' चेहऱ्याला वारंवार हात लावल्याने कोरोना विषाणुचा होणारा फैलाव रोखण्यासाठी हे उपाय नक्की ट्राय करा – InMarathi

चेहऱ्याला वारंवार हात लावल्याने कोरोना विषाणुचा होणारा फैलाव रोखण्यासाठी हे उपाय नक्की ट्राय करा

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामशेअरचॅट

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

===

करोना म्हणजेच COVID १९ विषाणूंनी जगभर थैमान घातलेलं आज आपण पाहत आहोत.

 

corona virus 7 inmarathi
natural news

 

चीन मध्ये उगम पावलेला आणि हळूहळू जगभर पसरलेल्या या रोगाने हजाराच्या घरात जीव घेतले अस सांगत जरी असले तरी एकट्या चीन मध्ये लाखो बळी गेल्याचे बोललं जातं.

कारण काहीही असली तरी आता अख्ख जग या रोगाच्या विळख्यात आलेलं दिसत आहे.

भारताचा आकडा तर सातत्याने वाढतोय.

 

corona death inmarathi
news track english

 

मृतांची संख्या त्या मानाने बरीच कमी जरी असली तरी स्टेज तीन आणि चार च्या लेव्हल ला आपण पोहोचलो नसलो, तरी काळजी घेणं गरजेचं आहे.

संसर्गजन्य रोग असल्यामुळे हवेतून याचा प्रसार हा झपाट्याने होत आहे.

साधा खोकला जरी आला आणि ती व्यक्ती कोरोना बाधित असली तर जवळपासच्या सगळ्या व्यक्तींना याची लागण व्हायची शक्यता आहे.

त्यामुळे योग्य ती काळजी घेणे बंधनकारक आहे.

“आपणच आपले रक्षक” ही थिअरी फॉलो करून काळजी घेणं आपलं परम कर्तव्य आहे.

मास्क चा वापर, उघड्यावर थुंकणे/शिंकणे/खोकणे टाळणे, ताप असल्यावर त्वरित उपचार घेणे असे साधे रेग्युलर प्रिकोशन आपण घेऊ शकतो.

 

China-coronavirus feature InMaarthi

 

नाही म्हटलं तरी चेहऱ्यावर सारखा सारखा प्रत्येकाचा हात हा जातंच असतो.

रिसर्च सांगतात, की जवळपास तासाला सोळा वेळा एक व्यक्ती चेहऱ्यावरून हात फिरवत असते.

 

face inmarathi
healthline

 

चेहऱ्यावर पिंपल्स आणि मुरूम वाढण्यास ही सवय कारणीभूत आहेच पण आता कोरोना कोविड-१९ च्या विषाणूंचा संसर्ग सुद्धा स्पर्शाने होत आहे म्हटल्यावर नकळत घडणाऱ्या या क्रियेमुळे कोरोनाचा सुद्धा संसर्ग होण्याची शक्यता वाढली आहे.

डोळे आणि नाक हे असे अवयव आहेत जे चेहऱ्याच्या संपर्कात आलेल्या विषाणूंना शरीरात प्रवेश करायला सोप्पा मार्ग आहे.

शरीराच्या ओपन असलेल्या भागावरच्या त्वचेपेक्षा चेहऱ्यावरची त्वचा ही जास्त सेन्सेटिव्ह असते.त्यामुळे साहजिकच इन्फेक्शन चे चान्सेस सुद्धा तेवढेच वाढतात.

पण, नेमकं आता करायचं तरी काय?

 

eyes inmarathi
health essential

 

तर, पाहूया कशाप्रकारे आपण चेहऱ्यासोबत सारखा होणारा आपला संपर्क आपण कसा टाळू शकतो ते.!

चेहऱ्याचा आणि हाताचा संपर्क टाळणं हे वाटत तेवढं सोप्प नाही.

स्ट्रेस मध्ये,टेन्शन मध्ये हात आपोआप माथ्यावर जातोच जातो!

 

stress inmarathi
robert half

 

कितीही आवरायचं प्रयत्न केल तरी ते होत नाही. शिवाय डोळे चोळणं ही आहेच.

