'या ५ प्रकारे व्हॅलेंटाईन डे साजरा करून बघा, १००% आनंद मिळेल...

या ५ प्रकारे व्हॅलेंटाईन डे साजरा करून बघा, १००% आनंद मिळेल…

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम |

===

फेब्रुवारी महिना उजाडला आहे, आणि तुम्हाला चांगलंच माहितीये की हा महिना जास्तकरून कशासाठी ओळखला जातो, १४ फेब्रुवारी म्हणजेच व्हॅलेंटाईन डे!

व्हेलेंटाईन डे म्हणजे प्रेमाचा दिवस! या दिवशी अवघ्या सृष्टीवर प्रेमाचा रंग चढलेला असतो. तरुणाई तर या दिवशी अगदी सातवे आसमान पर असते. हा दिवस आपल्या गर्लफ्रेंडसाठी किंवा बॉयफ्रेंडसाठी मोस्ट मेमोरेबल बनवावा यासाठी प्रेमात असणारा प्रत्येक व्यक्ती प्रयत्न करत असतो.

 

dil chaahta hai inmrathi
the indian express

 

बरं यात तरुणांपेक्षा मोठी पिढी देखील मागे नसते म्हणा! पण कधी कधी मनात सहज विचार येतो की व्हेलेंटाईन डे हा फक्त गर्लफ्रेंड-बॉयफ्रेंड, प्रियकर-प्रेयसी, नवरा-बायको यांच्याच प्रेमाचा दिवस का?

व्हेलेंटाईन डे हा दिवस फक्त प्रेमवीरांसाठी असण्यापेक्षा निव्वळ प्रेमाचा दिवस म्हणून साजरा केला जाऊ शकत नाही का? हा दिवस इतर निखळ, निरागस मनाला आनंद आणि समाधान देणाऱ्या प्रेमाचा दिवस म्हणून साजरा करण्यास काय हरकत आहे?

सेंट वेलेंटाईन हे बऱ्याच हुतात्मा ख्रिस्ती संतांच नाव होत,आणि कुठल्या वेलेंटाईनच्या नावाने हा सण साजरा होतो याबद्दलही बरीच मतमतांतर आहेत.यापैकी सर्वात सुप्रसिद्ध कथा म्हणजे रोमन साम्राज्याने ख्रिस्ती सैनिकांचे लग्न लावण्याचा प्रमाद करणाऱ्या संत वेलेंटाईन बद्दल.

 

saint-valentine-marathipizza
youtube.com

 

त्याला १४ फ़ेब्रुवारी रोजी मृत्युदंड दिला गेला. तत्पुर्वी त्याने त्याने त्याच्य मुलीला एक कार्ड पाठवलं आणि त्यात शेवटी “तुझा वेलेंटाईन” असा उल्लेख केला. हे पहिले वेलेंटाईन कार्ड असे म्हणतात.

यांना रोम येथे जाळुन ठार मारण्यात आल, त्यानंतर त्यांच्या कन्येने त्या जागेवर आलमंड नावाचा वृक्ष लावला, जो प्रेम आणि मैत्रीचे प्रतिक मानला जातो.

आपल्याकडे हा उत्सव १९९२ च्या कालावधीत आला. नुकतेच जागतीकीकरणाचे वारे भारतात घुमु लागले होते आणि एम.व्ही. चॅनेल वगैरे मंडळींनी तरुणाईचे प्रतिनिधीत्व करणाऱ्या वाहिन्या असा प्रचार करुन याला हातभार लावला. १० रुपयाला एक याप्रमाणे प्रेम रस्त्यावर विकलं जाऊ लागलं.

याच विचारातून काहीतरी वेगळं तुमच्यासमोर या लेखातून सांगायचं प्रयत्न करत आहोत!

 

१. समाजावर प्रेम

ngo inmarathi
my one tenth ngo

 

ज्यांना प्रेमाचा अर्थ कोणी शिकवलाच नाही असे अनाथ, मुलांच्या फोनच्या प्रतीक्षेत असलेले वृद्धाश्रमातले लोक, बंद डोळ्याने जग पाहणारे अंध, रोज रस्ता झाडणारे कामगार यांना जर एखाद गुलाबाचं फूल दिलं तर ?

