' केवळ सर्दी, खोकला नव्हे तर कोरोनाच्या या लक्षणांकडे दुर्लक्ष करणं धोक्याचं ठरेल! – InMarathi

केवळ सर्दी, खोकला नव्हे तर कोरोनाच्या या लक्षणांकडे दुर्लक्ष करणं धोक्याचं ठरेल!

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम |

===

मागील काही दिवसांपासून संपूर्ण जगाला फक्त एकाच शब्दाची धास्ती आहे आणि तो शब्द म्हणजे कोरोना, संपूर्ण जगाने या व्हायरसचा धसका घेतलाय.

१९२ देशांमध्ये या कोरोनाने मागच्या काही दिवसांमध्ये थैमान घातले आहे. अर्ध्याहून अधिक जग या व्हायरस पासून वाचण्यासाठी लॉक डाऊन आहे.

चीनमधून हा व्हायरस जगभरामध्ये अगदी कमी काळात पसरला आहे. युरोपमध्ये तर या व्हायरसमुळे अक्षरशहा मृत्यू तांडव चालू आहे.

इटली, स्पेन, जर्मनी, इंग्लंड अशा देशांमध्ये हजारो रुग्ण आढळत आहेत आणि शेकडोंचा मृत्यू होत आहे. अशा परिस्थितीत आपल्या सर्वांना कोरोनाबद्दल माहिती असणे अत्यंत गरजेचे आहे.

 

corona attack inmarathi
financial times

 

खोकला, ताप, सर्दी ही लक्षणे जर जाणवत असतील तरच कोरोना होतो असं नाही त्यासोबतच अनेक वेगळी लक्षण आहेत ज्या लक्षणांबद्दल आपल्याकडे मोठ्या प्रमाणावरती प्रबोधन झालेलं नाही.

ही लक्षणे जाणून घेणे अत्यंत गरजेेेचं आहे. चला तर मग या लेखामध्ये आपण करोना या आजाराबद्दल आणि त्याच्या लक्षणांवर बद्दल जास्त माहिती जाणून घेऊयात!

गेल्या काही दिवसांमध्ये भारत सरकारने कोरोना बद्दल प्रबोधन करण्यासाठी सुरुवात केलेली आहे. अगदी सामान्य नागरिकांच्या कॉलरट्यून देखील भारत सरकारने बदललेल्या आहेत.

काही व्यक्तींना या गोष्टीचा त्रास जरी होत असेल तरीही कोरोना बद्दल सरकारने प्रबोधनासाठी उचललेलं हे पाऊल नक्कीच प्रशंसनीयच आहे.

सोशल डिस्टन्सिंग सोबतच आपल्याला कोरोना या आजाराबद्दल सर्व माहिती असणे देखील गरजेची आहे.

सर्वसामान्य पणे प्रत्येकाला एवढेच माहिती आहे की ताप, सर्दी, खोकला ही कोरोनाची मुख्य लक्षणं आहेत, परंतु जवळपास सर्वच आजारांबाबत असेच आढळून येते.

 

corona heart inmarathi

 

मग कोरोनाबाबत अधिक लक्षणे कुठली असा प्रश्न प्रत्येकाला पडला असेल?

मित्रांनो माणसाला पंचज्ञानेंद्रियांच याचं वरदान मिळालं आहे असं म्हणता येईल डोळे, त्वचा, जीभ, नाक आणि कान या 5 अवयवांच्या मदतीने आपण दैनंदिन आयुष्यातील अनेक कामे लीलया पार पाडू शकतो.

पण कोरोनामुळे या पाचपैकी काही अवयव त्यांचं काम व्यवस्थित करू शकत नाहीत.

म्हणजेच जर तुम्हाला कोरोना झाला आहे की नाही हे जाणून घ्यायचं असेल तर तुम्हाला चव जाणवते आहे का आणि वास येतो आहे का या दोन गोष्टी व्यवस्थित लक्षात घ्या!

कारण कोरोना बाधित रुग्णाला या पैकी काहीही लक्षात येत नाही असे अनुभव समोर आले आहेत.

 

corona doctors inmarathi
CNBC.com

 

तुमच्या अगदी व्यवस्थित लक्षात यावं म्हणून इथे एका युट्युबरची व्यथा मांडत आहोत, त्याची कथा ऐकल्यानंतर तुमच्या लक्षात येईल की कोरोना बाबत अजून काय लक्षणे असू शकतात.

