' कोरोनाच्या संकटात ब्युटी पार्लरला जाणं टाळा, सौंदर्य खुलवणा-या घरगुती टिप्स ट्राय करा

कोरोनाच्या संकटात ब्युटी पार्लरला जाणं टाळा, सौंदर्य खुलवणा-या घरगुती टिप्स ट्राय करा

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामशेअरचॅट

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

===

कोरोनाने पुन्हा डोके वर काढले आणि काही अंशतः लॉकडाऊन चालू झाले आहे. कोरोनापासून वाचण्यासाठी एकच महत्वाची गोष्ट आवश्यक आहे आणि ती म्हणजे घरातच राहणे. जरी बाहेर सर्व काही चालू असले तरी सुरक्षेच्या दृष्टीने घरात राहणे कधीही उत्तम. स्त्रियांना सुरक्षेसोबतच सौंदर्य सुद्धा राखता येणार आहे अर्थात या घरगुती टिप्स वापरून.

 

 

दर महिन्याला ज्या महिला आपल्या लूक्ससाठी, आपल्या त्वचेची काळजी किंवा केसांच्या सौंदर्यासाठी ब्युटी पार्लस् किंवा ब्युटी सलोन मध्ये जातात त्यांची पंचाईत झाली!

 

eyebrows inmarathi

 

पार्लरमध्ये जाऊन कोरोनाचा धोका पत्करण्यापेक्षा घरच्याघरी काही साधी आणि घरात नेहमीच सापडणाऱ्या वस्तू वापरून उत्तम आणि नितळ सौंदर्य उजळवता येईल.

==

हे ही वाचा :  तुमच्या त्वचेच्या सौंदर्याला घातक ठरणारी वस्तू तुम्ही सोबत घेऊन फिरत आहात! कोणती? जाणून घ्या…

==

त्वचेची, चेहऱ्याची काळजी

उन्हाळ्याचे दिवस आहेत, घरात असलो तरी गरमी असह्य होते.

महिलांचा स्वयंपाकघरात अर्धा-अधिक वेळ जातो कारण सगळेच घरी असल्याने खाण्या-पिण्याचा फर्माईशी असतात. त्यामुळे स्वयंपाकघरात बहुतांश वेळ जातो गृहिणींचा!

 

women inmarathi

 

आणि मग घामाने आंघोळ होते! मग आता चेहेर्याची काळजी कशी घ्यायची, त्वचेची देखभाल कशी करायची ते पाहूया!

क्लिन्झिंग

हल्ली सगळीकडे जाहिरातीतून, सगळ्या प्रसार माध्यमातून सारखे हात स्वच्छ धुवा असे सांगताना दिसतात.

उन्हाळ्यात त्वचेची काळजी घेणे पण अत्यावश्यक आहे. आपण हात धुतो तेव्हा चेहेराही स्वच्छ धुणॆ गरजेचे आहे.

 

washing-her-face InMarathi

 

दिवसातून किमान २ ते ३ वेळा चेहेरा स्वच्छ धुवा.

किमान एकदा तरी क्लीन्झरने चेहरा धुवा, घरात क्लीन्झर नसेल तर दूधाचा वापर करणे फायदेशीर ठरते.

 

cleasing milk inmarathi

 

दूध् आपल्या त्वचेला नैसर्गिकरित्या क्लीन्झर म्हणून सर्वात उत्तम आहे.

सिरम

व्हिटॅमिन ई आणि व्हिटॅमिन सी युक्त सिरम त्वचेला तजेला देण्यासाठी खूप मदत करतात.

उन्हाळ्यात त्वचेला उन्हापासून खूप हानी पोहोचते (घराबाहेर नाही गेलं तरी), त्यामुळे त्वचेला संरक्षण देण्यासाठी व्हिटॅमिन ई आणि व्हिटॅमिन सी अतिशय उपयुक्त आहेत.

