' जगातल्या सर्वोत्तम स्विमिंग पूल्सची ही व्हर्च्युअल सफारी तुम्हाला नक्कीच आवडेल!

जगातल्या सर्वोत्तम स्विमिंग पूल्सची ही व्हर्च्युअल सफारी तुम्हाला नक्कीच आवडेल!

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम |

===

सध्या सर्व प्रवासी योजनांवर परिणाम झाला आहे, पण परिस्थिती पूर्ववत झाल्यावर भटकंती करायला, काही नवीन सफारीचा अनुभव घ्यायला तुम्हाला नक्कीच आवडेल ना?

सध्या सुरु असलेल्या लॉकडाऊनमुळे जणु काही सगळे घरात कैद झाले आहेत.

 

home inmarathi
the economic times

 

अनल़ॉक काळ सुरु असला तरी कधी एकदा मुक्तपणे बाहेर वावरतोय असं सगळ्यांना झालयं.

त्यानंतर पुढे वर्षभर काय काय करायचं,  कुठे फिरायचं याचे प्लॅन्स आखणार असाल, तर जरा थांबा, कारण तुमच्या बकेटलिस्टमध्ये अॅड होवु शकतील अशी काही ठिकाण आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलोय.

अर्थात या ठिकाणांची व्हर्चुअल ट्रिपही तुम्हाला आनंद देईल.

चला तर मग आज आपण सफारीवर गेल्यानंतर राहण्यासाठी काही आगळ्या-वेगळ्या हॉटेल्सची माहिती घेऊया.

जसं सिंगापुरच्या ५२ मजल्यांच्या उत्तुंग इमारतीवर सर्वात वरच्या मजल्यावर असलेल्या स्विमिंग पूलमध्ये पोहोण्याचा थरारक अनुभव घेणे किंवा मस्त, प्रसन्न सकाळी पूलमधुन चित्त्याची भटकंती बघणे किंवा व्हिला पूलमध्ये एंजॉय करायचं!

 

pool inmarathi

 

मस्त अगळावेगळा भन्नाट अनुभव घ्यायचा असेल तर ह्या हॉटेल्स ना नक्की भेट द्या.

सूर्य तळपत असेल तर पाणीही खूप गरम होते पण, येथे असे काही अद्भूत, आगळावेगळा तरण तलाव आहे जे जंगलामध्ये किंवा झाडांनी वेढलेले आहेते, तर काही अथांग आहेत.

हॉटेल्स आणि तरण तलावांची माहिती वाचून तुम्हाला नक्कीच त्यांना भेट द्यायची उत्सुकता वाटेल.

जगभरातील काही हॉटेल्स मधे इतर सोयी-सुविधांबरोबरच अप्रतिम तरण तलावांचा अनुभव हवाय? मग ह्या अद्भूत हॉटेल्स आणि त्यातील तरण तलावांची माहिती करून घेऊया.

१) ग्रेस सॅंटोरिनी

ग्रीसमधल्या या हॉटेलमध्ये तेथील सर्वात मोठा तरण तलाव आहे, जिथे स्विमर्स पूलच्या काठावर चढू शकतात आणि कॅलरेडा आणि खोल निळे एजियन्स समुद्र त्या काठावरून पाहू शकतात.

 

greece inmarathi

 

विशेषतः सूर्यास्ताच्यावेळी येथील दृश्य अत्यंत मनमोहक असते.

पूलसाईडच्या भन्नाट अनुभवासाठी मस्त कॉकटेल किंवा स्नॅक घेऊ शकता.

येथे ताज्या ग्रीक डिशेस जशा अल फ्रेस्को वगैरे पूलसाईड बार क्षेत्रात मिळतात, जो सकाळपासून रात्रीपर्यत सुरू असतो.

२) द रॉयल अटलांटिस, बहामा

 

bahama pool inmarathi

 

बहामा मधील ह्या भव्य-दिव्य हॉटेल मध्ये असणारा तरण तलाव १० व्या मजल्यावार आहे.

अर्थातच ह्यात पोहणे हा आपल्या काही थरारक अनुभवांपैकी एक असेल!

इथून दिसणारे दृश्य खूपच छान आहे. १० व्या मजल्यावरील तरण तलावात पोहोण्याचा अनुभव कसा असेल ह्याची कल्पनाच खूप भारीये.

३) सॅन अल्फान्सो डेल मार्च, चिली

 

san alfanso chili
pintrest

 

चिली येथील सॅंटियागो पासून सरळ किनारपट्टीवरून सरळ गेल्यावर दिसणारा हा तरण तलाव जगातील सर्वात मोठा (७६,८९० चौ.मी.) तरण तलाव आहे.

ज्याचा अनुभव घेणे हा नक्कीच एक अविस्मरणीय अनुभव असेल.

४) गोल्डन नगेट हॉटेल, लास वेगास

 

las vegas inmarathi

 

लास वेगासमधील गोल्ड्न नगेट ह्या हॉटेल मधे सर्वात सुंदर जलतरण तलाव आहे.

ह्या स्विमिंग पूलचे वैशिष्ट्य माहितेय?

ह्यामध्ये चक्क देवमासे (शार्क) आहेत.

 

shark inmarathi
vital vegas

 

सुदैवाने आपल्या आणि त्यांच्या मध्ये एक जाड काचेची भिंत आहे ज्यातून आपण शार्कना पाहू शकतो. अर्थातच हा एक भन्नाट आणि थरारक अनुभव असेल.

