' महाभारतात अनेक चमत्कार झालेत, पण मग चमत्कारांनी धृतराष्ट्रचं अंधत्व का नाही गेलं? – InMarathi

महाभारतात अनेक चमत्कार झालेत, पण मग चमत्कारांनी धृतराष्ट्रचं अंधत्व का नाही गेलं?

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

===

महाभारतात कित्येक चमत्कार झालेत, पण मग धृतराष्ट्रचं अंधत्व दूर का नाही केलं गेलं चमत्कारांनी? असा प्रश्न आपल्याला पडू शकतो, पण याचं उत्तर महाभारतातच आपल्याला सापडू शकतं.याचं उत्तर हिंदू तत्वज्ञानाचं रुप दाखवतं.

आपला मोठा मुलगा कृष्ण द्वैपायन याला बोलावून त्याच्यापासून विचित्रवीर्याच्या बायकांना गर्भ राहावा आणि कुरुकुळाला वारस मिळावा असा निर्णय सत्यवतीने घेतला.

त्यातूनच पुढे महाभारत घडत गेलं. धृतराष्ट्राची कहाणी हा त्यातलाच एक परिपाक आहे.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

दीर्घतमसची कथा –

दीर्घतमस हा उतथ्य आणि ममता यांचा मुलगा होता आणि देवांचा अधिग्रहक बृहस्पतीचा पुतण्या होता. तो जेव्हा आईच्या गर्भात होता, तेव्हा त्याच्या काकाने तिच्यावर बलात्कार करण्याचा प्रयत्न केला होता.

तेव्हा दीर्घतमसने आईच्या गर्भातूनच आपल्या काकाच्या तोंडावर लाथ मारण्याचा प्रयत्न केला होता. तेव्हा काकाने चिडून त्याला अंध होण्याचा शाप दिला होता.

दीर्घतमसचा अर्थच मुळी दीर्घकाळचा अंधार असा होतो.

पुढे दीर्घतमसने वेदाध्ययन करून त्यात प्राविण्य मिळवलं परंतु त्याने अपारंपरिक पद्धतीने केलेल्या तपश्चर्येमुळे त्याला त्याच्या कुळातल्या लोकांनी वाळीत टाकले.

एकदा त्याच्या बायकोने त्याला नाकारल्यामुळे रागावून त्याने समस्त स्त्रीजातीला पतीच्या गुलामीचा शाप दिला आणि लग्न न करता अविवाहीत राहणाऱ्या स्त्रियांना बदनामीचा शाप दिला.

एकदा त्याच्या क्रूर मुलाने त्याला एका तराफ्याला बांधून गंगेत ढकलून दिले. तेव्हा त्याला एका राजाने वाचवले आणि त्याला विनंती केली की त्याने आपल्या राणीशी संग करून आपल्याला एक वारस द्यावा.

परंतु राजाच्या राणीला तो आवडला नाही. तिने त्याच्या शय्यागृहात आपल्याऐवजी आपल्या दासींना पाठवून दिले. त्या दासीला त्याच्यापासून झालेली मुलं ही त्याच्याप्रमाणेच वृद्ध, अशक्त आणि आंधळी झाली होती.

अशारीतीने हा माणूस त्याचा काहीही दोष नसताना आंधळा होतो आणि लोकांचा छळ सहन करत राहतो. या छळाच्या बदल्यात तो देखील इतरांचा छळ करतो, त्यांना शाप देतो.

परंतु तो जगात एक हुशार आणि शहाणा माणूस म्हणूनच ओळखला जातो.

 

mahabharat inmarathi 1

 

धृतराष्ट्राची कथाही दीर्घतमसपेक्षा फारशी वेगळी नाही. त्याच्या आईला खरंतर भीष्म किंवा त्याच्यासारखाच कुणी राजघराण्यातल्या उमद्या माणसापासून मूल हवं होतं.

पण सासूच्या सांगण्यावरून तिला आपल्या सावत्र दिराबरोबर संग करावा लागतो. तो दिसायला चांगला नसतो आणि त्याच्या अंगाला वास येत असतो, म्हणून ती त्याच्याबरोबर संभोगादरम्यान आपले डोळे गच्च मिटून घेते.

परीणामी तिच्या पोटी धृतराष्ट्र आंधळा जन्माला येतो अशी कहाणी आहे.

 

gandhari inmarathi

 

धृतराष्ट्र किंवा दीर्घतमस या दोघांचेही अंधत्व हे त्या दोघांच्या काकांनी त्यांना दिलेल्या शापाचे परीणाम होते. कारण या दोघांच्या आईने या दोघांना संभोगादरम्यान पूर्ण साथ दिली नव्हती.

धृतराष्ट्राचे पुढचे आयुष्य म्हणजे त्याची शोकांतिकाच होती.

धृतराष्ट्र देखील दीर्घतमसप्रमाणेच हुशार होता. त्याने धर्माचा अभ्यास केलेला होता आणि तो धर्मचक्षू या नावाने सन्मानित केला जात होता. त्याच्या अंधत्वामुळे त्याला राजगादीचा वारसा नाकारण्यात आला.

ज्या मुलाने त्याला वचन दिलं होतं तो वेळेवर आला नाही. आणि आपल्या पहिल्या मुलाला त्याला सोडून द्यावे लागले होते.

