' कोरोनाचा असाही फटका: या वस्तु खरेदी करण्यासाठी तुमच्या खिशावर चांगलाच भार येऊ शकतो – InMarathi

कोरोनाचा असाही फटका: या वस्तु खरेदी करण्यासाठी तुमच्या खिशावर चांगलाच भार येऊ शकतो

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम

 

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

===

कोरोना संसर्गजन्य रोग असल्यामुळे जवळपास सगळ्याच मोठ्या देशात फॅक्टरी काय लहान लहान दुकान सुद्धा बंद ठेवण्यात आलेले आहेत.

मोजक्या काही प्रमाणात कंपन्यांना परवानगी मिळालेली असली, तरी अद्याप सगळेच व्यवहार ठप्प आहेत.

चीन. जिथे कोरोनाचा जन्म झाला आणि जिथून जगभर पसरला तो देश, पण याच चीन ची दुसरी आणि मुख्य ओळख म्हणजे रॉ मटेरीयलचं होलसेल मार्केट.

इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंचा तर चीन दादा माणूस. साध्या रेझिस्टर, कपॅसिटर आणि ट्रान्झिस्टर पासून ते सुपरएमोलेड डिस्प्ले, हायडेफिनिशन कॅमेरे इथपर्यंत सगळं चीन मध्ये मोठ्या प्रमाणात तयार होतं.

 

camera 2 inmarathi

 

त्यामुळे कमी किमतीत ते जगभरच्या मार्केट मध्ये उपलब्ध आहे. उदाहरण घेऊया,

आयफोनचं फक्त प्रोसेसर अर्थात बायोनिक चिप ही अँपल फॉक्सकॉनला देते. बाकी स्पीकर, डिस्प्ले, कॅमेरा हे चीनमध्येच असलेल्या सॅमसंग आणि सोनी कडून घेऊन आयफोन तयार करत असतात.

तेच सेम फीचर्स असलेले वनप्लस, हुआवे यांचे सगळे पार्ट हे चीन मध्येच तयार होत असतात. आणि वर सांगितलेल्या ब्रँडच्या किमती मधला फरक तर जगजाहीर आहे.

तर, आता कोरोनामुळे याच चीनच्या फॅक्टरीज तीन महिने बंद होत्या. जे बेसिक मटेरीयल एखादं युनिट तयार करायला लागतं तेच चीन मधून एक्स्पोर्ट होतं.

सध्याच्या घडीला मागणी जास्त आणि पुरवठा कमी ही स्थिती आहे. अर्थशास्त्रात या स्थितीला महागाई असे म्हणतात.

 

share market inmarathi

 

एक साधं उदाहरण घेऊया,

आपला जो स्प्लिट एसी असतो त्याच्या आऊट डोअर युनिटच्या कम्प्रेसर ला चालू बंद करायला एक कम्युनिकेशन कार्ड असतं .जास्त काही नाही फक्त रोम, प्रोसेसर आणि काही प्रोटेक्शन डायॉड यांचं कॉम्बिनेशन असतं.

हे खराब झालं की याला फक्त रिप्लेसमेंट हाच एक पर्याय आहे. बाजारभावात याची किंमत ५ ते ८ हजार आहे. लॉट मध्ये मागवलं तर ५०% पर्यंत भरघोस सूट देखील मिळते. रिपेअर करायला याला ऑप्शन नाही.

तर, आजच्या घडीला चीन मध्ये मार्केट बंद असल्यामुळे याच कम्युनिकेशन कार्ड ची किंमत ही १०-१५ हजार एवढी झालेली आहे. कारण प्रोडक्शन बंद आहे.

त्यामुळे इम्पोर्ट बंद आहे. मागणी जास्त आहे आणि पुरवठा कमी. बिझनेस करत असाल तर यावेळेस प्रॉडक्ट्स चे भाव आकाशाला गवसणी घालतात, हे वेगळं सांगायला नको.

आज हीच एसी संबंधीत स्थिती जगातल्या प्रत्येक कंज्युमर प्रोडक्ट मॅन्युफॅक्चरिंग करणाऱ्या कंपनीत आहे. मग ते एसी असो, फ्रीज, वॉशिंग मशीन, मोबाईल फोन्स किंवा कोणतीही इलेक्ट्रिकल गोष्ट.

