' ‘कोरोनामुक्त’ झालो तरी पुढे येऊन ठेपलेल्या ‘या’ संकटाची कल्पना सुद्धा करवत नाही – InMarathi

‘कोरोनामुक्त’ झालो तरी पुढे येऊन ठेपलेल्या ‘या’ संकटाची कल्पना सुद्धा करवत नाही

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम |

===

सध्या संपूर्ण जग बंद आहे. सगळे व्यवहार ठप्प आहेत. सगळीकडे फक्त कोरोनाच्या बातम्या आणि चर्चा भरुन राहील्या आहेत. कोरोना जगातून कधी जाईल याचीच सर्वजण वाट पाहत आहेत.

त्यावरती संशोधन देखील सुरू आहे, आणि माणसाला विश्वास आहे की एक ना एक दिवस कोरोनाचं संकट आपण दूर करू.

कोरोनाचं संकट दूर होईलही, माणसाच्या प्रयत्नाला यश येईलही परंतु त्यानंतरच जग कसं असेल? आता जी उलथापालथ सगळीकडे झाली आहे, त्यानंतर पूर्वीसारखंच सुरळीत होईल का?

परंतु सगळंच सुरळीत होण्यासाठी आता काही काळ जावा लागेल. कारण यानंतरच संकट हे आधिक गहिरं आणि भयानक असेल.

 

corona in china inmarathi
the new york times

 

सध्या कोरोनामुळे बरेच उद्योगधंदे अक्षरश: डबघाईला आलेले आहेत. पर्यटन क्षेत्र, विमान वाहतूक, हॉटेल व्यवसाय इत्यादींचे तरी कंबरडे मोडले असल्यागत स्थिती आहे.

अमेरिकेसारख्या प्रगत राष्ट्रात देखील सध्या कोरोना व्हायरस मुळे हाहाकार माजला आहे. तिथल्या अनेक नोकऱ्या जाण्याची परिस्थिती उद्भवली आहे. ८० दशलक्ष लोकांना नोकऱ्यांच्या बाबतीत धोका निर्माण झाला आहे.

अगदी इतक्या नोकऱ्या गेल्या नाहीत तरी दहा दशलक्ष लोकांच्या नोकऱ्या मात्र जाऊ शकतात, असा अंदाज तिथल्या मुडी अॅनलिटिकल सर्वेने व्यक्त केला आहे.

त्यामुळे वाहतूक, पर्यटन, हॉटेल मॅनेजमेंट, तत्काळ सेवा देणारे छोटे उद्योग या सगळ्या क्षेत्रांवर २०% प्रभाव या व्हायरसचा पडू शकतो. त्यामुळे २७ दशलक्ष लोकांच्या नोकऱ्या जाऊ शकतात.

अमेरिकेतल्या लोकांना तर अशी भीती वाटत आहे की, जर आपण कोरोनामुळे आजारी पडलो तर आपल्याला कंपनीत येण्यासाठी मज्जाव केला जाईल.

 

corona virus 12 inmarathi
the financial express

 

तसेच सुट्टी घेतली तर आपला पगार कापला जाईल, आणि जर तुम्ही आजारी नसाल तरी इतर कोणामुळे ही आजारी पडण्याची शक्यता नाकारता येत नाही.

म्हणजेच एकूण नोकऱ्या जाण्याची टांगती तलवार तिथल्या लोकांवर आहे.

रिटेल, मॅन्युफॅक्चरिंग, बांधकाम व्यवसाय आणि शिक्षणक्षेत्र यामधल्या ५२ दशलक्ष लोकांवर याचा प्रभाव पडू शकतो. या क्षेत्रातले पाच दशलक्ष लोक बेरोजगार होऊ शकतात.

त्यामुळे लोक स्वतःच्या गरजा कमी करून करतील आणि खरेदी करण्याचे प्रमाण आहे कमी होईल. २००९च्या आर्थिक मंदीमध्ये देखील कुठलीही अर्थव्यवस्था इतकी प्रभावीत झाली नव्हती.

नवीन नोकऱ्या निर्माण करणे आणि त्यामध्ये लोकांना घेणे यानंतरच्या परिस्थितीत कठीण होणार आहे.

