' कोरोनाचा संसर्ग होऊ नये म्हणून बाहेरून आणलेले अन्नधान्य शिजवताना "ही" काळजी घेताय ना?

कोरोनाचा संसर्ग होऊ नये म्हणून बाहेरून आणलेले अन्नधान्य शिजवताना “ही” काळजी घेताय ना?

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम |

===

मार्च महिन्याच्या मध्याला भारतात नोवेल कोरोना व्हायरसच्या संक्रमणाला सुरुवात झाली. तेव्हा परिस्थितीचं गांभीर्य कोणालाच कळलं नव्हतं.

१५ मार्च पासून शाळा महाविद्यालये ३१ मार्च पर्यंत बंद ठेवण्यात आली. परिस्थिती गंभीर होऊ लागली होती. १८० देशांमध्ये लाखो लोकांना ह्याची लागण झाली.

लाखो लोकं मृत्युमुखी पडली होती. अजूनही ह्याचा संसर्ग होतोय आणि लोकं बळी पडातायत. रोज ह्याच बातम्या आहेत सगळीकडे.

राजकारण, दहशतवाद, देशा देशातले वैमनस्य किंवा मैत्री असे दुसरे कोणतेही विषय आता चर्चेत नाहीत!

ह्या व्हायरसने भारतातही भराभर बळी घ्यायला सुरुवात केली होती. २२ मार्च रोजी टोटल लॉकडाऊन जाहिर झाला होता. नंतर तो वाढवून १४ एप्रिल पर्यंत करण्यात आला.

पण परिस्थिती अजूनही गंभीरच होती. ह्या रोगाचा संसर्ग वाढतच होता, बळींची संख्या शेकडोंच्या वर गेली होती. आणि आता ३ मे पर्यंत हा लॉकडाऊन वाढवण्यात आला आहे.

 

lockdown extened inmarathi
livemint

 

खाजगी तसेच सरकारी वाहने बंद, रेल्वे, विमाने बंद, खाजगी कंपन्या बंद, लोकांना घरातून बाहेर न पडण्याची सक्ती करण्यात आली आहे.

सगळीकडे भयंकर परिस्थिती आहे. लोकं किड्या-मुंग्यां सारखी मरू लागली. ह्या व्हायरसचा संसर्ग झालेल्या माणसाला सगळ्यापासून तोडून एकटे ठेवायला भाग पडते.

टोटल क्वारंटाईन! कोणीही त्या व्यक्तीजवळ जायचे नाही. डॉक्टर्स् आणि नर्सेस् पण खूप काळजी घेऊन मगच रूग्णाजवळ जातात.

मृत्युनंतरही त्या रूग्णांचे हाल संपत नाहीत. त्यांचा मृतदेह नातेवाईकांना दिला जात नाही, नातेवाईकाना देखील संसर्ग होऊ नये म्हणून! परस्पर अंत्यसंस्कार केले जातात!

खूपच गंभीर परिस्थिती आहे, सगळीकडे भयावह वातावरण आहे.

 

quarantine inmarathi
india today

 

सध्या लॉकडाऊन असल्यामुळे आपण ४ ते ५ दिवसांचं किंवा आठवडाभराचं किराणा, भाजी, फळे वगैरे आणून ठेवतो आपल्या घरी. सोशल डिस्टन्सिंग पाळणे गरजेचे आहे.

त्यामुळे रोज बाहेर पडणे शक्यच नाहिये. ह्या कोरोनाच्या संसर्गापेक्षा कोरोना बद्दल गैरसमजच जलद गतीने पसरतायत.

आज आपण ह्या लेखातून पाहूया की, अन्न सुरक्षा किंवा आपण जे सेवन करतो त्या अन्नामुळे कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव किंवा त्याचा संसर्ग होऊ शकत नाही का?

सगळे गैरसमज दूर करूया आज आपण!

एक तर असा समज आहे अन्नातून हा रोग, हा व्हायरस पसरतो. रोग नियंत्रण आणि प्रतिबंध केंद्राच्या अहवालानुसार अन्नामुळे हा संसर्ग होत नाही!

अजून तरी हा संसर्ग अन्नामुळे झाल्याची कोणतीही बातमी नाही. कोरोना व्हायरस हा अन्नामुळे पसरत नसून असा संसर्गजन्य आजार आहे जो श्वसनाद्वारे होतो.

 

corona public inmarathi
Al jazeera

 

त्यामुळे आपण शक्यतो जास्तीत जास्त स्वच्छता पाळणे खूप जरूरीचे आहे.

अन्न शिजवण्याच्या आधी हात कमीत कमी २० सेकंद नीट, स्वच्छ धुवावेत.

अन्नावर हा संसर्गजन्य विषाणू असण्याची शक्यता जवळ जवळ नसतेच, असा निर्वाळा तज्ञांनी दिला आहे.

