' कोरोनाला घाबरण्यापेक्षा रोगप्रतिकारक शक्ति वाढवण्यासाठी “आयुष मंत्रालयाने” सांगितलेल्या या टिप्स फॉलो करा – InMarathi

कोरोनाला घाबरण्यापेक्षा रोगप्रतिकारक शक्ति वाढवण्यासाठी “आयुष मंत्रालयाने” सांगितलेल्या या टिप्स फॉलो करा

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम |

===

कोरोनाला अटकाव करण्यासाठी लॉकडाऊनचा पर्याय स्विकारत शासनाने कठोर पावले उचलली,

त्यासह पंतप्रधान नरेंद्र मोदींनी वारंवार आयुष मंत्रालयाच्या सूचनांचे पालन करण्याची सूचनासुद्धा केली. यामुळे अनेकांना प्रश्न पडला आहे की आयुष मंत्रालयाच्या सूचना नेमक्या आहेत तरी काय.

 

PM modi inmarathi
livemint

 

याबद्दल सविस्तर माहिती या लेखाच्या माध्यमातून मांडत आहोत. आयुष मंत्रालयाने रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी काही उपाय सुचवले आहेत.

यासाठी तज्ञ मंडळींची मदत घेण्यात आली होती. हे उपाय भारतातील १६ मोठ्या वैद्यांच्या मदतीने तयार करण्यात आले आहे.

कोरोनाबाधितांची संख्या वेगाने वाढत असताना, हे काही आयुर्वेदिक उपाय आहेत, जे मानवी शरीराची रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी फायदेशीर ठरु शकतात.

हे उपाय म्हणजे कोरोनावरील इलाज नाही तर शरीर सुदृढ ठेवण्यासाठी घरगुती उपाय आहेत. घरच्या घरी अगदी सोप्या पद्धतीने हे उपाय केले जाऊ शकतात. पाहूया काय आहेत

 

१. गरम पाणी प्या :

गरम पाणी आपल्या शरीराला गुणकारी आहे.सकाळी उठल्यावर उपाशीपोटी गरम पाणी प्यायल्याने शरीरातील विषारी घटक बाहेर टाकण्यास मदत होते आणि चेहरयाची चमक वाढते.

 

drinking warm water inmarathi

 

शरीरातील रोगप्रतिकार शक्ती वाढवण्यासाठी गरम पाण्यासोबत लिंबू व मध घ्यायला हवा. त्याचबरोबर वजन कमी करण्यासाठीही हा उपाय फायदेशीर आहे.

पाण्यामध्ये कॅलरी नसतात. याशिवाय सकाळी पाणी प्यायल्याने शरीरातील टॉक्सिन बाहेर पडतात. त्यामुळे चयापचय किया वाढते जे कॅलरी बर्न करण्यास उपयुक्त ठरतात.

यामुळे गरम पाणी पिणे फायदेशीर आहे!

 

२. योगासनांचा अभ्यास :

दररोज योगासने आणि व्यायाम केल्याने त्याचा फायदा शरीराला होतो. दररोज योगासने केल्याने रोगप्रतिकार शक्ती वाढते.त्याचबरोबर प्राणायामाने श्वसनाचे विकार दूर होतात.

 

yoga inmarathi
knot9

 

त्यामुळे दररोज ३० मिनिटे योगासन , प्राणायाम आणि व्यायाम करण्याचा सल्ला आयुष मंत्रालयाकडून देण्यात आला आहे.

योगासनांनी शरीर सुदृढ राहण्यास मदत होते त्यामुळे योगासने फायदेशीर ठरतात.

३. हळद, जिरे, लसूण आणि धण्याचा आहारात समावेश :

या मसाल्यांचा वापर केल्याने तुमची रोगप्रतिकार शक्ती वाढू शकते. याचबरोबर अनेक रोगांवर गुणकारी असणारे हे पदार्थ आहेत.

त्यामुळे रोजच्या आहारात या पदार्थांचा समावेश केल्याने निरोगी राहण्यास मदत होईल.

 

४. दररोज सकाळी एक चमचा किंवा १० ग्रॅम च्यवनप्राश खावं :

 

chywanprash inmarathi
wikipedia

 

आयुर्वेदिक घटकांचा वापर करून हे च्यवनप्राश तयार केलेले असते. त्यामुळे प्रकृतीसाठी हे उत्तम मानले जाते. याचबरोबर मधुमेहींसाठीसुद्धा आयुष मंत्रालयाने सूचना केल्या आहेत.

मधुमेहींनी सुगर फ्री च्यवनप्राश खावे , याचबरोबर हरबल टी प्यावा असा सल्लाही देण्यात आला आहे.

