' ही व्यक्ती नसती तर कोरोनाशी "दोन हात" करणं निव्वळ अशक्य झालं असतं

ही व्यक्ती नसती तर कोरोनाशी “दोन हात” करणं निव्वळ अशक्य झालं असतं

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम |

===

सतत प्रवासात असणाऱ्या व्यक्तीच्या सोबत डेटॉलची लहान सॅनिटायझरची बॉटल ही असतेच असते. सतत हात धुवायला कंटाळा येतो म्हणून हात स्वच्छ ठेवायला शॉर्टकट!

पण आता तर हेच सॅनिटायझर जवळपास प्रत्येक घरात,ऑफिस मध्ये कम्पलसरी झालेलं दिसत आहे. कारण ‘कोरोना’!

सध्या करोना व्हायरसमुळे जगभर हाहाकार माजला आहे. या रोगामुळे इटलीमध्ये आतापर्यंत सगळ्यात जास्त बळी गेले असून इतर देशांमध्येही हा आजार वेगाने पसरतोय.

आपल्या देशात सुद्धा हा आजार पसरू नये म्हणून सरकार शर्थीचे प्रयत्न करतंय. एक सुजाण नागरिक म्हणून या प्रयत्नांना यापासुन योग्य साथ दिली पाहिजे. लॉकडाऊनमुळे प्रत्येकाने घरी बसणे अनिवार्य आहे.

 

janata curfew inmarathi
the statesman

 

घरी असताना स्वच्छता बाळगणं सुद्धा गरजेचं आहे.

जसं कळलं की, सॅनिटायझर मुळे कोरोनाचा धोका हा कमी होतो तसं लोकांनी त्याच्या बाटल्याच्या बाटल्या विकत घेऊन घरात स्टॉक करुन ठेवला आणि मार्केट मध्ये शॉर्टेज निर्माण केला.

पण, हे सॅनिटायझर म्हणजे नक्की आहे तरी काय? याचा शोध तरी कसा लागला?

आजच्या कोरोनाग्रस्त दिवसात, सगळ्यांच्याच आरोग्याच्या चिंतेचा विषय असताना स्वच्छतेसाठी सोप्प मार्ग ठरलेल्या सॅनिटायझरचा शोध कसा लागला त्याबद्दल जाणून घेऊया!

 

Hand sanitizer InMarathi

 

लूप हर्नांडिस,  बेकर्सफिल्ड, कॅलिफोर्निया येथे राहणारी मेडिकल नर्सिंगची विद्यार्थिनी! म्हणतात की, गरज ही शोधाची जननी आहे. तसंच काहीसं हिच्या सोबत घडलं.

म्हणजे मेडिकल प्रोफेशन मध्ये रुग्णांच्या संपर्कात यायच्या आधी आपले हात स्वच्छ असावे असा नियमच आहे. त्या अनुषंगाने सर्व कर्मचारी वागत असतात.

पण जर एखाद्या रिमोट एरिया मध्ये गेलो आणि तिथे पाणी आणि साबणाची सोयच नसेल तर? याचा अर्थ पेशंट अटेंट करायचे नाही असं तर नाही. पण पुन्हा संसर्गाचा धोका आहेच.

या परिस्थिती वर मात करण्यासाठी तत्कालीन शोध चालू तर होते, पण उत्तर मात्र मिळत नव्हतं.

१९६६ म्हणजे आज पासून जवळपास ५४ वर्षांपूर्वी लूप ला एक कल्पना सुचली. अल्कोहोल तर रोगजंतू प्रतिकारक, हे आपण सगळेच जाणतो.

 

sanitizer inmarathi 1
IForHer

 

तर,अल्कोहोलला जेल स्वरूपात साठवून ते वापरता येईल का याचा विचार लूप ने चालु केला आणि ती यामध्ये यशस्वी सुद्धा झाली.

मेडिकल क्षेत्रात क्रांती आणणारी तिची ही संकल्पना कमर्शियल दृष्टीने पण हिट होईल याची तिला तिळमात्र सुद्धा कल्पना नव्हती. तेव्हा अमेरिकेत पेटंट टाकायचं म्हणजे टीव्ही वर येणासाठीचा उत्तम पर्याय होता.

