' कोरोनाग्रस्त रुग्णांच्या चेहऱ्यावर हसू आणण्यासाठी या डॉक्टरांनी जे केलंय, ते पाहून तुम्हीही आनंदी व्हाल!!

कोरोनाग्रस्त रुग्णांच्या चेहऱ्यावर हसू आणण्यासाठी या डॉक्टरांनी जे केलंय, ते पाहून तुम्हीही आनंदी व्हाल!!

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम |

===

स्माईल. काय लागतं एक स्माईल द्यायला ? काहीच नाही. मागच्या काही दिवसात या स्माईल चं महत्व फार वाढलं आहे. कारण, कोरोना ने लोकांना इतकं त्रस्त केलं आहे की लोक हसणं विसरत चालले आहेत.

एका संशोधनात असं समोर आलंय की कोणत्याही रुग्णाला जर का प्रसन्न वातावरणात ठेवलं तर त्याचा रोग लवकर बरा होऊ शकतो. कारण त्याच्या आजूबाजूची सकारात्मकता त्याला त्या रोगावर मात करण्यासाठी बळ देत असते.

याच आधारावर अमेरिकेतील एका श्वसन विकारांवर उपचार करणाऱ्या हॉस्पिटलने प्रत्येक डॉक्टरचे स्माईलिंग फोटो हे प्रत्येकाच्या युनिफॉर्म वर लावले आहेत.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जगातील प्रत्येक हॉस्पिटलने सतर्कता म्हणून आपल्या युनिफॉर्म पद्धतीत बदल केला आहे. ज्यामुळे प्रत्येक डॉक्टर चा चेहरा हा कव्हर केलेला असतो.

 

corona in china inmarathi 1

 

डॉक्टर लोकांना संसर्ग टाळण्यासाठी त्यांच्यात आणि कोरोना बाधित लोकांमध्ये एक विशिष्ट अंतर राखणं अत्यंत गरजेचं आहे.

त्याचबरोबर कोरोना बाधित लोकांनी खचून न जाता कोरोनाशी लढण्यासाठी सकारात्मक असावं यासाठी हॉस्पिटल प्रशासनाने स्माईल असलेले फोटो रुग्णांना दिसावेत यासाठी हा निर्णय घेतला.

या निर्णयाचं सर्व स्तरातून, रुग्णांकडून खूप स्वागत झालं. त्यामुळे ही एक साखळी तयार झाली आणि आज किती तरी हॉस्पिटल ने हे त्यांच्या हॉस्पिटल मध्ये सुद्धा राबवण्याचा निर्णय घेतला आहे.

रॉबर्टीयो रोड्रिग्स हे डॉक्टर स्क्रीप्स मर्सि या हॉस्पिटलमध्ये, सन डियगो इथे काम करतात. त्यांनी इन्स्टाग्राम वर एक फोटो share केला ज्याला ३५००० लोकांनी लाईक केलं आहे.

त्या फोटोमध्ये त्यांनी सर्वांन हे आवाहन केलं आहे: ‘तुमची स्माईल movement share करा’.

रोड्रिग्स त्यांच्या पोस्ट मध्ये पुढे असं सांगतात की, “काल मी Emergency मधली रुग्ण पहायला गेलो होतो तेव्हा त्या रुग्णांबद्दल विचार करून मला फार वाईट वाटलं.

म्हणून, मी आजपासून मी एक स्माईल असलेला फोटो माझ्या PPE सोबत लावायला सुरुवात केली आणि त्याचा अनुकूल परिणाम मला दिसायला लागला”.

 

corona doctor inmarathi 2
insider

 

सोशल मीडिया वर ही पोस्ट खूप व्हायरल झाली जेव्हा रोड्रिग्स यांनी त्यांचे कलीग, इतर डॉक्टर मित्र यांचे असेच फ़ोटो share करायला सुरुवात केली.

लॉस इंजिलीस मधील एका नर्स डेरेक DeVault यांनी सुद्धा सध्या असलेला स्ट्रेस लक्षात घेता ह्या पोस्ट चं स्वागत आणि अवलंबन केलं.

त्याच बरोबर त्यांनी जे लोक कोरोना चा संसर्ग होऊ नये म्हणून घरीच बसत आहेत त्यांचे सुद्धा आभार मानले. कारण ते सुद्धा सोपं काम नाहीये.

सध्याच्या परिस्थितीत एखाद्या व्यक्तीला वैद्यकीय मदतीची गरज पडणे हेच क्षणभरासाठी थरकाप उडवणारं आहे. आजाराचं कारण कोरोना असो किंवा नसो, भीतीही प्रत्येकालाच आहे.

प्रत्येक डॉक्टर ला संसर्ग टाळण्यासाठी स्वतःला PPE वापरणं हे बंधनकारक आहे. अश्या वेळात जर का पेशंट ला जर का डॉक्टर चा स्माईल असलेला फोटो दिसला की त्याने एक प्रकारे शांतता मिळते.

 

corona doctor inmarathi
huffpost

 

हा बदल काही दिवसांपासून सगळे डॉक्टर करत आहेत आणि त्यांचे फोटो आणि अनुभव सुद्धा जगाला सांगत आहेत. रोड्रिग्स यांनी न ठरवता केलेलं एक काम प्रत्येक डॉक्टर ला पटलेलं आहे आणि ही एक चैन तयार झाली आहे.

रोड्रिग्स यांच्या कार्याची दखल कॅलिफोर्निया च्या राज्यपाल गॅविन न्यूसम यांनी सुद्धा घेतली आणि त्यांनी ट्विट करून रोड्रिग्स यांचे आभार मानले.

