' धावपळीत खालावलेली तब्येत सुधारायची असेल, तर "हे" उपाय करण्यासाठी सध्याचा वेळ दवडु नका

धावपळीत खालावलेली तब्येत सुधारायची असेल, तर “हे” उपाय करण्यासाठी सध्याचा वेळ दवडु नका

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

===

कोरोनाच्या भितीने घरात अडकून पडल्यासारखं सगळ्यांनाच वाटतय.

हे सगळं का, कोणामुळे, कशासाठी, किती दिवस याबद्दल आता न बोललेच बरं.

 

home quarantine inmarathi
the federal

 

कारण, हे लॉकडाऊन देशासाठीच नव्हे तर संपुर्ण जगासाठी किती महत्वाचं आहे हे आता सगळ्यांनाच कळलंय.

लॉकडाऊननंतर देशभर अनलॉकची घोषणा करण्यात आली, मात्र कोरोनाचं संकट सातत्याने वाढत असल्याने अनेक शहरांमध्ये लॉकडाऊनची घोषणा करण्यात आली आहे.

मात्र आधीच आपलं शेड्युल आठवा बरं.

९ ते ५ च्या चौकटीत अडकलेलो.रोजच रुटीन काम करणारे वगैरे वगैरे.

 

office inmarathi
office space software

 

त्यात कॉर्पोरेट वाल्यांचं मार्च एन्ड.म्हणजे विचारायची सोय नाही. कामाचा ताण आहेच.त्यात वाढीव एक्स्ट्रा काम.फिजिकल आणि मेंटली फुल्ल बारा वाजलेत.

अशा स्थितीत तब्येत बिघडली असणार हे वेगळं सांगायला नको.

 

cold inmarathi

 

कोरोनामुळे घरी बसण्याची सक्ती करण्यात आली असली तरी वर्क फ्रॉम होमचं भूत मानगुटीवर आहेच.पण आपल्या ९ ते ५ च्या मानाने बरंच आहे,म्हणायला हरकत नाही.

तर,

या धावपळीत आपणच आपली घालवलेली तब्येत पुन्हा कशी बिल्ड करू,यावर लक्ष देता येईल का.?

का नाही.?

किंबहुना ही सुवर्णसंधी आहे, असं समजा.

अनेकांना फिटनेसची गरज असली, तरी कामाच्या गडबडीत फिटनेसाठी वेळ देता येत नाही, त्यातच काही सवयी बदलायच्या असल्या तरी त्यासाठीही वेळच नाही ही सबब दिली जाते.

मात्र आता वेळच वेळ आहे, मग या वेळाचा थोडीतरी वापर स्वतःसाठी करायला काय हरकत आहे.

तर बघूया कोणत्या मार्गाने आपण आपली बॉडी रिबिल्ड करू शकतो.

सकाळी न्याहारी घ्या आणि भरपेट घ्या.

ऑफिस ९ चं असल्यामुळे आणि टाईम पंकच्युअल असाल तर ट्रेन न चुकवण्यासाठी कधी कधी आपला न्याहारी म्हणजेच सकाळचा ब्रेकफास्ट हा राहून जातो.

 

working women inmarathi
buisness lines

 

किंवा घाई गडबडीत आपण भराभरा ते आटपत असतो ज्याची शरीराला काडीमात्र गरज नसते.

आता लॉक डाऊन मुळे ९ लाच लॅपटॉप खोलून काम करायला घ्या,अस काही बंधन तर नक्कीच नाही.

आणि डायटेशीयन म्हणजेच आहारतज्ञ सांगून थकले असतील की सकाळी न्याहारी ही व्यवस्थित घेत जा.

 

breakfast inmarathi

 

तर सकाळी मजबूत न्याहारी केली की दुपारच्या जेवणपर्यंत नको ते खाण्यासाठी आपण प्रवृत्त होत नाही.

सकाळी सकाळी आपली पाचक संस्था ही त्यांच्या पीक लेव्हल ला जाऊन काम करत असते.

भोजन संबंधित वेळापत्रक

वेळ आणि पैसा दोन्ही वाचवण्यासाठी उत्तम मार्ग.!

थोडा वेळ काढा आणि एक शेड्युल तयार करा.

 

diet plan inmarathi
holand and barret

 

तुम्हाला वजन कमी करायचा आहे की वाढवायचं आहे.?

