'या 'फुटबॉल' मॅच मुळे इटली आणि स्पेन मध्ये सुरू झालेलं 'कोरोनाचं तांडव' अजूनही चालूच आहे!

या ‘फुटबॉल’ मॅच मुळे इटली आणि स्पेन मध्ये सुरू झालेलं ‘कोरोनाचं तांडव’ अजूनही चालूच आहे!

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम |

===

इटली आणि स्पेन या दोन देशांमध्ये सध्या कोरोनाचं संकट अतिप्रचंड आहे. इटलीने तर चीनलाही मागे सोडलं आहे. संपूर्ण इटलीला या संकटाचा सामना करावा लागत आहे.

पण या सगळ्याची सुरुवात झाली कुठून…. एका फुटबॉल मॅचचं कारण ठरलं आणि इटली आणि स्पेन या महाभयंकर संकटाचा भाग झाले.

फुटबॉलच्या मॅचचा आनंद घेत असताना त्यांना या संकटाची कल्पनासुद्धा नसेल पण पुढे जे झालं ते आज जगासमोर आहे.

 

corona football match inmarathi

 

इटली आणि स्पेन फुटबॉल प्रेमी देश. त्यांच्याकडे फुटबॉल मॅच म्हटलं की हाऊसफुल प्रतिसाद हे ठरलेलं समीकरण. गेम झिरोबद्दलही अशीच उत्सुकता इटलीमध्ये होती.

मिलानचं सॅन सिरो स्टेडियम म्हणजे इटालियन फुटबॉलची पंढरी. १९ फेब्रुवारीला या स्टेडिअममध्ये मॅचचे आयोजन करण्यात आले होते.

खरं तर या सामन्याचे आयोजन बरगामो येथेच होणार होते मात्र तेथील स्टेडियमची आसनक्षमता कमी असल्याने मिलान येथे आयोजन करण्यात आले.

त्यामुळे बरगामोमधून हजारो प्रेक्षक या सामन्याला उपस्थित होते.

१९ फेब्रुवारीच्या त्या रात्री इटालियन फुटबॉल रसिक या मैदानात एकत्र झाले होते. निमित्त होतं चॅम्पियन्स लीगमधल्या अटलांटा आणि व्हॅलेन्सिया सामन्याचं.

या मॅचच्या आधी इटलीमध्ये कोरोनाचे संकट आले नव्हते. त्यामुळे त्याबाबत कोणी विचारही केला नव्हता. मात्र या मॅचमध्ये झालेल्या गर्दीमुळे संपूर्ण देशात कोरोनाचा फैलाव झाल्याचे बोलले जात आहे.

 

atlanta valencia inmarathi
new york post

 

सामन्यानंतर दुसऱ्याच दिवशी इटलीमध्ये पेशंट्स दिसून येऊ लागले आणि ही संख्या झपाट्याने वाढत गेली.

त्यामुळे ही मॅचच याला कारणीभुत असल्याची शक्यता अनेकांना खरी वाटत आहे. बरगामो मधील अभ्यासक आणि डॉक्टरांनी या सामन्याला आणि त्यातील प्रेक्षकांना जैविक बॉम्बची उपमा दिली आहे.

सध्या कोरोना इटलीसाठी सर्वात संहारक ठरतोय. मृत्युमुखी पावलेल्यांची आणि कोरोनाची लागण झालेल्या लोकांची संख्या रोज वाढतेय. याच कारण ठरतेय फुटबॉलची एक मॅच.

 

italy lockdown inmarathi
metro

 

भारतात ज्याप्रकारे क्रिकेट लोकप्रिय आहे त्याप्रकारे इटलीमध्ये फुटबॉलचे चाहते आहेत.

युनियन ऑफ युरोपियन फुटबॉल असोसिएशनच्या युएफाच्या चॅंम्पियन्स लीगमधला अटलांटा आणि लेव्हॅन्सिया क्लब्समधला सामना १९ फेब्रुवारीच्या रात्री मिलानच्या सॅन सिरो स्टेडियमवर खेळवण्यात आला.

त्यापैकी अटलांटा हा इटलीतल्या ‘सिरी ए’ लीगमधला नामवंत क्लब, तर व्हॅलेन्सिया हा स्पेनमधल्या ‘ला लीगा’ त खेळणारा तगडा क्लब.

हे दोघे समोरासमोर असल्याने या सामन्याची उत्कंठा अनेकांना होती. सामन्याच्या आधीच सर्व तिकिटे विक्री झाली होती आणि हाऊसफुल सामना होता .