आणि अजूनही कोरोनाचं सावट संपलेलं नाही. कोरोना विरोधात लढणाऱ्यांमध्ये सगळ्यात आघाडीवर आहेत ते डॉक्टर्स, नर्सेस आणि पॅरामेडिकल स्टाफ. यांच्या जीविताला ही सध्या धोका निर्माण झाला आहे.

 

corona virus inmarathi 2
business insider

 

सध्या आपण पाहतो की अनेक डॉक्टर्स, नर्सेस यांचा कोरोनाव्हायरसच्या संसर्गामुळे मृत्यू होत आहेत म्हणजेच एक कुशल व्यवस्था कमकुवत होत आहे.

वैद्यकीय क्षेत्रातील लोकांवरचा ताण आता वाढवायचा नसेल आणि आपल्या कर्मचाऱ्यांना देखील सुरक्षित ठेवायचे असेल तर सध्या कंपन्या, वर्क फ्रॉम होम म्हणजे घरून काम करण्याची परवानगी देत आहेत.

कर्मचारीदेखील घरून काम करण्याला पसंती देत आहेत कारण लहान मुलांचे पाळणाघरं सध्या बंद आहेत. कुठेही लहान मुलांना पाठवून रिस्क वाढून घ्यायला कोणीही तयार नाही.

ही परिस्थिती आता कोरोना वरती औषध मिळेपर्यंत कायम राहणार आहे.

अशा परिस्थितीमुळे सगळीकडे पैशाचा तुटवडा निर्माण होणार आहे. कारण सध्या बराचसा आर्थिक खर्च हा केवळ कोरोना वरतीच लक्ष केंद्रित करुन करण्यात येत आहे.

सगळीकडची वाहतूक बंद असल्यामुळे सरकारला मिळणारा पैसा देखील कमी झाला आहे. मोठ-मोठ्या उद्योगधंद्यांमध्ये काम होत नाहीये त्यामुळे उत्पादन येत नाहीये आणि त्याचा फटका अर्थव्यवस्थेला बसत आहे.

शेती हा मुख्य व्यवसाय असलेल्या आपल्या भारतात देखील आता शेतीक्षेत्राला कोरोनाचा फटका बसत आहे. विशेषतः फळ उत्पादकांना फळ उतरवण्यासाठी कामगार मिळत नाहीयेत.

 

agriculture 1 InMarathi

 

शेतकऱ्यांवर आपल्या फळांच्या बागा तोडण्याची वेळ आलेली आहे. दुग्ध व्यवसायाला देखील कठीण दिवस आलेले आहेत. दूध ओतून देणे नाहीतर त्याची पावडर तयार करणे असे उद्योग आता करावे लागत आहेत.

सध्या पर्यटन क्षेत्र अक्षरशः थांबल्यात जमा आहे. लोकांनी परदेशी पर्यटनासाठी किंवा देशातल्या पर्यटनासाठी जे बुकिंग केले होते ते आता कॅन्सल करण्यात आले आहेत.

त्यामुळे पर्यटन क्षेत्रावर आधारित सर्व वाहतूक व्यवस्था उदाहरणार्थ, विमान, रेल्वे, बस, गाड्या, कार यांच्याकडे फारशी बुकींग नाहीत. किंवा जे बुकिंग होते ते कॅन्सल करण्यात आले आहे.

त्यामुळे विमानात सेवा पुरवणाऱ्या ज्या कंपन्या होत्या त्यांनी देखील आता आपलं काम थांबवलेलं आहे, आणि पुढे देखील त्यांना कधी काम मिळेल याची शाश्वती नाही.

 

plane-inmarathi

 

ई-कॉमर्स च्या क्षेत्रावरही सध्या कोरोनाचं सावट असून तिथेही २० ते ३० टक्के नोकऱ्या धोक्यात आल्या आहेत. अलीकडे ऑनलाइन फूड डिलेवरीला प्रचंड मागणी होती.

भारतात दर मिनिटाला जवळजवळ ९५ बिर्याणी मागवल्या जायच्या. आता कोणामुळे अशा उद्योगांवरही संकट कोसळले आहे.

त्यामुळे ते पुरवणारे डिलिव्हरी बॉईज यांचे उत्पन्न आता कमी होणार आहे आणि त्यामुळेच त्या काही जणांच्या नोकऱ्या जाऊ शकतात.

