' हजारोंचा संहार करणाऱ्या कोरोना संकटाविषयी वेळीच ही माहिती वाचा आणि सावध व्हा!

हजारोंचा संहार करणाऱ्या कोरोना संकटाविषयी वेळीच ही माहिती वाचा आणि सावध व्हा!

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम |

===

कोरोना व्हायरस हा कसा पसरतो आणि त्यापासून किती धोका आहे, याच्याविषयी आता आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे.

परंतु त्याचा खरा धोका भारतात अजून दिसून आलेला नाही, आणि तो म्हणजे कोरोना व्हायरसचा समूह प्रसार.

जर भारतात कोरोनाव्हायरसचा सामूहिक प्रसार म्हणजे कम्युनिटी स्प्रेड सुरू झाले, तर हजारोंचा संहार होऊ शकतो. त्यानंतर उभं राहणारं संकट हे खूप मोठं असेल.

त्यासाठीच सगळ्यांनी जागरुक असण्याची आवश्यकता आहे.

 

corona in china inmarathi
the new york times

 

चीनमध्ये हा व्हायरस सुरू झाला, तिथून तो जगभर पसरला. जगातल्या अनेक देशांचे धाबे आता त्यामुळे दणाणले आहे. कोरोना पसरण्याचे साधारण तीन टप्पे पडतात.

कोरोना व्हायरस सगळीकडे कसा पसरला आणि त्याचे कसे टप्पे झाले यात याचा अभ्यास करण्यात आला आहे.

चीन मधल्या वुहान मध्ये कोरोनाची पहिली केस सापडली. परंतु चीनने अत्यंत शिस्तबद्धपणे कोरोना व्हायरसला चीनमधल्या इतर प्रांतात पसरण्यापासून रोखण्यात यश मिळवले.

पण त्या आजाराची महामारी होईल असं सुरुवातीला अगदी WHO ला देखील वाटलं नव्हतं.

 

corona virus 11 inmarathi
extra ie

 

खरंतर ह्या आजाराची लक्षणे पाहिली तर साधारण फ्लू सारखीच सर्दी, खोकला आणि ताप अशीच असतात. परंतु हा व्हायरस जर तुमच्या फुप्फुसांमध्ये गेला तर तुम्हाला प्रॉब्लेम होऊ शकतो.

आणि मग शरीरातील एक एक अवयव निकामी होत जातात, आणि माणसाचा मृत्यू होतो. जे पेशंट अधिक सिरीयस होतात त्यांना न्युमोनिया देखील होतो.

आत्तापर्यंत जगभरात तीन लाख लोकांना कोरोनाची लागण झाली असून ३४ हजार पेक्षा जास्त मृत्यू झाले आहेत.

हा आजार पसरण्याचे साधारण तीन टप्पे पडतात, ज्यात या व्हायरसचं गंभीर रूप दिसतं.

असं म्हटलं जातं की पहिल्या टप्प्यात त्याचा उद्रेक होतो दुसऱ्या टप्प्यात त्याची साथ पसरते आणि तिसऱ्या टप्प्यात तो महामारीच रूप धारण करतो.

 

stages if corona inmarathi
pune mirror

भारतातला त्याचा संबंध पाहू

१. पहिली स्टेज

आता हा व्हायरस मुळात आला तो चीनमधून, आणि तो तिथून जगभर पसरला. म्हणजे मग भारतामध्ये त्याचा संबंध लावायचा झाला तर त्याचे वेगळे टप्पे करावे लागतील.

म्हणजे भारतातल्या सुरुवातीच्या कोरोनाच्या केसेस या परदेशातून आलेल्या व्यक्तीलाच कोरोना होतो.

२. दुसरी स्टेज

दुसरी स्टेज म्हणजे, परदेशातून भारतात आलेल्या व्यक्तीला जर कोरोना असेल, आणि त्या व्यक्तीच्या संपर्कात येणाऱ्या व्यक्तीला जर कोरोनाची लागण झाली, तर त्या स्टेजला कोरोनाचा उद्रेक (outbreak) झाला असं म्हटलं जातं.

