' "येणारे ४-६ महीने असतील जास्त कठीण" - बिल गेट्स यांचं कोरोना बद्दलचं नवं भाकीत!

“येणारे ४-६ महीने असतील जास्त कठीण” – बिल गेट्स यांचं कोरोना बद्दलचं नवं भाकीत!

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामशेअरचॅट

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

===

बिल गेट्स या नावाचा परिचय करून देण्याची खरंतर आवश्यकता नाहीच. ज्यांनी १९७५ मधे मायक्रोसॉफ्ट ची स्थापना केली आणि कधी काळी जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तींच्या यादीत ते सर्वप्रथम होते!

६५ वर्षीय बिल गेट्स सध्या त्यांच्या बिल आणि मेलिंडा फौंडेशन’ च्या माध्यमातून समाजोपयोगी कामांमध्ये अग्रेसर दिसून येतात.

त्यांचे कार्य केवळ अमेरिकेपुरते मर्यादित नाही तर जगातल्या बऱ्याच देशात त्यांनी मानवतेच्या नात्याने मदत केलेली आपण ऐकली असेल.

नुकतेच बिल गेट्स मायक्रोसॉफ्ट च्या बोर्ड वरून निवृत्त झाले ते केवळ त्यांना त्यांच्या फौंडेशन ला अधिक वेळ देता येऊन,अधिकाधिक लोकांना मदत करता यावी म्हणून!

 

bill gates inmarathi

 

सध्या कोरोना महामारीमुळे सगळेच देश त्रस्त आहेत. पण आता लोकांच्या मनातली भीती थोडीफार का होईना कमी झालेली आहे. कोरोनाची लस ही आता शेवटच्या टप्प्यात असून लवकरच ती लोकांसाठी उपलब्ध होईल!

भारतात सुद्धा कोरोनाचं प्रमाण कमी नसलं तरी लोकं आता स्वतःची काळजी घेत रोजच्या कामाला लागलेली दिसतील. मार्च २०२० नंतर जे चित्र होतं ते हळू हळू बदलत आहे.

सिनेमा थेटर्स. नाट्यगृह, बागा, पर्यटन स्थळ सगळंच हळू हळू सुरू झालं आहे. अद्याप शाळा कॉलेजेस बंदच आहेत पण तरीही या new normal कॉन्सेप्टला लोकांनी आपलंस केलं आहे!

या काळात बिल गेट्स यांनी आणि त्यांच्या फाउंडेशननी बरीच मदत केली, शिवाय आत्ता कोरोनाची लस अमेरिकेच्या लोकांपर्यंत पोचवण्यात सुद्धा बिल गेट्स यांनी चांगलीच मदत केली आहे.

पण नुकतंच बिल गेट्स यांनी एक वक्तव्य केलं आहे ते वाचून आपल्याला कदाचित धक्का बसू शकतो. त्यांनी त्यांच्या व्यक्तव्यातून एक धोक्याचा इशाराच दिला आहे, ते म्हणाले –

“पुढील ४ ते ६ महीने हे अधिक त्रासाचे असणार आहेत, या कालावधीत सर्वात जास्त मृत्यू होण्याची सुद्धा शक्यता आहे. त्यामुळे आपण नियमांचे पालन करून, मास्क sanitizer चा योग्य वापर केला तर आपण हा धोका टाळू शकतो!”

 

bill gates inmarathi

 

गेट्स यांनी ५ वर्षांपूर्वी TED च्या मुलाखतीत सुद्धा एक अशीच शक्यता वर्तवली होती जी आता खरी ठरते आहे. 

त्यांच्या ५ वर्षांपूर्वीच्या मुलाखतीमधून त्यांची दूरदर्शिता तर दिसून येतेच पण जगाने वेळीच या मुलाखतीला गांभीर्याने घेतलं असतं तर आज पश्चाताप करण्याची वेळ आली नसती.

२०१५ मधे TED TALK मध्ये एक मुलाखत गेट्स यांनी दिली होती. त्याच्या एक वर्ष अगोदरच जग ‘इबोला’ सारख्या भयानक विषाणू विरोधात लढाई करत होता.

जाणून घेऊ यात की बिल गेट्स यांनी नक्क्की कुठल्या प्रकारची शक्यता वर्तवली होती आणि ती किती खरी ठरते आहे!

पुढचा संसर्ग: आपण पूर्णतः अनभिज्ञ

गेट्स दोन काळांची तुलना करताना सांगतात,

“पूर्वी न्यूक्लिअर युद्धाची भीती असायची त्याकरता आम्ही तळघरात धान्याची कोठारं भरून ठेवायचो जेणे करून आणीबाणी च्या परिस्थितीत ते धान्य कामी येईल परंतु, आता परिस्थिती पूर्ण बदलली आहे.

