'कोरोनापासून जीव वाचवत हा तरुण २०० कि.मी. चालला, पण ही मेहनत ठरली जीवघेणी

कोरोनापासून जीव वाचवत हा तरुण २०० कि.मी. चालला, पण ही मेहनत ठरली जीवघेणी

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम |

===

चीनमधील वूहानमध्ये उद्भवलेल्या कोरोना व्हायरस अर्थात कोविद- १९ ने सगळीकडे पसरण्यास सुरुवात केली. जगभरात भयाची लाट उसळली.

सर्व थरांतील माणसे मग ती गरीब असोत, सामान्य असोत किंवा श्रीमंत, ह्या व्हायरस मुळे सगळे भयभीत झाले आहेत. सर्वत्र हाहाकार उडाला आहे.

भारतामध्ये परिस्थिती हाताबाहेर जाऊ नये म्हणून सरकारने आधी ८ दिवसांचा आणि मग २१ दिवसांचा लॉकडाऊन घोषत केला. सगळे व्यवहार बंद, सगळे कारखाने, वाहने, रेल्वे सर्व सर्व बंद!

 

stay home stay safe inmarathi
amar ujala

 

लोकांना घराबाहेर न पडण्याचे आव्हान करण्यात आले आहे.

कोरोना विषाणूचा फैलाव रोखण्यासाठी देश लॉकडाऊन आहे. लॉकडाऊनमुळे प्रवासबंदी आहे. घरातून बाहेर पडायचे नाही.

हे लॉकडाऊन अजून वाढेल का किंवा कमी होईल काहीच माहित नाही. कशाचीच शाश्वती नाहीये. सगळंच अनिश्चित आहे!

सामान्य लोकं तसंच हातावर ज्यांचं पोट आहे, जे कामासाठी आपलं गाव सोडून दुसऱ्या शहरात गेले आहेत त्या सगळ्यांचेच खूप हाल होतायत. हे असं कधीपर्यंत चालणार?

काहीच माहित नाही, ह्या व्हायरस ची साखळी जोपर्यंत तुटत नाही तोपर्यंत हे असंच चालणार! पण, कधी तुटणार ही साखळी? एकामागून एक प्रश्नपण सगळेच अनुत्तरीत!

 

police lockdown inmarathi
scroll.in

 

मग काय! गावी जाण्याची ओढ लागली शहरात काम करणाऱ्यांना! घरच्यांना भेटायची इच्छा झाली चाकरमान्यांना! पण… इथेही पण आहेच! जाणार कसे घरी? रेल्वे बंद! वाहनांना बंदी!

दुचाकी, चारचाकी कोणतीच वाहने उपलब्ध नाहीत. तरीही घरी जायचंच ही जिद्द! कारण राहून तरी काय करणार शहरात!

गावी आपल्या लोकांमध्ये तरी राहता येईल, शहरात पोटापाण्याचं काय हा महत्त्वाचा प्रश्न आहेच! कारण सगळंच ठप्प ना!

अनेक लोकं शहर सोडून गावाकडे जाण्यास निघाले आहेत, कोणतेही वाहन नाही त्यामुळे चक्क पायीच! हो चक्क पायी निघाले हे लोक!

 

lockdown effect inmarathi
Al jazeera

 

आत्ताची ही करूण गोष्ट अषीच एका तरूणाची, जो गावी आपल्या घरी पायी निघाला होता, रणविर सिंह नाव त्याचं!

दिल्लीत डिलिव्हरी एजंट म्हणून काम करणारा रणवीर सिंह हा हजारो परप्रांतीयांपैकीच एक जो जिवंतपणी नोकरी, निवारा किंवा पैसा न मिळाल्यामुळे आपल्या गावी व खेड्यात परत जाण्याच्या प्रयत्नात होता.

हातावर पोट भरणारे मजूर पायीच आपलं घर गाठत आहेत. मात्र हा पायी चालत जाण्याचा प्रवास ३८ वर्षीय रणवीर सिंगच्या जीवावर बेतला.

 

ranveer singh corona inmarathi
Times of india

 

दिल्लीत एका जेवणाच्या हॉटेलमध्ये रणवीर काम करायचा. मात्र कोरोनामुळे हे हॉटेल पूर्णपणे बंद झालं आहे.

पोटापाण्याचा प्रश्न निर्माण झाल्यानं रणवीरनं मध्यप्रदेशमधील दुर्गम भागातील आपल्या गावी जाण्याचा निर्णय घेतला.

वाहतूक बंद असल्यानं इतर मजूरांसारखाच तो पायपीट करत घराकडे निघाला. मात्र २०० किलोमीटर चालल्यानंतर दिल्ली- आग्रा महामार्गावर शनिवारी सकाळी त्याचा मृत्यू झाला.

 

people return inmararthi
news track english

 

त्याचं गाव या महामार्गापासून १०० किलोमीटर आतमध्ये होतं.

रणवीरसोबत प्रवासामध्ये दोघजण होते. घेरी येऊन रस्त्यावर कोसळण्यापूर्वी त्यानं छातीत दुखत असल्याचं सांगितलं होतं.