५) कोमो शंभला इस्टेट, बाली

सर्वात सुंदर स्विमिंग पूल असणारे हे हॉटेल इंडोनेशिया मधील सर्वात सुंदर आयलंड अर्थात बाली मध्ये आहे.

 

bali pool inmarathi
delaxu excep

 

इथे अनेक असंख्य पूल वरच्या मजल्यावर आहेत ज्यामुळे असे वाटते की, ते स्विमिंग पूल्स झाडांच्या शेंड्यावर म्हणजेच ट्री-टॉप्सवर आहेत.

६) हॉटेल बुटिक, आइसलॅंड

केफ्लेवॅक मरीना/ आइसलॅंड वर असणारे हे नयनरम्य बुटिक हॉटेल वैशिष्ट्यपूर्ण आहे.

 

island pool inmarathi
lastminute

 

ह्याचे वैशिष्ट्य असे आहे की इकडे स्विमिंग पूल छतावरील टेरेसवर आहेत.

ज्यामध्ये रिलॅक्स होताना आजुबाजुच्या निसर्गसौंदर्याचा आनंद घेता येतो.

७) मरिना सॅंडस्, सिंगापूर

सिंगापूरमध्ये असणार्या ह्या मरिना सॅंडस होटेलमधील स्विंमिंग पूल्स हे खास आकर्षणाचा विषय़ आहे, जे उंचीवर आहे,

 

singapur inmarathi

 

सिंगापूरच्या नयनरम्य देखाव्यांचा ज्यांना तरण तलावातून अनुभव घ्यायचा असेल त्यांच्यासाठी हे स्विमिंग पूल्स म्हणजे एक पर्वणीच आहे, पण ज्यांना व्हर्टिगोचा त्रास आहे त्यांनी अज्जिबात इकडे जाऊ नये.

८) अन्तारा गोल्डन ट्रायंगल एलिंफंट कॅंप आणि रिसॉर्ट

 

golden triangle inmarathi
tripadvisor

 

थायलंडच्या मस्त सफारीचा अनुभव घेऊन झाल्यावर या मोठ्या तलावामध्ये पोहोण्याचा अनुभव घ्या आणि खाली असणार्या जंगलांचे सौंदर्य पहा आणि सगळा शीण घालवा.

९) द गिलडेड इगुआना, कोस्टा रिका

येथे एक मस्त, अविस्मरणीय स्विमिंग पूल आहे जो समुद्र किनार्यापासून फक्त ३०० कि.मी. अंतरावर आहे आणि आऊटडोअर आहे,

 

costa swimming pool inmarathi
costa rica star news

 

आपल्या मूडप्रमाणे आपण कोठेही पोहू शकतो जे एकदम स्वप्नवत आहे.

१०) लालू हॉटेल सन मून लेक, तैवान

हे खूप सुंदर, नेत्रदीपक हॉटेल सन मून तलावाच्या वरच्या भागात आहे आणि इथे तैवनच्या काठावरचा सर्वात रूंद, उबदार पाण्याचा तलाव आहे.

 

taivan pool inmarathi
trip advaisor

 

तुम्ही इथल्या तरण तलावात पोहोण्याचा अनुभव कधीच विसरू शकणार नाही!

११) लॉकला आयलंड, फिजी

लॉकला बेटाची पूल इन अ पूल ( तरण तलावात तलाव) ही संकल्पना जितकी नावीन्यपूर्ण आही तितकीच आश्चर्यकारक आहे.

 

fiji pool inmarathi
agoda

 

रिसॉर्टच्या बरोबर मध्यभागी २१,००० चौ.फूट (हो, हो २१,००० चौरस फूट) लेगून शैलीचा तलाव समुद्र किनार्याचे दर्शन घडवतो, त्याच्या आत लॅप स्विमिंगसाठी एक लांब काचेचा क्युबिक स्विमिंग पूल आहे.

तलावाच्या परिसराचे वातावरणही एकदम मस्त आहे, घरट्यांसारखे कंदिल, पोहल्यावर पिण्यासाठी कॉकटेल बार आहे आणि प्रत्येक खोलीला स्वतंत्र स्विमिंग पूल्स देखील आहेत.

१२) कॅंब्रियन, स्वित्झर्लंड

कॅंब्रियन मधल्या स्विमिंग पूल मधे रिलॅक्स होताना स्विस आल्प्स चे सौंदर्य न्याहाळू शकतो! अल्पाइन खो-यात खोल असलेल्या निसर्गाचा नेत्रदीपक फायदा ह्या हॉटेलला झाला आहे.

 

cabrian pool inmarathi
life of mike

 

आणि हे सौंदर्य पाहण्यासाठी इथल्या खोल्यांना छतापासून जमीनी पर्यंत काचेच्या खिडक्या आहेत.

पण त्याही पेक्षा बर्फाच्छादित स्विस आल्प्स पर्वताचं सौंदर्य टिपायचं असेल तर ते ह्या हॉटेलच्या स्टीम आऊटडोअर थर्मल पूलच्या काठावरूनच!

ही दृश्ये इत्की सुखद आहेत की आपण आपला थकवा, शीण, ताण क्षणाता विसरून जातो.

थंडगार पाण्यात मनसोक्त पोहण्याची प्रत्येकाची इच्छा असते, पण आपल्या नेहमीच्या पुलपेक्षा काहीतरी हटके आणि अप्रतिम असा अनुभव घ्यायचा असेल तर आयुष्यात यापैकी किमान एका ठिकाणी नक्की जाण्याचा बेत आखा.

===

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?