 

corona outbreak inmarathi
india today

 

३. तीसरी स्टेज

तिसरी स्टेज म्हणजे, आता या भारतातल्या लोकांना ज्यांचा कोणताही परदेश प्रवासाचा इतिहास नाहीये, अशा सामान्य लोकांना जर कोरोनाची लागण व्हायला लागली!

आणि त्याचं प्रमाण हे खूप जास्त झालं, ते एका भागा पुरतं मर्यादित न राहता देशातल्या काही भागात पसरलं तर त्याला कोरोनाची साथ (epidemic)आली असे म्हणू शकतो.

किंवा कोरोनाने तिसऱ्या टप्प्यात प्रवेश केला असे म्हणू शकतो.

४. चवथी स्टेज

ही स्टेज म्हणजे ज्याला कुठलाही प्रवासाचा इतिहास नाहीये, त्या परदेशातून आलेल्या व्यक्तीच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींच्या संपर्कात देखील ही व्यक्ती आलेली नाही.

आणि तरीही जर अशा व्यक्तीला कोरोना झाला तर कोरोनाची महामारी (pandemic) आली असं म्हणता येईल आणि ह्याचे प्रमाण इतकं मोठं असतं की देशात कुणालाही कोरोना होण्याची शक्यता अधिक असते.

 

corona doctors inmarathi
CNBC.com

 

भारतात अजूनही आपण तिसऱ्या टप्प्यात नाही, असं सरकारकडून सांगण्यात येत आहे. आरोग्य मंत्रालयाने घेतलेल्या परिषदेतही या गोष्टीवर भर देण्यात आला.

परंतु जर आपण तिसऱ्या टप्प्यात प्रवेश केला तर, परिस्थिती गंभीर होऊ शकते असा इशाराही दिला गेला. कोरोना संदर्भातली कोणतीही माहिती, लपवली जाणार नाही.

तिसऱ्या टप्प्यात जर आपण प्रवेश केला तर त्याबद्दल सर्व लोकांना सगळी खरी इन्फॉर्मेशन मिळेल, याची ग्वाही देखील आरोग्य मंत्रालयाने दिली.

तिसऱ्या स्टेजची कंडिशन ही, अशी असते की नक्की कशामुळे आणि कुठे गेल्यामुळे कोरोना झाला याची खात्री देऊ शकत नाही.

माणसांनाही आठ दहा दिवसात कुठे कुठे आणि काय काय केलं, याच्या विषयी आठवणं कठीण असतं.

आणि भारतात अशा काही केसेस झाल्या आहेत की काही लोकांनी आपली ट्रॅव्हल हिस्टरी लपवली आहे.

 

corona travel inmarathi
Money control

 

काहीजण जे कोरोना संशयित होते ते हॉस्पिटलमध्ये क्वारंटाइन असताना हॉस्पिटलमधून पळून गेले आणि लोकांच्यामध्ये मिसळले त्यामुळे धोका थोडा जास्त वाटतोय.

भारतात जर कोरोनाचा कम्युनिटी ट्रान्समिशन अर्थात समूह संसर्ग जर सुरु झाला तर अत्यंत बिकट अवस्था ओढावणार आहे.

सेंटर फॉर डिसीज डायनामिक्स, इकॉनॉमिक्स अँड पॉलिसी (CDDEP) च्या रिपोर्ट नुसार भारतामध्ये मार्च मध्यानंतर साधारणपणे कम्युनिटी स्प्रेडला सुरुवात होईल.

आणि जवळजवळ ३० ते ४० कोटी लोकांना याची लागण होईल.

 

corona community inmarathi
INretail

 

एप्रिल आणि मे मध्ये याची साथ इतकी भयंकर असेल की, देशातील १० कोटी जनता कोरोनामुळे बाधित होऊ शकते. एक कोटी लोक हे गंभीर आजारी होतील!

