'मध्य अमेरिकेतील चमत्कारिक आणि गूढ माया संस्कृतीबद्दल काही रोचक गोष्टी!

मध्य अमेरिकेतील चमत्कारिक आणि गूढ माया संस्कृतीबद्दल काही रोचक गोष्टी!

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामशेअरचॅट

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

===

लेखिका – अभिज्ञा अदवंत 

===

Civilization – संस्कृती – जीवनशैली… आजपर्यंत अनेक संस्कृती उदयास आल्या, स्वतःसाठी स्वतःची प्रगती केली आणि कालानुरूप लोप पावल्या. हडप्पा-मोहेंजोदडो संस्कृती, इंडस – सिंधू संस्कृती ही काही त्यातलीच नवे.

पण मध्य अमेरिकेमध्ये दोन हजार वर्षांपूर्वीच एक संस्कृती उदयास आली – माया संस्कृती. हिला मायान संस्कृती असंही ओळखतात. पुर, दुष्काळ, लोकसंख्यावाढ ह्यांपैकी कोणत्यातरी कारणांमुळे ती लोप पावली. ह्या संस्कृतीमध्ये काही रोचक गोष्टी होत्या त्या आपण जाणून घेऊ.

परकीय आक्रमणांनंतर लोप पावलेल्या माया संस्कृतीला मेक्सिको आणि ग्वातमाला इथल्या गावकरी लोकांनी संस्कृती आणि भाषा आज सुद्धा जतन केल्या आहेत.

 

mayan-people-inmarathi

 

जरी माया लोक आज अस्तित्वात असतील तरी त्यांची राजवट आणि संस्कृती स्पेनच्या १६९७ साली आक्रमणात संपुष्टात आली. चकित करणारी गोष्ट अशी की स्पेनच्या आक्रमणाच्या आधीपासूनच माया शहरे ओस पडायला लागलेली.

तज्ज्ञांच्या मते ह्याची कारणे अवर्षण, हवामानात आलेले बदल किंवा लोकसंख्या वाढ ह्यापैकी काहीही असू शकतात.

 

location of mayan marathipizza

 

भाषा तज्ञांच्या मते ‘शार्क’ हा शब्द माया संस्कृतीच्या बोलीभाषेतून आल्याचे सांगितले जाते. पंधराव्या शतकात समुद्रातल्या मोठ्या मास्यांना “Sharke” असा उल्लेख केला असल्याचे ऑक्सफर्ड डिक्शनरीत आहे.

 

 

माया संस्कृतीत मुलांची नावे त्यांचा जन्म ज्या दिवशी झाला त्यानुसार ठेवली जात असत.

माया संस्कृतीत वैद्यकशास्त्र खूप प्रगत होते. मानवी केसांनी टाके घालणे, दातांच्या किडलेल्या पोकळ भागात भर घालणे त्याही पेक्षा एखाद्या अवयवाच्या जागी कृत्रिम अवयव बसवणे अश्या गोष्टी ते सहज करत असत.

 

prosthesis marathipizza

 

बळी देण्याची प्रथा माया संस्कृतीत सुद्धा होती. तेव्हा ती नरबळीचा होती. आता सुद्धा बळी दिले जातात पण आता ते कोंबड्याच्या बळी देतात.

 

Inquistive_hens marathipizza

 

बळी देण्याची पद्धत फार विचित्र होती. ज्या गुलामांचा किंवा प्राण्यांचा बळी द्यायचा आहे त्याला निळ्या रंगानेसजवले जाई. त्यानंतर त्याला कोणत्याही एका पिरॅमिड वर नेऊन बळी दिला जाई.

 

pyramids marathipizza

 

एकतर बाणांच्या वर्षावात हा बळी दिला जाई किंवा जिवंतपणीच त्याचं हृदय बाहेर काढलं जाई. आणि त्यानंतर पुजाऱ्यांमधलं कुणीतरी त्याची त्वचा काढून मुख्य पुजाऱ्यास भेट देई. त्याच्यापासून वेशभूषा केली जाई.

 

killing marathipizza

 

माया संस्कृतीत “Mesoamerican Ballgame” नावाचा एक खेळ खूप लोकप्रिय होता. ह्या खेळात टीम हरल्यावर एखाद्यावेळी हरलेल्या टीमकडून एकाच शिरच्छेद करण्याची प्रथा होती.

ह्या खेळात धडापासून वेगळे केलेले डोके बॉल म्हणून वापरत. आजही ह्या खेळाचा सुधारित प्रकार ‘उलामा’ म्हणून खेळला जातो. आणि हो धडापासून वेगळे केलेले शीर आज खेळात वापरले जात नाही.

हे खेळ मोठ्या स्टेडियम मध्ये खेळले जाई हे मोठ मोठाले स्टेडियम आजही बघायला मिळतात.

 

stadium marathipizza

 

‘स्टीम बाथ’ ला माया संस्कृतीत खूप महत्व होते. त्यांच्या मते स्टीम बाथ ने सगळ्या impurities धुवून निघतात.

 

 

‘२०१२ मध्ये जगबुडी होणार’ असं तुम्ही २०१२ च्या आधी खूप ऐकलं असेल ना? ते कॅलेंडर ह्याच संस्कृतीतलं. पण  खोलात जाऊन अभ्यास केला तेव्हा कळलं की ह्या संस्कृतीत असे ४ कॅलेंडर आहेत…पहिल्यानंतर दुसरं…त्या नंतर तिसरं…असं चक्र चालूच असतं.

 

calender marathipizza

 

चौथ्या कॅलेंडर नंतर परत पाहिलं सुरू होतं…! म्हणूनच २०१२ ची भीती निराधार होती.

लिखाणाच्या बाबतीत माया संस्कृती प्रगत होती. त्यांच्याकडे असलेल्या साधनांमुळे ते कोणत्याही प्रकारच्या पृष्ठभागावर लिहू शकत होते, अगदी भिंतींवरसुद्धा.

ग्राफिटी? हो ते इथूनच आलं असावं. पण स्पेनच्या आक्रमणात सगळं उध्वस्त झालं.

 

graphity marathipizza

 

माया संस्कृतीच्या लोकांची हत्यारे लोखंड वा स्टील पासून बनलेली नसत. ते ज्वालामुखीच्या खडकापासून हत्यार बनवायचे.

 

osbedian Marathipizza

 

माया संस्कृतीत उच्च, आदरणीय समजले जाणारे पुरुष आपल्या दातांच्या आत जेड – हिरवा मौल्यवान खडा ची भर घालत. आणि स्त्रिया आपल्या दातांना टोकदार करून घेत.

 

chiseld teeth MarathiPizza

 

तर अश्या काही भयानक आणि काही रंजक अश्या माया संस्कृतीबद्दल वाचून तुम्हाला काय वाटतं?

आपली संस्कृती आपल्या वंशजांना काय धक्के देईल?

===

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

InMarathi.com वर विविध लेखकांनी व्यक्त केलेले विचार ही त्यांची वैयक्तिक मतं असतात. InMarathi.com त्या मतांशी सहमत असेलच असं नाही. | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटरइंस्टाग्राम | टेलिग्रामशेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?