लॉकडाऊन, कर्फ्यू , कलम १४४ यामधला फरक प्रत्येकाने नक्कीच समजून घ्यायला हवा

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम |

===

सध्या कोरोना व्हायरसच्या साथीने भारतात आणीबाणीची स्थिती आणली आहे. भारतातले अनेक राज्य लॉक डाउन जाहीर करत आहेत. तरीही लोक ऐकत नाही. जमावबंदी करूनही रस्त्यावर फिरताहेत.

कोरोना व्हायरसच्या साथीचे गांभीर्य लोकांना अजून कळलं आहे असं वाटत नाही. म्हणून मग सरकारने संचारबंदी लागू केली आहे. कलम १४४ चा वापर आता कडकपणे केला जाणार आहे, असं सरकारकडून सांगण्यात येतं आहे.

आणि नाहीच ऐकलं तर कर ठेवून कर्फ्यू लावू असं म्हटलं जातंय.  हे जरी असलं तरी बऱ्याच लोकांना लॉक डाऊन, कर्फ्यू, कलम १४४, संचारबंदी यामध्ये फरक कळत नाही.

 

curfew inmarathi

 

अर्थातच ही कायद्याची भाषा आहे, आणि सामान्य नागरिकांनी कसं वागलं पाहिजे याचे काही निर्देश या कायद्यान्वये दिले आहेत.

आपण बऱ्याचदा पाहतो की, एखाद्या देशात ठिकाणी जर तेढ निर्माण होऊन दंगली सुरू झाल्या, तेथील कायदा आणि सुव्यवस्था जर बिघडल्या तर सरकार त्याठिकाणी कलम १४४ लागू करते.

आपण अलीकडेच पाहिलं असेल की CAA या कायद्याला विरोध करण्यासाठी लोक रस्त्यावर उतरले, आणि दिल्ली सारख्या काही भागात प्रचंड प्रमाणात दंगल उसळली. त्यावेळेसही सरकारने १४४ कलम लागू केले होते.

आता कोरोनाचा कहर संपूर्ण देशात दिसून येतोय. कोरोनाचे रुग्ण दिवसेंदिवस वाढताहेत. आणि आता जर काळजी घेतली नाही तर परिस्थिती हाताबाहेर जाऊ शकते याची जाणीव झाल्यामुळे महाराष्ट्र सरकारने आता संपूर्ण राज्यात संचारबंदी लागू केली आहे.

कलम १४४ ची कडक अंमलबजावणी केली जाणार असं सांगितलं आहे.

आता या दोन्ही ठिकाणी जर पाहिलं तर परिस्थिती वेगळी आहे म्हणजे दिल्लीत दंगल झाली आहे, तर महाराष्ट्रात एका आजारामुळे परिस्थिती हाताबाहेर जाते आहे. आणि दोन्ही ठिकाणी कलम १४४ लागू आहे.

 

janta curfew inmarathi
CineJosh

 

तर पहिल्यांदा आपण कलम १४४ काय आहे हे समजून घेऊ. 

आपल्या देशाच्या संविधानानुसार आपले जे मूलभूत अधिकार आहेत त्यानुसार सनदशीर मार्गाने मत मांडण्याचा अधिकार आपल्याला आहे.

पण कधीकधी शांततेने होणारे आंदोलन जर हिंसक बनले तर परिस्थिती आवरणे कठीण होते. त्यामुळे समाजामध्ये तेढ निर्माण होते. अशा वेळेस कायदा व सुव्यवस्था राखून शांतता प्रस्थापित करण्याचे अधिकार जिल्हाधिकारी यांना आहेत.

ते अधिकार त्यांना भारतीय दंड विधान कलम १४४ अन्वये मिळतात. त्यानुसार सर्वाधिकार सुरक्षा व्यवस्थेकडे दिले जातात व परिस्थिती आटोक्यात आणली जाते.

आणि त्यांनी सांगितलेले नियम जर एखाद्याने मोडले तर त्याला तीन वर्षांचा तुरुंगवास आणि दंडाची शिक्षा होते.