करोडो लोकांना मारणारी गोष्ट आता युद्ध किंवा मिसाईल नसेल तर तो असेल एखादा विषाणू!

आपण मिसाईल अन हत्यारे यावर प्रचंड खर्च करतो पण वेगवेगळ्या रोगांच्या,लसींच्या संशोधनात त्याच्या तुलनेत क्षुल्लक खर्च केला जातो.त्यामुळे कुठल्याही महामारीला रोखण्यासाठी आपली काहीही तयारी नाही!”

गेट्स पुढे म्हणतात ‘पुढचा विषाणू हमला हा कदाचित इबोला पेक्षा भयंकर असू शकतो. इबोला ने १०००० बळी घेतले ते सुद्धा केवळ पश्चिम आफ्रिकेतल्या केवळ ३ देशांमध्ये!’

 

ebola crisis inmarathi

 

इबोला बाकी जगात न पसरण्याची त्यांनी तीन प्रमुख कारण सांगितली होती :

१) आरोग्य सेवकांचे अथक प्रयत्न

२)विषाणू प्रवृत्ती,एक तर इबोला हा हवेद्वारा पसरत नाही आणि ज्यांना हा रोग होतो ते अंथरुणाला खिळून जातात. त्याने तो बाकी लोकांमध्ये पसरत नाही.

३) शहरांमध्ये न झालेला प्रादुर्भाव. या बाबतीत केवळ योगायोग म्हणता येईल. जर हा शहरांत पसरला असता तर बळी गेलेल्यांची संख्या अजून जास्त असती.

पुढे ते म्हणतात,

“समजा पुढल्यावेळी नशिबाने इतकी साथ नाही दिली आणि विषाणूग्रस्त नॉर्मल राहून जर हिंडु – फिरू शकले. समजा त्यांनी विमान प्रवास केला किंवा बाजारात गेले तर होणार प्रादुर्भाव प्रचंड असेल!”

आणि त्यांची हीच भविष्यवाणी आता तंतोतंत खरी ठरत आहे. त्यांनी मुलाखतीत पुढे १९१८ मधे आलेल्या ‘स्पॅनिश फ्लू’ ज्याच्या संसर्गाने ३ करोड लोकांचा जीव गेला होता त्याचं उदाहरण दिलं.

 

spanish flu patient inmarathi

 

बिल गेट्स पुढे आशा प्रकट करताना म्हणतात की

“यापुढे यासारखी रोगजन्य परिस्थिती उद्भवू न देण्याची जबाबदारी आपलीच आहे. आपल्या कडे विज्ञान, तंत्रज्ञान आहे.सेल फोन्स, सॅटेलाइट मॅप्स, आणि आधुनिक जीवशास्त्र सारखी बरीच साधनं उपलब्ध आहेत.

गरज आहे ती या सर्व संसाधनांचा सुयोग्य वापर जागतिक आरोग्य संरचनेत करून घेण्याची!”

गेट्स जगाला NATO चं उदाहरण देताना सांगतात

“North Atlantic Treaty Organization’ बऱ्याच देशांनी एकत्र येऊन तयार केलेली एक सैनिकी संस्था आहे. NATO मध्ये काही पूर्ण वेळ तर काही अर्धवेळ काम करणारे राखीव गट आहेत.

 

NATO inmarathi

 

त्यांच्याकडे एक मोबाईल युनिट आहे ज्याला केव्हापण कुठेही पाठवता येऊ शकतं. ‘War Games’ च्या माध्यमातून त्यांना प्रशिक्षण दिलं जातं.

त्यांच्या कडे इंधन, लॉजीस्टिक, रेडियो फ्रीक्वेंसी अशी सगळी सुसज्ज यंत्रणा असते. आपण रोगांच्या विरोधात लढण्यासाठी तशीच तयारी, नियोजन करायला हवं!”

त्यांनी पुढे महामारी पासून वाचण्यासाठी महत्वाची पंचसूत्री सुद्धा सांगितली

१)कमजोर देशांमध्ये मजबूत आरोग्य सुविधा निर्माण झाल्या पाहिजेत.

२)मेडिकल राखीव दल, या अंतर्गत खूप सारे लोक जे या क्षेत्रात निष्णात, प्रशिक्षित असतील त्यांना लवकर, गरज असलेल्या जागी पाठवण्याची सोयं करणं.

३)मेडिकल आणि सैनिकी क्षेत्रात निष्णात असलेल्या लोकांना एकत्र करणे. जेणे करून मिलिटरी या आरोग्य सेवकांना जलद हालचाल करून योग्य जागी पाठवेल.

