' केवळ ८ तासात आत्मसात होणारे हे स्किल्स तुमच्याकडे असतील तर तुम्ही प्रत्येक कामात यशस्वी व्हाल! – InMarathi

केवळ ८ तासात आत्मसात होणारे हे स्किल्स तुमच्याकडे असतील तर तुम्ही प्रत्येक कामात यशस्वी व्हाल!

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

आपण हाती घेतलेल्या कामात यश मिळावं असं कोणाला वाटत नाही?

 

winner inmarathi

 

 

सगळेजण यश मिळावं म्हणूनच काम सुरू करतात.

शाळा किंवा महाविद्यालयीन किंवा इतर स्पर्धा परीक्षा असो, कोणताही इंटरव्ह्यु असो. स्पर्धा असो, खेळासंदर्भात काहीही असो, कंपनीचा पहिला दिवस असो किंवा आयष्यातील कोणताही मोठा निर्णय असो, करिअर संदर्भात काहीही सुरवात करायची असो.

आपण यश मिळेल ह्या विश्वासानेच काम सुरू करतो आपण!

आपल्याला यश मिळावं म्हणून आपण खूप प्रयत्न करतो, अगदी पूर्वीपासूनच आपण आपल्या कोणत्याही कामाला सुरुवात करण्या आधी वडिलधार्यांच्या पाया पडतो, तेव्हा ते पण आपल्याला “यशस्वी भव!” असाच आशीर्वाद देतात.

 

narendra modi inmarathi

 

त्यामुळे आपल्याला काम करण्यास हुरूप येतो आणी यशस्वी होऊच असा आत्मविश्वास मिळतो आपल्याला!

त्यामुळे यश मिळवणे ह्या ध्येयानेच आपण कार्याला सुरुवात करतो, पण काही काही वेळा आपल्याला हवे तसे यश मिळतेच असे नाही किंवा अगदी यशाच्या जवळ पोचतो आणि ते हुलकावणी देतं आपल्याला!

मग आपण नाउमेद होतो.

पण आज आपण अशा काही गोष्टी बघणार आहोत, अशी काही कौशल्ये आत्मसात करण्यासाठी काय करायला हवे ते बघूया!

जगातली अनेक यशस्वी लोकं याच स्किल्सना श्रेय दिलं आहे.

 

ratan tata inmarathi 5
rvcj media

 

ही स्किल्स् आपल्याला आपल्या आयुष्यात पुढील अनेक वर्षे वापरता येतील आणि अजून १ महत्त्वाची गोष्ट म्हणजे ही स्किल्स् हजारो वर्षांपासून प्रचलित आहेत.

आपल्याला ही स्किल्स् आत्मसात करण्यासाठी जास्त वेळ जाणार नाही.

केवळ ८ तासात आपण ही कौशल्ये शिकू शकतो ज्यामुळे आपल्याला निश्चितच यश मिळेल.८ तास म्हणजे एक दिवसाचा वर्किंग टाइम!

चला तर मग, बघूया कोणती कौशल्ये आहेत ती, जी आपल्याला नक्कीच यशापर्यंत पोचवतील!

१) शिकण्याचे कौशल्य शिकून घेणे

आपण आपल्याला इतके तयार करायचे की, कोणतीही नवी गोष्ट शिकणे आपल्याला सहज जमले पाहिजे.

 

learn new things inmarathi
amen clinic

 

म्हणजेच आपल्या कामात आपल्याला नेहेमीच काही तरी नवीन शिकायला लागते.

ते शिकण्याचे कौशल्य आपल्यात हवे.

यश मिळवायचे तर नवीन गोष्टी शिकणे अत्यावश्यक असते. त्यामुळे शिकण्याचे कौशल्य शिकूनच घेतले पाहिजे.

२) लेखन

आपण आपले संवाद कौशल्य वाढविण्यासाठी, संप्रेषण कला सुधारण्यासाठी लेखन करणे अत्यावश्यक आहे.

 

writting inmarathi
grademiners

 

आपल्या मनात येणारे विचार, दिवसभरात काय केले ते रात्री लिहून काढणे (ज्यामुळे आपल्या चूका देखील समजतात आणि आपण त्या सुधारू शकतो) हा उत्तम उपाय आहे.

सुरवातीला कदाचित आपल्याला नीट लिहिता येणार नाही कदाचित, सुसंगतपणे लिहिता येणार नाही, कदाचित आपल्याला असंही वाटू शकतं की हे का करतोय आपण? पण साधारण २ ते ३ दिवसांनी आपल्या लिखाणाला दिशा मिळेल.

आपण लिहिणे थांबवू नये आपल्याला वाटेल. ह्या लिखाणामुळे आपण संवादात, समोरच्याशी कॉनव्हरसेशन करण्यात “एक्स्पेर्ट” होऊ, जे आपल्या यशस्वी होण्यात महत्त्वपूर्ण कामगिरी बजावते.

३) प्रकट भाषण

आपल्याला आपल्या आयुष्यात अनेकवेळा अशा संधी येतात, अशी वेळ येते की आपल्याला व्यासपीठावर बोलण्याची गरज असते.

आपण संकोची असाल तर आपल्याला व्यासपीठावर बोलण्याची नक्कीच भीती वाटेल, लाज वाटेल. पण तुम्ही एकदा बोलण्यास सुरुवात केली तर तुमची भीड नक्कीच चेपेल.

 

speech inmarathi

 

स्वतःहून पब्लिक समोर बोलण्याची संधी सोडू नका.

हेसुद्धा लेखनासारखेच आहे सुरुवातीला एक दोनदा संकोच वाटेल,

आपण आपले मित्र आपला परिवार ह्यांच्यासमोर आधी बोलण्याचा सराव करा, त्यांच्याकडून ‘फीडाबॅक’ घ्या, बोलण्यामध्ये ज्या चुका होतात त्या सुधारा, हळूहळू आपण न अडखळता, अस्खलितपणे बोलू शकतो.

