' करोनासारख्या साथींवर भाष्य करणारे “हे” ६ चित्रपट अनेक अज्ञात गोष्टींचा उलगडा करतात – InMarathi

करोनासारख्या साथींवर भाष्य करणारे “हे” ६ चित्रपट अनेक अज्ञात गोष्टींचा उलगडा करतात

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामशेअरचॅट

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

===

चार महिन्यांपासून कोरोना या महाभयंकर साथीचा सामना आपण सगळेच करत आहोत.

एकमेकांची अशाप्रकारे साथ देत ह्या भयंकर साथीला आटोक्यात आणण्यासाठी सर्वच प्रयत्न करतायत. घंटानाद, टाळ्यांचा कडकडाट ह्याने अगदी काहीच वेळात वातावरणही प्रसन्न केलं.

सुट्टी असताना घरी बसणं आणि बाहेरच्या भीषण परिस्थितीमुळे घरी बसणं ह्यात नक्कीच फरक आहे. म्हणूनच मनावरची मरगळ, थोडं नैराश्य ह्या टाळ्यांच्या कृतीमुळे नक्कीच कमी झालंय.

तसंच आपल्याला मदत करत ह्या परिस्थितीशी झुंजणाऱ्यांपर्यंत आपल्या कृतज्ञतेच्या भावनाही आपण पोहोचवू शकलोय..! मात्र, मित्रांनो हा शेवट नक्कीच नाहीये, ही तर फक्त सुरुवात आहे.

 

China-coronavirus feature InMaarthi

 

‘City that never stops’ असं आपल्या मुंबई ला म्हटलं जातं आणि चक्क आपली ही मुंबईदेखील थांबलीय! एखाद्या चित्रपटात शोभावं असंच काहीसं हे दृश्य आहे.

एरव्ही पावसाळ्यात पण धीम्या गतीने का होईना पण विस्कळीत होऊन चालणाऱ्या रेल्वे नामक जीवनवाहिन्याही मोठ्या कालावधीसाठी बंद असणं अगदीच ऐतिहासिक आहे!

ही परिस्थिती जर एखादा चित्रपट मानली तर आपण सगळे ह्या चालत्या बोलत्या चित्रपटातली जिवंत पात्रच जणू . बऱ्याचदा चित्रपट हे एखाद्या सत्यघटनेतून प्रेरणा घेत तयार होतात. विषयाचा धागा गावतो आणि मग विणला जातो तो चित्रपट.

सध्या कोरोना व्हायरसने जो उन्माद केलाय त्यावरही भविष्यात डॉक्युमेंटरी/ चित्रपट येणं अगदीच शक्य आहे.

मात्र ह्यासारख्या इतर काही साथीच्या रोगांवर भाष्य करणारे अजूनही काही चित्रपट आहेत ज्यांची माहिती आपण आज घेणार आहोत.

१. Virus (२०१९) :

 

corona virus movies inmarathi 5

 

आशिक अबू दिग्दर्शित virus हा मल्ल्याळम भाषेतील चित्रपट आहे. आपल्याला माहित आहे की, २०१८ साली केरळ मध्ये निपा व्हायरस पसरला होता.

कोझिकोड आणि मलप्पुरम या भागात त्यामुळे जवळजवळ १७ जण प्राणाला मुकले होते. आणि ह्याच सत्यघटनेतून प्रेरणा घेत virus हा चित्रपट तयार करण्यात आला.

एका तरुणाला डोकेदुखी, उलट्या आणि ताप ह्या लक्षणांमुळे इस्पितळात भरती केलं जातं आणि त्यानंतर थोड्याच वेळात त्याची सुश्रुषा करणाऱ्या नर्सलाच श्वासोश्वासात अडथळे येऊ लागतात. आणि मग उलगडतं ते कटू सत्य.

समजतं की, हा साधासुधा आजार नाही तर जीवघेणा virus आहे. अर्थातच बघताबघता हा जिवाणू संपूर्ण शहरभर पसरू लागतो आणि वैज्ञानिक तसेच डॉक्टर त्याच्याशी दोन हात करतात.

हा virus वटवाघुळांमुळं पसरला की औषधाच्या कंपनीतल्या माफियांमुळे? हा नक्की रोग आहे की आतंकवाद्यांचं शस्त्र? ह्या सगळ्या गोष्टींचा उलगडा हा चित्रपट पाहून नक्कीच होईल.

२. 28 डेज़ लेटर :

 

corona virus movies inmarathi 4
apsari.com

 

स्लमडॉग मिलियनेयर ज्यांनी तयार केला अशा डैनी बॉयल ह्यांनी हा चित्रपट दिग्दर्शित केला आहे. ह्या चित्रपटातील नायक जिम हा कोमात गेलेला असतो.

चित्रपटाच्या नावाप्रमाणे २८ दिवसांनंतर तो कोमामधून सुखरूप बाहेर पडतो आणि बघतो तर काय? संपूर्ण जगाची नासधूस झालीये, सगळं अस्ताव्यस्त झालंय!

चिंपांजीमुळे एक जीवघेणा विषाणू सगळीकडे भराभर पसरतो आणि त्याचा प्रसार वाढतच जातो. आणि काय आश्चर्य! तो virus ज्या व्यक्तीत शिरतो त्याचं रूपांतर झॉम्बीत होतं.

झॉम्बी म्हणजे रक्ताला हपापलेला जिवंत मृतदेह. अगदी रक्तपिपासूच म्हणा ना! पूर्ण शहरात असे झॉम्बी फिरू लागतात.