शनिवारी सकाळी २०० किलोमीटर चालत आल्यानंतर छातीत दुखत असल्याची तक्रार त्यानं केली होती.

म्हणून विश्रांतीसाठी ते तिघंही थांबले मात्र तिथेच रणवीरचा मृत्यू झाला अशी माहिती पोलिसांनी दिली. पोलिसांनी रणवीरचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला होता.

यात हृदयविकाराच्या झटक्यानं त्याचा मृत्यू झाल्याचं समोर आलं आहे.

 

corona people inmarathi
amar ujala

 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोरोना व्हायरसचा प्रसार रोखण्यासाठी २१ दिवसांच्या लॉकडाऊनची घोषणा केली.

मध्य प्रदेशात आपल्या घरी पोहोचण्यासाठी दिल्लीपासून २०० किमी अंतरावर चाललेल्या ३८ वर्षीय रणवीर सिंहचा वाटेतच मृत्यू झाला.

रणवीर सिंग राष्ट्रीय राजधानीपासून ३२६ किलोमीटर अंतरावर असलेल्या मध्य प्रदेशातील मुरैना जिल्ह्यात आपल्या गावी चालला होता.

जेव्हा तो उत्तर प्रदेशातील आग्रा येथे महामार्गावर कोसळला तेव्हा एका स्थानिक दुकानदाराने त्यांना चहा आणि बिस्किटांची ऑफर दिली.

पण लवकरच रणवीर सिंगला हृदयविकाराचा झटका आला आणि त्याचा मृत्यू झाला.

शनिवारी संध्याकाळी, हजारो परप्रांतीय कामगारांनी राष्ट्रीय राजधानीच्या आसपासच्या बस टर्मिनल्समध्ये गर्दी केली होती. रविवार २२ मार्च पासून टोटल लॉकडाऊन जाहिर करण्यात आला.

 

bus stand people
tribun kaltim

 

केंद्राच्या “टोटल लॉकडाउन” म्हणजे गर्दीच्या ठिकाणी वेगाने प्रसारित करणार्‍या अत्यंत संसर्गजन्य कोविद-१९ किंवा कोरोना व्हायरसचा प्रसार थांबविण्यासाठी,

सर्व आंतरराज्यीय बस आणि रेल्वे सेवा स्थगित करण्यात आल्यामुळे प्रवासी आणि त्यांच्या तरुण कुटुंबांना शेकडो किलोमीटर चालत जाण्याशिवाय पर्याय नव्हता.

शनिवारी उत्तर प्रदेश आणि दिल्ली सरकारने लोकांच्या घरी जाण्यासाठी बसची व्यवस्था करुन प्रतिसाद दिला;

यूपी सरकारने सांगितले की त्यांनी १००० बसेसचे आयोजन केले होते आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल म्हणाले की २०० बसगाड्यांनाही सेवेत दाखल केले जाईल.

कोरोना व्हायरसच्या जागतिक उद्रेकानंतर दोन महिन्यांनंतर अचानकपणे लॉकडाऊन जाहीर करण्यात आले. लाखो लोक अडकून पडले आणि अन्न व इतर मूलभूत गरजा भागविण्याबाबत घाबरुन गेले.

“रणवीर अजून दोघांसोबत दिल्लीहून निघाला होता आणि मध्य प्रदेशातील मुरैना जिल्ह्यात आपल्या गावी जात होता. शनिवारी सकाळी आग्रा येथे पोचल्यावर त्याने छातीत दुखण्याची तक्रार केली.

 

corona breakdown inmarathi
outlook india

 

त्यामुळे तिघेही आग्राच्या बाहेरील भागात थांबले पण रणवीर कोसळला,” वरिष्ठ पोलिस अधिकार्यांनी माहिती दिली.

स्थानिक दुकानदार तिघांना मदत करण्यासाठी आला. त्यांनी रणवीरला झोपण्यास सांगितले आणि भुकेल्या त्यांना चहा आणि बिस्किटे दिली.

एसएसपी (SSP) नी सांगितले की,

“पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली पण तोपर्यंत त्या व्यक्तीचा मृत्यू झाला होता. त्यामुळे त्याच्या मृत्यूचे नेमके कारण शोधण्यासाठी त्याचा मृतदेह शवविच्छेदन तपासणीसाठी पाठविण्यात आला.

त्यात असे होते की रणवीर सिंहचा मृत्यु हृदयविकाराने झाला.”

मृताच्या कुटूंबाला त्याच्या फोनवरून संपर्क तपशील मिळाल्यानंतर पोलिसांनी त्यांना माहिती दिली आहे.

तो मुरैना येथील अंबाह भागातील रहिवासी होता आणि आपल्या गावापासून १०० किमी दूर होता, अशी माहिती एका पोलिस अधिकार्याने दिली.

ह्या कोरोना मुळे अनेक लोकांचे हाल झालेत, माणसे मृत्युमुखी पडतात ह्याच्या संसर्गाने, पण आता गावी निघालेली निरोगी माणसेही अती श्रमाने मरण पावू लागली आहेत.

ह्या लोकांना दिलासादायक कहीतरी ठोस निर्णय घ्यायला हवेत.

===

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?