तेव्हाच्या शोधांना मान्यता देऊन पेटंट देण्यासाठी ‘इन्व्हेन्शन हॉटलाईन’ कार्यरत होती. त्यांच्याकडून लूप ला निमंत्रण आलं आणि लुपची ती कल्पना रातोरात अमेरिकेत हिट झाली.

केवळ रुग्णांपासून रोग संसर्ग टाळावा म्हणून प्रक्रिया करून तयार करण्यात आलेलं हे हॅन्ड सॅनिटायझर बघता बघता अमेरिकेत प्रसिद्ध झालं.

हॉस्पिटल आणि क्लिनिकच्या पुढे जाऊन हे सॅनिटायझर सुपरमार्केट मधून लोकांच्या वैयक्तिक वापराची गोष्ट बनली.

 

sanitizer inmarathi

 

केवळ अमेरिकेतचं २००२ साली हॅन्ड सॅनिटायझरचा बिझनेस २ करोड ८० लाख डॉलर च्या घरात होता. आणि आता कोरोना मुळे त्याची वाढलेली मागणी बघता अंदाज लावा याच हॅन्ड सॅनिटायझरचा व्यवसाय किती झाला असेल.

कोरोना यायच्या आधी २००९ मध्ये चीनमधूनच जगात पसरलेल्या एच१ एन१ स्वाईन फ्ल्यू च्या दरम्यान सुद्धा हॅन्ड सॅनिटायझरच्या मागणी ने आकाश गाठलेलं.

आणि हे बर्‍याच वेळा दर्शविले गेले आहे की, जेव्हा एखादा सुपरबग (कोरोना/स्वाईन फ्ल्यू सारखे विषाणू) बाहेर पडतात तेव्हा त्यांची संसर्ग पसरवण्याची क्षमता ही अफाट असते.

द गार्डियनच्या वृत्तानुसार संसर्गजन्य रोगतज्ज्ञ म्हणतात,

“लोकांना स्वतःच्या आरोग्याची काळजी आहे. म्हणून असले संसर्गजन्य रोग वाढले की बाजारात आपोआप हायजेनिक प्रोडक्ट ची मागणी वाढते.”

आणि मागणी आली की पुरवठा आला आणि आपोआप व्यवसाय/बिझनेस आला. सध्याच्या कोरोना व्हायरसच्या तडाख्यात आपल्याला सॅनिटायझरचा तुटवडा हे दाखवुनच देत आहे.

सॅनिटायझरच्या वाढत्या मागणी मुळे आरोग्य विषयक असलेल्या या उत्पादनात जागतिक आरोग्य संघटनेला लक्ष घालावे लागले.

 

hand sanitizer inmarathi

 

जेव्हा जेव्हा सॅनिटायझर ची मागणी ही वाढली तेव्हा तेव्हा मद्य आणि परफ्युम उत्पादक आपल्या सामान्य प्रॉडक्ट्स वरून सॅनिटायझर वर स्विच मारायला लागले.

यावरच उपाय म्हणून वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन ने २०१० साली स्वाईन फ्ल्यू च्या साथी नंतर हॅन्ड सॅनिटायझर संबंधित गाइडलाईन्स जाहीर केल्या.

या गाइडलाईन्स फॉलो करून तयार केलेलं सॅनिटायझर चं आज मार्केट मध्ये उपलब्ध आहेत. स्वाईन फ्ल्यू नंतर आता कोरोना पासून किंवा त्याच्या विषाणू पासून सुरक्षित ठेवण्याचे काम लूप चे हे प्रॉडक्ट करत आहे.

विशेष म्हणजे जग आज तिचं हे सॅनिटायझर प्रॉडक्ट वापरताना ती स्वतः बघत आहे. यावर तिला विचारले असता लूप म्हणते,

केवळ सामान्य गरजेपुरते तयार केलेल्या या वस्तूला एवढी मागणी मिळेल असा वाटलं नव्हतं.आणि यात अल्कोहोल जे आग आकर्षित करण्यासाठी कपॅबल आहे म्हणून, आगीपासून विशेष काळजी घ्यायला विसरू नका.

तर,

स्वतः सोबत जगाला सुरक्षित ठेवण्यासाठी शोधलेल्या या सॅनिटायझर बद्दल लूप चे आभार मानणे तर बनता है ना?

===

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | Copyright © InMarathi.com | All rights reserved. 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?