 

mahabharat inmarathi

 

स्वतःचे दुःख त्याने सहन केले, परंतु आपल्या पहिल्या मुलाचे म्हणणे पटले नाही तरी पुत्रमोहापुढे नेहमी त्याला झुकते माप दिले, परिणामी पुढे जाऊन त्याने आपल्या कुळाला आणि सोबत रयतेलाही महायुद्धाच्या खाईत लोटले.

आणि दीर्घतमसप्रमाणेच धृतराष्ट्राला जो त्याच्या एका दासीपासून झालेला मुलगा होता, युयुत्सु तोच त्याच्या कुळाला उद्धरणारा गुणी मुलगा होता.

शाप आणि उःशाप:

धृतराष्ट्र आंधळा झाला तो त्याला मिळालेल्या शापामुळे. ते व्यंग नव्हतं.

पौराणिक कथांमधल्या शापांचं स्वरूप –

अध्यात्मिक प्रगती केलेल्या व्यक्ती आपल्या तोंडून निघालेले वाक्य खरे व्हावे यासाठी परिस्थिती बदलून दाखवण्याची क्षमता राखून असत.

आपल्या अध्यात्मिक प्रगतीच्या आणि तपश्चर्येच्या जोरावर प्रत्येक सजीव-निर्जीव व्यक्ती आणि वस्तु देखील शाप देण्याइतके सक्षम असत.

आपल्या शापाचे परीणाम अशा व्यक्तींना ठाऊक असत. त्यामुळे अशा व्यक्ती जाता-येता कुणालाही असा शाप देत नसत. किंवा आपले बोल खरे होतात हे माहीत असल्याने बोलताना फार सावध आणि गंभीर असत, असंही म्हणू शकतो.

बहुतेक सगळ्याच व्यक्ती थोड्या बहुत तरी अध्यात्मिक प्रगती केलेल्या असत. परंतु याचा अर्थ असा नव्हे, की त्यांनी दिलेले शाप देखील मर्यादित काळापुरतेच राहतील.शापाचं निवारण किंवा उःशाप हे शाप देणारी व्यक्तीच करू शकत असे.

बृहस्पती आणि व्यास हे दोघेही प्रचंड अध्यात्मिक शक्ती असलेले आणि तप केलेले होते. त्यामुळे त्यांनी उच्चारलेला प्रत्येक शब्द हा खरा ठरणार अशी शक्ती त्यांच्या वाणीत आलेली होती.

 

vyas inmarathi

 

वासुदेव कृष्ण हा देव असून देखील कोणत्याही शापांचा प्रतिकार का करू शकत नव्हता.

सध्याच्या काळात आपण वस्तुमान आणि उर्जा यांतील संबंध ज्याप्रकारे समजून घेऊ शकतो त्याचप्रकारचे संबंध पुराणकाळात अध्यात्मिक उर्जा आणि त्यांचे वर्तन यांत होते.

देवदेवता या शुद्ध अध्यात्मिक उर्जा असलेल्या असत. आणि त्यांचे काम धर्माचे रक्षण करणे असे. देव देवता आणि धर्म हे दोन्ही वेगवेगळ्या स्वरुपात नसल्याने धर्मात ढवळाढवळ करण्याचे काम खुद्द देव देखील करू शकत नव्हते.

धर्म विश्वामध्ये विविध कायदे आणि मार्गांच्या रुपात प्रकट होतो.तपश्चर्येद्वारे शुद्धता, द्वेषबुद्धीस नकार आणि सत्याचा पाठपुरावा करून आध्यात्मिक गुणवत्ता प्राप्त करण्याचे नियम म्हणजे धर्म.अस्त्र, वरदान, शाप आणि तांत्रिक ज्ञानाद्वारे आध्यात्मिक गुणवत्ता वापरण्याचे नियम म्हणून धर्म.

गर्व, अहंकार, लालसा, लोभ या दुर्गुणांमुळे मिळवलेले अध्यात्मिक ज्ञान गमावण्याचा नियम म्हणजे धर्म.हे तिन्ही प्रकारचे सामर्थ्य असणाऱ्या व्यक्तींचे गुण तीन प्रकारचे असत – सत्व, रज आणि तमस. आणि त्यांचे हे सामर्थ्य या तीन प्रकारच्या गुणांवर देखील अवलंबून असे.

थोडक्यात कृष्ण हा स्वतःच धर्म असल्याने तो धर्मातील या तिन्ही रुपांना देखील विरोध करू शकत नाही. कृष्ण हा स्वतःच एका शापाचे स्वरुप आहे, स्वतःच तो शाप देणारा व्यास आहे, आणि तोच तो शाप भोगणारा धृतराष्ट्रही आहे.

 

mahabharat-krishna-inmarathi

 

त्यामुळे तो या तिन्ही गोष्टीत ढवळाढवळ करू शकत नव्हता.आदिपर्वाच्या संभव पर्वात ९८व्या प्रकरणात ममतावर केलेल्या बलात्काराची वरील गोष्ट आहे.आणि आपल्यावर ज्या निती-अनितीच्या संस्कारांचा परीणाम आहे आणि आपण ती मानतो त्याच्या बरोबर उलट महाभारतात व्यासांपासून झालेल्या मुलांची उदाहरणे आहेत.

अंबिकेला पसंत नसतानाही हा प्रकार झाला आणि तिने दुसऱ्यावेळी व्यासांसोबत संग करण्यास स्पष्ट नकार दिला होता.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

 शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?