्यंत कोरोनावर लस मिळू शकेल.

 

corona test inmarathi
business today

 

काही काही आजार किंवा विषाणू हे असे असतात की त्यांच्यावर कोणतीही लस प्रभावी ठरत नाही. कोरोनाच्या बाबतीतही असंच म्हणावं लागेल. कोरोना फॅमिलीतील covid-19 हा नवीन विषाणू.

आधीच्या कोरोना व्हायरस वर देखील कोणत्याही प्रकारची लस उपलब्ध झाली नव्हती. इतर काही औषधांचा वापर करून तेव्हा कोरोनावर नियंत्रण मिळवण्यात यश मिळालं होतं.

परंतु आता ह्या नवीन कोरोनाच्या विषाणूवर लस मिळवणं अवघड होत आहे, याचं कारण म्हणजे त्याचं एकूणच स्वरूप.

कोरोना वर लस मिळेल की नाही याबाबत जागतिक आरोग्य संघटना साशंक आहे. जागतिक आरोग्य संघटनेचे सल्लागार डेव्हिड नाबारो यांच्या म्हणण्यानुसार कोरोनाव्हायरसवर लस मिळणे अशक्य ठरू शकते.

कारण अजूनही कोरोना च्या विषाणूवर कसा हल्ला चढवायचा हे अजून शास्त्रज्ञांना समजलेलं नाही.

डेव्हिड नाबारो याविषयी सांगताना म्हणतात की,

 

corona israel scientist inmarathi 1
devex

 

“आपली प्रतिकार शक्ती ही खूप आतल्या भागात असते. कोरोना हा आजार श्वसन यंत्रणेमार्फत फुफ्फुसापर्यंत जातो. आपली फुफ्फुस देखील शरीराच्या आतल्या भागात असतात.

त्यामुळे श्वसन यंत्रणेत वरच्या भागात जर कोरोना विषाणूचा हल्ला झाला तरी आपली प्रतिकारशक्ती त्यावेळेस काम करू शकत नाही.”

याच काळात माणूस हा त्या विषाणूंचा वाहक असतो. त्या माणसाची प्रकृती ठीक असते, परंतु तो इतरांना संसर्ग देऊ शकतो.

जेव्हा हे विषाणू फुफ्फुसांपर्यंत जातात आणि तिकडे हल्ला चढवतात तेव्हा माणसाची प्रतिकार शक्ती जागृत होते.

फुफ्फुसांमध्ये देखील तो विषाणू लगेच आत जात नाही. सुरुवातीला तो तिथे ही वरच राहतो आणि नंतर आतल्या भागात प्रवेश करतो.

त्यानंतर माणसाच्या शरीरातील टी पेशी त्याच्याशी लढायला लागतात आणि माणसाला फ्ल्यू सारखी लक्षणं दिसतात, आणि माणूस आजारी पडतो.’

कोरोनाचा विषाणू टी पेशींना मारत नाही तर त्यांना आजारी करतो, त्यामुळेच त्याच्यावर लस काढणं जिकिरीचं काम आहे. सर्दीवर ज्याप्रमाणे अजून लस तयार झाली नाही तसाच हा कोरोनाचा विषाणू आहे.

सध्या जगभरात जवळपास शंभर लसी यासाठी तयार करण्यात आल्या आहेत, त्यातली नक्की कोणती चालेल याबद्दल अजून खात्री नाही.

 

corona vaccine inmarathi 5
abc news

 

तरीदेखील कोरोनाच्या या विषाणूच्या गुंतागुंतीवर कशी मात करायची याबद्दल इस्त्रायलच्या शास्त्रज्ञाला यामध्ये यश मिळालेले आहे.

इस्रायलच्या, तेल अविव युनिव्हर्सिटीचे प्रोफेसर जोनाथन गेर्षोनी यांना ही लस तयार करण्यात यश मिळाले आहे. अगदी अमेरिकेने देखील त्यांना ही लस तयार करण्याचे पेटंट दिले आहे.