अटलांटा आणि व्हॅलेन्सिया क्लब्समधला सामना पाहण्यासाठी सॅन सिरो स्टेडियमवर तब्बल ४५  हजार ७९२ फुटबॉल रसिकांची गर्दी उसळली होती.

शिवाय व्हॅलेंसियाचे प्रेक्षकही येथे उपस्थित होते.अटलांटा हा क्लब बरगामो शहराचा.

 

game zero inmarathi
RT.com

 

त्यामुळे या बरगामो शहरातून हा सामना पाहण्यासाठी ४० हजार फुटबॉलप्रेमी रसिक जमल्याचे सांगण्यात येते.

खाजगी कार, बस आणि ट्रेन या मिळेल त्या वाहनानं गर्दीमध्ये प्रवास करून रसिक सामान्यांना आले आणि त्यातूनच बरगामो शहर कोरोनाचे इटलीतील सत्ताकेंद्र बनले.

केवळ स्टेडियमच नाही तर पब्स, रेस्टॉरंट्स आणि स्टेडियमबाहेर गर्दी करून हा सामना प्रेक्षकांनी अनुभवला.

फुटबॉलच्या मैदानातली लढाई अटलांटानं ४-१ अशी सहज जिंकली. मात्र या सामन्यामुळे इटलीमध्ये कोरोनाचा शिरकाव झाला. याआधी इटलीमध्ये कोरोनाचे रुग्ण आढळले नव्हते.

मात्र या मॅचमुळे कोरोनाचा शिरकाव झाला आणि एवढी लोक उपस्थित असल्याने झपाट्याने कोरोना इटलीमध्ये पसरला.

म्हणूनच अटलांटा-व्हॅलेन्सिया सामन्याचा उल्लेख आता ‘गेम झीरो’ म्हणूनच होतो.

 

game zero corona inmarathu
the indian express

 

बरगामो शहरातील चाहत्यांनी घरचा सामना असल्याने या सामन्याला गर्दी केली.  मात्र आपल्या पुढे काय वाढून ठेवलंय याची फेब्रुवारीच्या मध्यावरही नेमकी कल्पना आली नव्हती.

त्यावेळी आयोजक तसेच इटलीच्या राज्यकर्त्यांना कोरोनाबद्दल अंदाज नव्हता. त्यामुळे अटलांटा-व्हॅलेन्सिया संघांमधला सामना रद्द करणं शक्यच नव्हतं.

कोरोनाच्या विषाणूनं जानेवारी महिन्यातच युरोपात शिरकाव केला होता , मात्र इटलीमध्ये त्याचा शिरकाव नसल्याने हा सामना पार पडेल असा निर्णय घेण्यात आला होता.

मात्र हा सामना पार पडला आणि इटली आणि खासकरून बरगामो शहरात झपाट्याने कोरोना पसरला.

या सामन्यांमध्ये प्रेक्षकांमध्ये कोरोना झालेल्या काही जणांचा सहभाग होता आणि त्यांच्यामुळे हा विषाणू इतर लोकांकडे झपाट्याने पसरला.

इतकंच नाही तर सहभागी संघातील ४० % खेळाडूंना आणि सपोर्ट स्टाफलासुद्धा कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले त्यामुळे एकंदरच सर्वांसाठी हा एक मोठा धक्का आहे.

 

atlanta team inmarathi
the times of israel

 

याबद्दल लोकांना कल्पना नसल्याने अधिक दुर्लक्ष झाले आणि कोरोनाचा प्रसार अधिक होत गेला.या सामन्याला आलेले प्रेक्षक सार्वजनिक वाहनांनी आपापल्या घरी परतली.

त्यामुळे या माध्यमातून विषाणूचे संक्रमण अधिक झाले.आणि मग त्यातूनच इटलीत अखेर हाहाकार उडाला.

इटलीचा फुटबॉल हा आवडता खेळ मात्र एकंदरच हा एक सामना देशातल्या नागरिकांच्या जीवावर बेतलाय असं चित्र आहे.

इटलीमध्ये जवळपास आत्तापर्यंत १०००० जणांचा या विषाणूमुळे बळी गेला असून ८०,००० पेक्षा जास्त रुग्ण सध्या उपचार घेत आहेत.

याच दूरगामी परिणाम इटलीच्या व्यवस्थेवर होत आहेत. इटलीतील सर्वच रुग्णालये भरलेली असल्याने नवीन पेशंटची व्यवस्था करतानासुद्धा अडचणी येत आहेत.

त्यामुळे एकंदरच इटलीसाठी कठीण वेळ असून याला एक फुटबॉल सामना कारणीभूत ठरला आहे.

===

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?