१९७३ साली या भारतीय दंडविधान कलम १४४ या कायद्यामध्ये बदल झाले आणि काही नवीन गोष्टी यामध्ये समाविष्ट करण्यात आल्या.

कलम १४४ नुसार पाच किंवा अधिक व्यक्ती एकाच वेळेस एकत्र फिरू शकत नाहीत. असं कोणी आढळल्यास सुरक्षा अधिकारी त्यांना आधी सूचना देतात आणि नंतर त्यांच्यावर कारवाई करतात.

जमावबंदी:

 

curfew inmarathi 1
loksatta

 

कलम १४४ अंतर्गत जमावबंदीचे आदेश हे जिल्हाधिकारी किंवा न्यायदंडाधिकारी हे देऊ शकतात.

यामध्ये पाच किंवा त्यापेक्षा अधिक व्यक्ती एकत्र येऊ शकत नाहीत आणि फिरू शकत नाही.

कोणतेही शस्त्र बाळगण्यास परवानगी नसते.

यातून जीवनावश्यक सेवा वगळण्यात येतात. म्हणजे, दूध, किराणा, हॉस्पिटल, मेडिकल इत्यादी.

परिस्थिती जर हाताबाहेर जाते असं दिसलं तर जिल्हाधिकाऱ्यांना त्या भागातील इंटरनेट सेवा देखील खंडित करण्याचे अधिकार आहेत.

कलम १४४ जेव्हा-जेव्हा लागू होते तेव्हा सर्व शैक्षणिक संस्था, शाळा, कॉलेजेस बंद असतात. सभा, कार्यक्रम, मोर्चे यांना परवानगी नसते. वाहतूक व्यवस्था बंद केली जाते.

सध्या महाराष्ट्रात जमाव बंदी लागू करण्यात आली आहे त्याचं कारण म्हणजे कोणतीही दंगल नसून कोरोना वायरस चा प्रसार आपल्याला रोखायचा आहे

कारण गर्दीमुळे कोरोना वायरस हा अधिक पसरला जाऊ शकतो म्हणून जमावबंदीचे आदेश काढण्यात आले होते.

जमावबंदीचा कालावधी हा दोन दोन महिन्यांपेक्षा अधिक नसतो. जर वेळ पडली तर परत दोन महिने तो वाढवता येऊ शकतो.

पण जर राज्य सरकारला वाटले की, नागरिकांच्या जीवाला धोका आहे तर त्याचा कालावधी सहा महिन्यांपर्यंत वाढवता येतो.

कलम १४४ चा वापर शांतता आणि सुव्यवस्था प्रस्थापित व्हावा यावा यासाठीच केला जातो.

भारतात अनेक राज्यांमध्ये सध्या जे कलम १४४ लावण्यात आले आहे. त्यानुसार, हेतु कोरोना व्हायरसचा धोका इथल्या जनतेला कमी व्हावा आणि ते सुरक्षित राहावेत इतकाच आहे.

कर्फ्यू म्हणजे काय? असा प्रश्न पडू शकतो. किंवा असंही वाटू शकतं की कर्फ्यू आणि कलम १४४ हे सारखेच आहेत. तर ते तसं नाहीये.

कर्फ्यू:

 

curfew inmarathi 2
the indian express

 

जर दंगलींनी हिंसक रूप धारण केलं आणि ती शांत होण्याची चिन्ह दिसत नसेल तर त्यावेळेस कर्फ्यू लावला जातो.

कर्फ्यू लावण्याचे अधिकार देखील जिल्हाधिकाऱ्यांना आहेत.

कर्फ्यूच्या काळात संपूर्ण वाहतूक व्यवस्था बंद केलेली असते.

कर्फ्यू हा ठराविक भागातच लावला जातो.

त्यानुसार लोकांनी ठराविक वेळेमध्ये घरीच राहिले पाहिजे.

थोड्या काळाकरता कर्फ्यू शिथिल केला जातो. ज्यामध्ये नागरिक बाहेर येऊन त्यांना लागणाऱ्या गोष्टी म्हणजे भाजी, किराणा, औषधं घेऊ शकतात.

त्यातही पाच जणांपेक्षा जास्त एकत्र जाऊ शकत नाही आणि त्या पाच जणांमध्ये देखील २०० यार्डांच अंतर असलं पाहिजे.

