'नकरात्मकता किंवा कंटाळा घालविण्यासाठी बालपणीच्या या '८' गोष्टीं तुम्हाला नक्कीच मदत करतील

नकरात्मकता किंवा कंटाळा घालविण्यासाठी बालपणीच्या या ‘८’ गोष्टीं तुम्हाला नक्कीच मदत करतील

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम |

===

जगावरती कोरोनाचं संकट अजूनही घोंगावतय. या संकटामुळे मृत्युमुखी पडणाऱ्या लोकांचा आकडा दिवसेंदिवस वाढत आहे.

एकूणच संपूर्ण जगामध्ये या वायरसमुळे झालेली आहे.

अर्ध जग आज लाॅकडाऊनच्या परिस्थितीत आहे. चीनमधून जगभरात पसरलेल्या या व्हायरसमुळे जगाचं प्रचंड नुकसान होत आहे.

आता अनलॉक सुरु झाले असले तरी एकंदरीतच सगळे घरात अडकून पडले आहेत.

त्यामुळे वेळ घालवायचा कसा हा प्रश्न अजूनही पुर्णपणे सुटलेलाच नाही.

गेल्या काही दिवसांपासून आपण टाईमपास करण्याच्या नवीन नवीन युक्त्या शोधतोय!

 

india lockdown inmarathi
gulf news

 

म्हणजे कोणी फेसबुक वर मित्रांचे जुने फोटो काढून त्याच्यावरती कमेंट करून मित्रांना त्रास देत आहे, तर कोणी मित्रांसोबत ऑनलाइन लूडो खेळतोय परंतु!

या सर्व काळात आपल्याला बालपणीच्या आठवणींनी आणि खेळांनी टाईमपास करण्यासाठी सर्वात जास्त मदत केलेली आहे हे मान्य करावे लागेल.

तर मग आज आपण जाणून घेऊयात असे कुठले खेळ आहेत जे आपण घरबसल्या खेळून टाइमपास करू शकतो….

 

१. बुद्धिबळ :

 

people playing chess inmarathi
slate magazine

 

मित्रांनो लाॅकडाऊनच्या काळात अनेक जणांनी हा खेळ नक्कीच खेळला असेल. आपल्यापैकी अनेकांना या खेळाची प्रचंड आवड असेल इतरही वेळी वेळ काढून आपण हा खेळ नक्कीच खेळत असू.

पण  हा खेळ आपल्याला वेळ कसा घालवायचा हे शिकवत आहे आणि हा खेळ आपल्यापैकी सामान्य नागरिकच नव्हे तर अनेक राजकारण्यांनी देखील लाॅकडाऊनच्या काळामध्ये खेळलेला आहे.

टीव्हीवर देखील याचं कवरेज मागच्या काही दिवसांमध्ये तुम्ही नक्कीच पाहिलं असेल!

त्यामुळे बुद्धिबळाने आपल्याला वेळ घालवण्यासाठी या लाॅकडाऊनच्या काळामध्ये खूपच मदत केलेली आहे हे मात्र नक्की.

 

२. नवा व्यापार :

 

nava vyapar inmarathi
youtube

 

आपल्यापैकी प्रत्येकानेच लहानपणी हा खेळ नक्कीच खेळला असेल. अत्यंत साधा आणि सोपा वाटणारा हा खेळ लहानपणी मात्र आपल्याला प्रचंड व्यवहारज्ञान देऊन जातो.

या खेळाचे अनेक प्रकार आता उपलब्ध आहेत. आपल्या लहान मुलांसोबत खेळ खेळून त्यांना व्यवहार ज्ञानाचे धडे नक्की द्यावेत.

लहानपणीच्या खेळाने त्या काळामध्ये मात्र अनेकांना वेळ घालवण्यात प्रचंड मदत केलेली आहे आजही हा साधासा खेळ आपल्याला मदत करत आहे.

 

३. साप-शिडी :

 

saap sidi inmarathi
wikiHow

 

लहानपणी आपल्यापैकी प्रत्येकाने हा खेळ नक्कीच खेळला असणार, आज हा खेळ खेळण्याच्या विचाराने देखील तुम्हाला हसू येत असेल.

परंतु मित्रांनो जेव्हा वेळ घालवायचा असतो ना तेव्हा माणूस काही देखील करू शकतो हे लक्षात घ्या.

खेळामध्ये अनेक लहान मोठे साप आणि शिड्या असतात त्यामुळे हा खेळ खेळत असताना तुम्हाला लहानपणीच्या गमती जमती आठवल्याशिवाय राहणार नाहीत.

जर तुम्ही लाॅकडाऊनच्या काळामध्ये हा खेळ खेळला नसेल तर नक्की खेळून पहा तुमचा वेळ खूप छान जाईल.

 

४. लुडो :

 

indian kids ludo inmarathi
Quora

 

लहानपणी खेळलेला हा खेळ आज मोबाईल वरती आल्यामुळे अनेक जण खेळत आहेतच, आता त्यातच ऑनलाईन देखील खेळण्याची संधी मिळालेली असल्यामुळे अनेक जण या खेळाचा आनंद घेत आहेत.