कधी कधी आपण मानसिक स्वास्थ्य सुद्धा महत्वाचं आहे हेच विसरून जात असतो. हा छोटा बदल केल्याने जर का पेशंट ची रोग प्रतिकारशक्ती वाढत असेल ह्याचा अंदाज रोड्रिग्स यांना सुद्धा सुरुवातीला आला नव्हता.

कोर्टनी बिलोट ज्या की radiation thearapy मध्ये काम करतात त्यांनी सुद्धा या उपक्रमाचं स्वागत केलं आणि त्यांच्या हॉस्पिटल मधील प्रत्येक व्यक्तीला त्यांचा एक स्माईल असलेला फोटो जमा करायला सांगितला.

आणि त्याबरोबरच हे सुद्धा त्यावर लिहायला सांगितलं की ती कोणती गोष्ट आहे ज्यामुळे ते सर्व इतके आनंदी आहेत. बिलोट यांनी स्वतः त्यांच्या पूर्ण स्टाफ चे बॅजेस तयार केले.

 

corona doctor inmarathi 1
instyle

 

डॉ. बिलोट यांनी ट्विट करून सांगितलं की, “त्यांच्या कॅन्सर पेशंट ला रोजच हॉस्पिटल मध्ये यावं लागतं आणि ते त्यांच्या सोबत कोणाला आणू सुद्धा शकत नाहीत.

तेव्हा त्यांना निदान एक चेहरा दिसणं आवश्यक आहे जो की त्यांची काळजी घेऊ शकतो. एक फोटो लावल्याने जर का पेशंट ला धीर वाटत असेल तर असं करण्यात काय हरकत आहे ?”.

डॉ. बिलोट यांच्या सहकारी एलिझा यांनी सुद्धा या गोष्टीला दुजोरा दिला आणि हे सांगितलं की,

“कोणत्याच पेशंट ला कधीच ट्रीटमेंट घेणं आवडत नसतं. पण, कोरोना मुळे तयार झालेल्या या स्माईल चेन मुळे आम्ही आमच्या प्रत्येक पेशंट सोबत एक कनेक्शन तयार करू शकलो.

आणि त्यांना हे शब्दांशिवाय हे सांगू शकलो की आम्हाला तुमची काळजी आहे आणि तुम्हाला बरं करण्यात आम्हाला आनंद होत आहे.”

Peggy Ji या physician म्हणून लॉस इंजिलीस च्या अतिदक्षता विभागात काम पहातात. त्यांना सुद्धा या स्माईल चेन मध्ये सहभागी होण्याची इच्छा दर्शवली आहे.

कारण, त्यांच्याकडे कोणताही पेशंट ज्याला सर्दी, श्वसनाचा त्रास किंवा ताप आलेला असेल तो प्रत्येक पेशंट त्यांना घाबरत विचारत असतो की, “मला कोरोना झालाय का ?”

तेव्हा आम्हाला त्यांच्या चेहऱ्यावरची भीती ही स्पष्टपणे दिसत असते आणि ते ज्या वॉर्ड मध्ये असतात तिथे होणारी नर्स ची वर्दळ यामुळे त्या पेशंट ला कोरोना ची किती धडकी भरलेली असेल ह्याचा आम्हाला अंदाज आहे.

 

corona

 

इतर वेळी आम्ही आमच्या पेशंट ला आमच्या स्पर्शाने बोलत असतो, पण सध्या आमचे चेहरे, हात हे PPE ने कव्हर केलेलं असल्याने आम्ही ते आता करू शकत नाही.

तेव्हा हा फोटो त्या सगळ्याचं काम करतो या distancing आणि quarantine च्या काळात.

डॉ. Ji यांनी पुढे सांगितलं की, “ह्याचा फायदा फक्त पेशंट ला न होता आमच्या पूर्ण मेडिकल टीम ला होताना दिसत आहे. या एका कामाने आमची पूर्ण मेडिकल टीम एकत्र आली असं मला वाटतंय.

कारण, सध्या आमचं काम इतकं वाढलं आहे की आम्ही कामाच्या गडबडीत आमच्या कलीग चे चेहरे सुद्धा बऱ्याच वेळेस बघू शकत नाहीत.

तेव्हा हा फोटो दिसला की त्या व्यक्तीने आपल्याला बघून आजच्या दिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत अशा भावना नकळत येऊन जातात.

आम्ही त्यात अजून एक सुधारणा केली की फोटो च्या बॅच वर आम्ही कोणासोबत काम करतोय त्या व्यक्तीचं सुद्धा नाव लिहिलं. म्हणजे प्रत्येकाला आपण कोणाशी बोलत आहोत हे कळायला सोपं जाईल.

 

corona doctor inmarathi 3
health magzine

 

आम्हाला आमच्या प्रोफेशन चा इतका अभिमान या पूर्वी कधी वाटला नव्हता. ही खूप छान भावना आहे की माझ्या specialization च्या व्यतिरिक्त सुद्धा इतर किंत्याही पेशंट ची आम्ही emergency वॉर्ड मध्ये आल्यावर काळजी घेत आहोत.

हेच कारण आहे की मी ही फिल्ड निवडली की ज्यामध्ये मला अशा परिस्थितीत कोणाची मदत करता येत आहे.  एका अशा रोगावर मात करण्याची संधी मिळत आहे ज्याबद्दल आम्ही आमच्या शालेय जीवनात कधीही अभ्यास केलेला नाही.

सोशल मीडिया चे सुद्धा खूप धन्यवाद की ज्यामुळे मला इतर देशातील मेडिकल क्षेत्रातील लोकांशी कनेक्ट होण्याची संधी मिळाली. या सर्वांच्या मदतीने ही स्माईल चेन पसरवण्यात योगदान देणं हे मी माझं भाग्य समजते”.

खरंच या सुपरहिरोजना सलाम!!

===

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | Copyright © InMarathi.com | All rights reserved. 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?