 

vitamine c for skin inmarathi

 

या व्हिटॅमिन्स् मुळे त्वचा कांतियुक्त होते.

सनस्क्रीन लोशन

उन्हाळ्यात त्वचेला सूर्यकिरणांपासून वाचवण्यासाठी सनस्क्रीन लोशन वापरणं गरजेचं आहे.

चेह-याची, त्वचेची विशेष काळजी घ्याला लागते उन्हाळ्यात!

 

sunscreen-facts-inmarathi06

 

उन्हामुळे त्वचेहा तजेला जाऊन गडद रंग येतो, हे टाळण्यासाठी सनस्च्रीन लोशन लावणे गरजेचे आहे.

कमीत कमी ३० SPF असणारे सनस्क्रीन लोशन लावणं गरजेचं आहे.

मॉइश्चरायझर

उन्हाळ्यात त्वचेसाठी मॉइश्चराइझर गरजेचं असते.

 

cream inmarathi

 

आपल्याला उन्हाळ्यात अतिशय घाम येतो. या घामामुळे आपल्या त्वचेची छिद्रे (रंध्रं) मोकळी होतात त्यामुळे त्वचेला हानी पोहोचू शकते.

हे टाळण्यासाठी मॉइश्चराइझर वापरणं अत्यंत गरजेचे आहे.

मॉच्छरायर्स नसेल तर फ़्रिजमधील थंड पाणी किंवा बर्फाचा वापर करावा.

थंड पाण्याने चेहेरा धुवावा, बर्फ एका स्वच्छ, तलम कपड्यात घेऊन मग चेहेर्यावरून फिरवावा.

 

ice inmarathi

 

याने त्वचेची छिद्रे तर बंद होतातच पण त्वचेला तजेला येण्यासही मदत होते.

साखर आणि मध

साखर आणि मध ह्यांचे मिश्रण हे उत्तम स्क्रब म्हणून काम करते. मध तर त्वचेसाठी खूपच उत्तम आहे.

 

suger inmarathi

 

घरात या दोन्ही वस्तु सहज उपलब्ध असल्याने क्वॉरन्टाईनच्या काळात याचा नक्की फायदा होवु शकतो.

केसांची काळजी

केसांना पण निगराणीची गरज असते.

उन्हाळ्यात तर आपल्या ‘स्काल्प’ ला पण खूप घाम येतोस्वयंपाकघरात तर नखशिखांत घाम येतो आपल्याला

 

indian girl hair fall inmarathi

==

हे ही वाचा : ऑईली स्किन लपवण्यापेक्षा “ह्या” घरगुती उपायांनी आपले सौंदर्य परत मिळवा!

===

 

तर केसांची कशी काळजी घ्यायची ते बघूया आता!

घरच्या घरी करा हेअर स्पा

आपण घरीच अगदी सोप्या पद्धतीने हेअर स्पा करू शकतो.

त्यासाठी दहीखोबरेल किंवा बदाम तेलकोरफड गर किंवा जेलमेथीचे दाणेअंडे (आपल्या इच्छेनुसारघेतले नाही तरी चालतेमिक्सरमध्ये फ़िरवून एकत्र करून घ्यावे.

 

hair spa inmarathi

 

हे मिश्रण / पाऊण तास लावून ठेवावे केसांनानैसर्गिक घटक केसांना चमकदार तर करतातच पण केस गळणं पण थांबते.

त्याशिवाय तेलाने केसांच्या मूळाशी मसाज करावात्याने रक्ताभिसरण नीट होते आणि केसांची मूळे घट्ट होऊन केस गळती थांबते.

 

oil massage inmarathi

 

आठवड्यातून  वेळा केस धुणे ह्यासारख्या गोष्टी अत्यावश्यक आहेत.

केसांचे सौंदर्य देखील तितकेच महत्त्वाचे आहे जितके चेहेर्याचे आहे!