उरलेले चार जण स्वतःला वाचवू शकतात का? कसे वाचवतात? त्यांच नक्की काय होतं? हे सगळं चित्रपट बघताना तुम्हाला कळेलच. सत्यघटनेवर आधारित नसलेला हा चित्रपट नक्कीच चुरस वाढवणारा आहे.

३. आउटब्रेक (1995) :

 

corona virus movies inmarathi 3
CNN.com

 

वोल्फगैंग पीटरसन ह्यांनी हा चित्रपट दिग्दर्शित केलेला आहे. आफ्रिकेतील जंगलात मिळालेल्या मोटाबा virus आणि त्यामुळे झालेल्या गदारोळाभोवती कथानक फिरतं.

आफ्रिकेतून एक माकड तस्करी करून अमेरिकेत आणलं जातं. त्यातच ऍनिमल टेस्टिंग लॅबोरेटरीचा एक कर्मचारी त्या माकडाला पळवतो आणि अर्थातच काळ्याबाजारात त्याची विक्री करतो.

जे व्हायला नको ते होतं;विषाणू संपूर्ण शहरात पसरू लागतो आणि म्हणून ते शहर आयसोलेट केलं जात. अशा ह्या रोगट शहराला सरळ बॉम्बने उडवण्याचेही काहींचे मनसुबे असतात.

तर काहीजण ह्या वायरसचा वापर करून अस्त्र बनवायच्या विचारात असतात. ह्या सगळ्यातच ह्या संसर्गापासून सामान्य जनतेला वाचवण्यासाठी सैन्यदल प्रयत्नांची पराकाष्टा करत असतात.

त्यांना त्यासाठी काय काय करावं लागतं? आणि पुढे काय होतं हे बघणं नक्कीच औत्सुक्याचं आहे. सध्याची जागतिक परिस्थिती पाहता काही गोष्टी आपण रिलेट करू शकतो.

४. कंटेजियन (2011) :

 

corona virus movies inmarathi 2
techrader

 

स्टीवन सोडरबर्गने हा चित्रपट दिग्दर्शित केला आहे. वटवाघुळांच्या आणि डुकरांच्या मार्फत एक व्हायरस पसरतो आणि अमेरिकेतील ‘सेंटर फॉर डिसीज अँड कंट्रोल’ मध्ये एली त्यावर प्रतिबंधात्मक लस तयार करत असते.

अशी लस घेण्यासाठी लोकांची झुंबड उडते आणि लॉटरी पद्धतीने तिचं वाटप केलं जातं. त्यातच एकजण स्वतःचा इलाज फोरसाइथिया ह्या औषधाने केल्याचं सांगतो आणि त्या औषधासाठी फार्मसी समोर रंग लागते.

त्यातच WHO च्या डॉक्टर ला हॉंगकॉंग मध्ये किडनॅप केलं जातं. ह्या सगळ्या नाट्यात हा वायरस थांबवता आला असेल का? जगात पुन्हा शांतता पसरली असेल का? चित्रपट नक्कीच ह्याची उत्तरं देईल.

५. ब्लाइंडनेस (2008) :

 

corona virus movies inmarathi1
empire

 

फर्नेंडो मरिल्स हे ह्या चित्रपटाचे दिग्दर्शक असून ‘सिटी ऑफ़ गॉड्स’ आणि ‘टू पोप्स’ हेही चित्रपट त्यांनी केले आहेत. हा रोमांचकारी चित्रपट सैरामेगो यांच्या ‘ब्लाइंडनेस’ ह्या कादंबरीवर आधारित आहे.

जपानमध्ये गाडी चालवताना अचानक एका मुलाला दिसणं बंद होतं आणि तो डॉक्टर कडे जातो; तर त्या डॉक्टरचीही दृष्टी अधू होते. आणि ही अशी अंधत्वाची साथ पसरू लागते व पीडितांना सुरक्षेसाठी क्वारंटाईन करण्यात येतं.

हळूहळू त्या कॅम्प मधील अन्न संपू लागतं आणि लोकांमधली माणुसकी संपुष्टात येऊ लागते.

लोकांना फक्त विषाणूच नव्हे तर माणसातील सैतानाचाही सामना कसा करावा लागतो हे बघणं अंगावर काटा आणणारं आहे.

६. द हॉट ज़ोन (2019) :

 

corona virus movies inmarathi

 

माइकल उपेन्डाहल व निक मर्फी ने हयाचं दिग्दर्शन केलं आहे. वॉशिंग्टनमध्ये एका लॅब मध्ये एका माकडात इबोला व्हायरस दिसून येतो तो पसरू नये म्हणून डॉक्टर नॅन्सी ह्यांना उपाय शोधायचा असतो.

त्यांचा कर्मचारी गुपचूप माकडाचं सॅम्पल पळवतो व उपाय शोधू लागतो. मात्र व्हायरस पसरतोच.

ह्यावर इलाज शोधणं आणि आपल्या कुटुंबाला वाचवणं अशी दुहेरी जबाबदारी सांभाळणारी नॅन्सी हे सगळं कसं बरं हाताळत असेल हे नक्की बघायला हवं.

मित्रांनो, आपल्याकडची परिस्थिती आटोक्याबाहेर गेली तर ह्यातलं एखादं चित्र सत्यात उतरायला वेळ लागणार नाही. म्हणून आपण योग्य ती दक्षता घेऊया.

आणि चित्रपटासारख्या भासणाऱ्या आत्ताच्या परिस्थितीचा हैप्पी एन्ड करूया. घरात बसून कंटाळा येणं स्वाभाविक आहेच आणि म्हणूनच सतत कोरोनाबद्दल चर्चा करण्याऐवजी आवडणार असतील हे चित्रपट बघूया.

===

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्रामशेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?