' इटलीला कोरोनाच्या विळख्यातून सोडवण्यासाठी क्युबन डॉक्टर्स करत असलेलं “हे” काम माणुसकीचं प्रतीक आहे – InMarathi

इटलीला कोरोनाच्या विळख्यातून सोडवण्यासाठी क्युबन डॉक्टर्स करत असलेलं “हे” काम माणुसकीचं प्रतीक आहे

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम |

===

सध्या कोरोना, कोरोना, कोरोना हेच शब्द आपल्याला ऐकायला मिळत आहेत. संपूर्ण जगभरात त्याची दहशत आहे.चीनमध्ये इतके लोक गेले.आता इटलीने चीनला मागे टाकलं, कोरोना मुळे इटलीमध्ये सगळ्यात जास्त मृत्यू झालेले आहेत.

फ्रान्स, ग्रेट ब्रिटन, स्पेन, इराण आणि अमेरिका सगळीकडे कोरोनामुळे हाहाकार माजला आहे. भारतातही कोरोना फोफावलाय.

सगळ्या मीडियामध्ये न्यूज चॅनल्स, फेसबुक, ट्विटर, व्हाट्सअप, इंस्टाग्राम सगळीकडे केवळ कोरोनाच आणि त्याच्याच बातम्या आपल्याला दिसत आहेत.

लोक परदेशातले व्हिडिओज सगळीकडे शेअर करत आहेत, त्यामुळे आपल्याही मनात निगेटिव्ह विचार येत राहतात. आणि अशा काळात कसं राहावं हेच समजेनासं होतं.

 

corona virus inmarathi 3
wall street

 

या आजारामुळे इटलीत सगळ्यात जास्त लोक दगावले आहेत. इटलीत माजलेल्या हाहाकाराच्या बातम्या आपण रोज ऐकतोय. मन विषण्ण करणाऱ्या या बातम्या आहेत.

इटलीला एका छोट्या देशाने मदतीचा हात पुढे केलाय… कोणता देश आहे हा?

क्युबा : एक छोटेसे कॅरेबिअन बेटं आहे, जिथली लोकसंख्या आहे जेमतेम एक करोड पेक्षा थोडी अधिक. पण आज ह्या गरीब देशाने इटली सारख्या प्रगत देशाकरता मदतीचा हात पुढे केला आहे.

आज संपूर्ण जगात कोरोना व्हायरस ने जे थैमान घातले आहे ते आपण पाहतोच आहोत, त्यात इटली सारखा प्रगत देश कोरोना मुळे होणारे मृत्यूचे तांडव अनुभवतो आहे.

दर दिवशी शेकडो लोक मृत्युमुखी पडत आहेत आणि हजारो नवे रुग्ण समोर येत आहेत. अशा परिस्थितीत तेथील वैद्यकीय सामग्री, बेड्स, व्हेंटिलेटर हे सारं कमी पडले तर नवल नाही.

 

corona italy featured inmarathi
Time

 

त्या शिवाय तेथील तज्ज्ञ डॉक्टर आणि नर्सेस अहोरात्र ह्या विषाणूच्या हल्ल्याचा मुकाबला करत आहेत. इटालियन सरकारला मदतीची नितांत गरज असताना त्यांनी शेजारील युरोपिअन युनिअन ज्याचा ते स्वतः देखील एक हिस्सा आहेत , त्यांच्या कडे मदत मागितल्यास काहीच हरकत नाही.

परंतु युरोपियन युनिअन मधील इतर देश जसे, फ्रान्स, ब्रिटन, जर्मनी हे स्वतः देखील ह्याच संकटाचा सामना करत आहेत आणि त्यामुळे त्यांना इटलीला मदत पुरवणे शक्य नसल्याचं त्यांनी स्पष्ट केलं.

ह्या बिकट प्रसंगात इटली च्या सरकार च्या मदतीला धावून आला आहे क्युबा सारखा छोटासा आणि गरीब देश.