डेव्हिड गेर्शोनी यांच्यामते जेव्हा, जानेवारी २०२० मध्ये कोरोनाव्हायरस सापडला आणि त्याचे स्ट्रक्चर लक्षात आल्यानंतरच त्यांनी त्याच्यावर काम करायला सुरुवात केली.

ते म्हणतात, “जानेवारीच्या सुरुवातीपासूनच कोरोनाच्या जीनोम वर काम करायला आम्ही शास्त्रज्ञांनी सुरुवात केली.

तो माणसाच्या शरीरात कशा प्रकारे जातो आणि तिथल्या पेशींवर कसा हल्ला करतो हे आता ध्यानात आल्यामुळे, त्याच्यावर कसा प्रतिहल्ला चढवायचा याचा आम्ही विचार केला. 

आता असं वाटतंय की यात आम्ही यशस्वी होऊ.”

कोरोना विषाणू हे माणसाच्या शरीरातील, ज्या टी पेशींना आजारी करत होतं त्या पेशी आता ही लस दिल्याने नंतर पुन्हा नव्याने तयार होतील. त्यामुळे कोरोना विषाणूला तिकडे राहणे आणि माणसाच्या शरीरभर साखळी निर्माण करणे शक्य होणार नाही.

 

corona virus 3 inmarathi
India TV

 

म्हणजेच माणसाच्या शरीरातील पेशी परत तयार होतील. आणि कोरोनाव्हायरस तिथे राहू शकणार नाही.

अर्थात त्यांनी ही लस तयार केली आहे, तिचे प्रयोग यशस्वी होण्यासाठी एक वर्षाचा कालावधी आवश्यक आहे. सध्या मानवावरच याच्या क्लिनिकल चाचण्या घेण्यात येत आहेत.

‘एकदा का ही लस यशस्वी होते असं कळलं तर एखाद्या फार्मासिटिकल कंपनी बरोबर करार करुन ती लस सगळ्यांसाठी उपलब्ध करता येईल.

येत्या दोन ते तीन महिन्याच्या काळात ही लस यशस्वी होते का याच्या निष्कर्षापर्यंत आम्ही नक्कीच येऊ, असा आम्हाला विश्वास आहे,’ असं प्रोफेसर डेव्हिड गेर्षोनी म्हणतात.

डॉक्टर डेव्हिड गेर्षोनी हे गेली १५ वर्ष कोरोनाव्हायरस वर अभ्यास करीत आहेत. आधीच्या सार्स कोव्ह तसेच मर्स कोव्ह या आजारांवर देखील त्यांनी अभ्यास केलेला आहे.

 

corona israel scientist inmarathi 2
the times of israel

 

त्यामुळे कोरोना फॅमिलीतील विषाणू हे कसे असतात याची त्यांना कल्पना आहे. आधीच्या दोन कोरोनाव्हायरस आणि आता आलेला covid-19 याचा त्यांनी अभ्यास केला आहे, आणि त्यानुसारच लस तयार केली आहे.

या लसीचं यशस्वी होणं यासाठीच महत्त्वाचे आहे की कोरोनामुळे आत्तापर्यंत जगात दोन लाखांच्या आसपास मृत्यू झाले आहेत आणि जगभरातल्या २५००००० लोकांना कोरोनाची लागण झालेली आहे.

जगाचे व्यवहार ठप्प झाले आहेय, त्यासाठीच कोणतीतरी लस किंवा औषध लवकरात लवकर मिळणे आवश्यक आहे. म्हणूनच या लसीचे प्रयोग यशस्वी झाल्यास ही लस बाजारात येईल.

शिवाय अजूनही अमेरिकन एफडीए ची या लसीला परवानगी मिळाली नाही, तीदेखील मिळवावी लागेल त्यानंतरच ही लस बाजारात येण्याचे मार्ग सुकर होतील.

===

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | Copyright © InMarathi.com | All rights reserved. 

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?