' कोरोना संकटात “टाटा”कडून जे घडलं ते दाखवून देतं, की ते सर्वोत्तम उद्योजक आहेत! – InMarathi

कोरोना संकटात “टाटा”कडून जे घडलं ते दाखवून देतं, की ते सर्वोत्तम उद्योजक आहेत!

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामशेअरचॅट

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

===

कोरोनाची दुसरी लाट आली आहे. भारतात कोरोना पुन्हा नव्याने चांगलाच हात पाय पसरू लागला आहे. त्याचं सावट जसजसं गडद होत आहे तसतसं सरकारदेखील नवीन उपायोजना करण्याचा प्रयत्न करत आहे.

राज्यात पुन्हा लॉकडाऊन लागण्याची स्थिती निर्माण झाली आहे. परिस्थिती गंभीर झाल्याचं येणाऱ्या आकड्यांवरून लक्षात येतंय. आता कोरोना रुग्णांच्या संख्येत पुन्हा नव्याने वाढ होत आहे. देशभरात दीड लाखांपेक्षा जास्त कोरोना रुग्ण आढळून आले आहेत.

त्यामुळे संपूर्ण आरोग्य व्यवस्थेवर सुद्धा त्याचा ताण येणार आहे, पोलीस यंत्रणा सुद्धा पुन्हा सतर्क झाली आहे.

 

curfew inmarathi 6

 

मागच्या वर्षी याचकाळात अशी कठीण परिस्थिती उद्भवली होती, तेव्हा  देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जनतेने पंतप्रधान निधी आणि मुख्यमंत्री सहाय्यता निधी यासाठी नागरिकांनी मदत करावी आणि आपला खारीचा वाटा, देश सावरण्यासाठी उचलावा असे आवाहन करत होते.

अनेक सामाजिक संस्था, कंपन्या, सामान्य लोक, कलाकार मंडळी अशा सगळ्यांनीच मदत करण्यासाठी पुढाकार घेतला होता. सामाजिक भान जपलं होतं.

 या सगळ्यात पहिल्यांदा जी सगळ्यात मोठी मदत मिळाली ती टाटा ग्रुप कडून! टाटा ट्रस्टने ५०० कोटी रुपयांची मदत जाहीर केली असून टाटा सन्सने  १००० कोटी रुपयांची मदत जाहीर केली होती.

टाटा ग्रुपने दिलेल्या १५०० कोटी रुपयांच्या निधीचा विनियोग हा कोरोना बाधित रुग्णांच्या उपचाराकरिता केला गेला. डॉक्टर नर्सेस यांच्यासाठी उपयुक्त उपकरणे घेण्यासाठी याचा वापर झाला.

 

corona suit inmarathi

 

कोरोना आजाराची चाचणी करण्यासाठी लागणारे किट्स घेण्यासाठीदेखील हा निधी वापरला गेला. अत्याधुनिक उपकरणे आणि व्हेंटिलेटर मिळवण्यासाठी देखील हा निधी मोठ्या प्रमाणावर उपयुक्त ठरला आहे.

कोरोना पेशंट्सची काळजी घेण्यासाठी, आरोग्य विभागातील व्यक्तींना ट्रेनिंग देण्याकरिता देखील या निधीचा हातभार होता यात शंका नाहीच.

टाटा ग्रुपने नेहमीच आपली सामाजिक बांधिलकी जपलेली आहे. देशात कधीही कुठलेही संकट आलं तरी पहिल्यांदा टाटा ग्रुप मदतीला धावतो.

या परिस्थितीवर भाष्य करताना टाटा ग्रुपचे अध्यक्ष रतन टाटा म्हणाले होते, की “भारत आणि जगातली परिस्थिती सध्या गंभीर आणि चिंताजनक असून त्यावर त्वरित उपाय करणे आवश्यक आहे.”

===

हे ही वाचा – शब्दांनी नव्हे तर कृतीतून अपमानाची परतफेड कशी करावी हे सांगणारी टाटांची ही कथा

===

आत्तापर्यंत देशात जेव्हा जेव्हा आपत्तीजनक परिस्थिती आली आहे, तेव्हा तेव्हा टाटा ट्रस्ट आणि टाटा समूहाने देशाच्या गरजा भागविण्याकरिता पावले उचलली आहेत.

रतनजी असंही म्हणाले, की “कोरोनाची परिस्थिती अधिक कठीण आहे यात दुमत नाही. संपूर्ण मानवजातीसाठी हा सध्या परीक्षेचा काळ आहे.

परंतु मला विश्वास आहे की, आपण सर्व संसाधने तयार करून या covid-19 शी लढा देऊ शकू आणि देशाला या संकटातून बाहेर काढू शकू.”

टाटा यांचा हा विश्वास आज सार्थ ठरलेला दिसत आहे. कोरोनाची दुसरी लाट देशात आलेली असताना, आपण या परिस्थितीला तोंड देण्यासाठी आपण तयार आहोत.

