' कोरोना संकट: स्वतःच्या ‘चॅरीटी’ बाबत कधीच उघडपणे न बोलणाऱ्या शाहरुख खानचं प्रशंसनीय पाऊल!! – InMarathi

कोरोना संकट: स्वतःच्या ‘चॅरीटी’ बाबत कधीच उघडपणे न बोलणाऱ्या शाहरुख खानचं प्रशंसनीय पाऊल!!

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम |

===

सध्या कोरोना ने सगळ्या जगात थैमान घातलंय, सगळ्या सरकारी यंत्रणांपासून कित्येक प्रगत देशाच्या अर्थव्यवस्था सुद्धा कोलमडल्या आहेत, सगळ्या जगाची आर्थिक सामाजिक घडी विस्कटली आहे!

भारतात सुद्धा संपूर्ण लॉकडाऊन आहे! अत्यावश्यक सेवा जसं की दूध, भाजीपाला, किराणा, औषधं याच सेवा फक्त चालू आहेत! अशा परिस्थिति तुमच्या आमच्या लोकांच चालून जातं!

पण ज्यांच हातावरचं पोट आहे, जे बेघर आहेत अशा लोकांचा कधी विचार आलाय का मनात तुमच्या? ती लोकं हा लॉकडाऊन कसा झेलू शकणार आहेत याचा विचार सुद्धा आपल्याला करवत नाही!

 

lockdown effect inmarathi
Al jazeera

 

आपल्या देशात कित्येक उद्योगपती तसेच सेलिब्रिटीजनी स्वतः पुढे होऊन राज्यातल्या मुख्यमंत्री फंडात तसेच पंतप्रधान यांच्या फंडात भरगोस रक्कम डोनेट केली!

अगदी यात साऊथ चा सुपरस्टार रजनीकांत पासून अक्षय कुमार पर्यंत तसेच उद्योगपती रतन टाटा यांचा सुद्धा समावेश आहे!

अक्षय कुमार ज्याला आपण सगळेच एक उत्तम अभिनेता मानतो तितकाच तो एक सच्चा देशभक्त तसेच अत्यंत संवेदनशील माणूस आहे हे देखील आपल्याला ठाऊक आहे!

अक्षय ने तर चक्क २५ करोड पंतप्रधान रिलीफ फंडासाठी देऊ केले, जी एक अत्यंत मोठी रक्कम असून, त्याच्या या कृतीच कौतुक साऱ्या देशभर होत आहे!

त्याची पत्नी ट्विंकल खन्ना हिने सुद्धा ट्वीट करून इतकी मोठी रक्कम कुठचाही विचार न करता दिल्याबद्दल त्याचं कौतुक केलं आहे!

 

akshay kumar donation inmarathi
news18 hindi

 

क्रिकेटचा देव म्हणजे आपलं सगळ्यांचा लाडका सचिन तेंडुलकर याने सुद्धा २५ लाख रक्कम देऊन त्याची देशभक्ती दाखवली आहे! क्रिकेटर सुरेश रैना याने सुद्धा तब्बल ३१ लाखांची मदत केली आहे!

दबंग सलमान खान याने सुद्धा फिल्म इंडस्ट्री मध्ये छोटी मोठी कामं करणाऱ्या २५००० लोकांची जवाबदारी घेतली!

या सगळ्यात एक आदर्श उद्योगपती रतन टाटा कसे मागे राहतील, त्यांच्या टाटा सन्स आणि टाटा ट्रस्ट अशा दोन्ही संस्थांनी मिळून जवळ जवळ १५०० करोड रुपयांची मदत जाहीर केली आहे!

 

ratan tata inmarathi
fresherslive

 

आता एवढया बातम्या आणि या मोठ्या मोठ्या किंमती बघून तुमच्याही मनात आलं असेल, की बाकीची मंडळी आणि विशेषकरून बॉलीवूड मधली ‘खान मंडळी’ कुठे गेली?

सलमान खान ने तर त्याची मदत केली, पण आमीर खान आणि शाहरुख खान अजूनही कसलीच मदत जाहीर करत नाहीत असा सूर सध्या सोशल मीडिया वर ऐकायला मिळत होता!

आणि हे दर वेळेस होतं, एखादी अशी आपत्ती आली की सोशल मीडिया आणि मीडिया चॅनल्स वर या स्टार मंडळींना टार्गेट केलं जातं हे आपण बघितलं असेल! 

खासकरून शाहरुख खानच्या बाबतीत तर ह्या गोष्टी प्रचंड झाल्या आहेत, तो पाकिस्तानला मदत करतो इथपासून अगदी त्याला पाकिस्तानचा एजंट म्हणण्यापर्यंत लोकांची मजल जाते!

 

protest against shahrukh khan inmarathi
hoax or fact

 

पण आजवर त्याने कधीच त्याची देशभक्ती सिद्ध करायचा प्रयत्न केला नाही, कारण देशभक्ती ही तुमच्या वागण्यातून दाखवायची असते असे त्याचे म्हणणे आहे!

पण आज तुम्हाला ही गोष्ट वाचून नक्कीच आश्चर्य वाटेल, स्वतःच्या चॅरीटी विषयी कधीच उघडपणे न बोलणाऱ्या शाहरुख ने या वेळेस चक्क उघडपणे एक घोषणा केली आहे!