 

fridge-inmarathi06
jezebel.com

 

पुरवठा कमी असल्यामुळे महागाई वाढणार आहेच.

एलजी, व्होल्टास, पॅनासॉनिक, सॅमसंग सारख्या कंपनी आपल्या प्रॉडक्ट्स च्या मागे ३ ते ५% प्राइझ हाईक करण्याच्या विचारात आहे. म्हणजे जवळपास किमतीत तीन ते पाच हजार पर्यंत वाढ.

व्होल्टासचे एमडी प्रदीप बक्षी म्हणतात,

चीन मध्ये मॅन्युफॅक्चरिंग बंदच आहे. डीलर कार्यरत असले तरी त्यांच्याकडून सप्लाय होणार मटेरीयल हे ते हाय रेट मध्ये विकत आहेत. त्यात इंपोर्ट करताना शिपिंग चार्जेस सुद्धा जास्त लागत आहेत.

त्यात भर म्हणजे या बजेट मध्ये काही इंपोर्टेड वस्तूंवर २.५% ड्युटी वाढवली गेली आहे. त्यामुळे एकूणच सगळ्या बाबतीत किंम झाल्यामुळे एन्ड प्रोडक्टची किंमत वाढवण्याखेरीज पर्याय नाही.

 

share market crash inmarathi
jagran.com

 

व्होल्टास ही देशातली अग्रगण्य एसी मॅन्युफॅक्चरिंग कंपनी आहे. यावर्षी च्या बजेट मध्ये एसी-फ्रीज यांच्या मध्ये वापरल्या जाणाऱ्या कम्प्रेसर वर ड्युटी १०% वरून १२.५% केली गेली.

एकूणच प्राइझ मध्ये किती हाईक झाली असेल ते यावरून कळून येईल. पॅनासॉनिक इंडियाचे चीफ एक्झिक्युटिव्ह मनीष शर्मा म्हणतात,

उन्हाळा येत आहे. त्यामुळे मागणी वर प्राइझ हाईक चा काही परिणाम होईल असं वाटत नाही.

नोटबंदी नंतर जर कोणाला सर्वाधिक फायदा झाला असेल तर या कंज्युमर प्रोडक्ट इंडस्ट्रीला. २०१७ मध्ये यांची वाढ १% होती, २०१८ मध्ये ४% तीच २०१९ मध्ये ९% एवढी प्रचंड होती.

तीच वाढ कायम ठेवण्यासाठी हा प्रपंच केला जात आहे, हे म्हणण्यास वावगे ठरणार नाही.

 

china electronic companu inmarathi
the financial express

 

जसं ऑटोमोटीव्ह मटेरीयलला चीनला ऑप्शन जपान आणि जर्मनी आहे, तसेच इलेक्ट्रॉनिक आणि इलेक्ट्रिक मटेरीयलला ऑप्शन व्हिएतनाम, मलेशिया आणि थायलंड हे देश आहेत.

पण या तिघा देशांच्या प्रोडक्शनच्या एकूण तुलनेत चीन बराच वरचढ आहे. त्यामुळे या देशातून मागवलेलं मटेरीयल हे चीनच्या मटेरीयल पेक्षा जास्ती किमतीत घेणं भाग आहे.

पण या देशातून मागवलेलं मटेरीयल जरी महाग असलं तरी त्यांचा लीड टाईम हा आताच्या चिनी प्रोडक्टच्या लीड टाईम पेक्षा बराच कमी आहे.

त्यामुळे महाग रॉ मटेरीयल मुळे महाग वस्तु  खरेदी करण्याच्या तयारीत राहा.

आगामी वर्षात मोबाईलचे भाव वाढणार असे संकेत असतानाच, कंज्युमर प्रोडक्ट मध्ये समावेश होणारे एसी, फ्रीज, वॉशिंग मशीन आणि मायक्रोवेव्ह ओव्हन हेही महाग होणार आहेत.

 

corona with mobile inmarathi

 

चीनसोबत जगाला बसलेल्या कोरोनाच्या धक्क्याचे हे परिणाम आहेत असं म्हणायला हरकत नाही.

===

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi


आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा:
InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?