त्यानुसार आहारात साखर,कार्ब्स,प्रोटिन्स किंवा व्हिटॅमिन यांचा समावेश असणार तुमचं वेळापत्रक तयार करा.

या टाईम टेबल नुसार स्वतः जेवण बनवा आणि त्याची मजा घ्या.

तुम्ही काय खाता आणि किती खाता हे तुम्हाला चं चांगलं माहीत असत त्यामुळे तुमच्याच या ‘गुड प्रॅक्टिस’ मुळे तुम्ही या वर देखरेख ठेवू शकता.

पाणी प्यायची क्षमता वाढवा

शरीर संबंधित अर्ध्या पेक्षा जास्त आजार हे पाण्याशीचं निगडित आहेत.

पाणी जास्त पिण्याच्या काही वाईट आऊटकम नाही पण पाणी कमी पिण्याचे भरपूर तोटे आहेत.

अपचन,डोके दुखी,किडनी स्टोन आणि यासारखे बरेच आजार.

accidity inmarathi

 

टाईप २ प्रकारचा मधुमेह,रक्त दाब सारख्या आजारांना पळवून लावण्यासाठी पाणी इज मस्ट.

तर, वजन वाढवणे आणि वजन घटवणे या दोघां साठी पाणी सतत पित राहणे हा उत्तम मार्ग आहे.

मेटाबोलिझम वाढविण्यासाठी पाण्याची शरीराला आवश्यकता असते.

 

water inmarathi

 

या लॉकडाऊन मध्ये जास्त पाणी कंज्युम करायची चांगली सवय लावून घ्या.

व्यायाम

चविष्ठ खात आहात पण ते शरीराला लागलं तर पाहिजे ना.?

फक्त खात राहिलात तर लठ्ठपण वाढेल.बाकी काही नाही.

 

belly fat inmarathi
livin3

 

जे खात आहात ते सुरळीत पचण्यासाठी थोडा व्यायाम करा.

अर्धा तास चालणे आणि ते सुद्धा आठवड्यातून फक्त पाच वेळा शरीराला भरपूर लाभदायक आहे.

आता या लॉक डाऊन मध्ये मैदानात किंवा गार्डन मध्ये तर जात येणार नाही.

तर स्वतःचीच गॅलरी किंवा टेरेस चा वापर आपण इथे करू शकतो.

हे नसेल जमत तर हृदय आणि फुफ्फुस यासाठी चे घरच्या घरी असलेले व्यायाम करा.

 

yoga
indira gandhi medical university

 

योगासने तर सर्वात उत्तम पर्याय.

काही काळासाठी ऑफ लाईन जा.

सारखे मेल चेक करत आहात? सारखे इंस्टा फेसबुक ट्विटर चं पेज रिफ्रेश करत आहात.?

तुमचे मित्र,जग,पर्यावरण यांचे सगळे अपडेट हे तुमच्या बोटाच्या एका क्लिक वर आहे.

पण खरंच तुमच्या मित्राने स्टोरी मध्ये टाकलेलं मीम लगेच बघणे गरजेचं आहे का?

 

online inmarathi

 

कोरोनाचे पेशंट कितीने वाढले बघायला इंटरनेट ची पेजेस सतत रिफ्रेश करत राहणे गरजेचे आहे का.?

यामुळे तुम्ही एका जागेवर बांधले जाता.

मोबाईल काही वेळा साठी लांब करा.आणि त्या वेळात पुस्तक वाचा,फिरायला जा,मित्रांना भेटा,आपला छंद जोपासा आणि आपल्या मनाला आलेली मरगळ झटका.

मनाचा संबंध हा थेट शरीराशी असतो.

 

deepika reading inmarathi
pinkvilla

 

टेक्नॉलॉजीशी थोडी फारकत आरोग्याला बर्यापैकी फायदा पोहोचवेल.

नवीन काही तरी शिका

नाही म्हटलं तरी या लॉक डाऊन च्या दिवसात तुमचा प्रवासाचा वेळ वाचतो.

लंच टाईम,टी ब्रेक तर काहींचा चाय सुट्टा ब्रेक याचा वेळ वाचत आहे.

कामाची वेळ सोडून इतर वेळेत नवीन काही तरी शिका.

नेटफ्लिक्स, अमेझॉन प्राईम आहे तिथेच राहणार आहेत, त्यावरचे शोज कुठे जाणार नाहीत.

 

alone at home inmarathi
student union sports

 

तरुण वयात हे करू ते करू ठरवलेलं पूर्ण करण्यासाठी आता उत्तम वेळ आहे.

