' ५ वर्षात भारतीय अर्थव्यवस्था वेगाने वाढणार अन पाकिस्तान अस्तित्वासाठी झगडेल: अमेरिकन अभ्यास – InMarathi

५ वर्षात भारतीय अर्थव्यवस्था वेगाने वाढणार अन पाकिस्तान अस्तित्वासाठी झगडेल: अमेरिकन अभ्यास

आमच्या इतर लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुकपेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi

===

देशाची प्रगती आणि विकासाचं मापक देशाची अर्थव्यवस्था असते. भारताची अर्थव्यवस्था आर्थिक मंदी, शेअर बाजार कोसळणे, डॉलर च्या तुलनेत रुपया घसरणे ह्यासारख्या प्रश्नांशी नेहमीच झुंजत आली आहे.

(मनमोहनसिंगांच्या नेतृत्वाखाली भारतीय अर्थव्यवस्थेने कात कशी टाकली ह्याबद्दल आपण इथे वाचू शकता.)

अर्थमंत्री अरुण जेटली ह्यांच्या मार्गदर्शनाखाली आपल्या अर्थव्यवस्थेचा गाडा सुरळीत चालू असल्याचे संकेत सुद्धा दिसत आहेत. अरुण जेटलींनी अर्थव्यवस्थेशी निगडित बरेच धीट निर्णय घेतले. काळ्या पैश्याशी दोन हात करण्यासाठी नोटबंदी सारखं पाऊल उचलणे मोठी गोष्ट आहे.

अर्थसंकल्प फेब्रुवारीच्या शेवटच्या आठवड्यात न सादर करता १ फेब्रुवारीला सादर जेटलींनी करण्याचा निर्णय घेतला हे आपण जाणतोच. ह्याचं कारण म्हणजे आता अर्थसंकल्पावर सखोल चर्चा करण्यासाठी पुरेसा वेळ मिळू शकेल आणि बदल १ एप्रिल पासून लागू होतील. ह्या आधी फेब्रुवारीच्या शेवटच्या दिवशी सादर होणाऱ्या अर्थसंकल्पावर मार्च ह्या एकाच महिन्यात घाईघाईत चर्चा होई.

arun-jaitley-union-budget-marathipizza

ह्या अश्या छोट्या मोठ्या बदलांचा परिणाम म्हणा किंवा भारताची उद्योगात वाढत चाललेली वाटचाल अमेरिकेच्या Think Tank ने असं भाकीत नोंदवलंय की भारताची अर्थव्यवस्था येत्या पाच वर्षात जगातील सर्वात वेगाने वाढणारी अर्थव्यवस्था असेल.

 

National Intelligence Council च्या ग्लोबल ट्रेंड्स नावाच्या रिपोर्ट मध्ये अमेरिकेच्या वैचारिक तज्ज्ञांनी असं भाकीत केलं आहे.

NIC marathipizza

भारताची एकूण वाटचाल आणि चीनची स्थिरावत आलेली अर्थव्यवस्था बघता भारताची अर्थव्यवस्था जलदगतीने वाढेल. चीनच्या अर्थव्यवस्थेची वाढ खुंटत जात असतांनाच तिचा विकासदर सुद्धा मंदावत असल्याचे रिपोर्ट मध्ये नोंदवले आहे.

भारतीय अर्थव्यवस्थेची उद्योगाला आकर्षित करणारी अर्थव्यवस्था आणि दिल्लीचे बीजिंग, मॉस्को आणि वॉशिंग्टन ह्या केंद्रांशी असलेला संपर्क ह्यांचा पोषक परिणाम अर्थव्यवस्थेची वाढ अजून मजबुत करतो. ह्या सगळ्यात भारताने दक्षिण आशियाई देशांना आपल्या विकासाचा फायदा करून देण्याचा पवित्र घेतला आहे. रस्ते, वीज प्रकल्प आणि धरण ह्यांसारख्या विकासकामांना मदत करून मोठ्या भावाची भूमिका बजावत आहे. ह्यासगळ्याचा फायदा येत्या पाच वर्षात अर्थव्यवस्थेला होणार असून वाढ निश्चित आहे.

 

South Asian Countries MarathiPizza

भारताबद्दलचं भाकीत सांगत असतानाच Think Tank पाकिस्तानबद्दल आपलं मत व्यक्त करायला विसरलं नाही.

जिथे भारतीय अर्थव्यवस्था सर्वात वेगाने वाढणार तिथेच शेजारी राष्ट्र म्हणून पाकिस्तान आपला समतोल सांभाळायला सुद्धा कमी पडणार आहे. मग पडलेली खळगी भरून काढण्यासाठी पाकिस्तान ‘नको त्या’ मार्गाला सुद्धा जाऊ शकते. ह्यामध्ये अण्वस्त्रांचा साठा आणि व्यापार, समुद्रकिनाऱ्यांवरून व्यापार ह्यांसारख्या पर्यायांचा वापर करून पाकिस्तान स्वतःला सावरू शकतो. ह्यामध्ये पाकिस्तान वेगवेगळ्या देशांशी आपले संबंध प्रस्थापित करू शकतो असेही रिपोर्ट मध्ये Think Tank सांगते.

ह्या Think Tank च्या भाकितांवर भारतातील राजकीय आणि औद्योगिक वर्तुळाचा सर्वात मोठा प्रभाव असणार आहे. सध्या तामिळनाडूत चालू असलेलं वादळ, पंतप्रधानांवर होत असलेली विरोधकांची टीका आणि जाणून बुजून अराजकता माजवण्याचा प्रयत्न ह्या सगळ्यांच्या परिणामांमुळे भारताची ही प्रगती खुंटू नये.

जिथे आशियाई देशांचं नेतृत्व करून अर्थव्यवस्थेला सुगीचे दिवस दाखवण्याची स्वप्न आपण बघत असताना फक्त राजकीय स्वार्थासाठी तोंडाशी आलेला घास दुरावू नये एवढंच!

InMarathi.com वर विविध लेखकांनी व्यक्त केलेले विचार ही त्यांची वैयक्तिक मतं असतात. InMarathi.com त्या मतांशी सहमत असेलच असे नाही. । आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुकपेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi

Abhidnya Adwant

Author @ मराठी pizza

abhidnya has 47 posts and counting.See all posts by abhidnya

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?