 

५. तुळस, दालचिनी, काळीमिरी, सुंठ, गूळ, लिंबू रसाचा काढा:

या पदार्थांचे औषधी गुणधर्म आयुर्वेदात नमूद केलेले आहेत. त्यामुळे या पदार्थांनी रोगप्रतिकार शक्ती तर वाढतेच त्याचबरोबर सर्दी , खोकला यांवर हा काढा गुणकारी आहे.

त्यामुळे याचे नियमित सेवन करण्याचा सल्ला सर्व जण देतात.

६. दिवसात एक-दोनवेळा हळद – दूध :

असा सल्ला आयुषतर्फे देण्यात आलेला आहे. हळदीमध्ये औषधी गुणधर्म असतात, त्याचबरोबर दुधामध्ये हळद घातल्याने त्याचा फायदा शरीराला होतो.

 

haldi doodh inmarathi

 

शरीराचा कोणताही भाग जर दुखत असेल तर हळदीचं दूध प्यायल्याने आराम मिळतो.हळद युक्त दूध घेतल्यामुळे पचनासंबंधी ज्या काही तक्रारी असतील तर त्या दूर होतात.

तसेच सर्दी किंवा कफ यासारख्या विकारांवर हळदीयुक्त दूध अधिक फायदेशीर ठरतं. गरम दूध प्यायल्याने कफ निघून जातो.त्यामुळे हा सल्ला मोलाचा ठरतो.

 

७. नाकात तीळाचं तेल किंवा खोबरेल तेल आणि तूप लावावं :

याला नस्य असे म्हणतात. नस्य केल्याने मेंदूला शक्ती मिळते.

डोकेदुखी, खांदेदुखी, केस गळणे किंवा पांढरे होणे, दोन नाकपुड्यांमधील पडदा (Nasal septum) एका कडेला सरकणे, दमा, जुनाट सर्दी, जुनाट खोकला

यांसारख्या विकारांमध्ये, तसेच मानेच्या वरच्या भागाच्या आरोग्यासाठी प्रतिदिन नस्य करणे लाभदायक आहे.

 

 

tilache tel inmarathi
NDTV food

 

८. एक चमचा तिळाचं किंवा खोबरेल तेल, दोन ते तीन मिनिटं तोंडात ठेवा आणि नंतर थुंका :

यानंतर दर पाण्याने गुळण्या करा. ही क्रिया दिवसातून एक-दोनवेळा करा. यामुळे सर्दी किंवा खोकल्याचा धोका दूर होतो. त्याचबरोबर आरोग्यासाठी हे लाभदायक आहे.

त्यामुळे आयुषद्वारे ही सूचना करण्यात आली आहे.

९. खोकला किंवा घसादुखी झाल्यास पुदिन्याची पाणी किंवा ओव्याच्या पाण्याची वाफ घ्यावी.वाफ घेतल्याने तुम्हाला त्वरित आराम मिळतो आणि खोकला बरा होण्यास मदत होते.

 

steaming inmarathi
organic authority

१० खोकला किंवा घशात खवखव झाल्यास लवंगाची पावडर मध किंवा साखरेसोबत दोन ते तीन वेळा खावी.

मधातील वैद्यकिय गुणधर्माचा फायदा होऊन तुम्हाला त्वरित आराम मिळू शकतो.

 

११. खोकला किंवा घसादुखी तसंच खवखव कायम राहिली तर तातडीने डॉक्टरांना दाखवा.

या सर्व सल्ल्यांचे पालन करून आपले आरोग्य सुरक्षित ठेवण्यासाठी मदत होऊ शकते. सध्याच्या घडीला कोरोनापासून सुरक्षित राहण्यासाठी या नियमांचे पालन करण्याची आवश्यकता आहे.

त्यामुळे सर्वांनी या नियमांचे पालन केले पाहिजे. रोगप्रतिकारशक्ती उत्तम असेल तर कोरोना विषाणूचा त्रास होणार नाही,

शिवाय इतरही शरीराच्या तक्रारी जाणवणार नाहीत. त्यामुळे सुदृढ आरोग्यासाठी आपण या सूचनांचे पालन करूया!

===

सदर लेखातील माहिती, विविध तज्ज्ञांच्या अभ्यास व मतांनुसार तसेच सर्वसामान्य मनुष्याच्या आरोग्यास अनुसरून देण्यात आलेली आहे. ही माहिती देण्यामागे, या विषयाची प्राथमिक ओळख होणे हा उद्देश आहे. InMarathi.com च्या वाचकांनी कोणताही निर्णय घेण्याआधी, आपल्या आरोग्याला अनुसरून ,डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.

===

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?