' अॅपलचे iphones - विक्री आणि नफ्याचं डोकं चक्रावून सोडणारं गणित

अॅपलचे iphones – विक्री आणि नफ्याचं डोकं चक्रावून सोडणारं गणित

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

प्रत्येक इंडस्ट्रीचं, वर्षानुवर्षांनंतर एक गणित बसतं. त्या क्षेत्रात एक कुणीतरी “मार्केट लीडर” असतो. इतर अनेक स्पर्धक असतात, जे लीडर होण्याचा प्रयत्न करत असतात. त्या व्यावसायिक प्रकारात नव्या उद्योगांना येणं सोपं असेल तर असे नव्याने सामील होणारे नवनवे ब्रॅण्ड्स असतात… असं ह्या सर्वांचं मिळून त्या त्या इंडस्ट्रीचं चित्र उभं रहातं. व्हिजनरी फाऊंडर स्टीव्ह जॉब्ज आणि त्यांच्या जोडीला अत्यंत हुशार कोडर – स्टीव्ह वॉझनियाक – ह्यांच्या मेहनतीचं अॅपल हे फळ…मोबाईल, विशेषतः स्मार्ट फोन्स, च्या जगात गेल्या कित्येक वर्षांपासून मार्केट लीडर आहे.

steve-jobs-steve wozniak marathipizza

गुगलने अँड्रॉइड ऑपरेटिंग सिस्टीम आणून अॅपलच्या मक्तेदारीला धक्का देण्याचा जोरदार प्रयत्न केला आहे. जो – बऱ्यापैकी यशस्वी झालाय हे स्मार्ट फोन्स च्या विविध प्रकार, ब्रॅण्ड्स कडे बघून दिसतच आहे. पण गंमत ही आहे की – एकीकडे हे बदलतं चित्र दिसत असलं तरी अॅपलच्या विक्री आणि नफ्याचे आकडे अचंभित करणारे आहेत. प्रसिद्ध झालेल्या एका सर्वेक्षणानुसार जे दिसतंय ते आश्चर्यकारक आहे.

पुढील वाक्य – परत परत वाचा –

ऑक्टोबर २०१६ ते डिसेम्बर २०१६ ह्या ३ महिन्यात –

जगातील एकूण स्मार्टफोन्स विक्री मध्ये अॅपलचा वाटा होता – १७.६% — पण —

स्मार्टफोन कंपनीज ने कमावलेल्या एकूण प्रॉफिट मध्ये – अॅपलचा वाटा — ९२% होता !

चक्रावणारं गणित आहे ना हे!

थोडं सोपं करून सांगतो.

गृहीत धरा जगात १००० स्मार्टफोन्स विकले गेले. अभ्यासानुसार – ह्या १००० स्मार्टफोन्समध्ये १७६ फोन्स हे अॅपलचे i phone होते.

आता गृहीत धरूया की ज्या कुठल्या कंपनीज ने ह्या १००० पैकी काही फोन्स विकले…म्हणजे ह्यात सॅमसंग, मायक्रोमॅक्स…सर्व आले…त्या सर्व कंपनीजचा, ह्या विक्रीतून झालेला एकूण नफा होता १,००,००० रूपये. तर – अभ्यासानुसार, ह्या एक लाख मध्ये, ९२,००० रूपये नफा एकट्या अॅपलच्या खिश्यात गेलाय…!

मार्केट शेअर फक्त १७.६ % – पण नफा मात्र तब्ब्ल ९२%…!

अॅपलचे CEO, टीम कूक – ह्या अश्या मूड मध्ये असणार आहेत —

Tim Cook Apple CEO marathipizza

स्रोत

ह्या आकड्यांमागे, उभं आहे, सहाजिकच – पर युनिट घसघशीत प्रॉफिट…!

आपण सर्व हे जाणतोच की अॅपलचे फोन्स भयंकर महाग असतात. अर्थात – ते महाग असतात – कारण अॅपलचा ब्रँड आणि फोन्सची क्वालिटी! गम्मत ही, की क्वालिटी कायम ठेवण्यासाठी जेवढी किंमत अॅपल कम्पनी मोजते, त्याहून कितीतरी अधिक रक्कम, ग्राहकांकडून वसूल करते. सॅमसंग आणि अॅपलच्या किंमतींची तुलना केल्यावर हे चटकन लक्षात येईल.

सॅमसंगचा एक फोन, सरासरी १८२ डॉलर्स (म्हणजे, १० – ११,००० रूपये) मध्ये विकला जातो. पण अॅपलचा स्मार्टफोन सरासरी ६९५ डॉलर्स – म्हणजे ५०,००० रूपयांच्या घरात जातो. सहाजिक आहे की i phone तयार करण्यासाठी सॅमसंगच्या पाचपट रक्कम लागत नाही! म्हणूनच नफा कित्येकपट वाढतो आणि मग असे चक्रावणारे आकडे दिसतात…!

उद्योजकांनी ह्यातून शिकायला हवं –

वास्तूचा दर्जा उत्तम ठेवा…स्वतःच्या ब्रँड ला विश्वास मिळवून द्या आणि प्रीमियम नफा कमवा…!

अर्थात, अॅपल हे सर्व करत आहेत कारण स्टीव्ह जॉब्ज ने रचलेला भक्कम पाया.

बिझनेस कसा चालवायचा – हे स्टीव्ह जॉब्ज सारख्या कुणाकडून तरी शिकायला हवं. अश्यांनी त्यांच्या धंद्याचा पाया कसा रचला, त्यांच्या ब्रॅण्डची ओळख “हे प्रोडक्ट म्हणजे नेमकं काय” म्हणून निर्माण केली ह्यावरून त्यांच्या यशाची सिक्रेट्स कळतात…आणि त्यातूनच आपण शिकत जातो…यशस्वी होतो…!

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

 शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Omkar Dabhadkar

Editor @ इनमराठी.कॉम

omkar has 171 posts and counting.See all posts by omkar

3 thoughts on “अॅपलचे iphones – विक्री आणि नफ्याचं डोकं चक्रावून सोडणारं गणित

 • April 4, 2017 at 7:52 pm
  Permalink

  १. एकेका वस्तूमागे नफा कमी ठेवा आणि भरपूर वस्तू विका. (चिनी माल? )
  किंवा
  २. एकेका वस्तूमागे प्रिमियम नफा कमवा. त्यासाठी स्वतःचा ब्रँड लोकप्रिय, विश्वासार्ह करा. इतरांच्या तुलनेने कमी वस्तू विका. (आयफोन.)
  वस्तू आणि सेवेनुसार ह्यातला एक पर्याय निवडायचा असतो का?
  इलर्निंगच्या सुविधा पुरवणे ह्याबाबत कोणता पर्याय योग्य आहे? आयफोनवाला?

  Reply
  • April 5, 2017 at 12:34 pm
   Permalink

   इ लर्निंग साठी सुरुवातीला फ्री कोर्सेस – मग स्वस्तातील पेड कोर्स आणि मग एकदा लोकांचा विश्वास संपादन झाल्यावर काही एक्सकॅलूजीव प्रीमियम कोर्स – असं करावं. सुरुवातीला फ्री कोर्स देणं आवश्यक आहे कारण अजून हे मार्केट सशक्त नाही. लोकांना आधी चाचपडून बघण्यासाठी प्रोत्साहन द्यावं लागेल.

   Reply
 • September 13, 2017 at 10:57 am
  Permalink

  मस्त मस्त माहिती अपल्याकडून मिळत असते ..अशी की अनेकांना माहित सुधा नसते
  अजुन अजुन नवीन माहिती देत रहा

  Reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?