त्यामुळे आपल्या केसांची निगा घरच्या घरी जितकी शक्य आहे तितकी राखणं गरजेचं आहे.

ह्याशिवाय फळभाज्याबीटरूटकडधान्येगाजर आणि भरपूर फळे खावीतज्यामुळे केसांचे आरोग्य नीट राहतेशिवाय चेहेर्याचेही सौंदर्य वाढते या आहारामुळे!

 

balanced diet inmarathi

==

हे ही वाचा : त्वचेचं सौंदर्य ते वजनाची समस्या : या एकाच “प्रयोगामुळे” तुम्ही चिरतरुण राहू शकता..!

 

स्त्रीयांना आपली नखे सुंदर असावीत असे वाटतेमग ह्या नखांसाठी घरच्या घरी काय करता येईलचला तर मग पाहूया!

नखांची काळजी

स्त्रियांना कमजोरकमकुवत किंवा ठिसूळ नखांचा त्रास असतो.

 

nails inmarathi

 

हा त्रास दूर करण्यासाठी आपल्याच स्वयंपाकघरातील काही साहित्यकाही पदार्थ आपल्याला मदत करतात. 

ठिसूळ नखे किंवा नखांवर पांढरे डाग हे कॅल्शियमच्या कमतरतेचे लक्षण आहेनखांसाठी काय करता येईल ते पाहुया!

लिंबाचा रस

लिंबाचा रस आपली नखे स्वच्छ करण्यासाठीनखांवरील डाग नाहिसे करण्यासाठी मदत करतो.

व्हिटॅमिन सी ची कमतरता भरून काढण्यास लिंबाचा रस अत्यंत उपयुक्त आहे.

 

lemmon spa inmarathi

 

एका कॉटनच्या कपड्यावर लिंबाचा रस घेऊन तो कपडा प्रत्येक नखावर चोळावा, याने नखावरचे डाग कमी होण्यास तर मदत होतेच ह्याशिवाय नखांना नैसर्गिक चकाकी येते. आठवड्यातून २ वेळा हे करावे.

याशिवाय २ चमचे ऑलिव्ह ऑइल आणि लिंबाचे काही थेंब घ्या आणि १५ सेकंद मायक्रोवेव्ह मध्ये गरम करा आणि हा पॅक कमीत कमी ३० मिनिट ठेवावा.

याने नखं नैसर्गिकरित्या चमकतात आणि डाग कमी होतात.

खोबरेल तेल

खोबरेल तेल नैसर्गिक हायड्रेट आहे, कोमट तेलाने नखांना मालिश केले तर नखांचा ठिसूळपणा कमी होऊन नखं मजबूत होतात.

 

nails inmarathi

 

ऍंटी फंगल म्हणूनही खोबरेल तेल उत्तम आहे. त्यामुळे नखांना संसरग होण्याची शक्यता असेल तरीही खोबरेल तेल लावावे.

मध

मध बॅक्टेरिया आणि बुरशीजन्य वाढीविरूद्ध लढायला मदत करतो, त्याचप्रमाणे नखं आणि नखांच्या त्वचेचे पोषण करण्यास मदत होते मधाने.

 

honey inmarathi

 

मधाने १५-२० मिनिटे नखांना हलकेच मसाज करावा.

 

हे ही  वाचा : उत्तम आरोग्य आणि सौंदर्यही! त्यासाठी गुलकंदाचे हे ८ फायदे जाणून घ्यायलाच हवेत…

===

सदर लेखातील माहिती, विविध तज्ज्ञांच्या अभ्यास व मतांनुसार तसेच सर्वसामान्य मनुष्याच्या आरोग्यास अनुसरून देण्यात आलेली आहे. ही माहिती देण्यामागे, या विषयाची प्राथमिक ओळख होणे हा उद्देश आहे. InMarathi.com च्या वाचकांनी कोणताही निर्णय घेण्याआधी, आपल्या आरोग्याला अनुसरून ,डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.

===

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?