''थरारपटांचा' किंग आल्फ्रेड हीचकॉकच्या या १० गोष्टी त्यांच्या उत्तम दिग्दर्शनाचे दाखले देतात

‘थरारपटांचा’ किंग आल्फ्रेड हीचकॉकच्या या १० गोष्टी त्यांच्या उत्तम दिग्दर्शनाचे दाखले देतात

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम |

===

आल्फ्रेड हिचकॉकचा जन्म १३ ऑगस्ट १८९९ रोजी झाला आणि मृत्यू १९८० मध्ये. या दरम्यानच्या काळात त्याने हॉलिवूडला पन्नास चित्रपट दिले.

त्याने प्रेक्षकांची पूर्वापार असलेली चित्रपट पाहण्याची पद्धत बदलली. आल्फ्रेड हिचकॉक हा त्याच्या काळातील एक वादग्रस्त,तरीही न विसरता येणारा दिग्दर्शक आहे यात मात्र वाद नाही.

त्याच्या सायको या चित्रपटाच्या प्रदर्शनासाठी त्याने विशिष्ट वेळ मागून घेतली होती आणि चित्रपटाचा शेवट कुणाला सांगू नका असे प्रेक्षकांना सांगण्यात आले होते.

 

alfred hitchcock inmarathi
the vintage news

 

त्यामुळे या चित्रपटाचं रहस्य उत्कंठावर्धक राहिलं.

हिचकॉक ऑस्कर ऍवॉर्ड कधीही जिंकू शकला नाही तरी देखील हिचकॉक हा गेल्या शतकातील हॉलिवूडचा सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक ठरला याची काही कारणे पुढीलप्रमाणे आहेत.

 

१. कथेची मांडणी :

हिचकॉकने दिग्दर्शक म्हणून सुरूवात केली ती मूक चित्रपट काळापासून. त्यामुळे संवाद नसतानाही कथानक प्रेक्षकांपर्यंत कसं पोचवावं याची त्याला उत्तम जाण होती.

चित्रपटात संवाद सुरू झाल्यावर त्याचं हेच कौशल्य अधिक प्रभावी ठरलं.

जरी आता बोलपट सुरू झाले असले, तरी बोलपटांतूनही प्रेक्षकांपर्यंत नेमकी कथा प्रभावीपणे कशी पोचवायची यासाठी हिचकॉक वेगवेगळे फंडे वापरत राहिला.

आणि हे त्याचं तंत्र त्याच्या शेवटच्या सिनेमापर्यंत त्याने टिकवलं होतं.

 

hitchcock inmarathi
into film

 

२. Mise-en-scene तंत्र :

हिचकॉकचं दिग्दर्शनाचं तंत्र असं होतं की तो प्रेक्षकांना एखाद्या सीनमधला प्रसंग नेमका आणि पूर्ण लक्षात राहावा अशी रचना करत असे.

आपल्या सिनेमातील रहस्य, शेवट, उत्कंठा प्रेक्षकांमध्ये टिकून राहील आणि प्रेक्षक चित्रपट पाहण्यात गुंगून जातील अशा प्रकारची सीनची रचना तो करण्यात एक्सपर्ट होता.

३. विषय :

हिचकॉकने आपल्या सिनेमात सेक्स, मृत्यू, अपराध, हिंसा, कौटुंबिकता या सर्व मानवी भावभावनांचा मालमसाला व्यवस्थित ठेवला.

त्यामुळे त्याचा कोणताच चित्रपट प्रेक्षकांना कंटाळवाणा झाला नाही.

४. पटकथा लेखन :

हिचकॉकची पटकथा लेखनाची पद्धत अभिनव होती. या पटकथेतील संवादातूनच तो प्रेक्षकांना खिळवून ठेवण्यात यशस्वी होत असे.

तो आपल्या मुख्य पात्रांच्या मानसिक वर्तनावर आणि वैशिष्ट्यांवर अधिक भर देत असे.

त्याच्या ‘रेबेका’ आणि ‘शॅडो ऑफ अ डाऊट’ या चित्रपटांत त्याने चित्रपटाची गूढता आणि रहस्यमयता टिकवून ठेवण्यासाठी संवादाचा प्रभावी वापर केला होता.

 

shadow of doubt inmarathi
monmouth film festival

 

५. संगीताचा वापर :

हिचकॉकच्या सिनेमात संगीताचा वापर फार खुबीने केला जात असे. न्युयॉर्क टाईम्सचे एडवर्ड रोथस्टीन तर म्हणतात,

की हिचकॉकच्या सिनेमात संगीत हेच त्या सिनेमाचे मुख्य पात्र असायचे म्हटले तरी चालेल.

सिनेमातील एखाद्या प्रसंगातली उत्तेजकता कशी वाढवायची, एखाद्या तणावपूर्ण प्रसंगातला तणाव प्रेक्षकांपर्यंत कसा पोहचवायचा, किंवा रहस्यमयता कशी वाढवायची,

शेवटाकडे कशा पद्धतीने न्यायचं हे सगळं हिचकॉक विशिष्ट प्रकारच्या संगीताच्या सहाय्यानेच प्रभावी करत असे.

६. एडीटींग :

हिचकॉकचं स्वतःचं मत असं होतं की चित्रपटाचं योग्य रित्या एडीटींग करता आलं पाहिजे.

योग्य ठिकाणी सीन कट करता येणं, प्रभावी संगीताचा वापर करता येणं आणि चित्रपटाचं कथानक योग्य रित्या प्रेक्षकांपर्यंत पोचवण्याची कला तुम्हाला जमली तर सिनेमा हिट होतो.