तर, चेहऱ्यावर आलेला घाम किंवा एक्सेसिव्ह ऑइल क्लीन करण्यासाठी टिश्यूचा वापर उत्तम.

रुमाल या वेळेस कुचकामी ठरतो. त्यामुळे युज अँड थ्रो टिश्यू याला उत्तम पर्याय ठरतो.

वाहते नाक किंवा वाहते डोळे यासाठी देखील हा पर्याय योग्य ठरतो.

 

tissue paper inmarathi
indiaMART

 

जेवढा चेहऱ्याशी हाताचा थेट संपर्क होणार नाही याची आपण पुरेपूर काळजी घेतली पाहिजे.

सतत हात धुणं तर आता अनिवार्य झालेलं आहेच, त्यासाठी सॅनिटायझरचा वापर करा.

चेहऱ्यावर हात फिरवण्याची सवय असेल तर हात स्वछ करण्याची पण सवय लावावी लागेल.

 

 

अवघड आहे,पण पर्याय नाही त्याशिवाय.

साबण आणि पाण्याने कमीतकमी २० सेकंद तरी हात धुण्याचा सल्ला तज्ज्ञ मंडळी देतात.आणि जर पाणी उपलब्ध नसेल तर अल्कोहोल बेस हॅन्ड सॅनिटायझर तर आता सगळीकडे उपलब्ध आहेतच.!

बाजारात तर आता सॅनिटायझरचा सुद्धा दुष्काळ पडलेला दिसतो.

तर घरी सुद्धा आपण हे सॅनिटायझर बनवू शकतो.

पुरुष मंडळी दाढी केल्यानंतर जे आफ्टर शेव लावतात ते आणि उकळलेले पाणी समप्रमाणात घेऊन आपण घरच्या घरी सॅनिटायझर बनवू शकतो.

त्याशिवाय डॉक्टर लोक जे डीसइन्फेक्शन/निर्जंतुक करायला लिक्विड वापरतात ते सुद्धा उकळलेल्या पाण्यासोबत समप्रमाणात घेऊन आपण घरच्या घरी सॅनिटायझर बनवू शकतो.

 

hand sanitizer inmarathi
fustany

 

जेवढे हात स्वच्छ ठेवायचा प्रयत्न करू तेवढ्या आपल्या पुर्ण शरीरासाठी योग्य राहील.

मुळात, आपला चेहरा हा धूळ आणि उन्हाच्या करणांने टॅन होतो. आणि त्याच कारणामुळे नाही म्हटलं तरी आपला हात चेहऱ्यावर जात असतो.

जेवढी आपण चेहऱ्याची काळजी घेऊ तेवढीच आपला चेहरा आणि हाताचा संपर्क येणार नाही.

उदाहरण घ्यायचं झालं तर पाण्याने सारखा चेहरा स्वछ करणं. फेसवॉश आणि साबण सारख चेहऱ्यावर लावणे सुद्धा हानिकारकचं आहे. पण पाणी नाही.

 

face wash inmarathi

 

चेहरा धुवायच्या आधी आपले हात नक्की स्वच्छ करून घेत जा. हातही स्वच्छ राहतील आणि चेहरा सुद्धा.!

ग्लोव्हजचा वापर

हातात ग्लोव्हज घालणं हा सुद्धा चेहऱ्यासोबत संपर्क टाळण्याचा एक पर्याय आहे.

हातात ग्लोव्हज असल्यावर शक्यतो आपला हात चेहऱ्याकडे वळत नाही.

 

hand gloves inmarathi

 

चेहऱ्यासोबत संपर्क टाळायला याचा जास्त आणि चांगला वापर होऊ शकतो.

महिलांनो, काळजी घ्या

मेकअप म्हणजे महिलांचा जीव की प्राण.

 

makeup inmarathi
myglamm

 

सण असो वा पार्टी गरजेनुसार मेकअप करत आसऱापुढे बसलेल्या महिला तुमच्याही घरात दिसून येत असतील.