जमावबंदी मध्ये तुम्ही एकटे बाहेर जाऊ शकता आणि फिरू शकता मात्र कर्फ्यू मध्ये तुम्हाला बाहेर देखील जाता येत नाही आणि जायचं असेल तर ऑथोरिटीची परवानगी घ्यावी लागते.

 

curfew inmarathi 3
livemint

 

या काळात परीक्षा, लग्न, कार्यक्रम किंवा इतर कोणत्याही एकत्र होणाऱ्या धार्मिक गोष्टी करू शकत नाही.

कोणतेही शस्त्र बाळगायला परवानगी नसते. अगदी तुमच्याकडे त्या शस्त्राचा परवाना असला तरी तुम्ही तो सोबत घेऊ शकत नाही. अगदी लग्नातल्या धार्मिक विधीसाठी देखील शस्त्र बाळगता येत नाही.

याकाळात फटाके वाजवता येत नाहीत.

जातीय किंवा धार्मिक तेढ निर्माण करणारी व्यक्तव्य केल्यास अटक होते.

कर्फ्यू च्या काळात कुणी घराबाहेर पडले तर त्याच्यावर कायदेशीर कारवाई तिथले अधिकारी करतात. आणि जर कोणी मुद्दामहून दंगल पसरवण्याचा प्रयत्न केला तर त्याच्यावर दिसताक्षणी गोळ्या घालण्याचे आदेशही दिले जाऊ शकतात.

लॉक डाऊन:

लॉक डाऊन म्हणजे जर एखादा संसर्गजन्य रोग पसरला आणि त्याचा परिणाम सामान्य जनतेवर दिसून यायला लागला, तर लोकांना एकमेकांपासून वेगळे करण्यासाठी किंवा अंतर ठेवण्यासाठी, सरकारकडून जी उपाय योजना केली जाते त्याला लॉक डाऊन म्हणतात.

आताची कोरोना व्हायरसची जी साथ सध्या आली आहे त्यावर नियंत्रण आणण्यासाठी सरकारने संपूर्ण राज्यात लॉक डाऊन केला आहे.

 

curfew inmarathi 4

 

या काळात लोकांनी घरातच राहणे अपेक्षित असते. बाहेर जायचं असेल तर फक्त तुमच्या जीवनावश्यक गोष्टींच्या खरेदीसाठी, औषध घेण्यासाठीच बाहेर जाता येतं.

तुम्ही मौजमजा करण्यासाठी सिनेमा, मूव्हीजला जाण्यासाठी जिम, स्विमिंग एन्जॉय करण्यासाठी बाहेर जाऊ शकत नाही.

यामध्ये रस्त्यावर फिरणे धोक्याचे ठरू शकते, कारण आजाराचा संसर्ग होण्याची शक्यता अधिक असते. आणि तो संसर्ग तुमच्या घरातल्या व्यक्तींना देखील होऊ शकतो.

 

curfew inmarathi 5
cnbc tv18

 

त्याचबरोबर तुमच्या मित्रमंडळींना देखील होऊ शकतो. म्हणून काळजी घेणे खूप महत्त्वाचे आहे.

परदेशात जेव्हा लॉक डाऊन असते, तेव्हा बाहेर जायचं असेल तर तुम्ही निरोगी आहात असं सर्टिफिकेट घेऊन तुम्हाला बाहेर जाता येते. आणि ते देखील तुमच्या घराजवळील परिसरातच.

यातही शाळा कॉलेज, ऑफिसेस इतर सार्वजनिक ठिकाणे बंद केलेली असतात. यामध्ये लोकांना आपल्या घरातच राहण्याचा सल्ला दिला जातो, आणि लोकांकडून ते पाळला जाईल अशी अपेक्षा केली जाते.

जेणेकरून तो आजार भयानक रूप धारण करू नये याची काळजी घेतली जाते.

सध्या आपल्या देशातील परिस्थिती आटोक्यात आणण्यासाठी सरकार शर्थीचे प्रयत्न करत आहे, या प्रयत्नांना

===

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | Copyright © InMarathi.com | All rights reserved. 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?