देशात कोरोना च्या संकटाशी लढायला शाहरुख ने त्याच्या बादशाही अंदाजात मदत देऊ केली आहे ज्याची पोस्ट त्याने नुकतीच त्याच्या इंस्टाग्राम अकाऊंट वर शेयर केली आहे!

 

shahrukh instagram inmarathi
YouTube

 

शाहरुख त्याच्या कोलकाता नाइट रायडर्स, त्याचं प्रोडक्शन हाऊस रेड चिलीज आणि रेड चिलीज व्हिएफएक्स, तसेच त्याने चालू केलेल मीर फाउंडेशन अशा वेगवेगळ्या स्तरातून लोकांची मदत करणार आहे!

या पोस्ट मध्ये शाहरुख ने लोकांना एक इमोशनल आव्हान सुद्धा केलं आणि त्याचे प्लॅन्स सुद्धा त्याने यात खूप डिटेल मध्ये मांडले!

त्याच्या रेड चिलीज आणि कोलकाता नाइट रायडर्स या दोन्ही संस्थांमधून पंतप्रधान यांच्या फंडात आणि महाराष्ट्र, दिल्ली आणि कलकत्ता या राज्यांच्या मुख्यमंत्री फंडात रक्कम दिली जाणार आहे!

शिवाय त्याच्या मीर फाउंडेशन च्या माध्यमातून या रोगाशी लढणाऱ्या वैद्यकीय क्षेत्रातल्या कर्मचाऱ्यांना एक वेगळीच मदत केली जाणार आहे!

 

shahrukh insta post inmarathi
instagram

 

तीनही राज्यात वैद्यकीय क्षेत्रातल्या लोकांना ५०००० Personal protection equipment kit चे वाटप या फाउंडेशनच्या माध्यमातून होणार आहे!

शिवाय याच मीर फाउंडेशन च्या माध्यमातून मुंबईतल्या ५००० कुटुंबाच्या जेवणाची सोय देखील केली जाणार आहे, ज्यांना जेवण मिळणं शक्य नाही!

तसेच पोलिस आणि ज्यांच हातावर पोट आहे त्यांच्यासाठी सुद्धा किमान महिना भर तरी १०००० लोकांना त्यांच्या जेवणाची सोय होणार आहे,यात शाहरुख ने वेगवेगळ्या एनजीओ ची मदत घेतली आहे!

जे गरीब आहेत, ज्यांना रेशन घेणं सुद्धा परवडत नाही अशा २५०० लोकांच्या किराणा सामानाची सोय सुद्धा या मीर फाउंडेशन मधून केली जाणार आहे!

युपी बिहार उत्तराखंड इथल्या असिड एटॅक पीडित महिलांना सुद्धा शाहरुख कित्येक वर्षांपासून मदत करतो, आणि या दिवसांत त्यांच्यासाठी सुद्धा शाहरुखने तरतूद केली आहे!

 

shahrukh insta post 3 inmarathi
kalinga tv

 

एकंदर नुसता नावाने नाही तर कामाने सुद्धा खरा बादशाह असलेल्या शाहरुख खान ने फक्त आर्थिक नाही तर अशी वेगवेगळ्या पद्धतीतून मदत देऊ केली आहे!

खरंतर शाहरुख कधीच त्याच्या या चॅरीटी बद्दल उघडपणे बोलत नाही, उलट त्याबद्दल उघडपणे बोलल्याने तिला चॅरीटी  म्हणता येणार नाही असंही त्याने त्याच्या कित्येक मुलाखतीत सांगितलं आहे! 

शिवाय शाहरुख हा असा पहिला भारतीय आहे ज्याला त्याच्या चॅरीटी साठी UNESCO AWARD देऊन गौरविण्यात आलं, कदाचित त्याची ही सायलेंट चॅरीटीच याला कारणीभूत ठरली!

 

shahrukh unesco inmarathi

 

शाहरुख चे वडील हे आपल्या देशाच्या स्वातंत्र्यलढ्यात सुद्धा सहभागी होते, त्याच मीर फाउंडेशन हे त्याने त्याच्या वडिलांच्या आठवणीखातर चालू केलं आहे!

खरंतर शाहरुखच्या या सगळ्या कामाविषयी खूप कमी लोकांना माहिती आहे, कारण तो कधीच त्याची उघडपणे वाच्यता करत नाही!

पण यावेळेस संपूर्ण जगावर आलेलं कोरोनाच संकट पाहून शाहरुख ला त्याच्या या अप्रतिम कृतीची बाहेर वाच्यता करावीशी वाटली असावी म्हणूनच त्याने त्याच्या इंस्टाग्राम अकाऊंट वर ही पोस्ट शेयर केली!

 

shahrukh on corona inmarathi
india ahead news

 

आपल्या कोणालाही देशभक्ती सिद्ध करून दाखवायची गरज पडत नाही, कारण आपण सामान्य माणूस आहोत, पण हाच कायदा सेलिब्रिटीजना सुद्धा लागू होतो ना?

त्यांना सुद्धा कुणाच्या देशभक्तीच्या सर्टिफिकेट ची गरज नाही, फक्त एक पब्लिक फिगर म्हणून त्यांनी त्यांची देशभक्ती सिद्ध केलीच पाहिजे हे कितपत योग्य आहे?

पण असो पोलिस, डॉक्टर्स आणि या सेलिब्रिटीजनी केलेली मोकळ्या मनाने मदत पाहून आपण या कोरोनाच्या संकटातून नक्कीच बाहेर पडू!

===

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?