दक्षिण आफ्रिकेतील एक युट्यूबर आहे त्याचं नाव आहे डेन मेस, जो नेहमीच ट्रॅव्हल व्हिडिओ तयार करत असतो. त्याने काही दिवसांपूर्वी एक व्हिडिओ त्याच्या युट्युब अकाउंटला शेअर केला होता.

डेनला कोरोना व्हायरस झालेला असून तो सध्या होम क्वारंटाईन मध्ये आहे. डेन नेहमीच अमेरिकेतून काम करत असतो.

 

dane mace inmarathi
head topics

 

काही दिवसांपूर्वी म्हणजेच १५ फेब्रुवारी रोजी तो आजारी होता, त्याला अशक्तपणा जाणवू लागला परंतु त्याने फार गंभीरपणे या गोष्टीचा विचार न करता घरीच काही औषध घेऊन आराम करण्याचे ठरवले!

परंतु एक-दोन दिवसांनी देखील बरं न वाटल्याने तो डॉक्टरांकडे गेला. डॉक्टरांना त्याच्यामध्ये कुठलीही कोरोनाची लक्षणं आढळली नाहीत.

काही दिवसांनी बरे वाटल्यावर तो अमेरिकेतून दुबई मार्गे साउथ आफ्रिकेत पोहोचला. (यावेळेला हे लक्षात घ्या की त्याला १५ फेब्रुवारी पासून अन्नाची चव येत नव्हती आणि वास देखील येत नव्हता)

साउथ आफ्रिकेत आल्यानंतर तो एका मोठ्या संगीताच्या कार्यक्रमाला (music concert) देखील गेला!

 

dan mace inmarathi
YouTube

 

आणि काही दिवसांनी अस त्याच्या असे लक्षात आले की कोरोना बाधित व्यक्तींना देखील कसल्याही प्रकारची चव किंवा वास येत नाही. त्यामुळे त्याने स्वतः डॉक्टरांकडे जाऊ टेस्ट करून घेतली.

तेव्हा त्याच्या लक्षात आले की त्याला कोरोना हा आजार झालेला आहे.

सध्या त्याच्या सहित, त्याचं संपूर्ण कुटुंब आणि त्याचा कुत्रा देखील होम क्वारंटाईन मध्ये ठेवण्यात आलेला आहे.

 

quarantine inmarathi
ilovequtar

 

त्यामुळे फक्त सर्दी आणि खोकला याच गोष्टींचा विचार न करता इतरही काही लक्षण आहेत शास्त्रज्ञांच्या आणि काही कोरोनाबाधितांच्या लक्षात आलेली आहेत.

त्यामुळे ही लक्षणे जर तुम्हाला जाणवत असतील तर लगेच डॉक्टरांकडे जाऊन करोना टेस्ट करून बघावी.

एक गोष्ट लक्षात घ्या की जुन्या कोरोना व्हायरस बाबत आपल्याकडे काही प्रमाणात माहिती उपलब्ध होते परंतु, या नवीन कोरोना व्हायरस बाबत आणि त्याच्या लक्षणां बाबत फार काही माहिती आजही उपलब्ध नाही.

परंतु इतर देशांमध्ये बाधित रुग्णांनी जी काही माहिती आणि अनुभव आपल्याला दिलेले आहेत त्याच्यावरून आपण ही लक्षणे ठरवत आहोत.

 

corona symptoms inmarathi
Mi Diario

 

असे देखील असू शकते की जी नवीन लक्षण आता समोर आली आहेत याशिवाय देखील अजून काही अधिक लक्षणे असू शकतील. परंतु ती हळूहळू पुढे येतील.

आपल्याला जेवढी जास्त लक्षणं माहिती असतील, तेवढ्या मोठ्या प्रमाणात आपल्याला करोनाबाधित लोकं शोधण्यास मदत होईल.

अनेक ठिकाणी खोकला आणि ताप एवढीच लक्षणे मोठ्या प्रमाणावर दिसून आल्यामुळे त्यांना ऍडमिट केलेलं आहे.

कदाचित सर्व ठिकाणी मुबलक प्रमाणात टेस्ट किट उपलब्ध झाल्यानंतर त्यांचा हा आकडा कमी-जास्त होऊ शकतो.

त्यामुळे सध्या या परिस्थितीत घरात राहून आपल्या व आपल्या कुटुंबाची काळजी घेणे हा एकमेव व उपाय आपण करू शकतो एवढं लक्षात घ्या.

===

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?