१९५९ साली, क्युबा मधील क्रांती नंतर तेथे, “क्युबन मेडिकल इंटरनॅशनॅलिसम” ची स्थापना झाली.

ह्या कार्यक्रम अंतर्गत आफ्रिका आणि लॅटिन अमेरिका खंडातील देशांना वैद्यकीय मदत पुरवणे तसेच तेथील वैद्यकीय विद्यार्थ्यांना आणि रुग्णांना क्युबा मध्ये घेऊन येणे इत्यादी कामे चालतात.

हा एकटा देश, इतर गरजू देशांना गट देशाच्या एकूण मदतीपेक्षा जास्त मदत पाठवत असतो. क्युबा चे ४२००० वैद्यकीय कर्मचारी आंतरराष्ट्रीय करारानुसार १०३ देशांमध्ये काम करत आहे,आणि त्यात १९००० डॉक्टर्स आहेत.

 

cuba doctors inmarathi
mintpress news

 

कोरोना चा सामना करणाऱ्या वेनूझवेला, निकारागुआ, जमेका, सुरीनाम , ग्रेनेडा ह्या ५ देशांना क्युबा ने मार्च महिन्यात डॉक्टर्सची कुमक पाठवली आहे. आणि इटली हा आता सहावा देश आहे.

ह्या टीम मधील अति दक्षता विभागाचे लिओनार्डो फर्नांडेज यांचं म्हणणं आहे की,

आम्ही सारेही घाबरलेले आहोत, परंतु आमच्यावर एक अतिशय मोठी जबाबदारी आहे, आणि त्यासाठी आम्हाला सारे भय मनातून काढून कामाला लागायचे आहे.

जो कोणी म्हणेल की मला कशाचेही भय नाही त्याला ‘सुपरहिरो’ म्हणावे लागेल, परंतु आम्ही सुपरहिरो नाही तर क्रांतिकारी डॉक्टर्स आहोत.

क्युबन डॉक्टर्स बरोबर आलेले पीटर कॉर्नब्लूह यांच्या म्हणण्यानुसार क्युबन वैद्यकीय ब्रिगेड, इटली च्या मदतीसाठी येणे हे ऐतिहासिक आहे.

युरोपियन युनिअन मधील एक प्रगत देश, एका छोट्याशा कॅरेबिअन बेटावरील वैद्यकीय मदत मान्य करत आहे ही फार मोठी बाब आहे. ही  मदत , इतर देशात क्युबाने केलेल्या मानवतावादी कार्याच्या प्रदीर्घ इतिहासात नोंदली जाणार आहे.

इतरांना मदत करणाऱ्या ह्या देशात देखील करोनाचे काही हजार रुग्ण आहेत आणि ते संपूर्ण देखरेखीखाली आहेत. तसंच देशाच्या सीमांवर दक्षता घेण्यात येत आहे.

बाहेरील नागरिकांना देशात येण्यास मनाई आहे, आणि पर्यटकांसाठी कमीत कमी एक महिना हे बेट बंद आहे.

ह्या देशात वैद्यकीय ट्रेनिंगवर भरपूर भर दिला जातो त्यामुळे तज्ज्ञ डॉक्टरांची मोठी फौजच या देशात तयार होते आहे.

येथील वैद्यकीय तज्ज्ञांनी संशोधन करून एक औषध तयार केले आहे जे कोरोना विषाणू संसर्गावर उपचार करण्यासाठी उपयोगी पडत आहे. ज्याचा वापर चीन मध्ये देखील करण्यात आला आहे.

आपत्कालीन स्थितीत छोटा देशही एका प्रगत देशाच्या उपयोगी पडू शकतो हे सत्य आहे, आणि ह्यातून जगाने धडा घ्यायला हवा.

===

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | Copyright © InMarathi.com | All rights reserved. 

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?