.
२. शाळा

rani inmarathi
Young Post

 

तुम्हाला ज्यांनी लिहायला, वाचायला शिकवलं असे शिक्षक, परीक्षेच्या वेळी पाणी आणून देणारे, रोज शेवटच्या तासाला ज्याची वाट पहायचो ती शेवटची घंटा वाजवणारे शिपाई/चपराशी, किंवा आजही शाळेसमोर हातगाडीवर चिंचा, कैऱ्या, गोळ्या विकणारे काका/आजी यांना भेटून नमस्कार केला तर ?

.
३. ‘तो’ मित्र

dch fight inmarathi
scriptors

 

ज्याच्या सोबत परीक्षेच्या एक दिवस आधी रात्र जागवली, लोकांची टिंगल करायला जो नेहमी सोबत असायचा, घरी येऊन जो हक्काने स्वयंपाकघरात घुसे आणि शहरातील प्रत्येक टपरीत ज्यांच्यासोबत चहा प्यायला, ज्याच्यासोबत फिरताना दिवस कमी पडे

असा तो मित्र जो काळाच्या ओघात दुराभिमाच्या प्रवाहात मागे फेकला गेलाय आणि ‘मीच का पहिला फोन करू?’, या प्रश्नामुळे जो आणखीन दुरावत चाललाय अशा एका जुन्या मित्रासोबत नवीन सिनेमा पाहिला तर ?

.
४. सख्खा शेजारी

neighbours-marathipizza

 

उन्हाळ्याच्या सुट्टीत ज्याच्या सोबत आंबे, बोर खाल्ली , झाडावर चढलो, मातीत लोळलो अन वाळूच्या ढिगाऱ्यात दबलो, रोज ज्यांच्यासोबत लगोरी, गोट्या, क्रिकेटचे डाव मांडले , आपलं ताट नेऊन त्याच्या घरी जेवलो, प्रत्येक सण ज्याच्यासोबत साजरा केला असा तो शेजारी आपण मोठे झाल्यापासून दिसेनासा झालाय ना?

मग अशा त्या शेजाऱ्याला कॉफी प्यायला नेला तर ?

.
५. मी, माय, मायसेल्फ

 

saif happy inmarathi
YouTube

 

शिक्षण, नोकरी, जबाबदारी, संसार यांच्या ओझ्याखाली दबून स्वतःची ओळख विसरलेला असा तो मी. हा प्रेमाचा दिवस मी स्वतःवर प्रेम करण्यात घालवला तर ?

कित्येक दिवस ज्या तळ्याकाठी एकट्याने बसलो नाही, काढलेल्या चित्रात रंग भरले नाहीत, अपूर्ण गाणं पूर्ण केलं नाही, दम लागेपर्यंत धावलो नाही का वेड्यासारखा नाचलो नाही , ते पुस्तक जे खणातून डोकावतंय, तो सिनेमा जो पाहा म्हणून खुणावतोय. मग आज मी माझ्या अपूर्ण इच्छा पूर्ण केल्या तर…?

प्रेम या शब्दाची वाढ आपणच खुंटवली आहे, प्रेम म्हणजे फक्त बायको किंवा प्रियकराबद्दल वाटणारी ओढ नव्हे, तर प्रेम म्हणजे आपल्याला आनंद देऊन गेलेला प्रत्येक क्षण!

व्हेलेंटाईन डे ला विरोध करण्यापेक्षा, गर्लफ्रेंड नाही म्हणून दुःखी होण्यापेक्षा किंवा दर वेळेप्रमाणे नवऱ्याबरोबर दिवस घालवण्यापेक्षा या १४ फेब्रुवारीला आपण असं काहीतरी अतिशय वेगळे करण्याचा प्रयत्न नक्कीच करू शकतो.!

(हे देखील वाचा: या व्हेलेंटाईन्स डे ला ‘तिला’ प्रपोज करताय? तर मग या टिप्स खास तुमच्यासाठी!)

===

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

One thought on “या ५ प्रकारे व्हॅलेंटाईन डे साजरा करून बघा, १००% आनंद मिळेल…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?