मेकअपवरून अनेकदा महिलांची चेष्टा केली जाते, मात्र सनस्क्रीम, कोल्डक्रिप वा अन्य काही क्रिम्स ही हल्लीच्या वातावरणासाठी गरेजेची आहेत, हे नक्की.

डॉक्टरांकडूनही अशा क्रीम्सचा सल्ला दिला जातो, मात्र सध्या तुम्ही ही क्रिम्स लावतानाही काळजी घेणं गरजेचं आहे.

क्रिम्स ही चेह-यावर लावली जातात. अशावेळी हाताचा संपर्क येतोच, मात्र तो संपर्क टाळण्याचा प्रयत्न करा.

अशी क्रिम्स लावण्यासाठी पफ किंवा ब्रश मिळतो, त्यांचा वापर करा.

 

brush inmarathi
tribum buttun

 

मात्र त्यापुर्वीही आपले हात स्वच्छ असावेत याची काळजी घ्या.

औषध लावताना…

सौंदर्यप्रसाधनांसह चेहरा, डोळे, कान यांसाठी अनेकांना औषधांचा वापर करावा लागतो.

यामध्ये डोळे, कान यांचे ड्रॉप्स असतील किंवा स्कीन इन्फेक्शनसाठी वापरील जाणारी क्रिम्स…

मात्र यांचा वापर करताना ग्लोज घालण्याची सवय करा.

 

ear drops inmarathi
healthline

 

ही औषधं, क्रिम्स यांना यापुर्वी इतरांचा स्पर्श झाला असेल, तर आपण ग्लोज घालून त्याचा वापर केला, तर करोनाचा संसर्ग होण्याची थेट भिती नाही.

दिवसभर अनेक लोक ज्याला स्पर्श करतात त्या गोष्टींचा विचार करा.

सेलफोन, गाड्यांचे किंवा घराचे/ऑफिसचे दरवाजे, चाव्या, रोख रकम वगैरे आपल्याला जरी माहित नसतं तरी वेगवेगळे बॅक्टेरिया यातून ट्रान्सफर होत असतात.

आता आपल्या नाक, तोंड आणि डोळ्यातील संवेदनशील त्वचेद्वारे आपल्या शरीरात त्या वस्तूंमधून सर्व बॅक्टेरिया, विषाणू यांचे हस्तांतरण होण्याची कल्पना करा.

हाताचा चेहरा किंवा त्यावरील अन्य संवेदनशील अवयवांशी संपर्क साधला जाणार नाही ही बाब अवघड असली, तरी करोनाचं संकट लक्षात घेता, त्यापुढे हे अशक्य नाही.

 

handgloves inmarathi

आज करोनाने जगभर दहशत माजवली आहे, जणुकाही सगळं जगचं आता घरात बंद झालं आहे.

सरकार, पोलिस, डॉक्टर्स, शास्त्रज्ञ या सगळ्यांचे युद्धपातळीवर प्रयत्न सुरु आहेत ते केवळ आपला जीव वाचविण्यासाठी…

असं असताना स्वतःची काळजी घेणं हे आपलं कर्तव्य आहे, त्यामुळे करोनाच्या विषाणुपासून लांब राहण्यासाठी स्वतःपुरता हा उपाय करणं तुम्हाला नक्की अवघड ठरणार नाही.

एकूणच आपण चेहऱ्यासोबत आपल्या हाताचा संपर्क टाळला तर कोरोनाचं काय त्यासारख्या मल्टिपल विषाणूंचे संक्रमण आपण सहज टाळू शकतो.

===

महत्वाची सूचना: सदर लेखातील माहिती, विविध तज्ज्ञांच्या अभ्यास व मतांनुसार तसेच सर्वसामान्य मनुष्याच्या आरोग्यास अनुसरून देण्यात आलेली आहे. ही माहिती देण्यामागे, या विषयाची प्राथमिक ओळख होणे हा उद्देश आहे. वाचकांनी कोणताही निर्णय घेण्याआधी, आपल्या आरोग्याला अनुसरून, डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.

===

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्रामशेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?