 

raj thakray inmarathi
india today

 

आणि एकदा स्टेज डेअरिंग आलं की आपण अगदी साहजतेने आणि आत्मविश्वासाने व्यासपीठावर बोलू शकू.

४) ध्यानधारणा म्हणजेच मेडिटेशन

ध्यानधारणा करणे हे सगळ्यात मोठे आणि महत्त्वाचे कौशल्य आहे, ज्यामुळे आपण आपल्या मनात होणार्या गोंधळाला काही प्रमाणात रोखू शकतो.

सुरवातीला आपल्याला हे खूप कठिण जाईल. आपले मन एकाग्र होणार नाही, खूप विचार येतील मनात. एकाच वेळी अनेक विचार गर्दी करतील.

 

modi maditaion

 

आपण एकाच जागी असतो पण मन सगळी कडे फिरून येते. ह्यामध्ये श्वासावर नियंत्रण हीदेखील महत्त्वपूर्ण गोष्ट आहे.

पण जसजशी आपण ध्यानधारणा वाढवू तसतसे आपले मन एकाग्र होते आणि विचारांची गर्दी कमी होते. ह्यामुळे आपल्याला आपल्या आयुष्यात खूप फायदा होतो.

जेव्हा आपणा यशासाठी प्रयत्न करत असतो तेव्हा काही अशा घटना घडतात की आपले मन अशांत होते, आपण नकारात्मक विचार करण्यास सुरुवात करतो.

आपण जर नियमित ध्यानधारणा करत असू तर आपले मन शांत करण्यास आपल्याला मदत होते आणि नकारात्मक विचार आपल्या मनात नाही येऊ शकणार, ज्यामुळे आपण यशापर्यंत सहजतेने पोचू शकतो.

५) चांगल्या सवयी आत्मसात करणं

आपल्याला आपल्या घरातच चांगले काय, वाईट काय ह्याची शिकवण मिळालेली असते. पण ठराविक वयापर्यंतच ते सांगतात.

पण आपल्याला चांगल्या वाईटाची जाणीव असते. आपल्यासाठी कोणत्या सवयी चांगल्या आहेत हे आपल्याला नक्कीच माहित असते त्यामुळे यश मिळण्यासाठी चांगल्या सवयी आत्मसात करणे गरजेचे आहे.

आपल्याला आपल्या चुका सांगणारे असतात किंवा इतरांच्या चुकांतूनही आपण शिकू शकतो(त्या चूका आपण टाळायच्या).

 

Mistake inmarathi

 

इतरांच्या गुणांचे आपण निरिक्षण करून आपणही ते गुण आत्मसात करू शकतो.

६) वाटाघाटी

काही वेळा वादाची परिस्थिती उद्भवते. भांडणे होतील अशी काही वेळ येऊ शकते. अशा वेळी वाटाघाटी महत्त्वाचा उपाय आहे.

प्रत्येक वेळी विजय होईल असे नसते. काही काही परिस्थिती अशा असतात की ज्यामध्ये जर भांडण केले तर एखाद्याचाच विजय होईल आणि नुकसान होईल त्यामुळे वाटाघाटी केल्याने सगळंच नुकसान होत नाही आणि वेळ आल्यावर पुन्हा यश मिळवता येते.

 

shake hands inmarathi

 

(ही युक्ती छत्रपतींनी मिर्झा राजांबरोबर वापरली होती).

वाटाघाटी म्हणजेच योग्य त्या गोष्टींना “होय” किंवा “नाही” म्हणण्यास शिकणे, शक्यतो वादविवाद टाळता येतात.

७) तार्किक विचारसरणी

तार्किक विचारसरणी म्हणजेच आपण असा विचार करायला शिकणे ‘यत्र यत्र धूम्रः अस्ति तत्र तत्र अग्निः अस्ति’! विश्लेषणात्मक विचार करणे हा तर्कशुद्ध विचाराचा एक भाग आहे.

असा तर्कशुद्ध विचार करणे, हे कौशल्य आत्मसात करणे म्हणजे कोणत्याही परिस्थिती मध्ये अधिक योग्य निर्णय घेण्याची क्षमता वाढवणे. हे रचानात्मक कौशल्य आहे.

 

Money Management-inmarathi
care2.com

आपला व्यवसाय आपण अधिक कौशल्याने चालवू शकतो. आपण परफेक्ट मॅनेजर बनू शकतो. पैशांचे योग्य नियोजन करू शकतो.

८) समन्वय आणि लवचिकता (Co-ordination and Flexibility)

समन्वय हा आपल्या हालचालींचा, शरीराचा आणि मेंदूचा आहे.

आपण रोज सकाळी किंवा संध्याकाळी स्ट्रेंचिंग चा व्यायाम केला, योगासने केली तर हा समन्वय साधणे एकदम सोपे जाईल, जे यश मिळवण्यासाठी महत्त्वाचे आहे.

योगासने, स्ट्रेचिंग ह्यामुळे शरीरातील रक्ताभिसरण योग्य रितीने होते, रक्तप्रवाह सुरळित होतो ज्यामुळे आपले शारीरिक आरोग्य आणि त्याचबरोबर मानसिक आरोग्य देखील व्यवस्थित राहते. जे आपल्या कार्यासाठी अत्यावश्यक आणि महत्त्वाचे आहे.

 

yoga inmarathi
cosmoplitan india

 

ही कौशल्ये आपल्याला यशस्वी होण्यासाठी नक्कीच मदत करतात आणि ही तात्पुरती नाहित तर कायमस्वरूपी आहेत.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

 शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?