' बॉम्बे ब्लड ग्रुप! होय, हा आहे मराठी माणसाने शोधलेला दुर्मिळ ब्लड ग्रुप!!

बॉम्बे ब्लड ग्रुप! होय, हा आहे मराठी माणसाने शोधलेला दुर्मिळ ब्लड ग्रुप!!

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

आपल्याला शरीराला जिवंत ठेवणाऱ्या घटकांपैकी सर्वात महत्त्वाचा घटक म्हणजे रक्त! कारण रक्ताशिवाय आपली शारीरिक यंत्रणा चालवली जाऊच शकत नाही.

अश्या या रक्ताचे वैद्यकीय क्षेत्रात फार महत्त्व आहे. एखाद्या व्यक्तीला रक्ताची गरज असल्यास आणि तिला वेळेवर रक्त मिळाल्यास त्या व्यक्तीचे प्राण वाचवण्याचे महत्त्वपूर्ण कार्य रक्त करते.  म्हणूनच ‘रक्तदान’ करण्याचे आवाहन केले जाते, ज्यामुळे गरजू व्यक्तीचे प्राण वाचवले जाऊ शकतील.

 

Blood-donation-marathipizza

स्रोत

 

तुम्हाला रक्तगट अर्थात ब्लड ग्रुप्स माहित असतीलच… तुमच्या म्हणण्याप्रमाणे A, B, O आणि AB हे ब्लड ग्रुप्स असतील हो की नाही?

 

blood-group-marathipizza

स्रोत

 

पण समजा आम्ही म्हणालो की अजून एक ब्लड ग्रुप असतो तर??? काय? आश्चर्य वाटलं ना? अहो, खरंच एकूण पाच ब्लड ग्रुप्स आहेत.

पण आपल्याला ५ व्या बद्दल काहीच माहिती नाही, म्हणून हे कुतुहुलाचे भाव चेहऱ्यावर उमटतात. चला तर आज या पाचव्या अज्ञात ब्लड ग्रुप बद्दल जाणून घेऊया!

 

bombay-blood-group-marathipizza

स्रोत

 

या ५ व्या प्रकारच्या ब्लड ग्रुपचे नाव आहे बॉम्बे ब्लड ग्रुप ! याला Oh म्हणून देखील ओळखले जाते.

या ब्लड ग्रुपचा शोध १९५२ साली Y M Bhende नावाच्या डॉक्टरांनी पूर्वीच्या मुंबई मध्ये अर्थात बॉम्बे मध्ये लावला होता. म्हणून त्याला बॉम्बे हे नाव पडले.

आपण सर्वजण असे समजतो की ओ निगेटिव्ह हा ब्लड ग्रुप सर्वात दुर्मिळ असतो कारण हा ब्लड ग्रुप फारच कमी लोकांमध्ये आढळ जातो. पण तसे नाहीये, कारण ओ निगेटिव्ह पेक्षाही दुर्मिळ ब्लड ग्रुप आहे बॉम्बे ब्लड ग्रुप!

हा ब्लड ग्रुप जगाच्या एकूण लोकसंख्येच्या केवळ ०.०००४ % लोक्संख्येमध्येच आढळतो. सोप्या शब्दात सांगायचे झाले तर दर दहा लाख लोकांच्या मागे केवळ ४ जण या ब्लड ग्रुपचे सापडतील.

या प्रकारच्या ब्लड ग्रुप मध्ये असणारे अँटीजन H हेच या ब्लड ग्रुपच्या दुर्मिळ असण्याचे महत्त्वाचे कारण आहे. हे अँटीजन H  अन्य कोणत्याही ब्लड ग्रुप मध्ये आढळत नाही.

 

bombay-blood-group-marathipizza

स्रोत

 

अजून एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे बॉम्बे ब्लड टाईप असणाऱ्या व्यक्तीचे रक्त इतर ब्लड ग्रुप्समधील व्यक्तीला चालू शकते, परंतु इतरांचे रक्त बॉम्बे ब्लड टाईप असणाऱ्या व्यक्तीला चालत नाही. या व्यक्तींना केवळ बॉम्बे ब्लड टाईप असणाऱ्या व्यक्तीच रक्त देऊ शकतात.

 

Blood-marathipizza

स्रोत

 

हा ब्लड ग्रुप Close Knit Communities मध्ये जास्त प्रमाणात पाहायला मिळतो. आई वडील दोघांमध्ये Recessive Allele असल्यास हा ब्लड ग्रुप निर्माण होतो. मुंबईच्या अवघ्या०.०१% लोकसंख्येमध्ये हा ब्लड ग्रुप आहे.

 

mumbai-poupulation-marathipizza

स्रोत

 

ही माहिती शक्य तितकी लोकांपर्यंत पोहोचवा. ज्यांना आपला ब्लड ग्रुप माहित नाही त्यांनी लवकरात लवकर टेस्ट करून आपला ब्लड ग्रुप जाणून घ्या. कोणास ठावूक हा ब्लड ग्रुप तुमचा देखील असायचा आणि तुम्ही देखील दुर्मिळातील दुर्मिळ मनुष्य म्हणून पुढे यालं.

 

blood-group-organisation-marathipizza

स्रोत

जर कोणाचा बॉम्बे ब्लड ग्रुप असेल तर त्यांनी  www.bombaybloodgroup.org  या संकेतस्थळावर संपर्क साधावा. म्हणजे भविष्यात तुम्हाला किंवा तुमच्या ओळखीच्यांना या दुर्मिळ ब्लड ग्रुपची गरज पडली तर ही संस्था तुमच्या मदतीला धावून येईल.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

 शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

One thought on “बॉम्बे ब्लड ग्रुप! होय, हा आहे मराठी माणसाने शोधलेला दुर्मिळ ब्लड ग्रुप!!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?