स्वतःचं जेवण स्वतः बनवून आपल्या किचन स्किल्स ला डेव्हलप करा.

जावा,पायथन,सी सारख्या दुनियभरच्या टेक्निकल लँग्वेज येतात.पण बोलीभाषेच्या किती लँग्वेज येतात?

शिका एखादी नवीन भाषा.आपल्या मराठी भाषेचेच असंख्य स्थानिक प्रकार आहेत.त्यातला गोडवा अनुभवा.

कॉलेज मध्ये मुलगी पटावी म्हणून गिटार/पियानो शिकायचे स्वप्न बऱ्याच तरुणांनी पाहिलेलं असत. घ्या शिकून!

 

 

आताच वेळ आहे.एवढा वेळ आहे की लेव्हल २ तरी नक्की पूर्ण करू शकाल.

आयुष्यात नावीन्य मानसिक आणि शारीरिक वाढी साठी उत्तम पर्याय आहे.

धूम्रपान टाळा

 

smoking and corona inmarathi
the sun

 

सुदृढ आरोग्याच्या दिशेने सर्वात मोठं पाऊल.

हा साधी आणि सरळ गोष्ट नाही.पण ट्राय करायला काय हरकत आहे?

कोणतीही चांगली गोष्ट लावून घ्यायला आणि वाईट गोष्ट सोडवण्यासाठी २१ दिवस पुरेसे आहेत.

सिगरेट नंतर तुमचा खालावलेला रक्तदाब आणि हृदयाचे ठोके पूर्ववत झाले की तुमच्या आरोग्याची गाडी रुळावर यायला जास्त वेळ नाही लागणार.

पुरेशी आणि मुबलक झोप

कामाचा लोड बहुतांश कमी आहे. नवीन वेब सिरीज,मुव्हीच्या नादात रात्र जागून काढणे नवीन नाही.

त्यापेक्षा रात्रीची झोप घेऊन आपल्या शरीराची झालेली झीज आताच्या या काळात भरून काढणे शहाणपणाचे ठरेल.

 

sleeping-direction InMarathi

 

सुट्ट्या आहेत तर ७ ते ९ तास झोपायचा प्रयत्न करा.

दिवसा नव्हे! रात्री!

ध्यान करा

शरीराला तसेच मनाला स्वस्थ,सुदृढ आणि सक्षम बनवण्याचा सर्वात उत्तम,सोयीस्कर आणि कुशल मार्ग.!

 

jaqueline-yoga-inmarathi
pinterest.co.uk

 

मन जेवढं मजबूत राहील तेवढं तुमचं शरीर सुदृढ होईल.

रोजच्या दगदगीत आपणास एकचित्त शांत बसण्यास कधीच वेळ मिळत नाही.

आता आजमावून बघायला काहीच हरकत नाही.

मेंदू ध्यान साधने मुळे विकसित होतो.आपल्या भावना,आपल्या आठवणी,आपल्या शिकवणी यांच्याशी रिलेट करणारा मेंदूचा भाग हा ध्यान धारणेमुळे डेव्हलप होत असतो.

जर मन आणि बुध्दी पॉझिटिव्ह राहिली तर आरोग्य आणि त्यासोबत आपलं शरीर सुद्धा पॉझिटिव्ह राहून त्यानुसार डेव्हलप होत जातं.

 

family help inmarathi

 

तर,

२१ दिवसांसाठी असलेलं हे लॉक डाऊन नक्कीच अजून काही दिवस वाढण्याची शक्यताही नकारता येत नाही.

तो वाढु नये हीच आपल्या सगळ्यांची इच्छा आहे,

पण जोपर्यंत घरी रिकामा वेळ आहे तोपर्यंत आपलं आरोग्य,आपली मेंटलिटी स्थिर आणि मजबूत करण्यास काहीच हरकत नसावी!

===

महत्वाची सूचना: सदर लेखातील माहिती, विविध तज्ज्ञांच्या अभ्यास व मतांनुसार तसेच सर्वसामान्य मनुष्याच्या आरोग्यास अनुसरून देण्यात आलेली आहे. ही माहिती देण्यामागे, या विषयाची प्राथमिक ओळख होणे हा उद्देश आहे. वाचकांनी कोणताही निर्णय घेण्याआधी, आपल्या आरोग्याला अनुसरून, डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.

===

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?