 

ratan tata inmarathi 4

 

टाटा ट्रस्टकडून आलेल्या निवेदनात असेही म्हणण्यात आलेलं होतं की, टाटा ट्रस्ट, टाटा सन्स आणि टाटा ग्रुप या कंपन्या स्थानिक आणि जागतिक पातळीवर सरकार बरोबर असून covid-19 बरोबर लढण्याकरिता तयार आहेत.

म्हणूनच टाटा ग्रुपने हे  १५०० कोटी रुपये कोरोना व्हायरसच्या संकटाचा मुकाबला करण्याकरिता दिले आहेत. टाटा यांनी टाकलेलं हे पहिलं पाऊल फारच महत्त्वाचं ठरलं होतं. त्यानंतर मदतीचा ओघ मोठ्या प्रमाणावर सुरु झाला होता.

टाटा ग्रुप सामाजिक बांधिलकी जपण्यात नेहमीच पुढे असतो. टाटा ग्रुपची ही परंपरा आली, ती टाटा ग्रुपचे संस्थापक जमशेदजी टाटा यांच्यापासून. त्यांनी स्वातंत्र्य मिळवण्याच्या आधीपासून उद्योगधंदे सुरू केले आणि लोकांना मदत केली. तीच परंपरा पुढे चालवली ती JRD टाटा यांनी.

रतन टाटांकडे आपण आदर्श म्हणून पाहतो, पण त्यांचे आदर्श होते जी आर डी टाटा. रतन टाटा यांनी त्यांच्या आठवणी सांगताना या सगळ्या गोष्टींचा उल्लेख करतात.

JRD टाटा यांनी देशातली मोठी कंपनी चालवली पण स्वतःचं घर घेतलं नाही. ते आयुष्यभर भाड्याच्या घरात राहिले.

 

jrd tata inmarathi

 

एअर इंडिया ही त्यांच्या मालकीची असून देखील ते इकॉनॉमी क्लासने प्रवास करायचे, स्वतःचे सामान स्वतः घ्यायचे. रस्त्यावर कुणी टॅक्सीसाठी वाट पाहत असेल तर आपल्या गाडीतून लिफ्ट द्यायचे.

त्यांच्याकडून मला खूप शिकायला मिळालं असं रतन टाटा म्हणतात. JRD टाटा म्हणजे देशप्रेमाने ओतप्रोत भरलेले व्यक्तिमत्व. देशाला कधी गरज असेल तेव्हा त्यांनी सढळ हाताने मदत दिली आहे.

कंपनीत कधीही गैरव्यवहार करू दिला नाही. कुणी करण्याचा प्रयत्न केला तरी त्याला विरोध करून काढून टाकलं आहे. त्यांनी कधीही आपल्या कंपनीच्या प्रॉडक्ट बरोबर कॉम्प्रमाईज केलं नाही, कायमच उत्तम देण्याचा प्रयत्न केला आहे.

टाटा ग्रुप किंवा टाटा कंपनी याच्या विषयी कोणी चांगलं बोललं तर त्यांना फार बरं वाटायचं, आपण केलेल्या कामाचं कौतुक होतंय असं त्यांना वाटायचं.

टाटा कंपनीतील अगदी शेवटच्या माणसालाही ती कंपनी आपली आहे असं वाटत असेल तर आपण काम चांगलं करतोय, असं समजायचं असं ते म्हणायचे.

मदत तर त्यांनी सगळ्यांनाच केली कंपनीतल्या माणसापासून ते देशापर्यंत. निराशेच्या गर्तेत अडकलेल्या माणसाला आशेचा किरण देण्याचे काम नेहमीच टाटा ग्रुपकडून करण्यात आलेला आहे.

 

ratan tata inmarathi

 

त्यांची हीच परंपरा रतन टाटा यांनी देखील पुढे चालू ठेवली आहे. म्हणूनच देशावर कितीही मोठं संकट आलं तरी टाटा ग्रुप हा सगळ्यात आधी देशाच्या मदतीसाठी धावतो.

प्रत्येक वेळेस संकटाचे गांभीर्य ओळखून त्यांनी तशी मदत केली आहे. पाकिस्तानने जेव्हा भारतावर हल्ला केला, त्यानंतर पाकिस्तानातले सगळे व्यवहार रतन टाटा यांनी बंद केले.

पूर, भूकंप अशा सगळ्या नैसर्गिक आपत्तीत टाटा ग्रुप मदतीसाठी पुढे आला आहे. आणि आता तर कोरोनाचं मोठं संकट देशापुढे उभे ठाकले आहे.

येणारा काळ हा कसा असेल याची कदाचित आता सध्या कोणालाच जाणीव नसेल, पण तरीही टाटा ग्रुपने मदतीचा हात देऊ करून देशातल्या नागरिकांना दिलासा दिला आहे.

केवळ पुरस्कार आणि नावलौकिकासाठी टाटा ग्रुपने कधीही काम केलं नाही. म्हणूनच इतर कंपन्यांपेक्षा टाटा हे नेहमीच वेगळे ठरतात.

===

हे ही वाचा – आदर्श व्यक्तिमत्व कसं असावं? हे रतन टाटांच्या या गोष्टी वाचून समजतं

===

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?