त्याचे ‘रोप’, ‘अंडर कॅप्रिकॉर्न’ आणि सॅबोटेज हे सिनेमे पाहिले तर योग्य प्रकारे केलेलं एडीटींग चित्रपटाला यशस्वी करण्यात कसं हातभार लावतं ते कळून येईल.

 

rope editing inmarathi
Den of Geek

 

७. पात्रांचा अभिनय :

हिचकॉकने ठराविक अभिनेत्यांनाच आपल्या सिनेमांत परत परत घेतले. त्याचे आपल्या अभिनेत्यांवर नियंत्रण असे. त्याला हवा तसाच आणि तितकाच अभिनय तो आपल्या अभिनेत्यांकडून करून घेत असे.

त्याचे अनुशासन कडक असे. तो अभिनेत्यांना फार स्वातंत्र्य देत नसे.

८. साधे सरळ कथानक :

गुंतागुंतीचे आणि अमूर्त प्रकारचे कथानक प्रेक्षकांना गोंधळात टाकू शकते असे हिचकॉकला वाटे. कथानक साधे, सहज समजणारे आणि सरळपणे पुढे पुढे सरकणारे हवे यावर त्याचा कटाक्ष होता.

चित्रपटातील रहस्यात प्रेक्षक गुंतून जायला हवे मात्र त्याचवेळी त्यांना गोंधळात टाकणारे कथानक असता कामा नये असे त्याचे मत होते.

सर्वसामान्य प्रेक्षकांनाही कळेल असे साधे सरळ कथानक हे त्याच्या सिनेमांचे वैशिष्ट्य होते.

 

hitchcock movies inmarathi
music rewind

 

९. विरोधाभासी परिस्थिती :

हिचकॉकला चित्रपटाच्या सीनमध्ये परस्परविरोधी दृश्ये दाखवून एक प्रकारचा तणाव निर्माण करणे आवडायचे. एकाच वेळी दोन असंबद्ध घटना दाखवून प्रेक्षकांना गुंगवून ठेवण्याचे तंत्र वापरत असे.

जेव्हा प्रेक्षक एखाद्या वेगवान घटनेकडे लक्ष केंद्रित करतात तेव्हा दुसऱे दृश्य त्यात अडथळा आणणारे असे वाटू शकेल अशी रचना तो करतो.

उदा. १९५६ च्या त्याच्या एका चित्रपटात, ‘द मॅन व्हू न्यू टू मच’ मध्ये एका प्रसंगात जिम्मी स्ट्युअर्ट आणि डॉरीस डे हे एका तणावग्रस्त फोन कॉलवर असतात,

तेव्हाच एकीकडे तिथे हसत खिदळत आनंदाने काही पाहुणे आत येत असतात. अशा प्रकारच्या दोन्ही परस्पर विसंगत दृश्यांमुळे प्रेक्षक गोंधळात पडून त्यांना उत्कंठा निर्माण होते.

 

the man who knew too much inmarathi
something else

 

१०. कॅमेऱ्याचे महत्त्व :

हिचकॉकचे म्हणणे होते की चित्रपटात महत्त्वाचा रोल असतो तो कॅमेऱ्याचा.

तुम्हाला जे काही सांगायचंय ते जितकं पात्रांच्या अभिनयातून, संगीतातून सांगू शकता त्याच्या कितीतरी पटीने तुम्ही तुमच्या कॅमेऱ्याचा ऍंगल ते सांगू शकतो.

तुमचा कॅमेरा तुम्ही कसा ठेवता, कुठे ठेवता आणि त्याच्या कशा हालचाली करता त्यावर तुमच्या कथानकाचा परीणाम ठरत असतो. साहजिकच हिचकॉकच्या चित्रपटात कॅमेऱ्याचा रोल अधिक होता.

हिचकॉकच्या सिनेमात कॅमेरा त्या सीनमधल्या जागेत सगळीकडे फिरतो. तिथल्या वस्तुंचे देखील तो क्लोजअप्स घेतो. जेणे करून प्रेक्षक त्या दृश्याकडे खिळून राहतात.

घडणाऱ्या घटनांशी त्यांचा संबंध लावू पाहतात. हिचकॉकने आपल्या सिनेमाची सुरुवातच मूक चित्रपटाद्वारे केल्याने त्याला कॅमेऱ्याचे महत्त्व चांगलेच ठाऊक होते.

 

alfred hitchcock camera inmarathi
reddit

 

संवाद नसलेल्या सिनेमात चित्रपटाचे कथानक प्रेक्षकांपर्यंत पोचवायचे तर ते कॅमेऱ्याच्या कोनांतूनच करू शकतो.

कॅमेरा काय काय दाखवतो त्यावरूनच मूक चित्रपट काळातील प्रेक्षक अंदाज लावून कथानक समजून घेत असत. कॅमेऱ्याचे हे तंत्र बोलपटातही हिचकॉकने अचूक वापरले.

या सर्व कारणांमुळे हिचकॉकचे सगळेच चित्रपट लोकप्रिय झाले. त्यांना पुरस्कार जरी जिंकता आला नसला तरी त्यांना प्रेक्षकांची मने जिंकता आली होती.

यशस्वी चित्रपट काढणे हा हिचकॉकचा हातखंडा झाला होता. त्यामुळेच प्रेक्षक आजही त्याची आणि त्याच्या चित्रपटांची आठवण काढतात.

===

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?