४) युद्धाच्या तयारीचे मोजमाप करण्यासाठी ज्या प्रमाणे वॉर गेम्स असतात त्याच धर्तीवर ‘जर्म गेम’ तयार करून आपली तयारी तपासावी लागेल.

५) औषधांच्या लसी आणि निदान करण्याच्या क्षेत्रात खूप साऱ्या संशोधनाची गरज आहे. या क्षेत्रात संशोधन आणि विकसन (R&D) करावं लागेल.

 

corona virus inmarathi

 

तुम्ही विचार करत असाल की हे सर्व उभं करण्यासाठी प्रचंड पैसा आवश्यक असेल. कुठल्याही देशाचं सरकार एवढा पैसा केवळ प्रतिबंधावर का म्हणून खर्च करेल?

पण ह्या प्रश्नाचं उत्तर देतांना गेट्स म्हणतात “मला माहित नाही की या सर्वांसाठी नेमका किती खर्च येईल पण हे नक्की की, महामारी ने जेवढं नुकसान होईल त्या पेक्षा हा खर्च नक्कीच खूप कमी असेल!”

त्यांचं हे वाक्य सुद्धा आज पूर्णतः लागू होताना दिसतंय. सबंध जगात सगळे आर्थिक व्यवहार ठप्प झाले आहेत, शेअर बाजार पत्याच्या बंगल्यासारखा कोसळतो आहे, कित्येक कामगारांची नोकरी गेलीय.

जेव्हा विषाणू जगात घुसल्यावर जे प्रतिबंध आपण करतो आहोत त्याने एवढं जबरदस्त नुकसान आज पर्यंत केलं आहे! अजून ही महामारी किती पसरेल माहीत नाही.

 

janata curfew inmarathi

 

“आरोग्य विषयक या गोष्टी (पंचसूत्री) आपली प्राथमिकता असायला हवी! घाबरून जाण्याची बिलकुल आवश्यकता नाही. इबोला पासून आपल्याला सतर्कतेचा इशारा मिळाला आहेच!

कदाचित हा पुढील काळात येणाऱ्या महामारी साठी ‘वेक अप’ कॉल असेल. जर आपण आताच जागे झालो आणि तयारी केली तर कदाचित पुढच्या विषाणू हमल्याला आपण रोखू शकू”

मुलाखतीच्या शेवटाला त्यांनी असा आशेचा सूर लावला खरं, आज सबंध जग त्यावर योग्य वेळी कार्य न केल्याबद्दल हळहळत असेल.

तुमच्या लक्षात आलंच असेल की अशी कुठलीही तयारी जगातील बहुतांश देशांनी (भारतासह) केली नाही. आपलं त्या विद्यार्थ्यां सारख झालंय जे परिक्षेच्या आदल्या रात्री पुस्तक हातात घेतात.

 

billgates on ebola inmarthi

 

तो अभ्यास नीट समजण्यासाठी त्यांना बऱ्याचदा नापास व्हावं लागतं! कॉलेज मध्ये असं केलं जाऊ शकतं कारण शाळा-कॉलेज शिकण्याची ठिकाणं आहेत.

खरोखर आयुष्यात इतकी बेफिकीरी आपल्याला घरी कैदी बनवून बसवू शकते. परदेशात मिनिटांगणिक बळी पडणारे नागरिक पाहता आणि मुख्यत्वे हे सगळे विकसित देशातील आहेत!

जर भारतासारख्या विकसनशील देशात जिथे काही हजार लोकसंख्ये मागे १ डॉक्टर आहे आणि दहा हजार लोकांमागे बोटावर मोजता येतील इतके व्हेंटिलेटर उपलब्ध आहेत!

अश्या देशात याची लागणं झाली तर परिस्थिती अकल्पनिय असेल.

बिल गेट्सनी केलेली ही भविष्यवाणी आणि त्यांनी नुकतंच केलेलं हे वक्तव्य आपल्याला बरंच काही सांगून जातं. त्यांनी केलेलं हे भाकीत सुद्धा खरं ठरेल किंवा नाही ही महत्वाची गोष्ट नाही!

पण काळजी घेतल्याने आपल्या कुणाचंच काही बिघडत नाही, त्यामुळे आपण सगळ्यांनीच आता जास्त सतर्क रहायला हवं! कोरोनाची लस जरी आली असली तरी विषाणू अजूनही गेलेला नाही!

===

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

One thought on ““येणारे ४-६ महीने असतील जास्त कठीण” – बिल गेट्स यांचं कोरोना बद्दलचं नवं भाकीत!

  • March 27, 2020 at 12:31 am
    Permalink

    what to say! thanks for the information

    Reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?