कौरवांची जन्मकथा आणि १०० कौरवांची नावं, जाणून घ्या !
आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम |
===
महाभारत म्हणजे धर्म आणि अधर्माची लढाई! सत्य आणि असत्याचे द्वंद्व! पांडवांची बाजू खरी तर कौरवांची बाजू खोटी! आणि नेहमीप्रमाणे विजयश्री पडली खऱ्याच्या गळ्यात म्हणजेच पांडवांच्या गळ्यात!
मूळ महाभारताबद्दल इतरत्र जाणून घेताना सर्व पांडवांच्या नावांचा वारंवार उल्लेख होतो. परंतु सर्वच कौरवांच्या नावांचा उल्लेख होत नाही. ज्यांना महाभारताचे सखोल ज्ञान आहे त्यांना या कौरवांची नावे माहिती असतील पण सामान्य वाचकांना आजही दुर्योधन, दु:शासन आणी फार फार तर दुर्मुख ही तीनच नावे माहित असतात.
बाकी उरलेल्या ९७ जणांची नाव आपल्या खिजगणतीतही नाहीत. आज याच सर्व १०० कौरवांची नावे आज आम्ही तुम्हाला सांगत आहोत. त्यापूर्वी कौरवजन्माची कथा जाणून घेण महत्त्वाचं आहे.
आपला पती दृष्टिहीन आहे हे समजल्यावर पत्नीधर्माचे पालन करत गांधारीने देखील आपल्या डोळ्यावर आजन्म पट्टी बांधून ठेवण्याचा संकल्प सोडला होता. एकदा महर्षी व्यास हस्तिनापुरात आले असताना गांधारीने त्यांचा उत्तम पाहुणचार केला.
त्यामुळे खुश होऊन व्यासांनी तिला वरदान मागण्यास सांगितले. त्यानुसार गांधारीने आपल्या पोटी शंभर पुत्रांनी जन्म घ्यावा जे अतिशय शूर असतील असा वर मागितला.
व्यासांनी दिलेल्या वरदानानुसार गांधारी गरोदर राहिली परंतु दोन वर्षे झाली तरी पोटातील अर्भकाने काही जन्म घेतला नाही. महर्षी व्यासांनी आपल्याला फसवले असा समज करून चिडलेल्या गांधारीने स्वत:च्या पोटावर मुक्का मारून गर्भ पाडला.
महर्षी व्यासांनी आपल्या अंतर्ज्ञानाने ही गोष्ट तत्काळ ओळखली आणि त्यांनी तडक गांधारीला गाठले. आपले वरदान कधीही वाया जाणार असे सांगून व्यासांनी तिला तुपाचे १०० कुंड (लहान भांडे) तयार करायला सांगितले. त्यानंतर महर्षी व्यासांनी गांधारीच्या गर्भ मांसाचे बरोबर १०० तुकडे करून ते तुकडे त्या १०० कुंडांमध्ये ठेवले.
महर्षी व्यासांच्या आदेशानुसार सुमारे २ वर्षांनी ती सर्व कुंडे खोलण्यात आली. पहिले कुंड खोलताच त्यात एक लहान अर्भक आढळले. त्याचे नाव दुर्योधन ठेवण्यात आले. त्यानंतर इतर ९९ कुंडे खोलण्यात आली आणि प्रत्येकामध्ये एक लहान अर्भक आढळले. अश्याप्रकारे १०० कौरवांचा जन्म झाला.
या शंभर कौरवांना दुःशला नावाची सर्वात धाकटी एक बहीण देखील होती. तिचा विवाह जयद्रथाशी झाला होता. कौरवांना अजून एक भाऊ होता. परंतु तो दासीपुत्र होता.
जेव्हा गांधारी गरोदर होती तेव्हा धृतराष्ट्राची काळजी घेण्यासाठी सुखदा नावाची एक दासी नेमण्यात आली होती. या दोघांना एक पुत्र झाला, तोच दासीपुत्र युयुत्सु होय.
खाली दिलेली कौरवांच्या नावांची यादी महाभारतातच द्रौपदी स्वयंवर, घोषयात्रा व उत्तरगोग्रहण आदी ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारांनी दिली आहे.
तर असे हे शंभर कौरव म्हणजे एकाहून एक वीर होते, पण असत्याच्या बाजूने लढले आणि त्यांच्या शूरपणावर कधीही न पुसला जाणारा कलंक लागला.
===
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | Copyright © InMarathi.com | All rights reserved.
very interesting.
Khup changla article aahe. Dhnyawad.
Very informative post.
Very informative article. Thanks for sharing sir.
That’s great information.
Good