तर तीन ते चार कोटी लोकांना विशेष वैद्यकीय उपचारांची गरज भासेल. हे आकडे पाहिले तर सहज कल्पना येईल की भारतापुढे येणारं संकट हे किती मोठं आहे.

याची कल्पना असल्यामुळेच सरकारने संपूर्ण देशभर लॉक डाऊन केला आहे. परंतु तरीही कोरोनाचा धोका टळलेला नाही.

भारतातल्या अनेक मोठ्या शहरांमध्ये जिकडे झोपडपट्ट्या किंवा स्लम एरिया असतो त्याठिकाणी कोरोनाचे रुग्ण मिळत आहेत त्यामुळेच हे संकट अधिक गहिरं होत आहे.

लॉक डाऊन झाल्यामुळे ज्यांचे हातावरचे पोट होते असे लोक पलायन करत आहेत किंवा स्थलांतर करत आहेत. आणि ते हेच लोक आहेत जे शहरांमध्ये झोपडपट्ट्यांमध्ये राहतात.

 

lockdown effect inmarathi
Al jazeera

 

जर हे लोक आपल्या गावी गेले आणि त्यातला जर कोणी कोरोना बाधित असेल तर त्या नवीन ठिकाणी कोरोना व्हायरसचा प्रसार होण्यास वेळ लागणार नाही.

आणि हीच काळजी सरकारला सतावत आहे.

केवळ याच कारणासाठी १४ एप्रिल पर्यंत सरकारने लॉक डाऊन केले आहे. इतकेच नाही तर वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन देखील भारत सरकारला याबाबत मदत करत आहे.

जे रुग्ण सापडत आहेत, त्यांच्या कॉन्टॅक्टमध्ये आलेल्या व्यक्तींना शोधून काढणे त्यांचं विलगीकरण करून १४ दिवस अलग ठेवणे इत्यादी उपाय करा, असे वारंवार सांगत आहे.

वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन भारतातल्या परिस्थितीवर लक्ष ठेवून आहे. जर कोरोना व्हायरसच्या प्रसाराचा वेग मंदावला तर तो व्हायरस कसा घालवायचा यावर लक्ष केंद्रित करता येईल असं त्यांचं म्हणणं आहे.

 

WHO inmarathi
Mashable Sea

 

म्हणूनच वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन कडून सांगण्यात येणार्‍या सगळ्या गोष्टींचे पालन सगळ्यांनीच करणे आवश्यक आहे. जेणेकरून आपल्या भारतावर कोरोनाचं संकट वाढू नये.

कोरोना विरुद्ध काय खबरदारी घेतली पाहिजे याबद्दल वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन दिलेले सल्ले

१. नियमितपणे आपले हात अल्कोहलबेस्ड् हँडवॉशने धुतले पाहिजेत.

२. समाजात वावरताना सोशल डिस्टन्सिंगचं भान ठेवलं पाहिजे.

३. चेहरा,नाक, डोळे आणि तोंड यांचा स्पर्श टाळला पाहिजे.

 

handwash and mask inmarathi
healio

 

४. तुम्हाला सर्दी झाली असेल तर घरी राहणे जास्त चांगले. पण बाहेर जायचं असेल तर तोंडावर मास्क बांधून बाहेर पडावे. 

५. शिंक आल्यास तोंडावर रुमाल किंवा टिशू धरावा आणि तो टिशू बंद डस्टबीन मध्ये टाकावा. जर टिशू नसेल तर आपल्या हाताचे कोपर तोंडाजवळ आणून शिंकावं.

६. सर्दी ,ताप, खोकला आणि श्वास घ्यायला त्रास होत असेल,अशी लक्षणं आढळली तर लगेच डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.

७. जर तुम्ही वयोवृद्ध असाल आणि तुम्हाला उच्च रक्तदाब, मधुमेह इत्यादी आजार असतील तर शक्यतो प्रवास करणे टाळा.

लॉक डाऊनच्या नियमांचं पालन केले पाहिजे.

===

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?