अन्नावर हा व्हायरस टिकून राहायचे कारण नाही कारण, हा व्हायरस अशा पृष्ठभागावर जास्त टिकून राहू शकतो जो पृष्ठभाग त्या व्हायरस च्या संसर्गाला अनुकूल असतो!

आणि अन्नाच्या पृष्ठभागावर हा व्हायरस टिकून राहू शकत नाही, कारण हया व्हायरस साठी अन्नाचा पृष्ठभाग अनुकूल नसतो. त्यामुळे अन्नाने हा पसरतो हा गैरसमज दूर होणे गरजेचे आहे.

आपण ज्या पालेभाज्या आणतो त्या स्वच्छ, खूप वेळ धुवून घ्याव्यात, फळभाज्या आणि फळे गरम पाण्यात १०-१५ मिनिटे ठेवावीत आणि नंतर स्वच्छ साध्या पाण्यात धुवून घ्याव्यात.

 

veggie cleaning inmarathiveggie cleaning inmarathi

 

कच्चे मांस इतर पदार्थांपासून वेगळे ठेवावे. उन्हाळ्याचे दिवस आहेत पदार्थ लवकर खराब होतील. असे पदार्थ फ्रिजमध्ये स्वच्छ पिशवीत, कंटेनरमध्ये ठेवावेत.

भाज्या, फळे देखील स्वच्छ पिशवीत ठेवाव्यात. अन्नातून हा व्हायरस पसरत नाही असे तज्ञांचे मत आहे. तरी देखील आपण शक्यतो सगळी खबरदारी घ्यायलाच हवी.

जेवढी स्वच्छता, जेवढी खबरदारी घेऊ तेव्हढे आपल्या तब्येतीला चांगले आहे.

अन्न शिजवल्यामुळे हा विषाणू मरतो असाही एक गैरसमज आहे. पुन्हा आधीच सांगितले त्याप्रमाणे तज्ज्ञांनी असे सांगितले आहे की, अन्नातून ह्या व्हायरसचा संसर्ग होत नाही.

तरीही आपल्याकडे अन्न शिजवूनच खायची पद्धत आहे, त्यामुळे त्याच्यावरचे सगळेच विषाणू नष्ट होतात. त्यामुळे अन्न शिजवून खाणे हे आपल्या तब्येती साठी केव्हाही चांगलेच असते.

सर्व डॉक्टर्स् देखील अन्न पूर्णपणे, नीट शिजवण्याचा सल्ला देतात.

 

cooked food inmarathi
pinterest

 

बर्याच वैद्यकिय सल्लागारांचे असे म्हणणे आहे की, कोरोना व्हायरस हा कमी टेंपरेचर मध्ये दीर्घ काळ टिकू शकतो आणि जास्त तापमानामध्ये त्याचा जास्त काळ टिकाव लागू शकत नाही.

त्यामुळे जरी अन्नातून ह्या व्हायरसचा जर संसर्ग होण्याचा धोका असला तरी अन्न शिजवल्यावर हा धोका तर पूर्णपणे नष्ट होतो असे तज्ज्ञांचे मत आहे.

त्यामुळे अन्न व्यवस्थितच शिजवून खाल्ले पाहिजे. अन्न शिजवण्याच्या सर्व मार्गदर्शनाचा विचार करून सर्व उपाय योजना केल्या पाहिजेत.

म्हणजेच आपण स्वयंपाक करण्यासाठी जे मापदंड आहेत, जे तपमान आवश्यक त्याचा विचार करून अन्न शिजवले पाहिजे!

कारण, ज्या तापमानाला अन्न शिजणे आवश्यक आहे त्याच तापमानामध्ये शिजवणे गरजेचे आहे कारण, त्यामुळे केवळ विषाणूच नष्ट होतात असे नाही तर त्यामध्ये जे शरीराला हानीकारक असतात ते बॅक्टेरिया देखील नष्ट होतात.

 

cooking inmarathi
Indian women blog

 

त्यामुळे अन्न शिजवणे हे आणि योग्य त्या तापमानाला शिजवणे हे आपल्या तब्येतीसाठी लाभदायक आहेत. जसे, मांस १४५० तापमानाला शिजते.

म्हणजेच आपण अन्न जर नीट, व्यवस्थित शिजवले तर त्याच्या सुरक्षेविषयी, अन्नाच्या खाण्याच्या योग्यतेविषयी काहीच काळजी करण्याचे कारण नाही.

अन्न शिजवले की, ते नक्कीच खाण्यायोग्य होते, कारण त्यातील विषाणू आणि हानीकारक बॅक्टेरिया नष्ट होतात.

अन्नातून ह्या व्हायरसचा संसर्ग, प्रसार होत नसला तरी स्वच्छता, योग्य ती काळजी घेणे खूपच गरजेचे आहे आणि अन्नाविषयी जो गैरसमज पसरत आहे तो दूर करणे गरजेचं आहे.

===

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?