आपल्या परिवारासोबत बसून लुडो खेळण्यात काही वेगळीच मजा आहे. प्रत्येकाची सोंगटी त्याच्या घरात परत पाठविण्यासाठी असलेली ही लगबग कोणाला अनुभवायला आवडणार नाही.

त्यामुळे हा खेळ नक्कीच खेळूून बघायला हवा. तुमच्या लहानपणीच्या आठवणी नक्कीच ताज्या होतील.

 

५. पत्ते :

 

playingcards inmarathi
bar games 101

 

“हाऊस ऑफ कार्ड्स” च्या काळात पत्ते कोण खेळत असं विचारू नका, कारण आता इंटरनेटचा स्पीड देखील बर्‍यापैकी कमी झालेला आहे.

त्यामुळे ऑनलाईन गोष्टींवर अवलंबून न राहता अनेक जण घरात बसून पत्ते खेळत आहेत. अनेक प्रकारचे खेळ तुम्ही तुमच्या परिवारासोबत या पत्त्यांच्या मदतीने नक्कीच खेळू शकता!

जर तुम्ही लाॅकडाऊन मध्ये पत्ते खेळले नसाल तर तुम्ही काय केले असा प्रश्न बाहेर पडल्यावर तुम्हाला तुमच्या मित्राने विचारला नाही म्हणजे मिळवले.

त्यामुळे भिकार सावकार, पाच-तीन-दोन, बदाम सात, झब्बू, मेंढी कोट, जजमेंट, असे कित्येक पत्त्यातले गेम्स खेळून तुम्ही धमाल करू शकता!

 

6.कॅरम :

 

people playing carrom inmarathi
outlook india

 

ह्या खेळाची महती फार मोठी आहे, बाकीचे खेळ एकमवेळ टाइमपास म्हणून दुर्लक्षित करता येतात, बुद्धिबळ आणि कॅरम या खेळांसाठी खरंच प्रचंड कौशल्य लागतं!

राज्य देश तसेच आंतरराष्ट्रीय स्तरांवर सुद्धा या खेळांच्या स्पर्धा होतात! लहानपणी जारी टाइमपास म्हणून खेळत असलो तरी कॅरम हा एक उपयुक्त इनडोअर गेम्स पैकी एक आहे!

आणि असाच या लॉकडाऊनच्या काळात हा खेळ आज देखील आपल्या मदतीला धावून आलेला आहे. आपल्यापैकी प्रत्येकाची या एका खेळा सोबत एक आठवण असतेच.

लहानपणी परिवारासोबत हा खेळ खेळताना वेळ कसा जायचं हे कळतच नव्हतं आज देखील हा खेळ खेळताना प्रचंड आनंदाचा अनुभव तुम्हाला नक्कीच आला असेल.

त्यामुळे सध्या हा गेम तुमचा विरंगुळा म्हणून आणि तुमचे कौशल्य दाखवण्यासाठी उत्तम आहे!

 

७. अंताक्षरी :

 

antakshari inmarathi
new indian express

 

परिवारासोबत बाहेर कुठे प्रवास करताना तुम्ही अंताक्षरीचा आनंद नक्कीच घेतला असेल.

खेळाची एक खासियत अशी आहे की हा खेळ खेळण्यासाठी जेवढे जास्त जण असतील तेवढा जास्त आनंद आपल्याला उपभोगता येतो.

त्यामुळे, संपूर्ण परिवारासोबत बसून टाईमपास करायचा असेल तर अन्ताक्षरी ला पर्यायचं नाही. तुमच्या परिवारासोबत वेळ घालवण्याची ही सुवर्णसंधी आहे त्यामुळे अंताक्षरी नक्की खेळाच.

 

८. पझल :

 

puzzle solve inmarathi
medium

 

लहानपणी अनेक विविध प्रकारच्या फोटोपासून आपण पझल तयार करत असू आणि त्या पझलमधुन तो फोटो तयार करण्याचा प्रयत्न करत असू.

आजही त्या आठवणी आनंद देऊन जातात. हा खेळ खेळला तर तुम्हाला प्रचंड आनंद अनुभवायला मिळेल त्यामुळे जुनी काढून एकदा नक्कीच साॅल्व्ह करायचा प्रयत्न करा.

एका चित्राचे किंवा फोटोचे मोठ्या प्रमाणावर ती मोठेमोठे तुकडे करून तयार केलेलं हे पझल सोडवताना प्रचंड आनंद मिळतो.

तर असे ही काही धमाल खेळ आहेत. जे तुम्ही कित्येक वर्षात खेळायचे सोडाच पण बघितले सुद्धा नसतील, पण या निवांत वेळामुळे या जुन्या खेळांच महत्व नक्कीच वाढलंय!

त्यामुळे तुम्ही सुद्धा घरी बसून टीव्ही नेटफ्लिक्स बघून कंटाळला असाल तर या छान रम्य बैठ्या खेळांचा आनंद नक्की घ्या!

===

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?