ऑनलाइन फूड डिलिव्हरी प्रमाणेच सध्या ऑनलाईन टॅक्सी बुकिंगला देखील प्रचंड मागणी होती. लोक ओला आणि उबेर या गाड्यांना ऑनलाइन बोलवून घ्यायचे.

सध्या तर लॉक डाऊन मुळे हा व्यवसाय चालतच नाहीये. आणि पुढेदेखील अनेक कंपन्यांमध्ये जर नोकऱ्यांमध्ये कपात झाली तर या सगळ्या लोकांवरही बेरोजगारीची कुऱ्हाड कोसळणार आहे.

सध्या लॉक डाऊन मुळे अनेक एमआयडीसी अनेक कारखाने, उद्योगधंदे बंद आहेत. सध्याच्या काळातील काही दिवसांचा पगार तिथले मालक देऊ शकतील

परंतु जर लॉक डाऊन, पुढे आणखीन काही दिवस चालू राहिलं, आणि नंतरही जर उत्पादनांना मागण्या कमी झाल्या तर कारखानदार मग तो छोटा असो किंवा मोठा आपल्या कामगारांमध्ये कपात करणार.

 

share market inmarathi

 

शिवाय काहीकाही ठिकाणी कामगारांना कमी पगारावर काम करावे लागू शकते.

शेती नंतरचा रोजगार देणारा सगळ्यात मोठा उद्योग म्हणजे बांधकाम क्षेत्र. आधीच रियल इस्टेट हे क्षेत्र बर्‍याच कारणांमुळे तिथल्या गैरव्यवहारांमुळे बदनाम असून त्याची चलती नाही.

परंतु आता तर रियल इस्टेट क्षेत्राला खूप मोठा फटका सहन करावा लागू शकतो.

कारण जर लोकांच्या नोकऱ्या जाणार असतील किंवा आर्थिक अडचणींमध्ये वाढ होणार असेल तर कोणीही नवीन गुंतवणूक या क्षेत्रात करण्यासाठी तयार होणार नाही.

त्यामुळे कोणताही बांधकाम व्यावसायिक यापुढे कुठलाही प्रकल्प उभारताना विचार करेल. त्यामुळेच त्याही क्षेत्रातल्या नोकऱ्यांवरती गदा येणार ही निश्चित.

त्याचबरोबर सध्या सिनेमा, टीव्ही, सिरीयल आणि वेब सिरीज यासारख्या गोष्टीदेखील प्रचंड प्रमाणात चालतात. आणि त्यावरूनही त्यातूनही कितीतरी रोजगार निर्मिती होत असते.

 

watching tv inmarathi
livemint

 

परंतु आता कोरोनाचा परिणाम त्यावरही होणार आहे. तिथली रोजगार निर्मिती सुद्धा कमी होणार आहे.

सध्या जगभरातील शेअर मार्केट हे कोसळले आहेत. त्याचं कारण एकच, कुठल्या देशात नवीन उत्पादन होत नाहीए आणि नाही त्याची निर्यात होत आहे.

जी काही आयात करण्यात येत आहे ती सध्या फक्त मेडिकल गोष्टींची. तसं पाहायला गेलं तर सगळेच उद्योग हे एकमेकांवर अवलंबून आहेत, आणि ते सगळेच सध्या बंद आहेत.

म्हणूनच कोरोना नंतरचे जग हे खूप वेगळं असणार आहे. कुठल्या संधी जातील आणि कुठल्या नवीन निर्माण होतील हे आत्ताच सांगणं किंवा त्याविषयी तर्क करणे कठीण आहे.

सध्या फक्त कोरोनाचा प्रसार रोखणे हे एकमेव ध्येय सगळ्या देशांसमोर आहे.

 

corona doctors inmarathi
CNBC.com

 

मध्ये एक ‘देऊळ बंद’ नावाचा सिनेमा आला होता त्यामध्ये कसा देवळातला देव नाहीसा झाल्यावर तिथे जी परिस्थिती लोकांवर उद्भवली होती, सगळे व्यवहार ठप्प झाले होते, तसंच काहीसं सध्या घडलंय.

पण खऱ्या जगात एका छोट्या विषाणूने माणसाच्या जगात प्रवेश करून माणसाचं जग थांबवलेलं आहे.

===

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?